' इतिहासातला एक असा अणुस्फोट ज्याच्या दाहकतेने आपण आजही होरपळले जातोय… – InMarathi

इतिहासातला एक असा अणुस्फोट ज्याच्या दाहकतेने आपण आजही होरपळले जातोय…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपणा सर्वांस माहितीय की गेली चार ते पाच वर्षे कोकणातील जैतापूर येथील अणु ऊर्जा प्रकल्पाला स्थानिकांचा मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अखेर प्रकल्प तेथे होणार नाही असे आश्वासन सरकारला द्यावे लागले. काय होते स्थानिकांचे म्हणणे आणि का होता एवढा विरोध?

स्थानिकांचा विरोध केवळ मच्छीमारीस होणारा अटकाव किंवा त्रास एवढंच नव्हे तर जर प्रकल्पात कोणत्याही स्वरूपाची दुर्घटना घडली तर त्याचे जे भयानक परिणाम भोगावे लागतील यासाठी होता.

 

jaitapur inmarathi
The Hindu

त्यासाठी जैतापूर प्रकल्प विरोधी समिती दाखला देत होती चेर्नोबिल अणुभट्टी दुर्घटनेचा.

काय आहे हे चेर्नोबिल प्रकरण? अशी कोणती मोठी दुर्घटना घडली होती की संपूर्ण जग हादरून गेले होते?

आपणास माहितीय ह्या चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पाने किती बळी घेतले होते ?

अभ्यासकांच्या मते ४००० ते ९०००० इतका हा आकडा मोठा आहे कारण किरणोत्सर्गाने बाधित लोकांच्या पेशीत झपाट्याने बदल होऊन तेथे कॅन्सरच्या पेशी निर्माण होऊन हजारो रुग्ण कॅन्सरने दगावले आणि पुढील पिढीत देखील कॅन्सर आढळून आल्याने एवढि मोठी संख्या गाठली गेली.

गर्भवती स्त्रियांचे गर्भपात झाले आणि लाखोंचे गर्भपात करवून घेण्यात आले कारण विकृती घेऊन बालके जन्मू नयेत म्हणून. किती भयानक आहे हे सर्व. जाणून घेऊया या विषयी अधिक.

३३ वर्षांपूर्वी युक्रेनच्या चेर्नोबिल या अणुभट्टीमध्ये २६ एप्रिल १९८६ ला मोठा स्फोट झाला आणि ३ कामगार जागीच मृत्यू पावले तर काही हजारोंच्या संख्येत लोक रेडीएशनमुळे मरण पावले.

युक्रेन हा तेव्हा रशियाचा भाग होता. रशियाच्या पोलादी पडद्याआड नक्की काय चालू असते हे जगासमोर येत नाही किंवा सरकारला जेवढे सांगायचे असते तेवढेच बाहेर पडते.

रात्रीच्या एक वाजून तेवीस मिनिटांनी घडलेली ही घटना जगासमोर यायला खुपच कालावधी लागला.तो पर्यंत मोठया प्रमाणात नुकसान होऊन गेले होते.

तेहेतीस वर्षे उलटलीत ही घटना घडून म्हणजेच ३३ वर्षांपूर्वी जी माणसं किमान पंधरा किंवा त्यापेक्षाही जास्त वयाची असतील त्यांना ही दुर्घटना आठवत असेल.

 

chernobyl inmarathi
Herald Sun

त्यावेळेस काय काय घडले आणि त्याचे दुष्परिणाम त्यांना चांगलेच आठवत असतील.त्यावेळच्या लहान मुलांना त्याचे गांभीर्य नंतर समजले असेल.

कोणत्या अशा दहा गोष्टी आहेत ज्या फारशा उजेडात आल्या नव्हत्या किंवा त्यावर फार चर्चा झाली नव्हती? बघुया कोणत्या आहेत त्या गोष्टी?

(१) – स्वीडनकडून पहिला इशारा दिला गेला.

आपण पाहिलंय की २६ एप्रिल १९८६ ला दुपारी एक वाजून तेवीस मिनिटांनी चेर्नोबिल अणुभट्टीत खुप मोठा स्फोट झाला आणि तीन कामगार जागीच ठार झाले.

