'आता पाकिस्तानातून घडणार भारतीय तिरंग्याचे दर्शन !

आता पाकिस्तानातून घडणार भारतीय तिरंग्याचे दर्शन !

 

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

भारतीय तिरंगा म्हणजे आपल्या देशाची शान! हवेत डौलाने फडकणारा हा तिरंगा पाहून उर अगदी अभिमानाने भरून येतो. तिरंग्याकडे पाहताच आठवतो तो स्वातंत्र्यसंग्राम, शहीद झालेले शूर वीर आणि परकियांच्या तावडीतून भारताची झालेली सुटका! संपूर्ण भारताची प्रतिष्ठा या तिरंग्यामध्ये सामावली आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये. अश्या या अमुल्य तिरंग्यावर स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देखील आपल्याच शेजारी पाकिस्तानाने अनेकदा प्रहार केले आणि आजही त्याच्या कुरापती सुरूच आहेत. पण सीमेवर तैनात असणाऱ्या आपल्या शूर सैनिकांनी प्रत्येक हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत तिरंग्याचे आणि एकंदरीतच देशाचे रक्षण केले. आता हाच तिरंगा एक वेगळी उंची गाठत रोज शत्रू पक्षाच्या डोळ्यासमोर डौलाने फडकता दिसणार आहे. कारण भारताच्या सीमेवर अतिशय उंच तिरंगा बसवला जातोय ज्याचे दर्शन थेट पाकिस्तानामधून देखील होईल.

indian-flag-marathipizza

स्रोत

भारत-पाकिस्तान अटारी-वाघा सीमेवर ३५० फूट उंचीचा भारताचा तिरंगा उभारला जाणार आहे. यासाठी साडेचार कोटी रुपये खर्च येणार आहे. हा भारतीय तिरंगा पाकिस्तानातील लाहोर शहरातूनही दिसू शकेल हे विशेष!

indian-flag-marathipizza01

स्रोत

पंजाबचे मंत्री अनिल जोशी यांनी या झेंड्याच्या उभारणी कार्याची पाहणी केली आहे. येत्या २६ जानेवारी २०१७ पर्यंत त्याची उभारणी पूर्ण होण्याची शक्यता आहे.

हा झेंडा तब्बल ३५०  फूट उंच असून  ध्वजाची रुंदी १०० मीटर एवढी आहे.

डौलाने फडकणाऱ्या या भव्य तिरंग्यामुळे वाघा सीमेवर रिट्रीट सेरेमनी बघायला येणाऱ्या भारतीय नागरिकांचा उत्साह अधिक वाढेल. तसेच देशाच्या सीमेवर तैनात जवानांचाही उत्साह वाढेल असा मंत्री अनिल जोशी यांना विश्वास आहे. या तिरंग्याच्या आजुबाजूलाचा परिसर सुंदर बाग-बगिचा, लँड स्कुपिंग आणि फ्लड लाईट्स यांनी सुसज्ज असेल.

वाघा बॉर्डरवर देखील नवीन प्रेक्षागृह उभारले जात असून त्यात एकाच वेळी २५ हजार नागरिक रिट्रीट सेरेमनीचा आनंद लुटू शकतील हे विशेष!

indian-flag-marathipizza02

सध्या भारतातील सगळ्यात मोठा तिरंगा (२९३ फुट उंच) हा झारखंडची राजधानी रांची मध्ये स्थित आहे.

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?