' ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरच्या बॅटमध्ये आढळला होता सेन्सर! – InMarathi

ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरच्या बॅटमध्ये आढळला होता सेन्सर!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

क्रिकेट हा भारतातील सगळ्यात लोकप्रिय खेळ. हातात बॅट आणि बॉल घेतला नाही असा भारतीय शोधणे अगदी दुर्मिळच.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

खरं तर क्रिकेट हा इंग्लंडचा खेळ, त्यांनी आपल्याबरोबर आपला खेळ सुद्धा भारतात आणला आणि भारतातल्या लोकांनी त्याला अगदी डोक्यावर घेतले. क्रिकेटची सुरवात साधारण सोळाव्या शतकात झाली असे मानले जाते.

 

david warner inmarathi

==

हे ही वाचा :  क्रिकेटच्या कित्येक चाहत्यांना कायमस्वरूपी विचारात टाकणारे ५ ऐतिहासिक- वादग्रस्त निर्णय

==

जसजसा वेळ जात गेला क्रिकेटची प्रगती होत गेली. हळूहळू एक एक नवीन नवीन नियम येत गेले, खेळाडू त्यातून पळवाटा काढू लागले मग अजून वेगळे नियम आले असं होत होत ह्या खेळला आजचे स्वरूप आले आहे.

जसे ह्या खेळाच्या नियमात बदल होत गेले तसेच तो खेळण्यासाठी लागणाऱ्या गोष्टीत म्हणजे बॅट, बॉल, पॅड, हेल्मेट,स्टंप ह्यात सुद्धा सुधारणा होत गेल्या आणि त्याचा दर्जा वाढत गेला.

आता तर लाईट पेटणाऱ्या आकर्षक बेल्स सुद्धा ह्या खेळात समाविष्ट झालेल्या आहेत.

जसजसे तंत्रज्ञान प्रगत होत गेले क्रिकेटने त्याचा वापर करून घेतला. रन आउटच्या निर्णयासाठी कॅमेरा आल्यानंतर तिसऱ्या पंचाची मदत घेतली जाऊ लागली .

 

third-umpire-inmarathi

 

ह्या सुधारणांचा उपयोग खेळाडूंनी सुद्धा आपला खेळ सुधारण्यासाठी केला. प्रत्येक सामन्याची तयारी करताना खेळाडू आता प्रतिस्पर्धी संघातील प्रत्येक खेळाडूच्या खेळाचे व्हिडीओ बघतात आणि त्यानुसार आपले डावपेच ठरवतात.

ह्या कामासाठी प्रत्येक संघासोबत आता कॉम्प्युटर तज्ञांची सुद्धा एक टीम तयार असते. आज आपण अशाच नवीन शोधाचा वेध घेणार आहोत.

२००३ साली जेव्हा भारत ऑस्ट्रेलिया विरुद्ध विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना हरला होता तेव्हा पूर्ण भारतात एक अफवा फार मोठ्या प्रमाणात फिरत होती. ती म्हणजे रिकी पॉंटिंग त्या सामन्यात बॅटमध्ये स्प्रिंग घालून खेळला आणि त्यामुळे तो एवढे मोठे मोठे फटके मारू शकला.

ह्या अफवेत काही तथ्य नसले तरी आज आपण जी गोष्ट वाचणार आहोत ती मात्र पूर्णपणे सत्य आहे. बॅट संदर्भातील एका गोष्टीबद्दल मागील वर्षीपासून चर्चेत आहे तो ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर…

डेव्हिड वॉर्नर एक वर्ष आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून बंदीच्या कारणाने बाहेर होता. २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेतून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले.

 

david warner 1 inmarathi

 

ह्या स्पर्धेत चांगली कामगिरी करून उत्तम पुनरागमन करण्यासाठी डेव्हिड वॉर्नर खूप जास्त मेहनत घेत होता. त्याची उत्तम कामगिरी सुद्धा त्याच्या चांगल्या खेळीत दिसून आली होती.

त्याच्या ह्या तयारीच्या बाबतीत एक नवीन आणि अनोखी गोष्ट बाहेर आलेली होती. ती म्हणजे डेव्हिड वॉर्नरने आपल्या बॅटला एक सेन्सर लावलेला होता.

