' 'चल तुझ्या रुममधे जाऊ!' रशियन कॉल गर्ल, मराठी माणूस - मन सुन्न करणारा प्रसंग

‘चल तुझ्या रुममधे जाऊ!’ रशियन कॉल गर्ल, मराठी माणूस – मन सुन्न करणारा प्रसंग

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक : संकेत कुलकर्णी (लंडन)

===

ही रात्रीची गोष्ट. भरपूर जेवण करून आमच्या ‘क्लबहॉटेल’ मध्ये यायला ११:४५ वाजून गेले होते. आमचं ‘क्लबहॉटेल’ फोर स्टार वगैरे असलं तरी तिथे एसी नाही. युरोपातल्या बहुतांश हॉटेल्सना त्याची गरजच नाही. कारण वर्षातले १० महिने थंड हवा.

उरलेल्या दोन महिन्यांत काही बोटावर मोजण्याइतकेच कडक उन्हाचे दिवस. काल तसा दिवस मॉस्कोत होता. सकाळी ३:४५ ला सूर्योदय आणि रात्री ९:१५ ला सूर्यास्त.

दिवसभर ३०-३२ सेल्सियस ऊन. रूमची नुसती भट्टी झालेली. त्यात आम्ही दिवसभर ऑफीसात.

दिवसभर रूमची खिडकीवजा झडपही बंद. रात्री परत आल्यावर ती उघडायचा प्रयत्न केला तरी वारा काही आत येईना. थोडावेळ बसून वाचन करायचा प्रयत्न केला.

बाहेर थंडी वाढली होती पण वारा नसल्याने रूममध्ये तरीही कोंडल्यासारखंच वाटत होतं. काय करावं विचार करता करता वाटलं की खाली एक मोकळ्या हवेत चक्कर मारून येऊयात. जरा बरं वाटेल.

 

moskow inmarathi

 

पटकन कपडे घातले. लिफ्टने खाली आलो. लॉबीतून रिव्हॉल्व्हिंग डोअर्सच्या बाहेर आलो आणि पोर्चच्या एका खांबाला टेकून निवांत उभा राहिलो. नेहेमी बाहेर उभे असणारे स्मोकर्सही नव्हते. वारा नव्हताच पण बाहेर वातावरण छानच थंड – म्हणजे तीन चार सेल्सियस वगैरे होतं. समोर लांब रस्त्यावर तुरळक रहदारी होती.

१५-२० मिनीटं थांबलो असेन. इतक्यात मागून एका मुलीचा आवाज आला – “दू यू हॅव अ लायतर”.

मागे वळून पहातो तर एक २२-२५ वर्षांची रशियन मुलगी. उंची साधारण माझ्याइतकीच किंवा दोनचार इंच कमी. छान गोरा रंग. हिरव्या आणि निळ्या रंगाच्या मिश्रणाच्या रंगाचे घारे डोळे.

खांद्यापर्यंत मोकळे सोडलेले सोनेरी केस. व्यवस्थित केलेला मेकप. कपडे मात्र घातले आहेत की नाहीत असा संशय यावेत असे. सुपर डीप नेककट असलेला टॉप आणि खाली अगदी नावालाच असल्यासारखी जीन्स.

 

blond with blue eyes InMarathi

 

मुलगी दिसायला आणि नाकीडोळी नीटस असली तरी हे प्रकरण काय आहे ह्याची कल्पना लगेच आली. मी म्हटलं “सॉरी. आय डोंट स्मोक.” तरीही ती तिथेच उभी राहिली.

मी जरा दुर्लक्षच केलं आणि रस्त्याकडे बघत राहिलो. आता परत जाऊया असा विचार करतच होतो तेवढ्यात ती पुन्हा म्हणाली “वॉंत तू हॅव सम फन”. “नो. थॅंक यू.” – मी असं म्हणून मी आत जायला निघालो. ती पटकन म्हणाली “सो कोल्द आऊत हियर. नो?”.

