' स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या हातातलं ते पुस्तक कोणतं?

स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या हातातलं ते पुस्तक कोणतं?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा म्हणजेच स्टॅच्यू ऑफ लिबर्टी ही अमेरिकेची ओळख आहे. उजव्या हातात स्वातंत्र्याची ज्योत घेऊन असलेली ही स्वातंत्र्यदेवता अमेरिकेत युरोपमार्गे समुद्राच्या मार्गाने येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करते.

नायगरा फॉल्स, हॉलिवूड, माऊंट रशमोर ह्यांच्याबरोबरच स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा आजही अमेरिकेतील सर्वात महत्वाच्या खुणांपैकी एक मानला जातो.

अमेरिकेतील न्यू यॉर्क शहरातील लिबर्टी आयलंडवर उभारण्यात आलेला हा पुतळा अमेरिकेला फ्रान्सने भेट दिला होता.

अमेरिकेला स्वातंत्र्य मिळाल्याच्या शतकपूर्तीनिमित्ताने फ्रान्सने अमेरिकेला स्वातंत्र्यदेवतेचा १५१ फूट उंच पुतळा भेट म्हणून दिला व २८ ऑक्टोबर १८८६ रोजी ह्या पुतळ्याचे उद्घाटन झाले होते.

 

statue of liberty inmarathi

 

ह्या स्वातंत्र्यदेवतेच्या उजव्या हातात स्वातंत्र्याची ज्योत व डाव्या हातात एक पुस्तक असल्याचे आपल्याला दिसून येते. ह्या पुस्तकावर ४ जुलै १७७६ ही अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनाच्या तारीख रोमन भाषेत लिहिलेली आहे.

त्या पुस्तकावर “July IV MDCCLXXVI” असे कोरलेले आहे.

अमेरिकन क्रांतीच्या वेळेला फ्रांस आणि अमेरिकेच्या मैत्रीचे प्रतीक म्हणून फ्रान्सने तांब्याची ही मूर्ती भेट दिली.

फक्त पुतळ्याचीच उंची १५१ फूट असून आधारशीला आणि पायथ्यापासून मोजल्यास स्वातंत्र्यदेवतेच्या मुकुटापर्यंत ह्या वास्तूची उंची ३०५ फूट इतकी भरते. ह्या मूर्तीच्या मुकुटापर्यंत जायचे असल्यास आपल्याला ३५४ पायऱ्या चढून वर जावे लागते.

पुतळ्याच्या मुकुटात ७ खिडक्या आहेत ज्या जगातील सात खंडांचे प्रतीक आहे. स्वातंत्र्यदेवतेच्या उजव्या हातातील ज्योत स्वातंत्र्याचा प्रकाश दर्शवते तर डाव्या हातातील पुस्तक हे ज्ञानाचे प्रतीक आहे.

फ्रेडरिक बार्थोल्दी ह्या फ्रेंच शिल्पकाराने हा पुतळा घडवला आहे.

पण ह्या स्वातंत्र्याच्या ह्या पुतळ्याची कल्पना बार्थोल्दीची नसून एडवर्ड लॅब्युलाय ह्या फ्रेंच व्यक्तीची होती. अमेरिकन गृहयुद्धाच्या वेळेला त्याने ही कल्पना मांडून प्रत्यक्षात उतरवली.

एडवर्ड लॅब्युलाय हा फ्रेंच फ्रीमेसन होता. ह्यानेच ह्या भव्य पुतळ्याची कल्पना मांडली. हा पुतळा मॅसोनिक चळवळीच्या देवतेच्या पुतळ्याशी साधर्म्य पावणारा होता.

 

fredrick bertholi inmarathi

 

त्यासाठी लॅब्युलायाने निधी उभारणे सुरु केले व बार्थोल्दीची ह्या प्राचीन देवतेचा पुतळा तयार करण्यासाठी नियुक्ती केली. ह्या प्राचीन देवतेची विविध नावे प्रचलित आहेत.

लॅब्युलाय आणि बार्थोल्दी ह्यांनी ह्या देवतेला लिबेर्ताज असे म्हटले.

पण ह्या देवतेला रोमन लोक सुद्धा मानत असत आणि त्यांची ही देवता बेबिलोनियन देवता इश्तारशी साधर्म्य साधणारी होती.

अति प्राचीन काळी ह्याच देवतेला सुमेरियन भाषेत इनन्ना किंवा नीनान्ना म्हणजेच स्वर्गाची राणी किंवा लेडी ऑफ द हेवन असे संबोधले जात असे. कनान प्रदेशात ह्याच देवतेचे अष्तारॉथ असे नाव होते.

तर हित्ताईत लोक ह्या देवतेला शौष्का म्हणत असत. फिनिशियन किंवा सायप्रसमधले लोक अस्तार्ते तर इजिप्शिअन लोक इसिस म्हणत असत.

