' हॉटेलच्या वाया जाणाऱ्या अन्नामधून गरिबांची पोटं भरणारी “रॉबिन हूड” आर्मी! – InMarathi

हॉटेलच्या वाया जाणाऱ्या अन्नामधून गरिबांची पोटं भरणारी “रॉबिन हूड” आर्मी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

रॉबिनहूडबद्दल तुम्ही सर्वजण ऐकून असालंच!तो श्रीमंतांकडून पैसे घेउन गरिबांना वाटायचा. सध्याच्या या जगात अशी रॉबिनहूड माणसं फार क्वचितच सापडतात. जी स्वत:चा स्वार्थ न पाहता इतरांच्या चेहऱ्यावर हास्य कसं आणला येईल याचा विचार करतात.

भारतामध्ये रॉबिनहूड आर्मी नावाची एक अशीच समाजसेवी संस्था आहे जी गरिबांसाठी काम करते. रॉबिनहूड का? तर या लोकांचं काम देखील रॉबिनहूड सारखंच आहे म्हणजे श्रीमंतांकडून घ्यायचं आणि गरिबांना वाटायचं.

याचा अर्थ हा नाही की हे लोक पैसे चोरून गरिबांना वाटतात. ही रॉबिनहूड आर्मी विविध हॉटेल्समधील उरलेले अन्नपदार्थ जमा करते आणि गरीब भुकेल्या लोकांना वाटते.

 

robinhood army InMarathi

स्रोत

रॉबिनहूड आर्मी या संस्थेची स्थापना नील घोष आणि आनंद सिन्हा यांनी केली असून, दोघेही पोर्तुगालमध्ये राहतात.  या रॉबिनहूड आर्मी मध्ये असणारे रॉबिनहूड स्वयंसेवक इतर ठिकाणी नोकरी करतात. ही संस्था कोणताही मोबदला न घेता गरीब मुलांना आणि गरजूंना जेवण पोहोचवण्याचं काम करते.

 

Robin-Hood-Army-marathipizza02

स्रोत

गेल्या स्वातंत्र्यदिनी या संस्थेने ५ लाख लोकांना जेवण देण्याचा संकल्प केला होता. भारतासह पाकिस्तानातील गरीब लोकांना जेवण देण्याचं काम ही संस्था करते. त्याच्या माध्यमातून ही संस्था पाकिस्तानातही गरिबांना जेवण वाटते.

Robin-Hood-Army-marathipizza03

स्रोत

या संस्थेचं नाव रॉबिनहूडच्याच नावावरून ठेवण्यात आलं आहे.ही रॉबिन हूड आर्मी ही संस्था स्वत:हून मदत करणाऱ्या लोकांच्या साहाय्याने गरिबांची भूक भागवते.

 

robinhood army 1 InMarathi

स्रोत

रॉबिन हूड आर्मीचे स्वयंसेवक वेगवेगळ्या शहरात नोकरी करणारे सामान्य नागरिक आहेत. आपल्या परिसरातील हॉटेल्सना संपर्क साधून, त्यांच्याकडे उरलेलं अन्न एकत्र जमवलं जातं. यानंतर हे जेवण शहरातील विविध भागात गरीब लोकांमध्ये वाटलं जातं. काही रेस्टॉरंटनी या संस्थेसाठी वेगळं जेवण बनवायलाही सुरूवात केली आहे.

Robin-Hood-Army-marathipizza05

स्रोत

समाजकार्याची ही अनोखी शक्कल खरंच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम| Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?