' परफ्युम आणि डिओमध्ये काय फरक असतो? दोन्हीमध्ये उत्तम काय? समजून घ्या…! – InMarathi

परफ्युम आणि डिओमध्ये काय फरक असतो? दोन्हीमध्ये उत्तम काय? समजून घ्या…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

अत्तर, डिओड्रंट आणि परफ्युम मध्ये नक्की काय फरक आहे? आज तुमच्या याच प्रश्नाचे उत्तर देणार आहोत.

डिओड्रंटपासून सुरुवात करूया. शरीराची दुर्गंधी दूर करण्यासाठी किंवा शरीराचा दुर्गंध येऊच नये म्हणून थेट शरीरावर मारण्यात येणारं प्रसाधन म्हणजे डिओड्रंट.

शरीराच्या दुर्गंधीची अनेक कारणे असू शकतात. शरीराच्या घामाला सुरुवातीपासून कुठलाच वास नसतो पण जर घाम दीर्घ काळ शरीरावर असेल तर त्यात दुर्गंध पसरवणारे बॅक्टिरिया तयार होतात आणि त्यामुळे शरीराला दुर्गंध येऊ लागतो.

परिश्रमामुळे घाम येणे, आणि मग वेळीच घाम आलेला भाग साफ न केल्याने घामात बॅक्टरीया वाढून दुर्गंधी येणे, पाणी कमी प्यायल्यामुळे किंवा तिखट जास्त खाल्ल्याने इत्यादी अनेक कारणे असू शकतात.

 

sweating-inmarathi

हे ही वाचा – घामाची दुर्गंधी घालवण्याबरोबरच डिओचे ‘हे’ फायदे बघून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल!

जर शरीराचा दुर्गंध जास्त असेल तर डिओड्रंट वापरावे. डिओड्रंट हे अल्कहोल व ट्रॅक्लोसन नामक रसायनात सुवासिक द्रव्य मिसळून बनवले जाते. ट्रॅक्लोसन हे एक जंतुनाशक रसायन आहे जे डिओड्रंट व्यतिरिक्त टूथपेस्ट, साबण यात ही वापरले जाते.

डिओड्रंट मध्ये ट्रॅक्लोसन असल्यामुळे दुर्गंध पसरवणारे बॅक्टिरिया मरतात.

तुम्हाला घाम येतो पण यातील सुवासिक द्रव्यांमुळे दुर्गंध येत नाही शिवाय त्यातील सुवासिक द्रव्ये घामात मिसळून शरीराला सुवासित करतात. डिओड्रंट मध्ये सुवासिक तेलाचे प्रमाण १० ते १५% असते.

यात अँटीप्राॅस्पॅरेशन डिओड्रंट हा ही एक प्रकार येतो. या प्रकारच्या डिओडरंट्स मध्ये अशी रासायनिक द्रव्य असतात जी तुमची घाम येण्याची प्रक्रियाच कमी करतात. म्हणजेच घाम उत्सर्जित करणारी त्वचेची द्वारेच बंद करतात.

जर तुम्ही अश्या प्रकारची अँटीप्राॅस्पॅरेशन डिओडरंट्स वापरत असाल, तर घरी आल्यावर तुमची त्वचा स्वच्छ धुवून घेऊन त्वचेची सर्व घाम उत्सर्जित करायची केंद्रे मोकळी व स्वछ करायला हवीत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

लक्षात ठेवा, ज्याप्रमाणे आपण श्वास घेत असतो त्याप्रमाणे आपली त्वचा सुद्धा श्वास घेत असते. म्हणूनच अशा प्रकारचे डिओड्रंट दीर्घ काळासाठी वापरू नयेत अथवा आपल्या डरमिटोलॉजिस्टला विचारूनच दीर्घ काळ वापरावेत.

खूप जणांचा प्रश्न असतो की डिओड्रंट पुरुषांचं आणि स्त्रियांचं वेगळं वेगळं असायची काय गरज आहे? शेवटी सुवासिक द्रव्यच ते…

पण पुरुषांना जास्त घाम येतो, आणि शरीराचा वास ही जास्त येतो, त्यामुळे त्यांच्यासाठी बनवलेले डिओडरंट्स थोडे जास्त उग्र आणि जरा जास्त दीर्घ काळ टिकणारे असतात.

