' युवराजच्या निवृत्तीच्या घोषणेवर सौरव गांगुली जे म्हणतोय ते विचारात टाकणारं आहे – InMarathi

युवराजच्या निवृत्तीच्या घोषणेवर सौरव गांगुली जे म्हणतोय ते विचारात टाकणारं आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

युवराज सिंग भारतीय क्रिकेट विश्वातील एक लाडकं नाव. नुकतीच त्याने प्रतिस्पर्धी क्रिकेट मधून निवृत्ती घेत असल्याचे एका पत्रकार परिषदेद्वारे जाहीर केले. या डावखुर्या फलंदाजाने क्रिकेट विश्वात खुपच चमकदार कामगिरी केलेली आहे. परंतु, त्याच्या निवृत्तीची हे घोषणा त्याच्या चाहत्यांना फारशी आवडलेली नाही.

जून २०१७ मध्ये तो शेवटची मॅच खेळल्यानंतर, आता मैदानापासून दूर राहूनच त्याने निवृत्त होत असल्याचे जाहीर केले.

जगभरातील काही अगदी मोजक्या क्रिकेट खेळाडूंच्या यादीत युवराज सिंह हे नाव सन्मानपूर्वक सामावलेलं आहे. आपली निवृत्ती जाहीर करताना त्याने चाहत्यांचे विशेष आभार मानले. मी मरेपर्यंत क्रिकेटवर प्रेम करतच राहीन असेही तो म्हणाला.

आयुष्यातील कठीण प्रसंगाशी कसा सामना करावा हे मी याच खेळातून शिकलो. त्यामुळे माझ्या भावना नेमक्या कशा मांडता पद्धतीने येणे कठीण आहे. माझ्या वडिलांचं स्वप्र पूर्ण करू शकतो याचा मला अभिमान आहे असेही तो म्हणाला.

 

yuvraj featured 1 inmarathi
Livemint

युवराजने अशा प्रकारे मैदानाबाहेर निवृत्त न होता, एखादी फेअरवेल मॅच खेळायला काय हरकत आहे? याबाबत माजी क्रिकेटपट्टू सौरभ गांगुलीला विचारले असता तो म्हणाला की,

“अशा खेळामुळे खूप काही फरक पडत नाही. युवराजने फेअरवेल मॅच खेळली नाही म्हणून भारतीय क्रिकेट विश्वातील त्याचे स्थान जरा सुद्धा कमी होणार नाही. कारण, युवराज नेहमीच भारतीय क्रिकेट विश्वात चमकणारा एक दैदिप्यमान तारा असेल.”

युवराज हरभजनसिंग, आशिष नेहरा आणि झहीर खान अशा कित्येकांच्या यशाचं श्रेय नेहमीच गांगुलीला दिलं जातं.

”मला तसं बिलकुल वाटत नाही (रिटायरमेंट मॅच झाली पाहिजे). मला याप्रकारच्या मॅचेसवर काडीमात्र विश्वास नाही.” आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप २०१९, साठी फेसबुक लाइव्ह वरून बोलताना गांगुली सांगत होता.

“त्याने फेअरवेल मॅच खेळली नाही तरी, एक खेळाडू म्हणून त्याने जे काही कमावले आहे त्याचे मूल्य कमी होत नाही. यावर माझा अजिबात विश्वास नाही. तो एक अतिशय उत्कृष्ट खेळाडू राहिला आहे… मॅच जिंकणारा खेळाडू. त्याने जे काही कमावले आहे त्याचा आपल्याला अभिमान असायला हवा,”

असेही तो म्हणाला.

 

sourav-ganguly-inmarathi
iloveindia.com

युवराजने २००० साली सौरभ कप्तान असताना, केनिया विरुद्ध पहिला अंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला होता.

या खेळात त्याला बॅटिंग करण्याची संधी मिळाली नव्हती पण, दुसर्या सामन्याच्या वेळी त्याला ही संधी मिळाली आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८४ धावा काढून त्याने अंतरराष्ट्रीय सामन्यातील आपले आगमन अधोरेखित केले.

त्यांनतर या खेळाडूने भारताच्या वतीने खेळताना कधीही मागे वळून तर पहिले नाहीच पण, त्याने स्वतःला एक चतुरस्त्र खेळाडू म्हणूनही सिद्ध केले.

