' इराणने अमेरिकेचं ड्रोन पाडलं आणि ट्रम्प तात्या भडकले! – InMarathi

इराणने अमेरिकेचं ड्रोन पाडलं आणि ट्रम्प तात्या भडकले!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

अलीकडे असे म्हटले जाते की तिसरे महायुद्ध झाले तर ते तेलाच्या प्रश्नावरून होईल. आणि या आठवड्यात घडलेल्या काही घटना पाहून खरंच जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे की काय असे वाटू लागलेय.

मंडळी तुम्हाला माहितीय अशा कोणत्या घटना घडल्या की ही परिस्थिती निर्माण झाली? तर दोन अशा घटना घडल्या आहेत की अमेरिकेसारख्या महासत्तेने इराणलाधमकावले.

कोणत्या आहेत या घटना? पहिली घटना घडली ती गेल्या गुरुवारी.

ओमानच्या आखातातून जाणाऱ्या अमेरिकेच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला झाला आणि अमेरिकेला संशय आला इराणचा. अर्थातच इराणने हा आरोप नाकारला.

 

drone inmarathi
Al-Masdar News

परंतु अमेरिकेच्या लष्कराने एक व्हिडिओ जारी केला ज्यात एक इराणी नौका क्षतीग्रस्त झालेल्या तेलवाहू जहाजाच्या बाहेरील बाजूस स्फोट न झालेला लिंपेट बॉम्ब काढत असताना दिसतेय.

परंतु व्हिडिओमधे दिसणारी नौका अंधुक दिसत असल्याने अर्थातच इराणने साफ नाकारले ती आपली नौका असल्याचे. झाले! ही घटना घडल्यावर चर्चा होणे स्वाभाविकच होते.

अमेरिका यामुळे प्रचंड खवळली आहे. त्यातच परवा होर्मुजच्या सामुद्रधुनीवरून जाणारे अमेरिकेचे ड्रोन इराणने पाडले.

आता या घटनेने अमेरिकेचे प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प अतिशय खवळणे स्वाभाविकच होते म्हणा. त्यांनी तर इराणला धमकीच दिली की ते याच बदला घेतील.

इराणने देखील “आमचा युद्धाचा इरादा नाहीय, परंतु आम्हाला कोणी डिवचले तर आमची युद्धाची तयारी आहे”.असे सांगून आगीत तेल ओतले.

असे काय घडले असेल मंडळी की इराणने अमेरिके सारख्या महासत्तेचे ड्रोन उडवायची हिम्मत दाखवली?

 

drone flying inmarathi
Al-Masdar News

वाचा तर..

ओमानच्या आखातातील तेलवाहू जहाजांवरील हल्ला इराणानेच केलाय यावर अमेरिकेचा विश्वास होता. जे ड्रोन इराणने पाडले ते इराणच्या हवाई हद्दीतून जात नव्हते तर होर्मुजच्या सामुद्रधुनीवरून आंतरदेशीय हवाई हद्दीतून जात होते असा दावा अमेरिकेने केला.

तर इराणच्या मते ते इराणच्या हवाई हद्दीतून इराणवर टेहेळणी करत होते.

अलीकडील काही वर्षात इराण आणि अमेरिका यांच्यात सतत व्यापारी संघर्ष चालू आहे. अमेरिकेने इराणवर आर्थिक निर्बंध घातलेले आहेत. अशा परिस्थितीत अमेरिका आपल्यावर नजर ठेवून आहे असा इराणला संशय होता.

त्यातच आपल्या हवाई हद्दीत ड्रोन बघताच इराणने ते ड्रोन उडवले.अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी असेच इराकच्या बाबतीत करून इराकवर युद्ध लादून सद्दाम हुसेन यांची सत्ता उलटवली होती.

आता आपला नंबर लागतोय हे लक्षात आल्यावर इराणने देखील ‘हम भी कुछ कम नहीं’ हे दाखवण्यासाठी आणि युद्ध लादल्यास आमची लढायची तयारी आहे हा अगदी खणखणीत इशारा अमेरिकेला देण्यासाठीच ड्रोन उडवले.

मंडळी काही अंदाज करू शकता का की कसे होते अमेरिकेचे ड्रोन? आणि त्याची किंमत काय होती ते?

 

america inmarathi
arinews.com

मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेचे ड्रोन ५० फूट लांबीचे होते व त्याच्या पंखांची लांबी १३० फूट होती. टेहेळणी करण्यासाठी लागणारी सर्व अत्याधुनिक उपकरणे त्यावर बसवलेली होती.

याशिवाय हे ड्रोन वेळ पडल्यास शत्रूच्या प्रदेशात क्षेपणास्त्रे डागु शकत होते आणि त्यासाठी अतिशय आधुनिक अशी रशियन बनावटीची S 300 ही क्षेपणास्त्र प्रणाली त्यावर बसविलेली होती.

