' भारताचे खेळाडू पाकिस्तानी खेळाडूंना मैदानावर थेट भिडतात तेव्हा… : वाचा ५ गाजलेले किस्से – InMarathi

भारताचे खेळाडू पाकिस्तानी खेळाडूंना मैदानावर थेट भिडतात तेव्हा… : वाचा ५ गाजलेले किस्से

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना म्हणजे फक्त एक क्रिकेट सामना नसतो तर ते एक प्रकारचं युद्ध असतं असं म्हणतात. भारतामध्ये क्रिकेटला धर्म तर खेळाडूंना देव मानतात. भारतामध्ये क्रिकेटचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत.

पाकिस्तानमध्ये सुद्धा क्रिकेटला मोठ्या प्रमाणात महत्व दिलं जातं.

जेव्हा भारत पाकिस्तान हे दोन शेजारी देश क्रिकेटच्या मैदानात समोरासमोर असतात तेव्हा तुम्ही देखील हातातली सगळी कामे बाजूला ठेवून मॅचचा आनंद घेत असणार यात काही शंका नाही नाही.

पण जेव्हा हे दोन संघ समोर येतात तेव्हा वाद तर होतातच.

 

india pakistan inmarathi
Geo.tv

 

आपलाच देश जिंकावा या जिद्दीने खेळतात तेव्हा खेळाडू दुसऱ्या खेळाडूंचं लक्ष विचलीत करण्यासाठी ते एकमेकांना चिडवतात किंवा असे काही तरी बोलतात ज्यामुळे वाद उभा राहतो.

 

ind pak inmarathi
business.com

 

या सामन्यांमध्ये खेळाडूंसह सर्वच चाहते भावनिक असतात त्यामुळे मैदानावर वाद होताना आपण पाहिलं आहे. पाकिस्तानच्या खेळाडूंनी केलेल्या स्लेजिंगला भारतीय खेळाडूंनी फक्त तोंडानेच नव्हे तर आपल्या खेळाने अनेकदा चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

जाणून घेऊयात असेच काही वादविवाद

१) वेंकटेश प्रसाद विरुद्ध आमिर सोहेल

 

vp vs sohail inmarathi
Sportswallah.com

 

९६ सालच्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेची ही दुसरी क्वार्टर-फाइनल होती. १९ मार्च १९९६ रोजी बंगळूरू येथे एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान हा सामना सुरु होता.

भारताने प्रथम फलंदाजी करताना २८७ धावांचा आव्हान पाकिस्तान समोर दिलं होतं. नवजोतसिंग सिद्धू यांच्या ९३ धावांचा या आकड्यात महत्वाचा वाटा होता.

२८८ धावांचा पाठलाग करत असताना पाकिस्तानी सलामीवीर अमीर सोहेलने वेंकटेश प्रसादला चौकार लगावला आणि त्याला बॅटने इशारा करत सीमारेषेवरील बॉल घेऊन ये असा टोमणा मारला.

वेंकटेश प्रसादने त्याला तोंडाने उत्तर न देता तो पुढील बॉल टाकण्यासाठी गेला आणि त्याने पुढच्याच बॉल वर विकेट घेत अमीर सोहेलला परत पाठवत त्याचे तोंड बंद केले.

अमीरने केलेल्या अपमानाचा त्याने व्याजासकट बदला घेतला.

२) किरण मोरे विरुद्ध जावेद मियांदाद

 

kiran more vs javed inmarathi
indiatoday.in

 

४ मार्च १९९२ रोजी सिडनी येथे भारत विरुद्ध पाकिस्तान सामना चालू असताना हा प्रकार घडला. जावेद मियांदाद फलंदाजी करत होता. त्याचा फॉर्म पाहता तो भारतीय संघासाठी सर्वात मोठा धोका होता.

जावेद मियांदादचं लक्ष विचलीत करण्यासाठी यष्टीरक्षक किरण मोरे गोलंदाजांना प्रत्येक बॉलवर प्रोत्साहन देत होता आणि सतत अपील करत होता.