“कोल्ड? आय केम हियर टू कॅच सम फ्रेश एअर. गुड नाईट” इतकं म्हणून मी जायला वळणार तितक्यात “सी दिस” म्हणत तिने झटकन तिचा तळहात माझ्या मनगटाला टेकवला. “स्टे ऑफ मी”

मलाच न शोभणाऱ्या आवाजाच्या पट्टीत ओरडून मी मागे सरकलो. तीपण बावचळून दोन पावलं मागं गेली. आपण कोणा अनोळखी मुलीवर असं ओरडायला नको होतं ही माझी अपराधी भावनाही लगेच जागी झाली.

 

prostitution InMarathi

हे ही वाचा – क्रोसीन” औषधाने रशियात प्रचंड राजकीय उलथापालथ घडवली होती

मला हीपण जाणीव झाली की ह्या मुलीचा तळहात हातात बर्फ घेतल्यासारखा थंड होता. किती वेळ ही बाहेर उभी होती कोणास ठावूक. का बरं हिचा हात इतका थंड पडला असेल?

बरं हिने कपडेही खास घातले नव्हतेच. लंडनमध्ये बरेच हिवाळे काढल्याने अजून एक शक्यता लगेच वाटली की ही काही न खातापिता बराच वेळ इथे थंडीत उभी आहे आणि त्याने गारठली आहे. उगाचच डाफरलो तिच्यावर.

चटकन मनाशी एक निर्णय घेतला आणि तिला म्हणालो “आय ॲम सॉरी. मी तुझ्यावर ओरडल्याबद्दल मला माफ कर. पण मला एक सांग – तू बराच वेळ काही खाल्लं नाहीयेस का?”

आता पुन्हा दचकायची तिची पाळी होती. ती दोन सेकंद थांबली आणि बाजूला मान वळवून हलकेच नाही म्हणून हलवली. “आय ओन्ली हॅद माय लंच इन द आफ्तरनून”. मलाच कसंतरी वाटलं. मी माझं रात्रीचं जेवण आडवा हात मारून हाणलं होतं आणि इथे ही मुलगी चौदा तास उपाशी थंडीत कुडकुडते आहे.

मी तिला म्हणालो

“आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर लॉबीमध्ये चल. आत एखादं रेस्तरॉं नक्की ओपन असेल. मी तुला तिथे खायला घालतो. इट्स ऑन मी.” पण ती काही हलली नाही. “व्हाय दोंत वी गो तू युवर रूम …”

वगैरे म्हणून तिने तिचे ‘कलागुण’ आणि ‘दरपत्रक’ सांगायला सुरुवात केली. मला तिची कीवही आली आणि रागही आला.

 

russian call girl inmarathi

 

तिच्या ‘दरपत्रकात’ला सगळ्यात ‘महाग कलागुण’ माझ्या काल रात्रीच्या जेवणाच्या बिलच्या फक्त दुप्पट होता आणि हे गणित आपोआप केल्याबद्दल स्वत:ची लगेच लाजपण वाटली! तिला मध्येच थांबवत मी म्हणालो

“आय ॲम नॉट इंटरेस्टेड इन दॅट. पण तू फक्त आत येऊन काहीतरी खाऊन जा.“

हसून तिने डोळा मारला आणि ती “लेतस गो” म्हणाली. लॉबीतल्या हट्ट्याकट्ट्या साडेसहा फुटी सिक्युरीटी गार्डने तिच्याकडे पाहून डोळे थोडेसे मोठे करून ती आत येण्याबद्दल नापसंतीच दर्शवली. मी तिला म्हटलं “फॉलो मी” आणि आम्ही रिसेप्शन लॉबीत आलो.

 

Reception lobby InMarathi

 

आत जरा उबदार वातावरण होतं. तिला विचारलं “बोल. काय खाणार किंवा पिणार?” त्यावर ती म्हणाली की “तू काय पिणार?”. मी म्हटलं की “मी आत्ता काहीही खाणार किंवा पिणार नाहीये. मी तसाही टीटोटलर आहे. आत्ता चहा प्यायलो तर रात्री झोप येणार नाही मला.” त्यावर एक डोळा मारून ती लगेच म्हणाली “मग तेच तर आपल्याला हवंय ना!”

