' क्रिकेटमधून जर "हे" धडे शिकलात तर तुम्ही भयंकर श्रीमंत होऊ शकता!

क्रिकेटमधून जर “हे” धडे शिकलात तर तुम्ही भयंकर श्रीमंत होऊ शकता!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आर्थिक गुंतवणूक हा प्रकार प्रत्येकाला समजेलच आणि जमेलच असे नाही. किंवा प्रत्येकाला त्यात रस असेलच नाही. पण आयुष्य जगण्यासाठी पदोपदी पैसा लागतोच.

पूर्वजांची पुण्याई आणि श्रीमंती असेल तर एखाद्या नशीबवान माणसाला पैसा कमावण्यासाठी हात पाय मारावे लागत नाहीत पण त्यालाही आहे तो पैसा व्यवस्थित पुरवून वापरावा लागतोच.

तो पैसा वाढेल कसा ह्याचाही विचार करावा लागतो. सामान्य माणसाला तर कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. पण आलेला पैसा टिकून कसा राहील आणि वाढेल कसा हे गणित मात्र सर्वांनाच जमेलच असे नाही.

भल्याभल्यांना आर्थिक व्यवहार, गुंतवणूक वगैरे गोष्टी अगदी क्लिष्ट आणि कठीण वाटतात.

 

investment-inmarathi
angel-investor.review

 

पण असे नाही. आपल्या आयुष्यात आपण रोज नवे अनुभव घेत असतो. वेगवेगळ्या घटना, गोष्टी बघत असतो. त्या लहान सहान गोष्टींमधून सुद्धा आपल्याला आर्थिक गुंतवणुकीचे धडे मिळू शकतात.

जास्त खोलात जाण्याची आवश्यकता नाही. साध्या क्रिकेट ह्या खेळातून सुद्धा आपल्याला आर्थिक गुंतवणूक आणि व्यवहाराचे धडे मिळू शकतात.

नाही.. मॅचच्या मध्ये मध्ये लागणाऱ्या म्युच्युअल फ़ंड आणि अनेक प्रकारच्या पॉलिसीजच्या जाहिरातींबद्दल आम्ही बोलत नाहीये.

क्रिकेट खेळातून मनी मॅनेजमेंटचे कुठले धडे घेता येतील ह्याविषयी आपण आज जाणून घेऊया.

बऱ्याच कॉर्पोरेट क्षेत्रातल्या लोकांनी क्रिकेटमध्ये गुंतवणूक करून भरपूर पैसे कमावले आहेत.

 

LALIT-MODI-inmarathi
huffingtonpost.in

 

क्रिकेट आणि गुंतवणूक ह्यात बऱ्याच गोष्टी सारख्या आहेत. तशी आपण ह्या दोन्हीत वन ऑन वन तुलना करू शकत नाही.

पण क्रिकेटमधील काही उदाहरणे आणि स्ट्रॅटेजी ह्यातून आपण गुंतवणूक करताना काय करायला हवे आणि काय टाळायला हवे हे शिकू शकतो.

उदाहरणार्थ लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपण टेस्ट मॅच म्हणू शकतो आणि रोजचे ट्रेडिंग म्हणजे कमी ओव्हर्सची मॅच!

 

१. मैदानात उतरण्याआधी सुरक्षाकवच घालणे विसरू नका

 

helmet inmarathi
ESPNcricinfo.com

 

खेळासाठी मैदानात उतरताना आपण आपल्याला दुखापत होऊ नये म्हणून हेल्मेट, ग्लव्ज आणि पॅड्स घालतो. खेळताना आपण सुरक्षित राहावे म्हणून आपण सगळी काळजी घेतो.

हेल्मेटविना फास्ट बॉलरचा सामना केला तर आपले डोके फुटू शकते, नाजूक अवयवांना इजा पोचू शकते. म्हणूनच आपण कुठलीही रिस्क घेत नाही.

तसेच आर्थिक गुंतवणुकीचेही आहे. गुंतवणूक सुरु करताना आपले पैसे सुरक्षित राहतील ह्याची काळजी घेणे आवश्यक आहे. नुसते पैसेच नाही तर आपले आयुष्य आणि आरोग्य सुद्धा धोक्यात येणार नाहीत ना ह्याचा विचार करूनच गुंतवणूक करावी.

