' शरद पवारांच्या फेसबुक लाईव्हवर विनोदी कमेंट्सचा पाऊस : वाचा २० भन्नाट कमेंट्स – InMarathi

शरद पवारांच्या फेसबुक लाईव्हवर विनोदी कमेंट्सचा पाऊस : वाचा २० भन्नाट कमेंट्स

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संयुक्त पुरोगामी आघाडीला महाराष्ट्रात दारुण पराभवाचा सामना करावा लागला, भाजपा शिवसेना युतीला महाराष्ट्रात बहुसंख्य जागांवर यश मिळाले.

त्यामुळे महाराष्ट्रात मोदी सरकारच्या कामगिरी प्रति जनता खुश असल्याचे दिसून आले आहे तसेच काँग्रेस राष्ट्रवादी हे कुठेतरी जनसंपर्कात कमी पडल्याचे दिसून आले आहे.

 

sharad-inmarathi

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार तसे महाराष्ट्रातील व देशातील राजकीय पटलावरचे एक उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणून आपल्याला परिचित आहेतच.

परंतु त्यांचा हा मोठा पराभव त्यांच्या दीर्घ राजकीय कारकीर्दीवर प्रश्न उपस्थित करणारा ठरला आहे.

ह्या पराभवाचे सिंहावलोकन करण्यास पवारांनी सुरुवात केली असून जनतेपर्यंत पक्षाला व ध्येय धोरणांना पोहचवण्याचे कार्य त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हाती घेतलं आहे.

ह्याच जनसंपर्क सशक्तीकरण यंत्रणेचा भाग म्हणून पवारांनी, राज्यातील दुष्काळ तसेच इतर अनेक महत्वपूर्ण प्रश्नांवर महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधण्यासाठी फेसबुक लाईव्हचा मार्ग निवडला आहे.

 

pawar inmarathi
facebook.com

महाराष्ट्रातील तरुणांपर्यंत पोहचणे हा ह्या लाईव्ह मागचा प्रमुख उद्देश होता, परंतु त्यांचा हा उद्देश सपशेल फोल ठरल्याचे दिसून आले असून त्यांचा हा जनतेशी लाईव्ह संवाद साधण्याचा उपाय त्यांच्यावर उलटला आहे.

लोकांनी त्यांच्या लाईव्हवेळी त्यांच्यावरच टीकास्त्र सोडले असून, कमेंट सेक्शनमध्ये आपला रोष प्रकट करत त्यांच्यावर प्रतिप्रश्नांची सरबत्त्ती केली आहे.

त्यात अनेक प्रश्न हे खूप गंभीर तर आहेतच पण काही प्रश्न हे उपरोधिक पण आहेत.

एकंदरीत शरद पवार यांना जनमत पुन्हा आपल्याकडे वळवण्यासाठी खूप कसरत करावी लागणार आहे हे मात्र नक्कीच !

 

sharad-pawar-inmarathi
indianexpress.com

 

तर चला आपण बघुयात पवार साहेबांच्या वॉलवर केलेल्या काही निवडक आणि लोकप्रिय कमेंट्स….

शरद पवारांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची सुरुवातच झाली ती त्यांच्या घराणेशाही वर टीका करून, यंदा पवारांचे दोन नातू राजकारणाच्या रणसंग्रामात उतरले आहेत,

यंदाच्या लोकसभेसाठी मावळ मधून अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार रणांगणात उतरले होते, त्यांचा जरी पराभव झाला असला तरी पवार घराण्याची एक नवी पिढी राजकारणात आली आहे.

पवारांचे पुतणे राजेंद्र पवार यांचे पुत्र रोहित पवार देखील यंदा विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे, त्यामुळे पवार घराण्यातून दोन नवे शिलेदार राजकारणात आलेले आहेत.

परंतु यामुळे पक्षातील इतर कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार यावर लोकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. हि घराणेशाही असल्याची टीका पवारांवर करण्यात आली आहे.

 

pawar comment 1 inmarathi

 

pawar comment 1 inmarathi

 

pawar comment 1 inmarathi

 

पवारांवर फक्त बारामतीचा विकास केला व इतर भागांकडे दुर्लक्ष केल्याची पण टीका केली जात आहे. सोबतच पवारांच्या कन्या  सुप्रिया सुळेंवर देखील अनेक टीका करण्यात आल्या आहेत.

 

pawar comment 1 inmarathi

 

pawar comment 1 inmarathi

 

pawar comment 1 inmarathi

 

pawar comment 1 inmarathi

 

pawar comment 1 inmarathi

 

पवारांनी मागे ईव्हीएम घोटाळा झाल्याची वाच्यता केली होती. त्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली होती. इथे देखील ईव्हीएम च्या मुद्द्यावर पवारांना लोंकानी खिंडीत पकडले आहे.

pawar comment 1 inmarathi

 

pawar comment 1 inmarathi

 

pawar comment 1 inmarathi

ट्रिपल तलाक, राहुल गांधी आणि इतर अनेक  विषयांवर लोकांनी पवारांना प्रश्न विचारले आहेत.

 

pawar comment 1 inmarathi

 

pawar comment 1 inmarathi

 

पवारांना अजून त्यांनी मुस्लिम शुक्रवारी बॉम्ब फोडणार नाही, १९९३ च्या कथित १३ व्या बॉम्बस्फोटाबद्दल  देखील त्यांच्या विधानांचा   लोकांनी चांगला समाचार घेतला आहे.

 

pawar comment 1 inmarathi

 

pawar comment 1 inmarathi

अनेकांनी पवारांच्या संघ स्वयंसेवकांकडून चिकाटी शिका ह्या मुद्द्यावर पण बरीच उपरोधिक टीका केली आहे.

 

pawar comment 1 inmarathi

 

pawar comment 1 inmarathi

 

अश्याप्रकारे शरद पवार हे लाईव्ह आले खरे पण लोकांनी त्यांच्यावर टीकेचा प्रचंड भाडीमार केला. या पार्श्वभूमीवर त्यांचा जनसंपर्काचा प्रयत्न कितपत यशस्वी होईल हे येणार काळ सांगेल.

आपल्याला शरद पवारांचं लाईव्ह बघायचं असल्यास आणि अजून रंजक कमेंट्स वाचायच्या असल्यास, खालील लिंक वर बघू शकतात

 

 

अश्याप्रकारे शरद पवार हे लाईव्ह आले खरे पण लोकांनी त्यांच्यावर टीकेचा प्रचंड भाडीमार केला. या पार्श्वभूमीवर त्यांचा जनसंपर्काचा प्रयत्न कितपत यशस्वी होईल हे येणार काळ सांगेल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?