आत्तापर्यंत तीन वेळा सांगूनही मला हिच्याबरोबर वेळ घालवण्यात काही रस नाही हे हिच्या डोक्यात का शिरत नाहीये हे मला कळत नव्हतं.

थोडंसं त्रासूनच मी म्हणालो

“लिसन. तुला जे खायचं किंवा प्यायचं असेल ते खा किंवा पी. मी त्याचं बिल भरेन. नंतर तू तुझ्या वाटेनं आणि मी माझ्या वाटेन. पुन्हा हा विषय नकोय.”

“ओके. मी चहा घेते. चालेल का?” – ती. मी म्हटलं “शुअर. पण काही खाणार नाहीस का मग?”

“खाईन त्याबरोबरच काहीतरी”.

“ओके”

 

Couple in Hotel InMarathi

 

ती चहा पिणार म्हटल्याने पबमध्ये न जाता आम्ही आतल्या डे-नाईट रेस्तरॉंमध्ये गेलो. आतमध्ये माझ्या ओळखीचा ॲंतॉन नावाचा वेटर होता. कालपासून दोनचारवेळा येताजाता गप्पा झाल्याने त्याची ओळख झाली होती.

ॲंतॉनला म्हणालो “अ कप ऑफ टी फॉर द लेडी अॅंड अ ग्लास ऑफ वॉटर फॉर मी, प्लीज”

“लेडी!??” ॲंतॉन तोंडातल्यातोंडात पुटपुटला आणि किचनमध्ये पाणी तापवायला गेला. तेवढ्यात ती मुलगी त्याच्यावर काहीतरी रशियनमध्ये ओरडली. मी विचारलं “काय सांगितलंस?” “चहाच्या पाण्यात थुंकू नकोस!” असं म्हणून ती खळखळून हसली. “तो असं का करेल?” – इति मी. “कारण तो चहा माझ्यासाठी आहे ना!” मी काही ह्या विनोदावर हसू शकलो नाही!

चहा आला. तिने दोन्ही हात त्या गरम किटलीवर गच्च दाबून धरले. तसेच दोन मिनिटे ठेवले. मग वाफाळतं चहाचं पाणी हळूहळू कपमध्ये ओतून घेतलं.

“मिल्क?” मी विचारलं. “नको. मला चहा असाच प्यायची सवय आहे.” दोन चार घोट गरम चहा तिने प्यायल्यावर तिला जरा तरतरी आल्यासारखी वाटली. “फिलिंग बेटर? काही खाणार आहेस का?” मी विचारलं. “फिलिंग मच बेतर नाऊ. लेतस प्लीज गो तू युवर रूम” – पुन्हा तिचं तेच. आता मला खरंच राग आला.

 

Woman having Tea InMarathi

हे ही वाचा – हा “बिहारी बाबू” थेट रशियातून, अन तेही पुतीनच्या पार्टीतून निवडून आला!

“मी इतक्यांदा नाही म्हटलेलं कळत नाहीये का तुला?!?” “पण तू नाही का म्हणतोयस मग? तुला पैसे हा प्रॉब्लेम दिसत नाहीये. मग काय ‘गे’ आहेस का?” – हसून पुन्हा तिने डोळा मारला. “तुला काय करायचंय त्याच्याशी? तुझं झालं असेल तर इथून उठूयात आता.” – मी.

दोन सेकंद ती घुटमळली आणि म्हणाली “मी एक चॉकलेट केकचा पीस घेते रे खायला. चहाने भूक अजून चाळवली माझी.” “मग घे की. उगाच नाही ती बडबड करण्यापेक्षा खाऊन घे.” – मी. ॲंतॉनला बोलावलं. तिने त्याला काय हवंय ते सांगितलं. ॲंतॉन केक घेऊन आला.

केकफोर्क घेऊन तिने केक खायला सुरुवात केली. मी पहात होतो – केकफोर्कने केकचा प्रत्येक तुकडा अगदी छोटाछोटा काढून ती अगदी चवीने खात होती.