त्याने क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक वेगवान अर्धशतक नोंदविताना पन्नास धावा करण्यासाठी फक्त १२ चेंडू घेतले.

भारताला २००७ साली (टी२० वर्ल्ड) आणि २०११ साली (ओडीआय वर्ल्ड कप) मिळालेल्या ऐतिहासिक विजयात त्याने महत्वाची कामगिरी बजावली. टी-२० वर्ल्ड कप मध्ये सर्वात जास्त धावा मिळवणाऱ्या खेळाडूंमध्ये त्याचा तिसरा क्रमांक लागतो.

 

yuvraj featured inmarathi
GQ India

२०११ साली पाकिस्तानला हरवून भारताला विजय मिळवून देण्यात त्याचा मोलाचा वाटा होता. या संपूर्ण मालिकेत त्याने १५ विकेट आणि ३६२ रन काढून मॅन ऑफ द टूर्नामेंट हा किताब मिळवलेला.

२००७ ते २००८ पर्यंत तो भारतीय एकदिवसीय संचाचा उपकर्णधार होता. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सन २०१२ मध्ये युवराज सिंहला भारतातील दुसऱ्या सर्वोच्च क्रीडा अर्जुन पुरस्कार बहाल केला.

सौरभ गांगुलीने त्याच्या अनेक हृद्य आठवणी देखील सर्वांसोबत शेअर केल्या आहेत. आम्ही सोबतच ऑस्ट्रेलियाला गेलो आणि पदार्पणाच्या सामन्यातच तो मॅन ऑफ द मॅच ठरला.

चाम्पियान करंडक स्पर्धेच्या उपांत फेरीत आम्ही एका वजनदार संघाचा पराभव केला होता. अशा कित्येक आठवणी सौरभने शेअर केल्या.

“टी २० क्रिकेटमध्ये त्याने मारलेले सलग सहा षटकार मी कधीही विसरू शकत नाही” असे गांगुली म्हणाला.

अगदी पदार्पणाच्या मॅच मध्येच त्याने वर्ल्डकप सामना जिंकण्यास हातभार लावला आणि त्या मालिकेमध्ये त्याने मॅन ऑफ द टूर्नामेंट हा बहुमान देखील मिळवला. त्याच्या अशा अनेक आठवणी माझ्या स्मरणात राहतीलच.

 

yuvraj-marathipizza04
quoracdn.net

एका ओव्हर मध्ये तेही समोर एक तरबेज फास्ट बॉलर असताना सलग सहा षटकार मारणे ही काही साधी गोष्ट नव्हे. युवराजच्या चाहत्यांना मात्र त्याच्यासाठी एखादी फेअरवेल मॅच झाली पाहिजे असे वाटते.

भारताचा उप-कप्तान रोहित शर्माने देखील सोशल मिडियावर युवराजसाठी एक फेअरवेल मॅच झाली पाहिजे असे वक्तव्य केले आहे.

त्यावर युवराजने रोहितला आतून काय वाटते तेच तो बोलला असा रिप्लाय देखील दिला आहे. युवराजने मात्र याबाबत कोणताही आग्रह केलेला नाही. बीसीसीआय मध्ये माझ्यासाठी फेअरवेल मॅच झाली पाहिजे असे मी कोणाजवळही बोललो नसल्याचे ते सांगतो.

माझ्याजवळ क्षमता नसती तर मी कधीच खेळपट्टी वरूनच निवृत्ती जाहीर केली असती. परंतु, मला फेअरवेल मॅचची गरज नाही. मी म्हंटल होत की जर यो-यो टेस्टमध्ये मी अपयशी ठरलो तरच मी फेअरवेल मॅच खेळेन अन्यथा मी खेळणार नाही.

 

yuvraj inmarathi
india.com

आणि जरी मी यो-यो टेस्टमध्ये अपयशी ठरलो असतो तरी मी शांततेतच निवृत्ती स्वीकारली असती. परंतु, यो-यो टेस्ट मध्ये मी विजयी ठरलो.” युवराज म्हणाला.

तो जर यो-यो टेस्ट मध्ये अपयशी ठरला असता तर त्याने स्वतःहून फेअरवेल मॅचची मागणी केली असती अशी कबुली देखील त्याने दिली. परंतु, भारतीय क्रिकेट जगतातील काही लोकांनी युवराजसाठी फेअरवेल मॅच झाली पाहिजे या मागणीचा जोर धरला आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?