प्रकल्प अधिकाऱ्यांनी लगेच ही बाब सरकारला कळवली आणि सरकारने त्या प्रकल्पाच्या आजूबाजूचा मोठा रहिवाशी एरिया रिकामा करून लोकांना त्वरित तेथून हलविले.

परंतु विस्थापितांना त्याची कोणतीच माहिती देण्यात आली नाही.

 

chernobyl 1 inmarathi
Sky News

आपल्याला का हलविण्यात येत आहे हे त्यांना अजिबातच सांगण्यात नाही आले. अर्थातच बाहेरील जगास देखील याचा काहीच पत्ता लागू देण्यात आला नाही.

मराठीत एक म्हण आहे मांजर कितीही डोळे मिटून दूध पिऊदे, जगास खबर लागते. अगदी तस्सेच घडले.

रशियन सरकारने बातमी बाहेर येऊ दिली नसली तरी वातावरणात तयार झालेल्या किरणोत्सर्गास थोडेच बांधून ठेवता येते?
रेडिओ ऍक्टिव्ह किरणे दूरवर पसरत गेली.

तसेच स्फोटातून तयार झालेले आयसोटोप्स देखील धुळीबरोबर आसमंतात पसरून वाऱ्याबरोबर बाहेर गेले. स्वीडनच्या एक न्यूक्लिअर प्लॅन्टमधील काही कामगारांना त्यांच्या सेन्सरवर किरणोत्सर्गा मधील वाढ दिसून आली.

त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात ही गोष्ट आणली.अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्लॅन्टची कसून तपासणी केल्यावर हा किरणोत्सर्ग तेथून निर्माण झालेला नाही याची खातरजमा करून घेतली व लगेच अलर्ट जारी केला.

त्यामुळेच बाहेरील देशांचे उपग्रह युक्रेनच्या दक्षिणेकडे रोखले गेले आणि मग तेथील अभ्यासातून चेर्नोबिल येथे काही दुर्घटना घडली असावी असे निष्कर्ष काढण्यात आले. अखेर रशियन सरकारला या विषयी माहिती द्यावीच लागली.

(२) – किरणोत्सारीत आयोडीन ठरले मृत्यूचे कारण.

चेर्नोबिल येथे स्फोट होताच वातावरणातील किरणोत्सर्गाचे चे प्रमाण वाढले. या प्रक्रियेत आयसोटोप्सची निर्मिती होते.हे आयसोटोप्स म्हणजे असे विद्युतभारीत कण असतात ज्यांच्यात अणुचे प्रमाण कमीजास्त असते व हे धुळीत मिसळून सर्वदूर पसरतात.

 

chernobyl 2 inmarathi
Reuters

या सोबतच आयोडिनची प्रक्रिया होऊन किरणोत्सारीत आयोडिनची निर्मिती होऊन ते जमिनीवर पसरते.

आयोडिनचा तात्काळ परिणाम थायरॉईड ग्रंथीवर होतो. हे किरणोत्सारीत आयोडीन लगेच ग्रंथीत साठू लागते आणि काही दिवसातच माणसाचा मृत्यू होतो. तसेच तेथे कॅन्सर होऊन काही महिन्यांत अथवा एक दोन वर्षात बधितास मृत्यू येतो.

(३) – स्ट्रोनटीयम 90 आणि सेसियम 137 हे दूरगामी मृत्यूदूत ठरले.

हे दोन्ही अनुक्रमे २८ आणि ३० वर्षे कार्यरत राहतात आणि त्या कालावधीत मृत्यू ओढवू शकतो. स्ट्रॉनटीयम 90 चा संयोग कॅल्शियमशी होतो आणि त्याचा परिणाम हाडांवर होतो आणि हाडांची झीज होत मृत्यू येतो.

 

chernobyl 3 inmarathi
Atlas Obscura

तर सेसियमचा संयोग पोटॅशियमशी होऊन ते रक्तात मिसळले जाते आणि रक्तातीती आणि शरीरातील टिश्यू कमकुवत होऊन मृत्यू ओढवतो.
किरणोत्सर्गाने हे निर्माण होतात. जे चेर्नोबिल मधील हजारोंच्या मृत्यूस कारणीभूत ठरले.

