' मृत पतीची आठवण - तब्बल ७५,००० झाडे लावणाऱ्या महिलेची अभिमानास्पद कहाणी

मृत पतीची आठवण – तब्बल ७५,००० झाडे लावणाऱ्या महिलेची अभिमानास्पद कहाणी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

वृक्षारोपण करा, पर्यावरण वाचवा असा जगभर नारा चालू असतो. लोक एखादं झाड लावतात आणि सोशल मीडियावर त्याचा डंका वाजवतात.

एकीकडे औद्योगिकीकरण होऊन वाळवंट होणारी जमीन आहे आणि दुसरीकडे काही पर्यावरणाचा विचार करुन पर्यावरणपूरक कामे करणारे असेही काही लोक आहेत ज्यांनी आपल्या कामाचा कसलाही गाजावाजा केला नाही.

हिल स्टेशनला गेलो तर तिथं हिरवळीने नटलेली वनराई दिसते. तेव्हा वाटतं इतकी झाडं आहेत तरीही काय हा झाडं लावायचा अट्टाहास.. पण जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी ही झाडंही कमी आहेत.

 

global warming inmarathi

 

वितळणारा हिमालय, बदललेले ऋतूमान, पावसाळ्यात होणारा कमी पाऊस, लांबणारा हिवाळा आणि वाढता उन्हाळा हे सारे बदल जीवसृष्टीच्या मुळावर येणार आहेत.

हे ओळखून पर्यावरण विषयक जाणिवा प्रगल्भ ठेवून वृक्षारोपण करणाऱ्या लोकांमध्ये अजून एक नाव आदराने घ्यावे लागेल ते म्हणजे जेनेट यज्ञेश्वरन्.

कोण आहेत या जेनेट यज्ञेश्वरन्?

जेनेट यज्ञेश्वरन् या बंगळुरू येथे राहणाऱ्या एक सर्वसामान्य गृहिणी आहेत. सप्टेंबर २००५ मध्ये त्यांच्या पतीचं निधन झालं. आपल्या नवऱ्याच्या आठवणीसाठी काहीतरी ठोस, भरीव असं काम करायची त्यांची इच्छा होती.

काय करावं? हा विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. त्याचवेळी बंगळुरू येथे बेसुमार वृक्षतोड केलेली होती.

 

forest inmarathi

 

लोकांना त्यांना काहीतरी करायचं आहे हा विचार समजला. त्यांना सल्ला दिला की तुम्ही धरणं आंदोलन सुरू करा. पण हे काही त्यांना पटले नाही. मग त्यांनी आपल्या पतीच्या नांवे एक चॅरिटेबल ट्रस्ट बनवला.

त्याचं नाव आहे जेनेट यज्ञेश्वरन् चॅरिटेबल ट्रस्ट.

त्यांनी ठरवलं आसपासच्या परिसरात वृक्षारोपण करावे. आणि ५ जून २००६ रोजी त्यांनी पहिलं झाड लावलं.. ते झाड होतं करंज्याचं! १३ वर्षांनंतर जेनेट ६८ वर्षांच्या झाल्या..

आणि त्यांनी लावलेल्या करंजाच्या झाडाला उत्तम बहर आला होता. ते पाहून जेनेट यांना अभिमान वाटला. त्यांनी बनवलेल्या ट्रस्टनं हे काम सार्थ अभिमान वाटावा असंच ठरलं.

आसपासच्या परिसरात या ट्रस्टच्या माध्यमातून जवळपास ७५ हजार झाडांची लागवड केली आहे. एजीपुरा या दक्षिण बंगळुरु मधील विभागात जिथं नागरी वस्ती आहे तिथं हे काम त्यांनी केलं आहे.

 

janet inmarathi

 

लोकांची प्रतिक्रिया-

अर्थातच संमिश्र प्रतिसाद असलेली प्रतिक्रिया लोकांनी दिली. काही जणांनी त्यांना सहभागी व्हायला तयारी दाखवली तर काही लोकांचा प्रतिसाद हा नकारात्मक भूमिका सांगणारा होता. पण त्यानं जेनेट खचल्या नाहीत की त्यांनी काम सोडायचा विचार केला नाही.

