'अल-कायदाच्या म्होरक्याचा अमेरिकेने असा केला खातमा...

अल-कायदाच्या म्होरक्याचा अमेरिकेने असा केला खातमा…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===  

पूर्वापार चालत आलेल्या सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्तींचा लढा आजही कायम आहे. वेगवेगळ्या आतंकवादी संघटना वेगवेगळ्या ठिकाणी लोकांना हर तऱ्हेने त्रास होईल असे हल्ले करत असतात.स्फोट होतात.

वित्तहानी जिवीतहानी होते. मृतांचे आकडे जाहीर होतात. चर्चा होतात, लोक फेसबुकवर हळहळतात.

काही दिवसांनी स्थिती सामान्य होते. लोक झालेले हल्ले, बातम्या सारं विसरुन आयुष्य जगायला सुरुवात करतात.

पण काही राष्ट्रे कणखर भूमिका घेतात. निषेधाचे खलिते आणि सौम्य शाब्दिक हिंसा करत बसत नाहीत. थेट अशा संघटनांच्या म्होरक्याच्या अड्ड्यांची पाळंमुळं खणून काढतात आणि निकाल लावून मोकळे होतात.‌

 

us army inmarathi
The National

अशीच जागतिक पातळीवर हिंसाचार घडवून आणणारी एक अतिरेकी संघटना आहे अल् कायदा. आणि या संघटनेच्या म्होरक्याला कसं टिपून मारलं होतं त्याची ही कथा..वाचा..

अल कायदाचा म्होरक्या होता मुसाब अल् झराकी. त्यानं एकेकाळी जगभरातील पोलिस खात्याच्या नाकात दम आणला होता. विविध प्रकारच्या आरोपांनी त्याच्यावर २५ अब्ज अमेरिकन डॉलर चे बक्षिस त्याला पकडून देण्यासाठी ठेवले होते.

एवढीच रक्कम ओसामा बिन लादेनला पकडायला सुध्दा ठेवली होती. अल् झराकी बद्दल एका ओळीत सांगायचं तर सर्वत्र असलेला अन् कुठेही नसलेला.

कोण होता हा अल् झराकी..

अल् झराकी हा जिहादी अतिरेकी होता. ज्यांचे वडील धर्मगुरु होते. सोविएत रशिया आणि अफगाणिस्तान यांच्यात चाललेल्या युध्दाचा काही काळ तो एक भाग होता. वयाच्या १५ व्या वर्षी तो या युध्दात सामिल झाला होता.

 

zarqawi inmarathi
The Times

३ वर्षांनी तो पेशावर येथे ओसामा बिन लादेनला भेटला. तेंव्हा दोन आझमना सोबत घेऊन ओसामा बिन लादेन सोविएत रशिया विरुध्द लढत होता. त्यावेळी झराकी दुसऱ्या टप्प्यात ती जिहादची लढाई करत होता. तोपर्यंत रशियाचे विभाजन झाले होते.

त्यानंतर हुथैफा आझम आणि अल् झराकी यांनी अफगाणिस्तान सोडून दिला आणि ते दोघेही वेगळे झाले. पण इराकमध्ये जिहादी कारवाया करत असताना ते दोघेही पुन्हा एकदा समोरासमोर आले.

आझम हा स्वयंघोषित जिहादी जो निव्वळ युद्ध हेच उत्तर आहे असं समजत होता, तो आता जाॅर्डनची राजधानी अमान येथे रहात होता. शास्त्रीय अरेबिक साहित्यावर डाॅक्टरेट करत होता. त्याची वेशभूषा, केशभूषा पार बदलली होती. पूर्वीचा जिहादी पोशाख आता कुठंही दिसत नव्हता.

 

zarqawi 1 inmarathi
NEWSREP

एका मुलाखतीत आझमनं सांगितलं जिहादी कारवाया करण्यासाठी प्रचंड मोठी रक्कम या अतिरेक्यांना दिली जात होती. साधा फोन केला तरी तीन कोटी डॉलर्स मिळत होते. जेंव्हा पहिल्यांदा झराकी जिहादी बनण्यासाठी आला होता तेंव्हा तो केवळ तेरा वर्षांचा मुलगा होता.

वय कमी असल्याच्या कारणावरून त्याला परत पाठवायचे ठरवले तर त्याने रडून रडून असा काही गोंधळ घातला की बास!!!

तर, आझम आणि झराकी इराकमध्ये परत एकदा भेटले. आणि झराकीनं इराकमध्ये जिहादी कारवाया सुरु केल्या. अमान येथे तीन हाॅटेल्समध्ये बाॅम्ब स्फोट घडवून आणला. अशा प्रसंगानी त्याच्या गैरवर्तणूकीचा आलेख चढता होऊ लागला होता.