(४) – चेर्नोबिल मधील किरणोत्सर्गाचे कमीजास्त प्रमाण

किरणोत्सर्ग होताना त्यांचे विविध लांबीचे तरंग तयार होतात.  त्यातील आयसोटोप्स मुळे अल्फा,बीटा आणि गामा किरण मोठ्या प्रमाणात तयार होतात.

 

chernobyl 4 inmarathi
RT.com

तसे एरवी देखील हे किरण वातावरणात असतात पण किरणोत्सर्ग झाल्यावर यांचे प्रमाण वाढते आणि हे शरीरातील पेशींवर परिणाम करतात आणि शरीरातील डीएनए ची रचना बदलते.

(५) -चेर्नोबिलमधे आता कोणी रहात नाही.

या मोठ्या दुर्घटनेची माहिती जगासमोर आल्यावर लोकांनी परत तेथे जाऊन रहाणे नाकारले.चेर्नोबिल शेजारील प्रिप्यात शहरात लोक टूरवर येतात.तेथील रिकामी घरे बागा, ओस पडलेल्या शाळा,पाहून तेथील मृतांना श्रद्धांजली वाहून परत जातात.

 

chernobyl 5 inmarathi
Fairewinds

तरी काही अतिवृद्ध मंडळी आपला जीव धोक्यात घालून आपली हक्काची जागा न सोडता तसेच रहात आहेत पण त्यांची संख्या नगण्य आहे.

(६) – चेर्नोबिलमध्ये अजूनही मृत्यूचा धोका कायम आहे.

एकदा किरणोत्सर्ग झाला की तो किमान चाळीस वर्षे टिकून रहातो. या शिवाय ज्यांना त्याची बाधा झाली आहे त्यांच्या पुढील पिढीत देखील त्याचे परिणाम दिसून येतात.

 

chernobyl 6 inmarathi
news18.com

चेर्नोबिल परिसरातील झाडे गवत सर्व नाहीसे झाले असून त्या भागास ‘रेडफॉरेस्ट’ म्हटले जाते,तसेच त्या भागात किरणोत्सर्ग बधितांचे मृतदेह पुरण्यात आले आहेत आणि तेथील जमिनीत अजूनही किरणोत्सर्गाचे अस्तित्व दिसून आले आहे.

प्रिप्यात येथील जमिनीत देखील काही अशा जागा आहेत जिथे हे प्रमाण जास्त आहे. पुढील २०००० वर्षे तो भाग राहण्यास योग्य असणार नाही असे सांगितले जाते.

(७) – काही किरणोत्सर्गाने बाधित कुत्री अजूनही तिथे रहात आहेत.

दुर्घटनेनंतर रहिवाशी आणि पाळीव जनावरे यांना हलविण्यात आले. तरीही काही कुत्री तिथे दिसून येतात.

 

chernobyl 7 inmarathi
Business Insider

दुर्घटनेच्या वेळेस जी कुत्री बाधित झाली होती त्यांच्या पुढील पिढीत देखील किरणोत्सर्गाचे परिणाम दिसून येत आहेत. तरीही तिथे राहणाऱ्या लोकांच्या सोबतीने ही कुत्री रहात आहेत.

(८) – वॉर्मवुड नावाचा राक्षसी तारा जगबुडीच्या वेळी येईल अशी भविष्यवाणी.

चेर्नोबिलआणि आसपासच्या भागात लोकांचा असा विश्वास आहे की एका भविष्यवाणीनुसार वॉर्मवूड नावाचा एक राक्षसी तारा जगबुडीच्या वेळेस प्रगट होईल.

 

chernobyl 8 inmarathi
Dr Steph and her Muslim wife do Chernobyl – WordPress.com

खरंतर या भागातील वनस्पती चे हे नाव आहे आणि त्याचा अर्थ चेर्नोबिल असा होतो जे नाव नंतर या अणुऊर्जा प्रकल्पाला देण्यात आले होते.
पण हे नाव आता अशुभ समजण्यात येते.

(९) – तुम्ही या भागास भेट देऊ शकता.

तुम्ही या भागास प्रवासी किंवा संशोधक म्हणून भेट देऊ शकता. इथे राहून तुम्ही येथील किरणोत्सर्गाची पातळी मोजू शकता, तसेच येथील जनावरे व माणसे यांची तपासणी करून विविध चाचण्या घेऊन,

तुम्ही या भागात झालेले दुष्परिणाम आणि इतर भाग जिथे किरणोत्सर्गाचा प्रसार झाला नव्हता अशा भागातील लोकांचे प्रकृतीमान यांची तुलना करू शकता.