स्त्रियांची त्वचा नाजूक असल्याने त्यांचे डिओडरंट्स सौम्य असतात. आपल्याला हवा असलेला परिणाम साध्य करण्यासाठी योग्य तोच डिओड्रंट निवडला जाणे गरजेचे आहे.

 

deodorent inmarathi

 

लहान मुलांनी डिओड्रंट वापरावे का? बहुदा पौगंडावस्थेतील मुलांना त्यांच्या गतिशील दिनक्रमामुळे घाम आणि दुर्गंधाला समोर जावं लागतं. तेव्हा नक्कीच डिओड्रंट वापरावे.

पण रोज अंघोळ करणे, खेळून आल्यानंतर पुन्हा अंघोळ करणे, खूप पाणी पिणे या गोष्टी ही लक्षात घ्यायला हव्यात.

पौगंडावस्थेपेक्षा लहान वयाच्या मुलांनी डिओड्रंट न वापरणंच योग्य. लहान मुलांची त्वचा नाजूक असते आणि म्हणूनच कुठल्या ही प्रकारचे केमिकल त्यांच्या त्वचेपासून दूर ठेवलेलेच बरे.

मूल अगदी हट्टच करत असेल तर सरळ स्प्रे मध्ये गुलाबजल भरावे आणि वापरायला द्यावे. लहान मुलांमध्ये शरीर दुर्गंधीची समस्या त्या मानाने कमी असते. परंतु जर असेलच तर आहारात आलं लसूण असे उग्र पदार्थ कमी करावेत.

आता आपण परफ्यूम्स कडे वळूयात. परफ्युम हा शब्द लॅटिन मधील आहे. “पर” म्हणजे “पार जाणे” किंवा “पसरणे” आणि फ्यूम म्हणजे “धूर”. पूर्वीच्या काळी निसर्गातूनच विविध सुवासाची फुलं, लाकूड किंवा सुवासिक पदार्थ जमवले जायचे.

त्यांना जाळून त्याच्या धुराने आजूबाजूचे वातावरण सुवासित केले जायचे. भारतात आपण अजून ही धूप किंवा अगरबत्तीचा वापर करतो तसेच.

नंतर या नैसर्गिक सुवासिक पदार्थांचे तेल बनवून ते तेल जाळून आजूबाजूची हवा सुवासित केली जात असत. ही पद्धत सोळाव्या शतकात खूप लोकप्रिय झाली.

आज काल मात्र “इथेनॉल” नामक द्रव्यात सुवासिक तेल मिसळून किंवा प्रक्रिया केलेल्या पाण्यात सुवासिक द्रव्ये मिसळून परफ्यूम्स बनवली जातात.

जी दीर्घ काळ टिकू शकतात. इथेनॉलची निर्मिती साखर व अल्कहोलचे नैसर्गिक किण्वन (fermentation) करून केली जाते. परफ्यूम्समध्ये सुवासिक तेलाचे प्रमाण १५ ते २०% असतं.

 

fragrances-perfumes inmarathi

 

डिओडरंट्स शरीराच्या अशा भागांवर वापरतात जिथे जास्त दुर्गंधी येते, किंवा जिथे घाम येतो. म्हणजेच काखेत, तळपायांवर वैगैरे. पण पर्फुम्स मात्र कपड्यांवर किंवा तुमच्या पल्सेस (कानामागे, मनगटावर, मानेवर वैगरे.. ) वर वापरले जाते.

महत्वाची गोष्ट, परफ्युम हे डिओड्रंटला पर्याय असू शकत नाही कारण परफ्यूम्स घामातल्या जंतूंचा नाश करू शकत नाही.

डिओड्रंट आधी वापरून मग गरजेनुसार परफ्युम वापरावे. दोन्हींचा सुगंध जरा एकसारखा किंवा एकमेकांना पूरक असावा.