ऐनवेळी गडबड व्हायला नको म्हणून तुम्ही आपातकालीन कॉर्पस, हेल्थ कव्हर मध्ये गुंतवणूक करायलाच हवी.

तसेच तुमच्या नंतर तुमच्या कुटुंबावर आर्थिक संकट उभे राहू नये म्हणून तुमचे व तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे लाईफ इंश्युरन्स काढले असणे महत्वाचे आहे.

 

२. कुठल्याही खेळीसाठी कायम तयार राहा

अति उत्साहाच्या भरात किंवा टेन्शन घेतल्यामुळे चुकीचा फटका मारला तर बॅट्समन बाद होतो. बॉलरच्या हातून चुका होतात आणि समोरच्या संघाला धावा मिळतात.

तसेच पटापट पैसे मिळवण्याच्या नादात कुठलीही शहानिशा न करता वाटेल तिथे पैसे गुंतवले तर फक्त नुकसान आणि मनस्तापच वाट्याला येतो.

 

stress inmarathi
ESPNcricinfo.com

 

किंवा मार्केट कोसळले असताना टेन्शनमध्ये येऊन घाईघाईत निर्णय घेतले तरी मोठा आर्थिक फटका बसू शकतो. इक्विटीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी कधीही शॉर्ट टर्म फायदा बघून निर्णय घेऊ नयेत.

कायम लॉन्ग टर्ममध्ये होणाऱ्या फायद्याकडे बघूनच गुंतवणूक करावी

मार्केट रोजच वर-खाली होत असले तरी लॉन्ग टर्ममध्ये फायदा होणार असला तर ती गुंतवणूक करणे आपल्या फायद्याचे आहे.

 

३. एकाच खेळाडूवर विसंबून राहू नका

जसे केवळ एकच खेळाडू चांगला खेळला आणि बाकीचे वाईट खेळले तर मॅच जिंकता येत नाही. त्यासाठी टीमवर्क आवश्यक असते.

 

Zimbabwe cricket team inmarathi
International Cricket Council

 

प्रत्येकानेच चांगले खेळावे लागते. आणि एकच खेळाडू चांगला खेळतो म्हणून त्याच्यावरच विसंबून राहिलो तर संघाचे नुकसान होते तसेच गुंतवणूकीचेही आहे.

एकाच ठिकाणी खूप मोठी रक्कम गुंतवणे म्हणजे मोठी रिस्क घेणे आहे. तज्ज्ञ लोक सांगतात की एकाच सेक्टरमध्ये मोठी गुंतवणूक करण्यापेक्षा विविध ठिकाणी कमी रकमेची गुंतवणूक करणे फायदेशीर ठरते.

 

४. रन रेट योग्य असण्यावर भर द्या

धावा करण्यात सातत्य ठेवले तर तुम्ही मोठा स्कोअर करू शकता किंवा तुमचं टार्गेट पूर्ण करू शकता. सुरुवातीपासूनच सातत्य ठेवलं तर नंतर मोठे टार्गेट पूर्ण करण्याचे टेन्शन येत नाही आणि कठीण जात नाही.

 

run rate inmarathi
ESPNcricinfo.com

 

हाच फंडा आर्थिक गुंतवणुकीच्या बाबतीत लागू पडतो.

सुरुवातीपासूनच तुम्ही थोडी थोडी रक्कम सातत्याने गुंतवलीत तर तुमच्याकडे काही काळाने मोठी गंगाजळी साठेल आणि ऐनवेळी पैश्यांची व्यवस्था करण्याचे टेन्शन येणार नाही.

तुम्ही उशीरा सुरुवात केलीत तर तुम्हाला गुंतवणुकीची सुरुवातच मोठ्या रकमेपासून सुरुवात करावी लागेल. तुम्ही खूप आधीपासून आर्थिक प्लॅनिंग केले तर तुम्हाला लॉन्ग टर्म टार्गेट पूर्ण करणे सहज शक्य होईल.