हा सेन्सर बॅटच्या दांड्याजवळ लावला जातो आणि त्याचा वापर करून खेळताना बॅटचा वापर कसा होत आहे ह्याची माहिती साठवली जाऊ शकते आणि नंतर त्याचा उपयोग करून फलंदाजाच्या तंत्रात योग्य ते बदल केले जाऊ शकतात.

ह्या सेन्सरला आंतराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आईसीसीने २०१७ सालीच परवानगी दिलेली होती. मात्र २०१९ पर्यंत कुणीही ह्या तंत्रज्ञानाचा वापर केला नव्हता.

या तंत्राचा वापर डेव्हिड वॉर्नर याने सर्वप्रथम केला होता. 

बेंगलोरमधल्या स्मार्ट क्रिकेट नावाच्या कंपनीने हा सेन्सर बनवला असून त्याचा वापर करून डेव्हिड वॉर्नरने विश्वचषकाची तयारी केली. विश्वचषकात अनेकवेळा यॉर्कर चेंडूचा सामना करावा लागू शकतो, हे त्याला ठाऊक होतं. त्यासाठी त्याने विशेष तयारी केली.

 

david warner 2 inmarathi

==

हे ही वाचा :  आज लोकप्रिय असलेल्या क्रिकेटमधील ‘वन डे’ सामन्यांना अशी झाली सुरूवात!

==

अशा चेंडूचा सामना करताना त्याच्या बॅटचा वेग साधारण ७०-७५ किमी/तास एवढा असायचा. मात्र तो सरावाच्या दरम्यान हा वेग ८५-९० किमी/तास एवढा वाढवण्याचा प्रयत्न करत होता. त्याचप्रमाणे बॅटचा कोन सुद्धा तेवढाच महत्वाचा असतो.

फिरकी गोलंदाजांसाठी हा कोन १६० ते १७५ डिग्री तर विचित्र गोलंदाजीची पद्धत असणाऱ्या मलिंगा किंवा बुमराह ह्यासारख्या गोलंदाजांसाठी हा कोन १२०-१२५ डिग्री एवढा असावा.

ह्या उपक्रमात भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज दीप दासगुप्ता हा सुद्धा सहभागी होता. त्याच्या म्हणण्याप्रमाणे आधी ह्या सगळ्या गोष्टी प्रशिक्षक आपल्या नजरेने टिपायचे आणि खेळाडूंना त्याप्रमाणे बदल सुचवायचे.

मात्र ह्या तंत्रज्ञानामुळे ह्या एकूण प्रकारात अचूकता आली असून ह्याचा फायदा खेळाडू आणि प्रशिक्षक ह्या दोघानांही होऊ शकतो.

सध्या ह्या सेन्सरच्या वापराची सुरवात असल्याने त्यापासून मिळालेली माहिती कमी आहे मात्र वेगवेगळ्या सामन्यात, वेगवेगळ्या गोलंदाजांविरुद्ध खेळल्यानंतर मिळणारी एकूण माहिती जेव्हा एकत्र केली जाईल तेव्हा त्याचा वापर फार चांगल्या प्रकारे केला जाऊ शकतो.

 

david warner 3 inmarathi

 

ह्या माहितीचा वापर करून फलंदाज आपल्या फलंदाजीच्या तंत्रात योग्य ते बदल वेळोवेळी करू शकतात किंवा जेव्हा धावा होत नसतील तेव्हा ह्याचा उपयोग करून आपल्या तंत्रातील चुका शोधून काढू शकतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

सध्या फक्त डेव्हिड वॉर्नर हा एकमेव खेळाडू ह्या तंत्राचा वापर करत आहे मात्र भविष्यात आपल्याला अनेक फलंदाज हे तंत्र वापरताना दिसू शकतात आणि कदाचित हा क्रिकेटच्या इतिहासातील एक क्रांतीकरण शोध ठरू शकतो.

===

हे ही वाचा :  क्रिकेटमधील हे ११ जबरदस्त रेकॉर्डस् तोडणं केवळ अशक्य मानलं जातं!

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?