पर्फुम्स तीन प्रकारचे असतात. एक अल्कहोलमध्ये बनवलेले, दुसरे पाण्यात बनवलेले, तिसरे कलोन परफ्युम. आता आपण जाणून घेऊयात कुठले परफ्युम कधी वापरावे. अल्कोहोल बेस्ड परफ्युम बहुदा दिवसा वापरावे. कारण हे खूप वेळ टिकते.

हे परफ्युम कपड्यावर मारावे. वॉटर बेस्ड म्हणजेच पाण्यात बनवलेले परफ्यूम्स रात्री वापरायचे असतात. हे ही कपड्यांवर मारावे. रात्री उग्र वासाची गरज नसते म्हणून हे परफ्यूम्स थोडे सौम्य असतात.

तिसरा प्रकार आहे कलोन परफ्यूम्स (अत्तर). हे परफ्यूम्स जिथे डॉक्टर शरीराची नाडी तपासतात, किंवा जिथे आपल्याला आपले पल्सेस जाणवतात, उदाहरणार्थ मनगटावर, कानामागे, मानेवर वैगरे, अशा ठिकाणी अगदी कमी प्रमाणात वापरावे.

हे परफ्यूम्स खूप उग्र असल्याने ह्यांचा वापर अगदी थोडा केला तरी दीर्घ काळ राहतो. म्हणूनच हे परफ्यूम्स इतरांपेक्षा महाग ही असतात.

आपल्या आजूबाजूला सकारात्मक वातावरण निर्माण होण्यासाठी आणि ते कायम राहण्यासाठी तसेच नेहेमी आपल्याला व आपल्या आजूबाजूच्यांना प्रसन्न वाटण्यासाठी योग्य त्या डिओड्रंट आणि परफ्युम चा वापर जरूर करावा.

 

perfume inmarathi

 

किमान आपल्या स्वतःच्या शरीराच्या स्वच्छतेसाठी व शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपल्या शरीराची दुर्गंधी तर येत नाहीये ना हे प्रत्येकाने तपासून पाहायलाच हवे. आज काल बऱ्याच ऑफिसेसमध्ये डिओड्रंटचा वापर सक्तीचा केला आहे.

जर आपण कार ड्राइवर, लिफ्टमन, सेल्समन किंवा अशा कुठल्या ही जागी काम करत असाल जिथे तुमचा ग्राहकांशी थेट संपर्क येतो, तेव्हा जर तुमच्यापासून सुगंध दरवळत असेल तर तुम्ही ग्राहकाचं निम्म मन जिंकण्यात समर्थ झालेले असता.

याउलट तुमची सेवा कितीही चांगली असली परंतु पूर्ण वेळ ग्राहकाला दुर्गंधाला समोरं जावं लागत असेल तर तुम्ही तो ग्राहक गमावू शकता.

परफ्यूम्स पेक्षा डिओड्रंट बऱ्यापैकी स्वस्त असतात. आपल्या गरजेनुसार प्रत्येकाने योग्य डिओड्रंट निवडावे, अंघोळ झाल्या झाल्या डिओड्रंट वापरल्याने डिओड्रंट दीर्घ काळ टिकतो.

त्या नंतर गरजेनुसार किंवा प्रसंगानुरूप परफ्युम वापरावे म्हणजे सुवास दूरवर पसरतो व दीर्घ काळ टिकतो.

एखादा सुंदर दरवळणारा वास खूपदा एखाद्या व्यक्तीची आठवण करून देतो. कारण तो सुवास हा त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचाच भाग बनलेला असतो.

परफ्यूम्स आणि डिओडरंट्सबद्दल पुरेशी माहिती मिळाल्यानंतर तुम्ही ही तुमच्या व्यक्तिमत्वाला साजेसा डिओड्रंट आणि परफ्युम निवडा आणि आपल्या व्यक्तिमत्वाची सुवासिक ओळख निर्माण करा.

===

हे ही वाचा – बुटांची दुर्गंधी येतेय? “खराब इम्प्रेशन” पासून स्वतःला वाचवा! वापरा या सोप्या टिप्स…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?