 

chernobyl 10 inmarathi
Channel 3000

एक गोष्ट विसरता कामा नये ती म्हणजे किरणोत्सर्गाचे अस्तित्व तुम्ही डोळ्यांनी बघू शकत नाही.एखाद्या पदार्थाचा वास ,चव,रंगरूप जसे बघू शकता तसे तुम्ही किरणोत्सर्गाच्या बाबतीत बघू शकत नाही. त्यामुळेच तो धोकादायक आहे आणि विनाशक सुद्धा.

(१०) चेर्नोबिल हा एक आश्चर्य कारक प्रयोग आहे.

तुम्ही इथे राहून विविध प्रयोग करू शकता.परंतु काही गोष्टी ध्यानात ठेवूनच इथे राहू शकता. किरणोत्सर्गाला अटकाव करणारे कपडे परिधान करूनच आणि आपल्याबरोबर किरणोत्सर्ग विरहित पाणी आणि अन्नसाठा बरोबर घेऊनच तुम्ही राहू शकता.

शेवटी सुरक्षितता महत्वाची आहे हे लक्षात ठेवायला हवे. प्रत्यक्षात रशियन सरकारने मृतांचा अधिकृत आकडा दिलेला नाहीय हे लक्षात घेणे महत्वाचे आहे.

तरीही सरकारने हा प्लांट २००० साला पर्यंत चालू ठेवला होता हे फारच चीड आणणारे होते.

 

The Long Shadow of Chernobyl
National Geographic

चेर्नोबिल दुर्घटनेतील एक बळी ठरलेला व्हॅसिली इग्नतेन्को याच्या पत्नीने “voices from Chernobyl” हे पुस्तक लिहून आपले दाहक अनुभव कथन केले आहेत.

तिच्या म्हणण्यानुसार व्हासिलीचे पूर्ण शरीर सुजत गेले होते आणि अंगावर काळे डाग पडून तिथे छिद्रे पडून नंतर तो भाग मोडलाच जायचा जणू काही विरघळून जातोय असा. त्याचे कपडे आणि बूट त्याला चढवता येत नव्हते.

तो दोन आठवड्यातच मृत्यू पावला आणि दफन करण्यासाठी त्याचे शरीर अखंड उरले नव्हते.त्या पुस्तकात त्या भागातील इतरांच्या मृत्यूच्या हृदयद्रावक कहाण्या दिल्या आहेत. त्या वाचताना अंगावर शहारे आल्याशिवाय रहात नाहीत.

या दुर्घटनेने जगाला चांगलाच धडा शिकवलाय.

 

Chernobyl Inmarathi
McClatchy Washington Bureau

नवीन अणुऊर्जा प्रकल्प उभारताना पुन्हा चेर्नोबिल सारखे अपघात होऊ नयेत म्हणून आणखी काय सुरक्षितता वाढवायला पाहिजे याचा अभ्यास जगभर सुरू झाला.

काही देशांनी अशा तऱ्हेचे प्रकल्प देशात नकोच अशी भूमिका घेऊन तसे ठराव पास केले आहेत. कोकणात येऊ घातलेल्या अणुप्रकल्पास म्हणूनच लोकांचा विरोध आहे.

त्या ऐवजी कमी खर्चातील ‘सोलर एनर्जी’ किंवा ‘विंड एनर्जी’ वर आधारित प्रकल्प आल्यास कोणाचाच विरोध असणार नाही.
सूर्याची उष्णता आणि वाऱ्याची गती यावर हे प्रकल्प उभे राहिल्याने प्रदूषणाचा कोणताच धोका राहणार नाही.

 

wind solar energy inmarathi
Earth.com

भारताला खुप मोठी किनारपट्टी लाभल्याने किनारी भागात हे प्रकल्प उभे राहू शकतात. केवळ अट्टाहास म्हणून अणु प्रकल्प उभा न करता त्याचा सर्व दृष्टिकोनातून अभ्यास होऊन मगच निर्णय घेणे योग्य ठरेल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?