सामान्य प्रवासी विमाने ३३००० हजार ते ३८००० फूट उंचीवरून उडतात. परंतु हे ड्रोन तब्बल ५६००० फुटांवरून ताशी ६०० किमी वेगाने उडू शकत होते.

आणि त्याची किंमत किती असेल काही अंदाज करू शकता? या R Q 4 GLOBAL HAWK ड्रोनची किंमत होती तब्बल १२६० कोटी रुपये.
आता असे ड्रोन आपल्याच हवाई हद्दीतून आपल्यावर टेहेळणी करतेय हा संशय आल्यानेच इराणने ते ड्रोन पाडले.

खवळलेल्याअमेरिकेचे प्रेसिडेंट ट्रम्प यांनी इराणला काय धमकी दिली? आणि नंतर घुमजाव का केले असावे?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इतके शस्त्रसज्ज आणि महागडे ड्रोन पाडले गेल्याने संतापले. मुख्य म्हणजे इराणसारख्या ‘किरकोळ’ देशाने अमेरिकेसारख्या महासत्तेच्या वस्त्राला हात घातलाय असे ट्रम्प याना वाटले आणि त्यांनी इराणला खणखणीत इशारा दिला.

 

Donald Trump-marathipizza
media.snn.ir

अमेरिकेचे नौदल आणि वायुदल दोन्ही सज्ज ठेवायचे आदेश ट्रम्प यांनी दिले. ट्रम्प सत्तेवर आल्यापासून एकूणच मुस्लिम देशांविषयीचे त्यांचे धोरण हे मुस्लिमांना त्रास देण्याचेच आहे हे सर्वांना माहिती आहेच.

निवडणुक लढताना ह्याच मुद्द्यावर ते निवडून आले. मात्र त्यांचे हे अतिरेकी मुस्लिमविरोधी धोरण त्यांच्याच सरकारमधील अनेकांना पसंत नसल्याने त्यांचे सहकारी त्यांना सोडून दूर होऊ लागलेत.

युद्धाची ठिणगी पडतेय असे वाटत असतानाच अचानक ट्रम्प यांनी आपल्या निर्णयापासून घुमजाव केले. पेंटेगॉन मधील अनेकांच्या भुवया यामुळे उंचावल्या.

युद्धनौका आणि विमाने सज्ज असताना कशासाठी त्यांनी माघार घेतली हेच अधिकाऱ्यांना कळेना.

स्वतः ट्रम्प याबाबतीत काहीच बोलायला तयार नाहीत मात्र “कदाचित दुसऱ्या कोणाकडून हे मूर्खपणाचे कृत्य घडले असावे” असे त्यांनी बोलून दाखवले.

अर्थातच ट्रम्प यांची धोरणे ज्यांना माहिती आहेत त्यांच्यामते ट्रम्प चुप बसणाऱ्यांपैकी नाहीत. कदाचित ते आणखी चांगल्या संधीची वाट बघत असावेत.

मंडळी, भारतावर या गोष्टीचा काही परिणाम होऊ शकेल असे वाटते का तुम्हाला? इराण आणि अमेरिकेच्या या वादात भारत निष्कारण का ओढला जातोय?

 

america-india-inmarathi
hindustantimes.com

या गोष्टी वरवर पाहता इराण आणि अमेरिका यांच्यातील अंतर्गत धुसफूस आहे असे वाटत असेल तर ते चुकीचे आहे. इराणकडे मोठ्या प्रमाणात तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे आहेत. त्यामुळेच इराण तेलपुरवठा करणाऱ्या देशांपैकी एक आहे.

खरंतर इराणकडे साधनसामग्रीचा तुडवडा असल्याने अजून किती तेलसाठा भूगर्भात आहे याचा अंदाज लावणं कठीण आहे. भारताला लागणाऱ्या तेलापैकी ५०% तेल भारत इराणकडून घेतो आणि नेमके हेच अमेरिकेला डाचत आहे.

या शिवाय आपण इराणचे चाबहार बंदर विकसित करून देतोय हे अमेरिकेला खटकतय. म्हणून अमेरिकेने ५ जुलैला ठरलेली द्विस्तरीय चर्चा पान पुढे ढकलली आणि आयातीवर निर्बंध आणि आयात शुल्क वाढवले.

एकंदरीत इराण प्रश्न बराच कंगोऱ्यांचा बनलाय हे निश्चित आणि भारताला चुचकारून आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न अमेरिका करत आहे.

अर्थातच या मध्ये असलेला रशियाचा अडथळा दूर झाल्याखेरीज अमेरिका काहीच करू शकत नाही. म्हणूनच सध्यापुरती अमेरिकेने माघार घेतलेली दिसतेय इतकेच.

भारताने देखील सावधगिरी बाळगणे जरुरीचे आहे कारण प्रचं मोठी रक्कम इराणमध्ये आपण गुंतवलेली आहे. सध्या ट्रम्प थोडे घुमजाव मोडमध्ये असले तरी मुळ प्रश्न धुमसत आहे हे लक्षात असू देण्यातच शहाणपणा आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?