आपली एखादी आवडती गोष्ट कधी संपूच नये असं वाटत असताना आपण ती कशी काटकसरीने खाऊ – अगदी तसंच.

खाणं सुरु असतानाच तिनं बोलायला सुरुवात केली –

“मला हा केक फार आवडतो. पण असं बसून खायला वेळच मिळत नाही. आज मिळाला. आज घरून जरा लवकर निघून इथे आले होते. पण आज काहीच कॅश मिळाली नाही. बॉसला पैसे नाही दिले तर तो हाकलून लावेल. इथून जेवायला गेले आणि गिऱ्हाईक मिस झालं तर ह्या भितीने जेवायलाही गेले नाही.”

 

Chocolate cake InMarathi

आता माझी ट्यूब पेटली. ही सारखं ‘लेतस गो तू यूवर रूम’ का करत होती. मन विषण्ण झालं. पण एक शंका होतीच.

“बॉस? तुला कुठला बॉस?”

“इथे धंदा करण्यासाठी आम्हाला एका माणसाला पैसे द्यावे लागतात. तो हे हॉटेलचे लोक, बाहेरचे पोलिस वगैरे सगळं मॅनेज करतो. पण रोजचे पैसे दिले नाहीत तर मात्र तो मला हाकलून दुसऱ्या कोणालाही ही माझी जागा देऊ शकतो.”

मी पाणी पित होतो. घोट घशातच अडकला. कल्पना करून पहा. हसतमुख राहून स्वत:चं शरीर विकायचं आणि पैसे कमवायचे. ते विकत घेणारा माणूस ठरलेला वेळ जे काही अत्याचार करेल ते सहन करायचे. आणि वर त्यातले काही पैसे कमिशन म्हणून कोणाच्यातरी घशांत घालायचे.

जे कोणी सेल्स किंवा कॉर्पोरेट सेल्स मध्ये असतील त्यांना हे अनुभव नक्कीच असतील की प्रॉस्पेक्टचा कस्टमर कन्व्हर्ट करायला कायकाय कटकटी कराव्या लागतात.

त्या करून जर कस्टमर गेला तर कशी चिडचिड होते. इथे हिच्या बाबतीत जर कस्टमर गेला तर उपास आणि कस्टमर मिळाला तर पिळवणूक – आणि दोन्ही वेळा हसतमुख राहणे अपेक्षित. मी हा सगळा विचार कधी केलाच नव्हता. हे सगळे विचार अगदी झरझर येऊन गेले.

विषय बदलावा म्हणून मी म्हटलं “मग अजून काय आवडतं तुला?” “वाचन” – ती.

मला हा धक्काच होता. मी म्हटलं “अरे वा. काय वाचतेस? रोमॅंटिक? फिक्शन?”

“रोमॅंटिक अजिबात वाचायला आवडत नाही. मला डिटेक्टीव्ह नॉव्हेल्स आवडतात. तुझ्या इंग्लिशमधले शेरलॉक होम्स आणि ॲगाथा ख्रिस्ती हे सर्वात जास्त. पण ते रशियनमध्ये भाषांतरित.”

 

Sherlock Holmes Inmarathi

 

“वेळ कधी मिळतो?” हा प्रश्न विचारला आणि मी चुकून काय इंप्लाय केलेय हे कळून माझी मलाच लाज वाटली. “चोवीस तास काम करत नाही मी.” – ती डोळा मारून.

“ होय होय. बरोबर आहे. मग सध्या काय वाचत आहेस?” – मी थोडं ओशाळून.

“नवीन लेखक शोधतीये मी वाचायला. तुला माहीत आहे का कोणी नवीन?” – ती

“हो. ज्यो नेस्बो वाच. स्वीडीश आहे पण मस्त लिहीतो.” – मी

“नावाचं स्पेलिंग सांग. किंवा मेसेज कर.” – ती

मी माझा फोन काढून विकीपिडीयावरचं ज्यो नेस्बोचं पेज दाखवलं.