आपल्या आसपास असणाऱ्या परिक्षेत्रात त्यांनी झाडं लावायला सुरुवात केली. काही लोक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. स्वयंस्फूर्तीने स्वयंसेवक बनून या अभियानात सामील झाले.

जेनेट यज्ञेश्वरन् स्वतः लैंडस्केप डिझायनर असल्याचा फायदा झाला की त्यांना त्यासाठी विशेष परिश्रम घ्यावे लागले नाहीत. आपल्या ज्ञानाचा उत्तम वापर करत त्यांनी वृक्षारोपण केलं.

सन २००६ पासून आजपर्यंत बंगळुरु मधून लावलेली झाडं पार राज्याच्या सीमा ओलांडून पलिकडे तमिळनाडू मध्येही पोहोचली आहेत.

 

deforestation-inmarathi

 

जेनेट यज्ञेश्वरन् यांना अत्यंत अभिमान वाटतो की या काही वर्षांत त्यांनी हजारो झाडांची लागवड केली.

 त्यापैकी काही भाग जे अतिशय प्रतिष्ठेचे मानले जातात. ते म्हणजे- कृष्णराजपुर, पै ले आऊट, बेगूर इलेक्ट्रॉनिक सिटी, टाटागुणी, तालगतपुरा, केम्ब्रीज ले आऊट, कोरमंगला, जक्कूर क्राॅस आणि इतरही बरेच भाग…

तोमकूर आणि चिक्कबल्लापूर या भागात पाच हजार झाडांची लागवड त्यांनी केली आहे.

जेनेट सांगतात, कुठूनही आम्हाला विनंती करणारं कुणी आलं तर आम्ही तिथे जाऊन वृक्षारोपण करतो. सध्या कूर्ग येते एक हजार आणि तमिळनाडू मध्येही तंजावर जिल्ह्यात एक हजार नारळाच्या झाडांच्या लागवडीचा संकल्प आमच्या ट्रस्टनं केला आहे.

तंजावरच्या त्रिभुज प्रदेशातील भागात ही झाडे लावली गेली आहेत.

जे शेतकरी चक्री वादळाचा तडाखा बसून आपदग्रस्त झाले होते, त्यांना हा लाभ व्हावा म्हणून ट्रस्ट प्रयत्नशील होते. लोकसहभागातून जनजागृती व्हावी यासाठी शंभर गरीब शेतकऱ्यांना निवडून प्रत्येकी दहा नारळाच्या झाडांच्या लागवडीचा निर्णय घेण्यात आला.

 

janet_inmarathi

 

लोकसहभागासोबतच काही कार्पोरेट कंपन्या सुध्दा जेनेट यांच्या या कार्यात सहभागी व्हायला तयार झाल्या आहेत. त्या म्हणजे सोनी, नोकीया, सॅमसंग आणि KPMG.

या कंपन्यांनी वृक्षारोपणाचे प्रायोजक होणे आनंदाने मान्य केले आहे.

जेनेट यज्ञेश्वरन् म्हणतात,

“आम्ही वृक्षारोपण करतो पण पुढं त्या झाडांची काळजी निगा राखणं हे काम रहीवासी लोकच करतात. आणि तेवढी माफक अपेक्षा ठेवली जाते त्यांच्याकडून.”

या कार्याचा मुख्य उद्देश आहे की लोकांनी झाडांची मालकी समजून काळजी घ्यावी.. ती जतन करावीत. याचसाठी लोकसहभाग अतिशय महत्त्वाचा घटक आहे.

 

jenet inmarathi

 

जेनेट यज्ञेश्वरन् यांच्या या पर्यावरण पूरक कार्याची दखल बंगळुरु मधील प्रमुख वर्तमानपत्रांनी सुध्दा घेतली आहे.

थोडक्यात पतीवरचं प्रेम आणि त्याचं निधन यांचं भांडवल बनवत दुःखी राहण्यापेक्षा जेनेटनी त्याच्या आठवणीत बंगळुरु वर हिरवाई पसरली. आणि त्यांची आठवण कायम राहील असं भरीव काम केलं.

मंगेश पाडगांवकर म्हणतात… सांगा कसं जगायचं? कण्हत कण्हत..की गाणी म्हणत? जेनेटनी दुसरा पर्याय निवडला आणि केवळ आपलंच नव्हे तर सकळांचं जीवन हिरवगार केलं

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?