' भारतातील उत्कृष्ठ स्टार्टअप्स सिंगापूरमध्ये का नोंदणीकृत आहेत? कारण विचारात टाकणारं आहे.. – InMarathi

भारतातील उत्कृष्ठ स्टार्टअप्स सिंगापूरमध्ये का नोंदणीकृत आहेत? कारण विचारात टाकणारं आहे..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

स्वतःचा स्टार्टअप उद्योग सुरु करताय? पण, कुठून नोंदणी करावी या गोंधळात आहात? जर तुम्ही भारता बाहेरील एखादा देश निवडणार असाल तर, सिंगापूर हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.

सिंगापूरस्थित फ्लिपकार्ट, मोबिकोन्म मिडीयालींक हे असेच काही भारतीय स्टार्टअप्स आहेत.

काही वर्षापूर्वी पश्चिम गोलार्धातील सिलिकॉन व्हॅलीचे असेच आकर्षण होते, जिथे अधिकाधिक स्टार्टअप्स आकर्षित होत. आत्ता अशा स्टार्टअप्स साठी सिंगापूर हे अगदी उत्तम लोकेशन मानले जाते.

 

singapore_landscape-inmarathi
thedrum.com

पण,यामागे नेमकी करणे काय आहेत, ते जाणून घेणे गरजेचे आहे. सिंगापूर सारख्या देशात भारतीय स्तर्टअप्सना आकर्षित करण्याची काय कारणे आहेत ते आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत.

१. सोपी सुरुवात –

सिंगापूर मध्ये कंपनी सुरु करण्याची प्रक्रिया एकदम सोपी आहे.

एखाद्या कंपनीची तुम्ही नोंदणी करणार असाल तर सिंगापूर मध्ये यासाठी तुम्हाला फक्त अडीच दिवस लागतील आणि फक्त तीन सोप्या स्टेप्स मध्ये तुमच्या कंपनीची नोंदणी पूर्ण झालेली असेल.

तेच भारतात मात्र या प्रक्रियेला तब्बल महिनाभराचा कालावधी जाईल आणि यादरम्यान तुम्हाला सात प्रकारच्या स्टेप्समधून जावे लागेल. अर्थातच जे अधिक वेळ खाऊ आणि किचकट असेल.

 

start inmarathi
startup.com

सिंगापूर मध्ये फक्त १ डॉलर एवढ्या अल्प भांडवलावर कंपनी सुरु होऊ शकते. त्यामुळे नव उद्योजकांना हा एक फार मोठा दिलासा आहे.

सिंगापूर सारख्या देशात इतक्या कमी भांडवलावर कंपनी सुरु करण्याची संधी मिळणे हा एक फार मोठा फायदा आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे सिंगापूर मध्ये १००% विदेशी मालकीला मान्यता आहे.

प्रायव्हेट लिमिटेड कंपनी रजिस्टर करण्यासाठी फक्त कंपनीच्या एका संचालकाची आवश्यकता असते, जो सिंगापूरमध्ये स्थायिक असेल. यामध्ये स्थानिक संचालक उपलब्ध करून देण्यासाठी हॉक्सफोर्ड सारखी कंपनी मदत करते.

मूख्य मालकाच्या अनुपस्थिती कंपनी रजिस्टर करण्याची सर्व प्रक्रिया पार पडू शकते. यामध्ये उद्योगधंद्याना कायदेशीर मान्यता दिली जाते. यासाठी मालक किंवा संस्थापकांना लालफितीच्या कारभारात अडकण्याची देखील वेळ येत नाही.

२. चांगल्या पायाभूत सुविधा –

वल्ड इकोनॉमिक फोरमच्या अलीकडील ग्लोबल कॉम्पिटीटीव्ह रिपोर्ट नुसार नव्या उद्योगांना चालना देण्याच्या बाबतीत १४४ देशांच्या यादीत सिंगापूर दुसर्या क्रमांकाचा देश आहे.

सिंगापूर मधील सरकार नवनिर्मितीच्या कल्पनांना प्रोत्साहन देते. ज्यामुळे तिथे स्टार्टअप्सची संख्या वाढते आहे.

