' पेनाच्या टोपणाला छिद्र कशासाठी असतं, ते जाणून घ्या – InMarathi

पेनाच्या टोपणाला छिद्र कशासाठी असतं, ते जाणून घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

पेन ही तशी रोजच्या वापरातली गोष्ट! बहुतेक जणांच्या रोजच्या जीवनाचा पेन म्हणजे अविभाज्य भागच म्हणा ना! खिशाला पेन लावल्याशिवाय यांचा दिवसच सुरु होत नाही असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. असा हा पेन दिसायला लहान असला तरी त्याचा मोठा फायदा आपल्याला होतो. कधी गरज पडली आणि हा पेन जवळ नसला एकी तुमचं काम रखडलं समजा.

या पेनकडे फारच कमी लोकांनी बारकाईने पाहिलं असेल. ज्यांनी पाहिलं असेल त्यांना पेन कॅपच्या टोकाला लहानसं छिद्र नक्कीच आढळलं असेल. आणि त्याच वेळी मनात प्रश्न उद्भवला असेल असं का बरं?

जर आजवर तुमची या गोष्टीकडे कधी नजर गेली नसेल तर आता लगेच नजर टाकून बघा. तुम्हाला पेन कॅपच्या टोकाला छिद्र दिसेल. चला तर आज या मागचं कारण जाणून घेऊ!

pen-cap-holes-marathipizza00

स्रोत

बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की पेनच्या निबची शाई वाळावी यासाठी पेन कॅपच्या टोकाला छिद्र दिलेलं असतं. पण हा पूर्णत: गैरसमज आहे. पेन कॅपच्या टोकाला या कारणासाठी छिद्र दिलेलं नाही.

pen-cap-holes-marathipizza01

स्रोत

खरंतर पेन कॅपच्या टोकाला छिद्र असंण ही आजवरची सर्वात हुशार शक्कल म्हटली गेली पाहिजे. ज्यांनी बॉल पेनची निर्मिती केली त्या बिक क्रिस्टल कंपनीच्या डोक्यातून पेन कॅपच्या टोकाला छिद्र ठेवण्याची नामी युक्ती बाहेर आली.

pen-cap-holes-marathipizza04

स्रोत

अनेकांना – विशेषत: लहान मुलांना – पेन कॅप तोंडात घालण्याची सवय असते. जर कॅप चुकून तोंडात गेली आणि अडकली तर त्यामुळे श्वासोच्छवासात अडथळा निर्माण होऊन जीव देखील जाऊ शकतो आणि पेन कॅपच्या टोकाला छिद्र नसल्यास त्यातून हवा जाण्याचा मार्ग देखील बंद होऊ शकतो.

हाच विचार करून पेन कॅपच्या टोकाला मुद्दाम छिद्र ठेवलं आहे.

pen-cap-holes-marathipizza02

स्रोत

म्हणजे समजा कोणीही चुकून जरी पेनची कॅप गिळाली तर पेन कॅपच्या टोकाला छिद्र असल्यामुळे त्यातून हवा पास होईल आणि त्याला श्वासोच्छवास घेण्यात जास्त अडथळा होणार नाही. त्याच्या जीवाला असलेला धोका देखील भरपूर प्रमाणात कमी होऊ शकतो. म्हणून पेन कॅपच्या टोकाला छिद्र असतं.

pen-cap-holes-marathipizza03

स्रोत

काय म्हणता? यामागे असं कारण असेल असं वाटलं देखील नव्हतं ना?

 

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?