वडील करतात मोलमजुरी आणि मुलगा गुगल मध्ये करतो नोकरी!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

अगदी हलाखीच्या परिस्थितीला तोंड देऊन, जगण्याशी संघर्ष करत यशाचे उत्तुंग शिखर गाठणाऱ्या अनेक प्रेरणादायी कथा आपण ऐकून आहोत. भारतामध्ये अश्या प्रतिभावंतांची कमी नाही. गरीब परिस्थिती असताना देखील शिकण्याची जिद्द मनात ठेवून आपले ध्येय गाठणाऱ्या या मुलांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. अशीच एक प्रेरणादायी कथा नुकतीच पुढे आली. मजुरी करणाऱ्या एका पित्याने आपल्या मुलाची शिक्षणाची ओढ ओळखून त्याला जमेल तसा पाठींबा दिला आणि आज तो मुलगा जगातील सर्वोत्तम कंपन्यांमध्ये नावाजल्या जाणाऱ्या गुगलमध्ये उत्तम पगाराच्या नोकरीवर कार्यरत आहे.

ramchandra-tejaram-sankhala-story-maratthipizza

स्रोत

राजस्थानमधील सुजात नावाच्या लहानग्या गावामध्ये राहणारे तेजाराम संखला इतर गावकऱ्यांप्रमाणे मोलमजुरी करायचे. पण त्यांचा मुलगा रामचंद्र याची स्वप्ने मात्र मोठी! पण तेजारामने कधीही आपल्या मुलाच्या स्वप्नांना मुरड घातली नाही. रामचंद्रने सुजातमध्येच १२वी पर्यंतचे शिक्षण घेतले आणि २००९ साली आयआयटी रुकडीमध्ये प्रवेश घेण्यासाठी एज्यूकेशन लोनसाठी बँकेकडे अर्ज केला. पण तो नामंजूर झाल्यामुळे तेजारामने बाहेरून कर्ज उचलीत पहिल्या आणि दुसऱ्या सेमिस्टरचे शिक्षण आपल्या मुलाला मिळवून दिले.

त्यानंतर मात्र रामचंद्रच्या प्रयत्नांना यश आले आणि त्याचे एज्यूकेशन लोन मंजूर झाले. आता पुढील शिक्षण घेणे त्याच्यासाठी सोप्पे होते. परंतु दरम्यान अजून एक अडथळा निर्माण झाला. इंजिनिअरच्या शिक्षणासाठी लॅपटॉप किंवा कम्प्यूटरची गरज होती आणि तेवढे पैसे त्याच्या कुटुंबीयांकडे नव्हते. पण तेजाराम स्वस्थ बसला नाही. त्याने आपल्या समाज बांधवांच्या मदतीने ३० हजार रुपये गोळा केले आणि त्यातून रामचंद्रला एक लॅपटॉप खरेदी करून दिला. आपल्या वडिलांच्या सर्व कष्टाचे पांग फेडीत अखेर रामचंद्रने आपले ध्येय पूर्ण करून दाखविले आणि थेट गुगलमध्ये प्रवेश केला.

ramchandr-tejaram-sankhala-story-maratthipizza02

स्रोत

पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की मुलगा गुगलमध्ये नोकरीला असून देखील तेजाराम मात्र वयाचा ५० व्या वर्षी आजही मोलमजुरी करतात. घरात निव्वळ बसून राहणे त्यांना पसंत नाही. रोज ट्रकमध्ये बॉक्स चढवणे आणि उतरवण्याचे काम करून ते दिवसाला ४०० च्या आसपास मजुरी मिळवतात.

एक्झिक्यूटीव्ह पदावर कार्यरत असणाऱ्या रामचंद्राला गुगलमध्ये वर्षाकाठी तब्बल ३६ लाख पगार मिळतो. आपल्या वडिलांनी घेतले तेवढे कष्ट पुरे झाले, आता त्यांनी आराम करावा अशी रामचंद्रची देखील इच्छा आहे. रामचंद्रने त्यांना आपल्यासोबत अमेरिकेमध्ये येऊन राहण्याची देखील विनंती केली. पण तेजारामच्या हट्टापुढे सारेच जण हतबल आहेत.

ramchandra-tejaram-sankhala-story-maratthipizza01

स्रोत

दुसरीकडे रामचंद्र देखील आपल्या मायभूमीला विसरला नसून पुरेसा पैसा जमा झाल्यावर भारतात परतून सामाजिक कार्य करण्याची त्याची इच्छा आहे.

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?