पुण्याजवळची ही १० नितांत सुंदर पर्यटनस्थळे यंदाच्या पावसाळ्यात पाहायलाच हवीत!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

=== 

पावसाळा म्हणजे निसर्गाच्या अनोख्या आणि विविध रंगांचा मनमुराद आनंद लुटण्याचा काळ! पुणे हे मुंबईचेच जुळे शहर समजले जात असले तरी, मुंबईच्या वेड लावणाऱ्या गर्दी पेक्षा इथे निश्चितच अधिक निवांतपणा मिळतो.

नुसता निवांतपणा नाही तर, इथे अशी अनेक निसर्गाचा वरदहस्त लाभलेली ठिकाणे आहेत जिथे मान्सूनच्या काळात आवर्जून भेट द्यायलाच हवी.

या शहराला लाभलेले निसर्गसौंदर्याचे वरदान पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल! 

पुण्यापासून अगदी जवळ आणि मनाला भुरळ पाडतील अशा काही रम्य ठिकाणांची माहिती आज आम्ही देत आहोत…

१. साताऱ्याजवळील ठोसेगर धबधबा,

 

thoseghar-waterfall inmarathi
TripAdvisor.com

पावसाळ्यात भेट देण्यासारखं हे एक अतिशय मोहक ठिकाण! घोंगावत कोसळणारा धबधबा आणि सोबत नानाप्रकारची, विविध आकाराची रंगीबेरंगी फुलांची अद्भुत दुनिया जिथे वसते ते कास पठार.

साताऱ्यापासून अगदी जवळ असणाऱ्या या ठिकाणाला तुम्ही नक्कीच भेट द्यायला हवी. पुण्यापासून हा धबधबा १३४.७ किमी अंतरावर आहे.

या पठारावर मॉन्सूनच्या दिवसात विविध स्थलांतरित पक्षी देखील पाहायला मिळतात. इथून जवळच असणार्या सज्जनगडावर संत रामदासांची समाधी आहे.

या गडाच्या टोकावरून फुलांनी आच्छादलेल्या दरीचे दर्शन नेत्रांना सुखावल्याशिवाय राहणार नाही.

२. तपोला

 

tapola-images-inmarathi
HuntForSpot.com

एका दिवासाच्या पिकनिक साठी पुण्याच्या आसपास एखादे स्थळ शोधात असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी अतिशय योग्य ठरेल. तपोला नगरीला पश्चिम किनार्यावरील “काश्मीर” म्हणून देखील ओळखले जाते.

ग्रामीण पार्श्वभूमी असणाऱ्या या ठिकाणी शिवसागर तलावाला भेट देऊ शकता. महाबळेश्वरहून तपोल्याला प्रवास करताना कित्येक ठिकाणी तुम्हाला कॅमेर्यात बंदिस्त करण्याचा मोह होईल अशी ठिकाणे सापडतील.

या मॉन्सूनमध्ये निवांतपणा अनुभवायचा असेल तर या ठिकाणांना जरूर भेट द्या. पुण्यापासून तपोला फक्त १५०किमि अंतरावर आहे.

ट्रेकिंगच्या छंद असणार्यांसाठी तर हे ठिकाण म्हणजे जणू स्वर्गच! तपोलाच्या घनदाट जंगलातून ट्रेकिंगचा आनंद लुटणे हा निश्चितच एक विलक्षण अनुभव असेल.

कोयना आणि सोळशी नद्यांवर बांधलेली धरणे पाहता येतील. तपोलाच्या शिवसागर तलावामध्ये बोटिंगचा देखील आनंद देखील लुटू शकता.

३. भिमाशंकर

 

bhimashankar inmarathi
thrillophilia.com

हे एक धार्मिक क्षेत्र असले तरी, भल्याभल्यांना इथल्या निसर्ग सौंदर्याची भुरळ पडल्यावाचून रहात नाही. १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे एक ज्योतिर्लिंग भीमाशंकर येथे आहे.

भाविकांसाठी हे एक तीर्थाटनाचं स्थान असलं तरी इथला निसर्गाचा देखणा सोहळा डोळ्यांत साठवण्यासारखा आहे. पुण्यापासून भीमाशंकर अवघ्या १२७ किमी अंतरावर वसलेले आहे.

इथे तुम्ही भीमाशंकर अभयारण्याला देखील भेट देऊ शकता. या अभयारण्यात शेकरू सारखा एक दुर्मिळ प्रजातीचा प्राणी तुम्हाला पाहायला मिळेल.

शिडी घाटापासून ते गणेश घाटापर्यंत ट्रेकिंगचा आनंद लुटू शकता. भीमाशंकरच्या डोंगर दऱ्यातून, पावसाळ्यात उत्स्फुर्त वाहणाऱ्या झर्यांचा आनंद लुटू शकता.