काही काळाने जावेद मियांदादचा संयम सुटला व त्याने ओव्हरच्या मध्येच गोलंदाजांला थांबवत किरण मोरेसोबत ते काहीतरी बोलायला गेला.

त्यानंतर त्यांने ओव्हर संपल्यानंतर किरण मोरेसमोर तीन बेडूक उडया मारून डिवचण्याचा प्रयत्न केला. हा झालेला प्रकार क्रिकेटमधला मजेदार प्रसंगांपैकी एक आहे.

३) हरभजन सिंग विरुद्ध शोएब अख्तर

 

harbhajan_shoaib-akhtar-inmarathi
theindianexpress.com

 

ही घटना १९ जून २०१० रोजी डंबुला येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आशिया कप २०१० च्या दरम्यान झाली. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने भारतासमोर २६८ धावांचे लक्ष्य ठेवले होते.

भारतीय संघास शेवटच्या दोन ओव्हर मध्ये १६ धावांची गरज होती. मैदानावर सुरेश रैना आणि हरभजन सिंग खेळत होते.

शोएब अख्तर ४९ वी ओव्हर टाकत होता. रैनाने त्याला पहिल्या चेंडूवर षटकार मारला. शोएब हरभजनसमोर गोलंदाजी करताना त्याने बाउंसर चेंडू टाकला पण तो मारण्यात हरभजन अयशस्वी झाला तेव्हा शोएब हरभजनला चिडवत काहीतरी बोलून गेला.

शेवटच्या ओव्हरमध्ये मोहंमद अमीरने रैनाला बाद केले. अखेरच्या दोन बॉल मध्ये भारतीय संघास ५ धावांची गरज होती तेव्हा हरभजन ने षटकार मारत भारतीय संघास सामना जिंकून दिला. शोएब अख्तरला सडेतोड उत्तर दिलं.

४) गौतम गंभीर विरुद्ध शाहिद आफ्रिदी

 

gambhir shoeib inmarathi
thenews.com.pk

 

क्रिकेटमधील सर्वात मोठया वादविवादापैकी एक म्हणजे भारत-पाकिस्तान सामन्यात झालेला हा वादविवाद.

हा सामना ११ नोव्हेंबर २००७ रोजी खेळला गेला होता. गौतम गंभीर फलंदाजी करत होता तर शाहिद आफ्रिदी गोलंदाजी करत असताना गंभीरने त्याला चौकार मारला, तेव्हा शाहिद आफ्रिदी आणि गंभीरमध्ये बाचाबाची झाली.

त्याच्याच पुढच्या चेंडूवर एक धाव घेत असताना शाहिद गंभीरच्या समोर आला तेव्हा गंभीरने त्याला धक्का देत धाव पूर्ण केली.

तेव्हा वातावरण इतकं तापलं होत की वाद मिटवण्यासाठी पंचांना मध्ये यावं लागलं.

५) वीरेंद्र सेहवाग विरुद्ध शोएब अख्तर

 

sehwag inmarathi
hindustantimes.com

 

२००४ मध्ये झालेला भारत पाकिस्तान सामना या विवादामुळे जास्तच गाजला. वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर हे दोघे मैदानावर खेळत होते तर त्याच्या समोर शोएब अख्तर गोलंदाजी करत होता.

सेहवागला तो सतत शॉर्ट बॉल टाकत होता आणि पूल शॉट मारून दाखव म्हणत होता. सेहवागने एक धाव घेत सचिनकडे स्ट्राईक दिली.

सेहवाग शोएब अख्तरला म्हटला, “सामने तेरा बाप खड़ा है उसे डालके दिखा.” तेव्हा शोएब अख्तरने शॉर्ट बॉल सचिनला टाकला आणि सचिनने त्या बॉलवर षटकार मारला.

वीरेंद्र सेहवाग शोएबजवळ जाऊन म्हटला, “बाप बाप होता है और बेटा बेटा होता है!”

भारत पाकिस्तान दरम्यान आजवर झालेल्या सामन्यांच्या वेळी मैदानावरच्या भांडणांची ही पार्श्वभूमी लक्षात घेता उद्याच्या सामन्यात काय होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?