तो कोण आहे हे बुश प्रशासनाला पडलेलं कोडं होतं.त्यांना समजत नव्हतं की तो इराकमधील अल् कायदाचा बंदुकधारी माणूस आहे की इस्राएलचा सेवानिवृत्त अधिकारी? त्याचा चेहरा शोधायला हवा होता..

एकदा असं समजलं की तो एका पायावर चालतो. त्यानंतर एका व्हिडीओ टेपमध्ये सद्दाम हुसैन बरोबर तो व्यवस्थित चालताना दिसला.

कितीतरी वेळा तो मेल्याच्या किंवा मारला गेला अशा बातम्या येत असत. जसा काही तो अदृश्य होण्यासाठीच अवतरत होता. कितीतरी वेळा तो अस्तित्वात आहे का यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

त्याचे अनेक अनुयायी होते. मानवी बाॅम्ब बनून जीवावर उदार होऊन जिहादी बनण्यासाठी तयार झालेले..

आॅफीसर्सना त्यानी जखमी केलं होतं, मारुन टाकलं होतं. कित्येको लोकांना यमसदनाचा रस्ता दाखवला होता. आणि लोकांना असुरक्षित असल्याचे दमदार पुरावे दिले होते.

 

zarqawi 2 inmarathi
dailymail.co.uk

जो व्हिडीओ टेपमध्ये एक चालती बोलती दंतकथा झाला होता. पण तो काही मास्टरमाईंड अतिरेकी नव्हता.

झराकीचं सुरुवातीचं आयुष्य आणि कुटुंब-

अल् झराकीला दोन बायका होत्या. त्यातील एक त्याची चुलत बहीण होती. तिच्याशी त्याने २२ व्या वर्षी लग्न केलं होतं. तिला दोन मुले आणि दोन मुली होत्या.त्यांना झराकीनं गुपचूप सीमापार इराकमध्ये आपल्या सोबत रहाण्यासाठी पाठवलं होतं.

दुसरी बायको जाॅर्डनियन पॅलेस्टिनी होती. तिला एक मुलगा होता. आईवर झराकीचा फार जीव होता. ती ल्युकेमियाने दगावली.

आयुष्याच्या सुरुवातीला झराकी अत्यंत वाईट बदमाश माणूस होता. अंडरवर्ल्ड कनेक्शन मध्ये तो दलाली करायचा. भयंकर व्यसनी होता. भुरट्या चोऱ्या करणारा होता.

पोलिस रेकॉर्डवर वयाच्या तेराव्या वर्षी त्यानं नातेवाईकाच्या घरावर दरोडा टाकला त्यात तो नातलग मेला. दोन वर्षांनी त्याला शाळेतून काढून टाकले.

 

zarqawi 3 inmarathi
The Atlantic

त्यानंतर हळूहळू त्यानं जिहादी बनण्यासाठी प्रयत्न सुरु केले. सोविएत रशिया मध्ये निजबुल्लाह रिजीम आणि मुजाहिदीनच्या गटात सतत चकमकी होत. जिहादी मासिकासाठी झराकी वार्ताहर म्हणून काम करत होता.

त्याच्या अतिरेकी कारवायांना पायबंद घालण्यासाठी आता अमेरिका प्रशासनाने कंबर कसली होती. कारण झराकीने तीन हाॅटेलमध्ये बाॅम्ब स्फोट घडवून ६० लोकांना यमसदनाचा रस्ता दाखवला होता.

तसेच जाॅर्डनवर राॅकेट हल्ला चढवला होता. एकदा इराकी सैन्याच्या हाती तो लागला होता पण त्याला ओळखता न आल्याने सोडून दिले होते.

नंतर एकदा तो जखमी होऊन दवाखान्यात दाखल होता. ती संधीही हुकली.

 

zarqawi 4 inmarathi
Truthdig

शेवटी अमेरिकन एअर फोर्सनं बगदाद जवळील त्याच्या घरावर हवाई हल्ला चढवला. आणि अमेरिकन दूतावासाने अधिकृतपणे पत्रकार परिषदेत घोषणा केली की, अल् झराकीला या हवाई हल्ल्यामध्ये अमेरिकेनं नेस्तनाबूत केले आहे.

अशा रितीने एक सत्य वारंवार अधोरेखित होत आहे.. ज्या गोष्टीची सुरुवात वाईट असते.. त्यातून कितीही अफाट पैसा मिळाला तरी त्याचा शेवट कधीच चांगला होत नसतो. लोकांना किड्या मुंगीसारखे मारुन टाकणारे लोक स्वतःही तसेच मरतात.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?