४. कर्नाळा

 

karnala-bird-sanctuary inmarathi

 

ताजातवाना अनुभव देणारा आणि उत्साह वाढवणारा निसर्गाची अद्भुत किमया अनुभवण्यासाठी किमान या मॉन्सूनमध्ये तुम्ही या ठिकाणाला किमान एकदा तरी भेट द्यायला हवी.

पक्षांच्या मंजुळ स्वरांचा आस्वाद घ्यायचा असल्यास या वैशिष्ट्यपूर्ण शहराला नक्कीच भेट द्या. निसर्गाच्या विविध रंगसंगतीचा आणि जैव-विविधतेचा सुंदर नजरा या ठिकाणी अनुभवता येईल.

पावसाळ्याच्या दिवसात महाराष्ट्रातील हमखास भेट देण्यासारखं ठिकाण म्हणजे कर्नाळा. पुण्यापासून कर्नाळा अवघ्या १२४ किमी अंतरावर वसलेलं आहे.

इथे तुम्ही एकेकाळी मराठा साम्राज्याचा भाग असलेल्या कर्नाळा गडाचे अवशेष पाहू शकता. कर्नाळा शिखरावर गिर्यारोहणाचा आनंद लुटू शकता. हे शिखर खास गरुड, गिधाड आणि अशाच प्रकारच्या पक्षांच्या दुर्मिळ प्रजातींसाठी राखून ठेवले आहे.

या शिखरावरून तुम्ही मुंबईच्या सागर किनार्याचे आकाश दर्शन घेऊ शकता. सह्याद्रीच्या कुशीतील घनदाट वृक्षराजी तुमच्या नजरेला खिळवून ठेवेल.

५. कामशेत

 

paragliding-at-kamshet inmarathi
Adventures365.in

निसर्गाच्या कुशीत राहून पक्ष्यांचे मधुर कूजन ऐकण्यात रस असेल तर पुण्यापासून जवळच असलेल्या कामशेत या ठिकाणाचा विचार करू शकता.

मॉन्सूनच्या काळात तर पक्षीप्रेमींसाठी कामशेत एक अद्भुत अनुभव देणारे ठिकाण ठरू शकते. एकदा भेट दिल्यानंतर निश्चितच या तुम्ही मरगळ झटकून फ्रेश व्हाल.

पुण्यापासून कामशेत फक्त ४८ किमी अंतरावर आहे. अगदी एका दिवसाची ट्रीप देखील प्लान करू शकता. कामशेत परिसरात अनेक जुनी हेमाडपंती बांधकाम असलेली मंदिरे आहेत.

संत तुकाराम महाराज ज्या डोंगरावर जाऊन अभंग रचत तो भंडारा डोंगर देखील याच परिसरात आहे. बौद्ध संस्कृतीच्या खुणा दर्शवणार्या भैरी, कारला, भाजा आणि भेडसा यासारखी लेणी इथल्या परिसरात पाहायला मिळतात.

पावना धरणावर उभारलेल्या पावना तलावातूनपतंग उडवणे आणि डान्सिंगचा मनमुराद आनंद लुटू शकता. निसर्ग सौंदर्य आणि वास्तुकलेचा संगम असणारे लोहगड, तिकोना आणि तुंगी यासारख्या किल्ल्यांना भेटी देऊ शकता. शिंदेवाडी टेकडीवरून पॅराग्लाइडिंगचा आनंद लुटू शकता.

६. सिंहगड

 

Sinhagad_inmarathi
aroundpune.com

सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा गड पाहण्यास तुम्हाला फक्त पाऊसच नव्हे तर कोणतही कारण पुरेसं आहे. आठवड्याचा शिण घालवायला यासारखं दुसरं ठिकाण नाही.

पुण्यापासून फक्त ३७.४ किमी अंतरावर हा देखणा गड वसलेला आहे. कात्रज घाटातून सिंहगड ट्रेकिंग करण्याचा आनंद वेगळाच असेल. पावना धारणावरील पानशेत तलावावरील शांत वातावरण नक्कीच वेगळी अनुभूती देईल.

७. मुळशी

 

mulshi inmarathi
Whatshot.com

पुण्यापासून अवघ्या एक-दोन तासाच्या अंतरावर पर्यावरणाच्या वैविध्यपूर्ण श्रीमंतीनं नटलेलं हे धारण. पावसाळ्याचा दिवसात पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी मुळशी अगदी योग्य ठिकाण आहे.

इथल्या शांत वातावरणाच्या आणि अद्भुत सौंदर्याच्या सान्निध्यात तासानतास बसणे, मनाला ताजेतवाने करून जातो.