भारतामध्ये अर्थव्यवस्थेत वाढ होत असली तरी, भ्रष्ट कारभारामुळे उद्योगधंद्यांना पोषक पायाभूत सुविधा मिळवणे दुरापास्त आहे.

बिल्डिंग्जची आकर्षक रचना, जिथे बँकिंग, शैक्षणिक सुविधा, आरोग्यसुविधा, गृह प्रकल्प आणि पुनर्निर्मितीच्या सुविधा मिळतील.

 

reliance-infra-inmarathi
imagesofus.co

सिंगापूरची हवाई वाहतूक आणि भौगोलिक स्थान यामुळे देखील स्टार्टअप उद्योजकांना फायदा होतो, जगभरात त्यांचा व्यवसाय पोहोचवणे सोपे जाते.

सिंगापूर सरकार स्वतः नवनव्या कल्पनांना उत्तेजन देते जेणेकरून या कल्पना देशाला विकासाकडे घेऊन जाण्यास उपयुक्त ठरतील.

३. निधी उभारण्याची सोपी प्रक्रिया –

उद्योगधंद्यांना भांडवल उपलब्ध करून देण्याला पाहिले प्राधान्य दिले जाते. सरकारच्या को-फंडिंग योजने व्यतिरिक्त इएसव्हीएफ, स्प्रिंग सीड्स आणि रिस्क शेअरिंग क्रेडीट फॅसिलीटी व्यतिरिक्त सिंगापूरमध्ये उद्यम भांडवलादाराकडून भांडवल उभे करणे सोपे जाते.

असे भांडवलदार ज्या व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता असेल अशा नवीन उद्योगासाठी आवश्यक सुरुवातीचे भांडवल पुरवतात.

२०१३ मध्ये अशा भांडवलदरांनी सिंगापूरमध्ये स्टार्टअप्स उद्योगामध्ये १ दशलक्ष अमेरिकी डॉलर इतकी गुंतवणूक केली होती. २०११ मध्ये हाच आकडा ३० दशलक्ष अमेरिकी डॉलर इतका होता.

अशा भांडवलदारांना भारतीय स्टार्टअप्समध्ये पैसा गुंतवण्यात रस आहे.

 

investment-inmarathi
i.dailymail.co.uk

भारतीय रिजर्व्ह बँकेची कठोर नियामक आवश्यकता आणि मौद्रिक नियामक प्राधिकरणाच्या अटी पूर्ण करण्यासाठी बरेच कागदी घोडे नाचवावे लागतात, ज्यामध्ये परदेशी चलनाचा देखील समावेश आहे.

यामुळे छोट्या स्टार्टअप्सना भारतात कंपनी सुरु करण्यात बरेच अडथळे निर्माण होतात.

३. अनुकूल कर प्रणाली –

सिंगापूर मधील व्यावसायिक कराचे दर फार कमी आहेत. १७% दराने प्राप्तीकर आकाराला जातो.

नव्या स्टार्टअप्सन त्यांच्या सुरुवातीच्या तीन वर्षात १००,००० डॉलरवर प्राप्तीकर अजिबात लागू नाही. आणि त्यापुढील २००,००० डॉलर वर फक्त ८.५% प्राप्तीकर आकारला जातो.

 

loan inmarathi
indian.com

तेथील करप्रणाली अतिशय सोपी आणि पारदर्शी आहे. भारतीय स्टार्टअप्सना आकर्षित करण्याचे सगळ्यात मोठे कारण हेच आहे. कारण भारतात, जर या कंपन्या सुरु झाल्या असत्या तर त्यांना ३०% इतका प्राप्ती कर भरावा लागला असता.

४. कुशल कामगारांची उपलब्धता-

कितीही चांगली कल्पना असणारा स्टार्टअप असला तरी ती राबवणाऱ्या कुशल टीम शिवाय ती अपयशीच ठरते.

स्टार्टअप कंपनीसाठी जे कौशल्य असणारे कामगार लागणार आहेत त्या प्रकाचे कौशल्य असणारे कामगार सिंगापूर मध्ये सहज उपलब्ध होतात.