उदाहरणार्थ मुलांचे उच्चशिक्षण किंवा तुमची रिटरमेंटसाठीची तरतूद करणे खूप आधीपासूनच सुरु केले तर तुम्हाला थोड्या रकमेपासून सुरुवात करता येते आणि ऐनवेळी तुमच्या खिशाला मोठा खड्डा पडण्याची वेळ येत नाही.

 

५. वातावरणाचा अंदाज घेऊन मॅचचे प्लॅनिंग करणे

वातावरणाचा आणि पीचचा अंदाज घेऊन खेळाडू आपली खेळण्याची स्ट्रॅटेजी ठरवतात. वातावरण व पीचच्या अवस्थेवर बॉल कसा वळेल, उसळेल,बॅट वर कशा पद्धतीने येईल हा अंदाज घेऊन खेळाचे प्लॅनिंग केले जाते.

त्यावरून एकूण मॅच कशी होईल ह्याचा अंदाज घेता येऊ शकतो. त्यावरून टॉस जिंकल्यावर आधी बॅटिंग करायची की बॉलिंग हा निर्णय घेतला जातो.

बऱ्याच वेळा टॉसच्या वेळेला घेतलेल्या योग्य निर्णयामुळे मॅच जिंकणे सोपे जाते.

 

England v India inmarathi
CricTracker.com

 

ह्यावरूनच आपण हे शिकू शकतो की मार्केटमध्ये गुंतवणूक करताना आपण एकूण मार्केटचे वातावरण बघून त्याप्रमाणे अंदाज घेऊन गुंतवणूक केली पाहिजे.

डोमेस्टिक इकॉनॉमिक क्लायमेट, आंतरराष्ट्रीय मार्केट कंडिशन्स, इंडस्ट्री ट्रेंड्स ह्या सगळ्याचा मार्केटवर परिणाम होत असतो.

त्यावरून गुंतवणूकदाराने कशात गुंतवणूक केली तर फायदा होईल आणि कुठे पैसे वाया जातील हे ठरवायला हवे. ज्याला हे जोखता येते त्याचे सहसा मार्केटमध्ये नुकसान होत नाही.

वाऱ्याची दिशा बघून निर्णय घेणे ज्याला जमले त्याचा नक्कीच फायदा होतो. म्हणूनच गुंतवणूक करताना मार्केटचा अभ्यास करून निर्णय घेतले पाहिजेत.

ह्याचप्रमाणे मॅच फॉरमॅटवर जशी खेळाची स्ट्रॅटेजी ठरते तशीच इन्व्हेस्टमेंटच्या प्रकारावर स्ट्रॅटेजी ठरते. ज्याप्रमाणे टी -ट्वेन्टी मॅचमध्ये वेगळी स्ट्रॅटेजी आणि नियम असतात जे टेस्ट मॅचमध्ये उपयोगाचे नाहीत.

त्याचप्रमाणे लॉन्ग टर्मसाठी वेगळा पेशन्स ठेवून गुंतवणूक करावी लागते. तसेच डे ट्रेडिंग आणि पोझिशनल ट्रेडिंगमध्ये पटापट निर्णय घ्यावे लागतात.

 

investment-inmarathi
i.dailymail.co.uk

 

तिथे तुम्हाला विचार करून निर्णय घेण्याची लक्झरी नसते. तिथे तुम्हाला रिस्क घ्यावी लागते. जसे टी ट्वेन्टीमध्ये विकेट गेली तरी चालेल पण स्कोअरबोर्ड हलता ठेवावा लागतो.

क्रिकेटच्या संघामध्ये बॅट्समन, बॉलर, फिल्डर ह्यांचा समतोल साधावा लागतो.

फटके मारू शकणारे बॅट्समन, टिकाव धरू शकणारे बॅट्समन, स्पिनर, फास्ट बॉलर्स ह्यांचा समतोल संघात साधावा लागतो तरच कुठलीही मॅच जिंकणे सोपे जाते.

तसेच गुंतवणूक करताना देखील समतोल साधायला हवा. इक्विटीज, सोने, रियल इस्टेट, एफडीज वगैरे ह्या सगळ्याचा समतोल साधला तर तुमची आर्थिक बाजू नक्कीच भक्कम होऊ शकते.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?