गोवा फिरायला जाताय? या १० गोष्टी गोव्यात चुकूनही करू नका

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

=== 

सुट्टीचा हंगाम म्हणजे पर्यटनाची धूम. शाळेला सुट्या लागल्याकी पर्यटनाचे वेध लागतात.

रेल्वेने जायचे असेल तर ३ महिने आधीच ऍडव्हान्स बुकिंग करावे लागते. अशा वेळेस कोठे जायचे याचे आधीपासून प्लॅनिंग करावे लागते. त्याप्रमाणे कार्यक्रमाची आधीच आखणी करा.

 

family trip inmarathi
Family Vacation Critic

भारत देश पर्यटकांच्या दृष्टीने जागतिक पातळीवर देखील अव्वल स्थानी आहे. त्यामुळेच आपल्यासाठी सुद्धा पर्यटन स्थळ ठरवायच्या दृष्टीने खुप पर्याय समोर येतात.

तुम्हाला थंड हवेच्या ठिकाणी जायचे असेल तर महाराष्ट्रात माथेरान, मुंबई , चिखलदरा, महाबळेश्वर, पाचगणी असे जवळचे पर्याय उपलब्ध आहेत.

हिमालयात जायचे असेल तर अनेक पर्याय समोर येतात. कुलू मनाली, धर्मशाला, डलहौसी, कौसानी, नैनिताल, काश्मीर, लेह लडाख, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आणि अक्षरशः शेकडोंच्या संख्येने पर्याय समोर येतात.

मंदिर पर्यटन करायचे असेल तर दक्षिण भारत, जगन्नाथ पुरी, सोमनाथ, बद्री नारायण केदारनाथ अशी अनेक ठिकाणे नजरेसमोर येतात.

 

badrinathi kedarnath inmarathi
Tour My India

समुद्र किनारा आवडत असेल तर भारताचा पश्चिम किनारा, पूर्व किनारा आणि दक्षिण किनारा असा मोठा पट्टा तुमच्या स्वागतास तयार आहे.

महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी वर्षभर पर्यटकांच्या उपस्थिती ने गजबजलेली असते. अलिबाग, नागाव, मुरुड जंजिरा, सिंधुदुर्ग, मालवण, वेंगुर्ला अशी काही ठिकाणे ही कायम गर्दी खेचणारी ठिकाणे आहेत. तर काही अनवट शांत किनारे देखील आहेत.

कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, ओरिसा आणि गोवा या राज्यांचे किनारे देखील पर्यटकांच्या यादीत स्थान मिळवून आहेत.

गोवा हे सर्वात “मोस्ट फेव्हरेट अँड हॉट डेस्टिनेशन” म्हणून देशविदेशातील पर्यटकांच्या मनात अव्वल स्थानावर आहे.
गोवा अप्रतिम नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहे.

एकेकाळी पोर्तुगिजांच्या ताब्यात असल्याने गोव्यावर पोर्तुगीज कल्चरचा प्रभाव आहे. गोव्याची खाद्यसंस्कृती म्हणजे कोकणी आणि पोर्तुगीज खाद्यपद्धतीचा अनोखा मिलाफ आहे.

 

goa beach inmarathi
The Goa Experience

गोव्यातील नितांत सुंदर किनारे देशी आणि विदेशी पर्यटकांनी गजबजलेले असतात. जेव्हा एखाद्या ठिकाणी तुम्ही पर्यटनासाठी जात असता तेव्हा काही गोष्टी कटाक्षाने टाळणे आवश्यक असते.

गोव्याला जात असाल तर खालील गोष्टी टाळा.

१ : दळणवळणाची व्यवस्था तपासून घ्या

गोव्यात जाताना स्वतःच्या कारने जात असाल तर पार्किंगच्या बाबतीत काळजी घेणे आवश्यक आहे. आपली गाडी इतरांना त्रासदायक होईल अशा पद्धतीने पार्क करू नका. योग्य ठिकाणीच मार्किंगच्या आतच गाडी पार्क करा.