“मेसेज कर रे. हे लक्षात राहणार नाही नाव.” – ती.

“नंबर टाईप कर तुझा” – मी माझा फोन काढून देत म्हणालो. तिने नंबर टाईप केला. मी कॉंटॅक्ट सेव्ह करायला गेलो.

“अरेच्चा. मी तुला नाव विचारलंच नाही!” – मी.

“व्हालेरीया. पण कोणाला हे सांगू नकोस. इथे मला इल्याना म्हणून ओळखतात. चला. माझं खाणंपिणं आवरलंय. मला आता निघायला हवंय.” – पर्समधून व्हेपर काढत ती म्हणाली.

 

Jo Nesbo Novels InMarathi

हे ही वाचा – हा “बिहारी बाबू” थेट रशियातून, अन तेही पुतीनच्या पार्टीतून निवडून आला!

“हे व्हेपर होतं तर मग माझ्याकडे लायटर कशाला मागितला होतास?” – मी.

“अरे, तुला नाही कळणार पण ती कस्टमरला ॲप्रोच करायची ट्रीक आहे रे!” – डोळा मारत ती.

ह्यावर काही न बोलता मी मेसेज टाईप करून सेंड केला. “मिळाला का बघ.” – मी.

“तो फोन घरी असतो. घरी जाऊन बघेन.” – ती.

“पण हातात तर फोन आहे तुझ्या.” – मी.

“अरे, तो ‘कामाचा’ फोन आहे. प्रॉस्पेक्टसना न्यूड्स वगैरे पाठवायला. तो नंबर तुला देऊन काय फायदा – सांग बरं?” – पुन्हा एकदा डोळा मारून ती म्हणाली.

“ओके! मी बिल मागवतो.” – मी.

ॲंतॉन बिल घेऊन आला. मी कार्ड स्वाईप केलं. आम्ही उठलो. तिच्या हिरव्या निळ्या डोळ्यांत पाणी तरळल्याचा भास झाला मला. हो भासच असावा. ती म्हणाली

“मी मरेपर्यंत आजची ही गोष्ट लक्षात ठेवेन की कोणताही हेतू मनात न ठेवता एका माणसाने मला खायलाप्यायला घातलं.”

मी ह्यावर काय बोलणार. थंडीत कुडकुडणारा एक उपाशी जीव मला दिसला होता आणि त्याला मी माझ्यापरीने मदत केली होती. इतकं नरकप्राय आयुष्य जगत असताना त्या जीवाला वाचनाची आवड होती. मी रेकमेंड केलेली पुस्तकं वाचून तो जीव थोडा तरी विरंगुळा मिळवेल ही गोष्ट मला त्यातल्यात्यात सुखावून गेली होती. इतकंच काय ते.

आम्ही उठलो. ‘सी यू सून’ किंवा ‘किप इन टच’ वगैरे म्हणायचा प्रश्नच नव्हता. तिने युरोपीय पध्दतीने गालाला गाल लावून गळाभेट घेतली आणि म्हणाली “हे तुला ऐकायला ऑड वाटेल पण रेस्तरॉंमधून आपण एकत्र बाहेर पडायला नको. मी आधी जाते आणि तू पाच मिनीटांनी जा.”

“का बरं?” – बुचकाळ्यात पडून मी.

“अरे, लॉबीतून बाहेर जाताजाता मी काही कस्टमर्स मिळवायचा प्रयत्न करणार आहे. काही लोक पीत बसलेले बघितलेत मी. तुझ्याबरोबर बाहेर पडले तर कोणी पाहणारही नाही रे माझ्याकडे.” – पुन्हा डोळा मारून ती.

 

prostitutes InMarathi
Swindon Advertiser

माझ्याकडे मागे न पहाता ती तरातरा निघूनही गेली. मी तसाच सुन्न टेबलवर बसून. ॲंतॉन आला. “इल्याना गेली? काय ‘रेट’ सांगितला तुला? जास्त वाटला तर मला सांग. मी डिस्काऊंट मिळवून देईन!” त्याला कसंबसं थॅंक्स म्हणून मी माझ्या रूममध्ये परत आलो.