 

milk-industry-inmarathi
youtube.com

भारतात कुशल कामगारांची वाणवा असल्याने चांगली कल्पना असणारी स्टार्टअप देखील फार पुढे जाऊ शकत नाही.

५. चाचपणी करण्यास अनुकूल वातावारण-

सिंगापूर हे एक महानगरीय शहरांचे जाळे असणारे देश आहे. अगदी संपूर्ण जगाची छोटी प्रतिकृती म्हंटले तरी चालेल.

अशा ठिकाणी आपके उद्योग उभारणे आणि तेथून संपूर्ण जगभर त्याचे प्रयोग करणे किंवा चाचपणी करण्याची एक नामी संधी या स्टार्टअप उद्योजकांना मिळते.

यामुळे आपल्या उत्पादनांचा आणि सेवांचा दर्जा सुधारण्यास वाव मिळतो. सिंगापूर हा अतिशय टेक्नोसॅव्ही आणि नेटवर्क सज्ज देश आहे. अनेक B2C प्रोडक्ट्स आणि सेवांसाठी विशिष्ट इंटरनेट लेवल, तत्पर सेवा आणि तंत्रज्ञान लवकरात लवकर आत्मसात करण्याचा वेग असावा लागतो.

 

buissness loan 1 inmarathi
Paisabazaar.com

अशा स्टार्टअप्स साठी सिंगापूर हे चाचपणी करण्याची योग्य संधी देते. मोठमोठ्या बाजारपेठेत सेवा आणि उत्पादने पोचवण्याची संधी मिळाल्याने त्यांची क्षमता आणि स्वीकारार्हता वाढते.

६. बौद्धिक संपत्तीचे जतन करण्याचा कठोर कायदा –

बौद्धिक संपत्तीचे जतन हा स्टार्टअप क्षेत्रातील एक महत्वाचा मुद्दा आहे. सिंगापूर मधील बौद्धिक संपत्ती संरक्षण कायदा अतिशय कठोरपणे राबवला जातो.

स्टार्टअपचे मूल्य आणि त्यांची सत्यता ही त्यांचे संशोधनाला कशा प्रकारे संरंक्षण दिले जाते यावर अवलंबून असते. अशा वेळी हे कायदे जर कमकुवत असतील तर, असे उद्योग कमकुवत आणि अस्थिर बनतात.

भारतात देखील आयपी प्रोटेक्शन कायदा आहे पण,त्याची अंमलबजावणी आणि उपयुक्तता हा वादाचा विषय आहे.

 

intellectual property
chinalaw.com

वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या अभ्यासानुसार सिंगापूरचा बौद्धिक संपत्ती संरक्षण कायदा हा आशियातील दुसर्या क्रमांकावरचा चांगला कायदा आहे. याच अभ्यासानुसार भारतातील कायद्याला ६५वा क्रमांक देण्यात आला आहे.

हा देश भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी ओळखला जातो. कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यावर यांचा भर असतो. बौद्धिक संपत्तीचे अधिकार, पेटंट एजंट आणि कायदा व्यवस्था स्टार्टअप्सना व्यापक सेवा पुरवते.

अशा पद्धतीने स्टार्टअप उभारणीसाठी अत्यावश्यक त्या सर्व गोष्टी सिंगापूरमध्ये सहज उपलब्ध होत असल्याने स्टार्टअप उद्योजकांसाठी ते एक मुख्य आकर्षण केंद्र बनले आहे.

 

diwali in singapore-marathipizza
flickr.com

पूर्व अर्धगोलातील एक मजबूत स्टार्टअप हब अशी मान्यता मिळवण्यातही हा देश यशस्वी ठरला आहे.

त्यामुळे स्टार्टअप उभारण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाधिक भारतीयांना हा देश खुणावत राहील यात वाद नाही. भारतातील ज्या स्टार्टअप उद्योजकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळवण्याची इच्छा असेल त्यांच्यासाठी तर सिंगापूर हे हक्काचे माहेरघर बनले आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?