 

goa bike inmarathi
Adventures365.in

गोव्यात फिरण्यासाठी रिक्षा वापणार असाल तर थोडे सावधान रहा. काहीवेळेस फसवणूक होण्याची शक्यता असते. त्या पेक्षा कार किंवा बाईक भाड्याने घ्या.

२ : स्वच्छतेची काळजी घ्या 

तुम्ही जेव्हा पर्यटक म्हणून जात असाल तेव्हा तेथील किनाऱ्यावर कचरा होणार नाही याची काळजी घ्या.

तुम्ही जेव्हा गोव्याला आपले टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून निवडता तेव्हा तेथील किनारे स्वच्छ असावेत ही तुमची अपेक्षा असते. तेव्हा तुम्ही स्वतः देखील तुमच्या नंतर येणाऱ्या पर्यटकांसाठी किनारा स्वच्छ ठेवा.

 

clean goa inmarathi
Herald (Goa)

खाद्यपदार्थ तिथे खाणार असाल तर त्यांच्या प्लास्टिकच्या अथवा कागदाच्या पिशव्या अथवा चॉकलेट रॅपर्स, उरलेले अन्नपदार्थ शीतपेये अथवा बियरचे कॅन इत्यादी कचरा नेमून दिलेल्या ठिकाणी डब्यात टाका, इतरत्र टाकू नका.

३ : समुद्रात उतरण्या आधी स्वत:ची काळजी घ्या 

समुद्रात पोहायलाउतरण्यापूर्वी कपडे पोहण्यास योग्य असतील याची खात्री करा. लुंगी अथवा साडी नेसून समुद्राच्या पाण्यात उतरू नका.

 

goa beach play inmarathi
YouTube

जोरदार लाटेच्या प्रवाहात असे कपडे पायात अडकून तुम्ही पडू शकता. लुंगी ढिली बांधली गेली असल्यास लाटेबरोबर वाहून जाऊ शकते.

४ : मद्यपान करताना काळजी घ्या

गोव्यामध्ये दारू स्वस्त मिळते आणि साहजिक पर्यटक दारू जास्त प्रमाणात खरेदी करतात, याचीच परिणीती दारू जास्त प्रमाणात पिण्यात होते.

दारू पिऊन गाडी चालवू नका आणि वाहतुकीचे नियम तोडू नका.

अपघात करून स्वतः अथवा दुसऱ्याला इजा करू नका. महत्वाची गोष्ट म्हणजे दारू पिऊन समुद्राच्या पाण्यात उतरू नका.

 

goa beer inmarathi
Condé Nast Traveller India

मद्यप्राशन केल्याने मेंदूवरील ताबा सुटून तुम्ही कोसळू शकता आणि लाटांबरोबर वाहून जाऊ शकता.

५ : विदेशी पर्यटकांप्रती चांगला व्यवहार ठेवा 

गोव्याच्या कलंगुट, कोलवा, तसेच पालोलीम सारख्या जवळपास सर्वच किनाऱ्यांवर परदेशी पर्यटक नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते.

विदेशी महिला कमी कपड्यात अथवा टु पीस बिकिनी घातलेल्या अवस्थेत समुद्राच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरतात.

 

foreigners in goa inmarathi
Herald (Goa)

अशा महिलांकडे टक लावून पहाणे टाळा. तसेच त्यांचे फोटो काढू नका. असे फोटो काढून सोशल मीडियावर टाकणे अतिशय महागात पडू शकते. कायद्याने तो गुन्हा आहे.

६: महिलांनी घ्यावयाची काळजी 

महिला वर्गासाठी खास सूचना.. तुम्ही हाय हिल्स वापरत असाल तर प्लिज त्या हॉटेल मध्ये ठेऊन साध्या चपला वापरा. उंच टाचांच्या चपला वाळूत पटकन रुततात.

 

goa girls inmarathi
pixabay.com

लाट मोठी असेल तर प्रवाहातून पटकन बाहेर पडता न आल्याने बुडू शकता. कोणत्याही प्रकारच्या चपला अथवा बूट किनाऱ्यावरून वाहून जाणार नाहीत याची काळजी घ्या.