पुण्यापासून फक्त ३५ किमी अंतरावर आहे. सह्याद्रीच्या डोंगर रांगांनी वेढलेल्या या ठिकाणी धनगड आणि कोरेगड सारखे किल्ले आहेत. शतकापूर्वीचे वांजाइ मातेचं ठिकाण देखील आहे.

या दर्याखोर्यातून ड्रायव्हिंगचा आनंद देखील घेऊ शकता. या पावसाळ्यामध्ये कोसळणारे धबधबे हे मुळशीचे आणखी एक आकर्षण.

८.कोलाड

 

kolad inmarathi
highape.com

तुम्हाला काही वॉटर गेम्स खेळायचे असतील तर, हे ठिकाण अत्यंत योग्य ठरेल. अॅडव्हेंचर पासून निसर्ग सौंदर्यापर्यंत सर्व गोष्टींचा आस्वाद इथे घेता येईल. ऐतिहासिक लेणी आणि किल्ले, मंदिरे आणि मठ अशी कित्येक स्थळं इथे पाहता येतील.

पुण्यापासून १२० किमी दूरवर हे स्थळ आहे. कोलाडमध्ये तुम्ही विविध प्रकारचे वॉटर गेम्स खेळू शकता. ताला आणि घोसला यासारखे वास्तुकलेच्या दृष्टीने प्रसिद्ध असलेले किल्ले पाहू शकता.

बौध्द कालीन प्राचीन लेणी पाहू शकता. भिरा धारण आणि धोलवळ धारण इथून पक्षी निरीक्षणाचा अस्वस घेऊ शकता.

ताम्हिणी धबधब्याचा सुंदर नजारा पाहू शकता. कानसाई धबधबा आणि उद्धार येथील गरम पाण्याचे झरे देखील पाहायला मिळतील.

९. लोणावळा-खंडाळा

 

Lonavala-hotels inmarathi
Cleartrip

सह्याद्रीच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी वसलेली ही ठिकाणे म्हणजे निसर्ग सौंदर्याचा खजानाच जणू. निसर्गानी सजलेल्या डोंगर रांगा, नितळ झरे आणि ऐतिहासिक महत्व असणारी लेणी आणि किल्ले असे चतुरंगी सौंदर्य पाहून तुम्ही थक्क व्हाल.

पावसाळ्याच्या दिवसात जर तुम्ही मुंबई किंवा पुण्याच्या आसपास फिरायला जाण्याचा बेत आखत असाल तर, लोणावळा-खंडाळा ही नवे तुमच्या लिस्टमध्ये हवीतच.

पुण्यापासून हे ठिकाण फक्त ७०.१ किमी अंतरावर आहे. झुडुपांच्या आतून ओसंडणारे पाण्याचे ओहोळ हे डोळ्याचे पारणे फेडणारे दृश्य आहे.

इथे गेल्यावर आवर्जून भेट द्यावं असं ठिकाण म्हणजे, सॉसेज टेकडी. सहसा कुठेही सहज नजरेस न पडणारे काही दुर्मिळ पक्षी इथे पाहायला मिळतात.

पवना धरणाचे काही थक्क करणारी दृश्ये इथून पाहायला मिळतात. तुंग आणि तिकोना यासारख्या किल्ल्यांना देखील भेटी देऊ शकता.

१०. माळशेज घाट

 

malshej inmarathi

 

कॅम्पिंग, ट्रेकिंग असे साहसी खेळ करणार असाल तर माळशेज घाट हा एक उत्तम पर्याय आहे. स्थलांतरित होऊन येणारे पिंक फ्लेमिंगोज हे इथले खास आकर्षण आहे.

दोन दिवस सुट्टी काढून फिरायला जाण्याचा बेत आखत असाल तर माळशेज हे एक उत्तम पर्यटन स्थळ आहे. पुण्यापासून माळशेज ११९ किमी दूरवर आहे.

माळशेजच्या परिसरात असणारे धाबेधाबे पाहणे हा एक सुंदर अनुभव आहे आणि पावसाच्या दिवसात हे धबधबे नवीन रूप घेऊन ओसंडत असतात.

ट्रेकिंग, हायकिंग, यासारखे साहसी खेळ देखील खेळता येतात. आकर्षक फ्लेमिंगोजना कॅमेर्यात कैद करण्याचा मोह तर तुम्ही टाळूच शकत नाही.

ही आहेत पुण्याजवळच्या मनमोहक पर्यटन स्थळे. तर… यंदाच्या पावसाळ्यात या स्थळांची पूर्ण मजा घ्यायला विसरू नका!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?