पहाटेचे २ वाजून गेले होते. देवाला सहसा नमस्कार न करणारा मी – पण काल रात्री अंथरूणावर पडल्यापडल्या मी मला मिळालेल्या आयुष्याबद्दल कृतज्ञतेने देवाचे आभार मानले.

 

folded hands prayer Inmarathi

सकाळी पुन्हा ऑफीस आणि काम. काल झालेला हा प्रसंग आज लिहीतानाही माझे डोळे दोनतीनदा भरून आलेत. त्यामुळे आज इतकंच!

===

हे ही वाचा – रशियाचे हे ४ हेरगिरी कारनामे ज्यांनी अमेरिकेसारख्या महासत्तेला जेरीस आणलं

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

17 thoughts on “‘चल तुझ्या रुममधे जाऊ!’ रशियन कॉल गर्ल, मराठी माणूस – मन सुन्न करणारा प्रसंग

 • June 16, 2019 at 12:58 am
  Permalink

  छान लिहलस तु । मलाहि असेच अनुभव वारंवार मिळतच असतात । परवाच फिलिपाइन्सच्या वरून आलो । तिकडे लोकल मुलिंची अवस्था साधारण अशिच । मला मागे गोव्यात ज्युसि भेटली । तिची व्यथा अजुनहि वेगळीच । तुझ्या सारख लिहतां नाहि येत मला । पण तु जे लिहलस ते खूपच मनाला लावून गेलय ।
  कधि आपलि भेट झाली तर नक्की गप्पा मारू ।
  धन्यवाद

  प्रविण मोहिते
  हैदराबाद

  Reply
 • June 16, 2019 at 10:30 am
  Permalink

  Wow…khup divsani Marathi lekh vachla…etk Sundar lihiley he…Dole bharun ale maje…ha lekh vachtana mi pn devache abhar manle majya life sati…darveli rdt hote as ka challay but ha lekh khup Sundar ahe…nd Jr ha incident khara asel tr I have to say thank you for helping that women….halli Kon krte selfless help? Asha incident la etk mature vagnare Lok kmi ahet khup…..tya Russian girl la pn ha incident atvun khup Vela changle vatel… thank you so much for such beautiful writing… And thank you for your pure help…

  Reply
 • June 16, 2019 at 2:47 pm
  Permalink

  I like this post मी पण अस आनुभवयल

  Reply
 • June 16, 2019 at 7:10 pm
  Permalink

  परदेशात पण माणूस जिवंत ठेवलात hats off

  Reply
 • June 16, 2019 at 10:14 pm
  Permalink

  सर छान पोस्ट होती, खूप काही शिकायला मिळाले

  Reply
 • June 17, 2019 at 9:46 pm
  Permalink

  अत्युच्य

  Reply
 • June 18, 2019 at 11:01 am
  Permalink

  Hearting touching story boss….

  Reply
 • June 25, 2019 at 4:19 pm
  Permalink

  Nice incident…painful life and profession…sometimes word ‘social worker’ is apt for these people who actually stand as cover fire to reduce such crimes against women.

  Reply
 • July 1, 2019 at 6:43 am
  Permalink

  खरच लेख वाचून एवढंच वाटल.”आते जाते खूब्सूरत आवारा सड़कों पेकभी कभी इत्तेफ़ाक़ सेकितने अंजान लोग मिल जाते हैंउन में से कुछ लोग भूल जाते हैंकुछ याद रह जाते हैं.”

  Reply
 • July 2, 2019 at 1:41 am
  Permalink

  Heart touching and its shows life moves on but some incidents we can’t forget and live a open wound in mind

  Reply
 • September 5, 2019 at 1:41 pm
  Permalink

  Khup chan lekh lihilat Tumhi kharc khup ase life madhe ghadat ki kalpanechya baher nice it’s heart touching story

  Reply
 • October 3, 2019 at 1:57 am
  Permalink

  Mast…. Nice storytelling and descriptions

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?