८ : कॅसिनोमध्ये जाताना घ्यायची काळजी 

गोव्याचे प्रमुख आकर्षण असलेल्या कॅसिनोमध्ये जाणार असाल तर कटाक्षाने एक गोष्ट पाळा. खेळताना गम्मत म्हणून छोटीशी रक्कम घेऊन खेळा, मोठी रक्कम खर्च करू नका. सावधानतेने खेळा.

 

casino inmarathi
TripSavvy

तेथे फोटो अथवा व्हिडीओ शूट करणे टाळा. व्हिडीओ शूट करणे गुन्हा ठरू शकतो.

९ : स्थानिकांशी सौदार्ह्य बाळगा 

 

goa locals inmarathi
Incredible Goa

कोणत्याही किनाऱ्यावर तेथील रहिवाशी असलेल्या लोकांशी उद्धट पणे बोलू अथवा वागू नका. कोणत्याही प्रकारची वादावादी टाळा.

१० : अमुल्य ऐवज जपा 

आपली महत्वाची कागदपत्रे, पैशाचे पाकीट, दागिने अशा मौल्यवान वस्तू शक्यतो हॉटेलमध्ये सोडून येऊ नका. आपल्यासोबतच बाळगा.

पाण्यात उतरणार असाल तर मात्र या वस्तू लॉकरमध्ये ठेवून या.बरीच हॉटेल्स लॉकरची सुविधा देतात. त्याचा वापर करा. लॉकर नसेल तर खोलीची किल्ली काउंटरवर न ठेवता स्वतः जवळ असू देणे श्रेयस्कर.

११ : सतर्क रहा  
एखादी व्यक्ती तुम्हाला फ्री पासेस देऊ करत असेल तर नम्रपणे नकार द्या. मोठ्या क्लब मधील डान्स अथवा इतर गोष्टीचे आमिष दाखवत असतील तर नक्कीच काही गडबड आहे हे ध्यानात घ्या.

तुम्हाला कोणत्यातरी गोष्टीत गुंतवून तुम्हाला लुटण्याचा डाव असू शकतो.

१२ : खेकड्यांंपासून जरा जपून रहा  

रात्रीच्या वेळेस किनाऱ्यावर मस्ती करत झोपू नका, खेकडे तुम्हाला चावू शकतात.विशेषतः दारूच्या नशेत अशा गोष्टी करणे टाळा.

 

crab inmarathi
YouTube

तुम्हाला खेकडा अथवा इतर कीटक वगैरे चावलेले कळणार नाही व त्याचा त्रास होऊन तुमच्या ट्रिपचा सत्यानाश होऊ शकतो.

आपण आनंद घ्यायला आलो आहोत याचे भान ठेवल्यास पर्यटन सुखाचे होऊ शकते. गोवा तेथील चर्चेस आणि मंदिरे दोन्हीसाठी अतिशय प्रसिद्ध आहे प्रत्येक ठिकाणी त्यांचे काही नियम असतात.

तुम्हास नियम जाचक वाटत असतील तर प्रवेश करूच नका. पण प्रवेश करणार असाल तर नियमांचे पालन करणेच योग्य ठरेल.

गोवा खुप सुंदर आहे.तेथील खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्या, विशेषतः गोव्यातील मासे एकदा चाखून बघा. प्रत्येक प्रदेशाची आपली अशी खाद्यपदार्थाची एक खास शैली असते. गोवन फिशकरी खाल्याशिवाय परत येऊ नका.

संध्याकाळी क्रूझ राईडची गंमत लुटा.

गोवा बाहू पसरून आपले स्वागत करत आहे..त्या स्वागताचा स्वीकार करून आनंद लुटा परंतु तो आनंद लुटत असताना गोव्याच्या आदरातिथ्याला आणि सौंदर्याला गालबोट लागेल असे काही करू नका.

येवा..गोवा आपलाच असा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?