' या ६ जणांनी करोडो रुपयांच्या जाहिराती नाकारल्या, कारण वाचून अभिमान वाटेल! – InMarathi

या ६ जणांनी करोडो रुपयांच्या जाहिराती नाकारल्या, कारण वाचून अभिमान वाटेल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारतात कलाकारांना मोठ्या प्रमाणतात महत्व दिले जाते. कलाकारांना लाखो लोक आपला आदर्श मानतात. कलाकार हे समाजाचा अविभाज्य घटक आहेत. कलाकारानी केलेल्या जाहिरातीचा समाजावर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडतो.

खूप सारे तरुण, तरुणी आपल्या आवडत्या कलाकारांना फॉलो करतात. ते ज्या गोष्टी करतात त्याचं अनुकरण करण्याचा ते प्रयत्न करतात.

काही कलाकार मोठ्या ब्रॅण्ड्सच्या जाहिराती करतात, त्यामुळे त्याचा समाजावर विपरित परिणाम होतो. काही कलाकार हे पैश्यासाठी पान मसाला, गुटखा अश्याप्रकारच्या जाहिराती करतात त्यामुळे अनेक तरुण व्यसनाधीन होतात. सध्या विमलच्या जाहिरातीमुळे अक्षय कुमार चर्चेत आला आहे.

 

ajay vimal inmarathi

 

काही असे ही कलाकार आहेत जे त्यांच्या तत्वांचा वापर जीवनामध्ये करतात. त्यांनी आपल्या तत्वांच्या आड येणाऱ्या जाहिराती नाकारल्या आहेत.

मोठ्या ब्रॅण्ड्सच्या जाहिरातीमधून कलाकारांना मोठ्या प्रमाणात उत्पन्न प्राप्त होते. तरीही या कलाकारांनी पैश्यापेक्षा आपल्या नैतिक तत्वांना प्राधान्य देत जाहिराती नाकारल्या आहेत. यांनी समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.

१) साई पल्लवी

 

sai pallavi inmarathi

साउथ इंडियन अभिनेत्री साई पल्लवी यांनी त्यांना मिळणारी दोन कोटी रुपयांची फेअरनेस क्रीमची जाहिरात नाकारली. तिच्या मते सोंदर्य हे गोरेपणात नसून पाहणाऱ्याच्या डोळ्यांंमध्ये असते.

तिने ही जाहिरात नाकारून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. कित्येक तरुणी या अशा जाहिरातींना बळी पडून आपला पैसे व वेळ वाया घालवतात.

मोठ्या ब्रॅण्ड्सची जाहिरात नाकारणारी ती पहिली सेलिब्रेटी नाहीये. तिच्या अगोदरही अनेक कलाकारांनी अश्या जाहिराती नाकारल्या आहेत.

२) अमिताभ बच्चन

 

amitabh-inmarathi
bollywood.com

बॉलीवूडमधील सुपरस्टार म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन यांनी शीतपेयाची जाहिरात करणे बंद केले. जेव्हा त्यांना शाळेत जाणाऱ्या मुलीने विचारलं की, “तुम्ही त्याची का जाहिरात करता ज्याला आमच्या शाळेतील शिक्षक विष म्हणतात?”

ते या गोष्टीने आश्चर्यचकीत झाले व तेव्हा पासून त्यांनी ठरवले की ते अश्या गोष्टीची जाहिरात करणार नाहीत.

त्यांनी सर्व कलाकारांना विनंती केली की ज्या गोष्टीमधून समाजास त्रास होईल अश्या जाहिराती करू नका.

३) आमीर खान

 

amir-khan-inmarathi01

बॉलीवूडमध्ये मिस्टर परफेक्ट म्हणून ओळखला जाणारा अमीर खान. अमीर खान फक्त सामाजिक संदेश देणाऱ्या जाहिराती करतो. अमीरने पान मसाल्याची जाहिरात नाकारली आहे.

अमीर हा सध्या महाराष्ट्रामध्ये पाणी फोंडेशनसाठी काम करत आहे. पाणी फौंडेशनच्या माध्यमातून तो जनसेवेचे काम करत असून या माध्यमातून कितीतरी गावे ही दुष्काळ मुक्त होत चालली आहेत.

४) जॉन अब्राहम

 

john abraham-inmarathi

जॉन हा बॉलीवूड मधील प्रसिध्द अभिनेता आहे. जॉनने दारूच्या जाहिरातला नकार दिला. तो केव्हाही दारू अथवा तंबाखुची कोणतीही जाहिरात करणार नसल्याचं त्याने स्पष्ट केलंय.

५) रणबीर कपूर

 

साई पल्लवी प्रमाणेच रणबीर कपूरने देखील फेअरनेस क्रीमची जाहिरात करण्यास नकार दिला आहे. तो म्हणतो ‘यासारख्या जाहिराती रंगभेद वाढवतात’. म्हणून त्याने ही जाहिरात करण्यास नकार दिला आहे.

रणबीरबद्दल तरुण तरुणीमध्ये भलतेच आकर्षण आहे. तो खूपच प्रसिद्ध असून त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न त्याचे चाहते करतात. त्यांच्या समोर रणबीरने एक चांगला आदर्श निर्माण केला आहे.

६) कंगना राणावत

 

kangna-ranaut-inmarathi
store2.com

बॉलीवूड queen कंगना राणावत ही कोणत्याही मुद्यावर आपलं मत मांडण्यासाठी प्रसिद्ध आहे. तिनेही फेयरनेस क्रीमची जाहिरात नाकारली आहे. तिने आपल्या जाहिरात नाकारण्याचं समर्थन केले आहे. ती म्हणते ‘मला संपत्तीपेक्षा नैतिक तत्व जास्त म्हत्वाचे आहेत.’

असे कलाकार खूप कमी आहेत, ज्यांनी पैश्यापेक्षा आपले नैतिक तत्व महत्वाचे समजून मोठ्या ब्रॅण्ड्सच्या जाहिरातीला नकार दिला आहे. त्यामुळे हे कलाकार फक्त चित्रपटामध्येच नव्हे तर खऱ्या आयुष्यातही हिरो आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?