' चीनची आणखी एक किमया: ट्रॅफिकवरुन चालणारी एलिव्हेटेड बस

चीनची आणखी एक किमया: ट्रॅफिकवरुन चालणारी एलिव्हेटेड बस

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

ट्रॅफिकची समस्या जगामध्ये दिवसागणिक वाढत चालली आहे. नव्या नव्या गाड्या रोज बाजारात येतायेत आणि रोज लोक या गाड्या खरेदी करतायेत. स्वत:ची गाडी असल्याने मनाला वाटेल तेव्हा फिरता येत आणि सार्वजनिक प्रवासासारखा त्रासही सहन करावं लागत नाही ही गाडी खरेदी करण्यामागची प्रत्येक माणसाची अस्सल भावना! अजून काही वर्षांनी मोबाईलप्रमाणे प्रत्येकाची स्वत:ची गाडी दिसली तर नवल वाटायला नको. मग तेव्हा तर ट्रॅफिक समस्या कोणता आकार घेईल याचा विचार करून सुद्धा धडकी भरते.

सध्या जगात ट्रॅफिक समस्येमध्ये कोणता देश सर्वात आघाडीवर असेल तर तो चीन! या देशाची लोकसंख्याच सर्वात जास्त असल्याकारणाने येथील ट्रॅफिक समस्या देखील सर्वात जास्त असणे साहजिक आहे. सोबतच भरमसाठ गाड्यांमुळे प्रदूषण होतं ते वेगळंच. यावर उपाय म्हणून तंत्रज्ञान क्षेत्रात रोज नवनवीन क्रांती करणाऱ्या चीनने आता नवा इलाज शोधून काढला आहे.

china-traffic-jam-marathipizza

स्रोत

चीनने ट्रॅफिकवरुन बस चालू शकते अश्या प्रकारच्या अनोख्या तंत्रज्ञानाचा विकास केला आहे. बीजिंग स्थित एका बस निर्मीती करणाऱ्या कंपनीने ही संकल्पना मांडली आहे. या बसमुळे केवळ ट्रॅफिकमुक्तीच नव्हे तर प्रदुषण टाळणं देखील सोपं होणार आहे. एलिव्हेटेड बस रस्त्यांच्या दोन्ही बाजूंच्या रेषांवर चालते. त्यामुळे वाहनांच्या वरुन ही बस चालते.

elevated-bus-beijing-china-marathipizza

स्रोत

एलिव्हेटेड बसची अश्या प्रकारची संकल्पना यापूर्वी २०१० मध्ये एका एक्स्पोमध्ये मांडण्यात आली होती. चीनच्या या एलिव्हेटेड बसमध्ये एकाच वेळी १२०० पेक्षा जास्त प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आहे.

elevated-bus-beijing-china-marathipizza01

स्रोत

लिव्हेटेड बसच्या प्रकल्पाचे इंजीनिअर बाय झायमिंग म्हणतात,

भुयारी मार्गाप्रमाणेच ही बस काम करते. विशेष म्हणजे एलिव्हेटेड बस तयार करण्यासाठी भुयारी मार्ग बांधण्याच्या पाचपट कमी खर्च येतो. तसेच ही बस बांधण्यासाठी एका वर्षापेक्षा कमी कालावधी लागतो.

elevated-bus-beijing-china-marathipizza03

स्रोत

 

रस्त्यावर वाहतूकीची कोंडी असली तरी ही बस वाहनांच्या वरून चालू शकते असे दाखवणारा हा व्हिडियो नक्की पहा

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?