''तो' रणगाड्यांच्या समोर छाती काढून उभा राहिला, त्या फोटोने चीनमध्ये हाहाकार माजवला!

‘तो’ रणगाड्यांच्या समोर छाती काढून उभा राहिला, त्या फोटोने चीनमध्ये हाहाकार माजवला!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

=== 

आपण एखादी गोष्ट जाणून-बुजून न करता अचानकपणे ती आपल्या हातून घडून जाते. कधीकधी ती इतकी प्रसिद्ध होते की, आपणही संभ्रमात पडतो.

अशीच एक घटना घडली ती चीनमध्ये. चीनमधील बीजिंगच्या टियानॅनमेन चौकात एक हत्याकांड सुरू होते.

त्याची छायाचित्रं वाइडनर नावाच्या छायाचित्रकाराने काढली आणि त्याच्या छायाचित्राने चीनमध्ये हाहाकार माजला. त्याचे छायाचित्र इतके प्रसिद्ध झाले की, वर्तमानपत्रातील दहा उत्कृष्ट चित्रांमध्ये ते गणले गेले.

वाइडनर हत्याकांडाची छायाचित्रं घेण्यासाठी एका हॉटेलमध्ये मुक्कामाला आला होता.

 

tank man photographer
dw.com

हा प्रवेश सहजी मिळणं शक्य नव्हतं, पण त्याने त्याच्या एका विद्यार्थ्यांच्या मदतीने या हॉटेलात प्रवेश मिळवला, परंतु ४ जूनला सकाळीच वाइडनरला ताप आला.

वाइडनरने सांगितले, त्याला जरा बरं वाटत नव्हतं. कारण रणगाड्याचा फोटो काढताना त्याला दुखापत झाली होती.

तो हॉटेलच्या सहाव्या मजल्यावरून फोटो काढत होता. ते हॉटेल म्हणजे चौकातील फोटो काढण्यासाठी एकदम परफेक्ट पॉइंट होता. म्हणून त्याने तिथे मुक्काम ठोकला होता. आता ते मिलिट्रीच्या आधिपत्याखाली आहे.

दुसर्‍या दिवशी म्हणजे ५ जून १९८९ रोजी म्हणजेच बरोबर एकतीस वर्षांपूर्वी चीनच्या सैन्याने एका लोकशाहीच्या समर्थकांवर जोरदार हल्ला चढविला.

विद्रोह विरोधकांना संरक्षण देण्यासाठी वाइडनर एका आठवड्यासाठी बीजिंगमध्ये होता, पण प्राणघातक हल्ला सुरू झाल्यानंतर त्याला दुखापत झाली.

तरीसुद्धा त्या दिवशी हॉटेलच्या बाल्कनीतून वाइडनर फोटो काढण्यासाठी उभा होता. त्याने कॅमेरा त्या अँगलला लावला. त्याने रणगाड्याचा फोटो काढण्यासाठी क्लिक केलं तेवढ्यात त्या रणगाड्याच्या समोर एक पांढरा शर्ट आणि निळी पँट घातलेला माणूस एकदम समोर आला. अगदी अचानक.

 

tank man inmaratrhi
collidecolumn.wordpress.com

त्याच्या हातात खरेदीच्या पिशव्या पण होत्या. वाइडनर नाराज झाला. त्याला वाटलं की आपण हा माणूस छायाचित्रात आल्यामुळे आपलं छायाचित्र चांगलं येणार नाही, त्याला कुठेही प्रसिद्धी मिळणार नाही, पण त्याला माहीत नव्हतं की हे छायाचित्रं इतिहास घडवणार आहे.

तो माणूस नेमका कुठून आला, कशासाठी आला, कोण होता त्याला काहीच कळले नाही. त्याने त्या माणसाला पाहिले. तो एकदम त्या रणगाड्यांच्या समोर आला.

रणगाडा थांबला आणि त्या माणसाच्या जवळून जाण्याचा प्रयत्न करू लागला, पण त्या माणसाने रणगाडा अडवला.

 

tank man and tiananmen InMarathi

 

तो त्या रणगाड्यावर चढला आणि आतील माणसांना बोलू लागला. तो नक्की काय बोलत होता हे वाइडनर लांब असल्यामुळे ऐकू शकला नाही. शेवटी त्या मध्ये आलेल्या माणसाने रणगाड्यांना लांब नेले.

आजपर्यंत तो कोण आहे आणि त्याला काय झाले हे कुणालाही माहिती नाही. पण त्याचा आवाज शक्तिशाली होता.

इकडे चायनीज सरकारचे अतोनात प्रयत्न सुरू होते की, हत्याकांडाची घटना जगासमोर येऊ नये. वाइडनर यांनी असे सांगितले की, ‘‘त्या वेळी अटक होण्याची व छायाचित्रं जप्त होण्याचा धोका होता.’’

 

drawn-tank-man-inmarathi

मार्स्टन नावाच्या त्याच्या एका विद्यार्थ्याने ते छायाचित्र आपल्या कपड्यांमध्ये लपवून सुरक्षितपणे हॉटेलच्या बाहेर नेलं. याच विद्यार्थ्याने वाइडनर यांना बिजिंग हॉटेलमध्ये जाण्यासाठी सुद्धा मदत केली होती.

नंतर काही काळातच टेलिफोन लाइन्स च्या माध्यमातून संपूर्ण जगासाठी ही छायाचित्रं प्रसिद्ध केली गेली.

वाइडनर प्रमाणेच अनेकांनी अशी छायाचित्रं काढली होती. त्यातही त्या माणसाचे छायाचित्रं आले होते. प्रसार माध्यमांनी त्या कणखर माणसाला ‘टँक मॅन’ या नावाने प्रसिद्ध केले.

बर्‍याच प्रसारमाध्यमांनी त्या ‘टँक मॅन’ याचा फोटो काढला होता, पण वाइडनर यांनी काढलेलं छायाचित्र जास्त ठिकाणी वापरलं गेलं होतं.

जवळपास सर्व वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर हेच चित्र होतं. वाइडनरला खूप आश्‍चर्य वाटलं. त्याच्या त्या छायाचित्राला पुलित्झर पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं.

पुलित्झर हा पुरस्कार प्रसारमाध्यमं, पत्रकारितेतील विशेष कार्यासाठी असतो. तो पुरस्कार खूप मोठा मानला जातो.

 

widener inmarathi
CP24.com

वाइडनरने सांगितलं,

‘‘मला माहीत होतं की ते चित्रं खूप वेळा वापरलं गेलंय, ते खूप छान आहे, पण जेव्हा ते ‘एओएल संस्थे’द्वारे सर्वांत सुंदर अशा दहा चित्रांमध्ये गणले गेले तेव्हा मला पहिल्यांदा लक्षात आलं की मी काहीतरी असाधारण असं काम केलंय.’’

म्हणजे तोपर्यंत वाइडनरला कल्पनाही नव्हती की, आपल्या हातून अप्रतिम अशी कलाकृती निर्माण झाली आहे.

बघा मंडळी. कधी कुठच्या गोष्टीला प्रसिद्धी मिळेल काही सांगता येत नाही. वाइडनरच्या त्या छायाचित्राने सगळीकडे प्रसिद्धी मिळवली, जे काढताना त्याला वाटलं होतं की, कशासाठी हा माणूस मध्येच आला?

आणि तो मध्ये आलेला माणूस कोण होता, का आला होता याची काहीच माहिती शेवटपर्यंत त्याला मिळाली नाही. आहे ना आश्‍चर्य?

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?