भारतीय सीमेवरील “हा तिरंगा” थेट पाकिस्तानातून सुद्धा दिसतो… वाचून थक्क व्हाल..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
भारतीय तिरंगा म्हणजे आपल्या देशाची शान! हवेत डौलाने फडकणारा हा तिरंगा पाहून उर अगदी अभिमानाने भरून येतो. तिरंग्याकडे पाहताच आठवतो तो स्वातंत्र्यसंग्राम, शहीद झालेले शूर वीर आणि परकियांच्या तावडीतून भारताची झालेली सुटका!
संपूर्ण भारताची प्रतिष्ठा या तिरंग्यामध्ये सामावली आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये.
अश्या या अमुल्य तिरंग्यावर स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देखील आपल्याच शेजारी पाकिस्तानाने अनेकदा प्रहार केले आणि आजही त्याच्या कुरापती सुरूच आहेत. पण सीमेवर तैनात असणाऱ्या आपल्या शूर सैनिकांनी प्रत्येक हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत तिरंग्याचे आणि एकंदरीतच देशाचे रक्षण केले.
आज याच तिरंग्याने एक वेगळी उंची गाठली आहे. रोजच तो शत्रू पक्ष पाकिस्तानच्या डोळ्यासमोर डौलाने फडकताना दिसतो आहे. कारण भारताच्या सीमेवर अतिशय उंच तिरंगा बसवला गेला आहे. ज्याचे दर्शन थेट पाकिस्तानामधून देखील होऊ शकते.
भारत-पाकिस्तान अटारी-वाघा सीमेवर ३६० फूट उंचीचा भारताचा तिरंगा उभारला गेला आहे. यासाठी जवळपास साडेतीन कोटी रुपये खर्च झाला. हा भारतीय तिरंगा पाकिस्तानातील लाहोर शहरातूनही दिसू शकतो हे विशेष!
पंजाबचे मंत्री अनिल जोशी यांनी या झेंड्याच्या उभारणी कार्याची पाहणी केली होती. त्यामुळेच याच्या उदघाटनाचा मान सुद्धा त्यांनाच देण्यात आला. २०१७ साली मार्च महिन्यात या ध्वजस्तंभाचे उदघाटन करण्यात आले. आज मोठ्या डौलात त्यावर रोज तिरंगा फडकतो आहे.
हा झेंडा तब्बल ३६० फूट उंच असून ध्वजाची लांबी ११० मीटर आणि रुंदी २४ मीटर इतकी आहे.
या ध्वजस्तंभाचे वजन तब्बल ५५ टन इतके आहे…
याआधी झारखंड राज्याची राजधानी असलेल्या रांची या शहरात ३०० फूट उंचीचा तिरंगा, हा भारतातील सर्वांत उंचावर फडकणारा तिरंगा मानला जात असे.
डौलाने फडकणाऱ्या या भव्य तिरंग्यामुळे वाघा सीमेवर रिट्रीट सेरेमनी बघायला येणाऱ्या भारतीय नागरिकांचा उत्साह अधिक वाढतो यात शंकाच नाही. देशाच्या सीमेवर तैनात जवानांचाही उत्साह वाढतो, असा मंत्री अनिल जोशी यांना विश्वास आहे.
या तिरंग्याच्या आजुबाजूच्या परिसरात सुंदर बाग-बगिचा, लँड स्कुपिंग आणि फ्लड लाईट्स अशी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.
याच दरम्यान वाघा बॉर्डरवर सुद्धा नवीन प्रेक्षागृह उभारले गेले असून आता एकाच वेळी २५ हजार नागरिक रिट्रीट सेरेमनीचा आनंद लुटू शकतात हे विशेष!
सीमेपासून याचे अंतर अवघे १५० मीटर इतके आहे. त्यामुळेच काही अंतरावर असलेल्या लाहोर शहरातून हा तिरंगा दिसू शकतो. पाकिस्तानातील नागरिक सुद्धा मोठ्या कुतूहलाने आणि उत्सुकतेने हा तिरंगा फडकताना पाहतात असं म्हटलं जातं.
पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय…
वाघा बॉर्डरवर भारतीय आणि पाकिस्तानी संघाची जुगलबंदी पाहायला जाणाऱ्या प्रेक्षकांसाठी सुद्धा, हे एक महत्त्वाचे आकर्षण ठरले आहे. अनेक पर्यटक अगदी आवडीने येथे भेट देतात, म्हणूनच मागील तीन वर्षांत हे मोठे पर्यटन स्थळ सुद्धा झाले आहे.

सूर्यास्ताच्या वेळी घडणाऱ्या रिट्रीट सेरेमनी चा आनंद लुटणारे भारतीय नागरिक, हा तिरंगा पाहण्यासाठी सुद्धा अतिशय उत्सुक असतात. पाकिस्तानातील नागरिकांना सुद्धा नजरेस पडू शकतो अशा उंचीवर फडकणारा हा तिरंगा कॅमेऱ्यात बंदिस्त करणारी मंडळी आणि त्या झेंड्यासह स्वतःचा फोटो काढणारी मंडळी सुद्धा इथे मोठ्या प्रमाणावर दिसतात.
३६० फूट उंचीवर असणाऱ्या या तिरंग्याने भारताची शान आणखी वाढवली आहे हे मात्र नक्की…!!!!!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.