अश्या रीतीने ग्रीक लोकांना ह्या देवतेची ओळख झाली आणि त्यांनी इश्तार ह्या देवतेला त्यांच्या पँथिऑनमध्ये ऍफ्रोडाईट म्हणून स्थान दिले आणि नंतर रोमन लोक ह्याच देवतेला व्हीनस म्हणू लागले.

 

venus roman goddess

 

ह्याच देवतेला हरलॉट्सची माता म्हणून ओळखले जाते. हरलॉट्स म्हणजे ज्यांना वाळीत टाकले आहे असे लोक! ह्या देवतेला मदर ऑफ एक्झाईल्स असे सुद्धा म्हटले जाऊ लागले. स्थलांतर व स्थलांतरितांशी ह्या देवतेचा संबंध जोडला गेला.

साहजिकपणेच इश्तार किंवा लिबेर्ताज ह्या देवतेला मदर ऑफ हरलॉट्स, मदर ऑफ एक्झाईल्स आणि मदर ऑफ इमिग्रण्टस असे फक्त बेबिलॉनियामध्येच नव्हे तर असिरिया, इजिप्त, ग्रीस आणि रोममध्ये ओळखले जाऊ लागले.

तर ह्या प्राचीन देवतेशी साधर्म्य असणाऱ्या ह्या स्वातंत्र्यदेवतेच्या हातात कुठले पुस्तक आहे? quora वर ह्या प्रश्नाचे उत्तर देताना अनेकांनी विविध माहिती दिली.

ह्या देवतेच्या डाव्या हातात जे पुस्तक दिसते ते पुस्तक नसून टॅबलेट असल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे.ह्या टॅब्लेटचे नाव tabula ansata म्हणजे कायद्याची सुरुवात करणारे टॅबलेट होय.

ह्यावर JULY IV MDCCLXXVI म्हणजे ४ जुलै १७७६ ही कोरलेली तारीख म्हणजे ज्या दिवशी अमेरिकेला स्वातंत्र्य घोषित झाले होते ती तारीख होय.

 

book of liberty inmarathi

 

ह्या टॅबलेटचा आकार एखाद्या कीस्टोन सारखा आहे. अमेरिकेतील सगळ्या नागरिकांसाठी सारखाच कायदा आहे, अमेरिकेत लोकशाही आहे आणि याचाच अर्थ की अमेरिकेत सर्वांना स्वातंत्र्य आहे असा त्यातून संदेश जातो.

हा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. म्हणजेच ते पुस्तक/टॅबलेट अमेरिकेतील सामान नागरी कायद्याचे प्रतीक आहे. ते समानतेचे आणि न्यायाचे प्रतीक आहे.

ह्याच स्टॅच्यू ऑफ लिबर्टीमुळे न्यू यॉर्कमध्ये एक आगळीवेगळी टिकर टेप परेड सुरु झाली. २०१२ पर्यंत ह्या लिबर्टी आयलंडवर काही लोक वास्तव्यास होते. सँडी ह्या चक्रीवादळात इथल्या रहिवाश्यांचे घर उध्वस्त झाले. त्यानंतर इथले लोक दुसरीकडे राहण्यास गेले.

 

liberty island inmarathi

 

त्या आधी स्टार आकाराच्या फोर्ट वूड मध्ये सैन्यातील अधिकाऱ्यांची कुटुंबे राहत असत. १८१८ ते १९३० पर्यंत ह्या ठिकाणी अनेक सैन्य अधिकाऱ्यांच्या कुटुंबांनी वास्तव्य केले.

हा पुतळा तयार करणाऱ्या शिल्पकाराने स्वतःच्या आईला ह्या पुतळ्यासाठी मॉडेल म्हणून उभे केले आणि तिच्यासारखा पुतळा तयार केला. त्याने ह्या पुतळ्याचे “Liberty Enlightening the World” असे नामकरण केले होते. नंतर लोक तिला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी म्हणू लागले.

दर वर्षी जगातून लाखो लोक हा पुतळा बघण्यासाठी जातात. किंबहुना अमेरिकेला गेल्यानन्तर स्टॅच्यू ऑफ लिबर्टी बघणे अनिवार्यच आहे.

ही स्वातंत्र्यदेवता अमेरिकेच्या अक्षय आणि अखंड स्वातंत्र्याचे प्रतीक आहे आणि ते पुस्तक अमेरिकेतील कायदेशीर लोकशाहीचे प्रतीक आहे.

फ्रेंच लोकांनी इश्तार ह्या स्थलांतरित लोकांच्या देवतेच्या रुपावरुन प्रेरणा घेऊन हा तांब्याचा भव्य पुतळा तयार करून तो अमेरिकेच्या स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण झाली म्हणून भेट देण्यात आला आणि आज ती स्वातंत्र्यदेवता अमेरिकेची ओळख आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?