' प्रत्येक मराठी माणसाने फॉलो करायलाच हवेत असे ११ अफलातून युट्युब चॅनल्स! – InMarathi

प्रत्येक मराठी माणसाने फॉलो करायलाच हवेत असे ११ अफलातून युट्युब चॅनल्स!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

हल्ली करमणुकीची सगळीच साधनं बदलत चालली आहेत. अगदी पूर्वी जेंव्हा टिव्ही आले तेंव्हा दूरदर्शनवरचे कार्यक्रम म्हणजे करमणूक असं समीकरण झालं होतं. मग हळूहळू जग पुढे जात गेलं आणि दूरदर्शन मागे पडून अनेक वाहिन्या सुरु झाल्या.

वाहिन्यांच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या मालिका, अंताक्षरी, विविध स्पर्धा वगैरे प्रसिद्ध होऊ लागल्या. हे सगळं बघणारा प्रेक्षकवर्ग ही खूप मोठा होता.

काही लहान मुलांच्या मालिका, काही किशोरवयीन मुलामुलींसाठी योग्य, काही बायकांच्या आवडीच्या तर काही सगळ्या कुटुंबाला एकत्र बसून बघता येतील अशा!

परंतु काळाच्या ओघात ह्या वाहिन्या सुद्धा हल्ली मागे पडताना आपल्याला दिसत आहेत.

 

channels-inmarathi

त्याच त्या रटाळ मालिका, कॉमेडीच्या नावाखाली चालणारा आचरटपणा किंवा लोकांना पहिल्याच्या मानाने असणारा कमी वेळ, काहीही म्हणा पण हल्ली बऱ्याच वाहिन्यांची लोकप्रियता कमी होत आहे हे सत्य आहे आणि बरोबर अशाच वेळी युट्युबच्या मराठी चॅनेल्सनी लोकांच्या मनात घर करायला सुरुवात केली आहे.

‘थोडक्यात मजा’ म्हणजे काय ह्याची प्रचिती ह्या चॅनेल्सवरचे प्रोग्राम्स बघून आपल्याला येत असते.

कमी वेळात, कमी शब्दात, कमी लोकांचा आणि बऱ्याच वेळा कमी साधनांचा वापर करून निर्माण केलेल्या ह्या प्रोग्राम्सनी अत्यंत अल्पकाळातच प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे.

विशेष म्हणजे हे चॅनेल्स बघायला आपल्याला अमुक एका वेळेची वाट बघायची गरज नसते आणि एक भाग चुकला तर पुढचा कसा बघायचा हा प्रश्न सुद्धा पडत नाही.

 

YouTube_New_logo inmarathi

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्या हातांच्या तळव्यावर अगदी कुठेही, म्हणजे ऑफिसमध्ये, लोकलमध्ये प्रवास करताना, कोणाचीतरी वाट बघताना बघता येणारे हे चॅनेल्स कोणाला आवडले नाहीत तर नवलच आहे.

अवघ्या काही मिनिटामधेच मनावरचा ताण दूर करून चेहऱ्यावर प्रसन्न हसण्याची लकेर पसरवणाऱ्या १० मराठी चॅनेल्सची माहिती आज आपण जाणून घेऊ.

१. फनीशमेंट प्रोडक्शन

मनोरंजन, मस्ती आणि मजा किंवा मजेशीर शिक्षा म्हणजे फनीशमेंट प्रोडक्शन. तरुणाईने तरुणाईसाठी तयार केलेला हा धमाल चॅनेल आहे.

आपल्या अगदी रोजच्या जीवनाशी साधर्म्य आढळेल अशा रीतीने हे व्हिडीओ बनवण्यात आले आहेत. एकटे असा किंवा सगळ्यांसोबत हे व्हिडीओ बघून अगदी मोठ्याने हसायला येणारच!

 

Funishment inmarathi

ह्या व्हिडीओजमधल्या प्रत्येक भागाला वेबिसोड म्हणतात व ह्या वेबिसोडमध्ये विशेष आवडण्या सारखं काही असेल तर ह्यात वापरलेले पार्श्वसंगीत! कधी मित्रांची धमाल, कधी पटवापटवी तर कधी बाप-लेकाच्या संवादातून होणारी धमाल कॉमेडी आपल्याला इथे बघायला मिळते.

२. जोश Talks मराठी

ह्या व्यासपीठावरून व्यक्तींची कथामुल्ये सादर केली जातात. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या, जसे की क्रीडा, समाजसेवा, कला, उद्योजगता प्रेरणास्थानांच्या कथांना तरुणांच्या समोर आणण्याचं काम ह्या व्यासपीठाद्वारे केलं जातं.

विशेष म्हणजे जोश Talks मराठीने भारतभरातल्या २८ पेक्षा ही अधिक शहरांना भेट देऊन ५०० पेक्षा जास्त कथा सादर केल्या आहेत.

 

josh talks inmarathi

ह्या कथा १५ दशलक्षापेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यात हा चॅनेल यशस्वी झाला आहे. ह्या चॅनेलचं केवळ एकच उदिष्ट आहे आणि ते म्हणजे तरुणांना मोठी स्वप्ने पाहण्यास प्रवृत्त करणे व त्यांच्या महत्वकांक्षांना बळ देणे!

३. कॅफे मराठी

कॅफे मराठी म्हणजे ‘डिजिटल स्टोरीटेलर्स’. कॉमेडी आणि ड्रामा ह्यांची उत्तम सांगड घालणारा हा चॅनेल देखील तरुणवर्गाचा अत्यंत लाडका चॅनेल आहे. अवघ्या काही काळातच ह्या चॅनेलनी प्रचंड प्रमाणात लोकप्रियता मिळवली आहे.

ह्या चॅनेलच विशेष कौतुक ह्यासाठी की YouTube NextUp award 2017- हा पुरस्कार मिळवणारा हा एकमेव भारतीय प्रादेशिक चॅनेल आहे.

 

cafe marathi inmarathi

क्रिकेटवर आधारित कॉमेडी व्हिडीओ, सिंगल लोकांचे खिल्ली उडवणारे व्हिडीओ तर आई ह्या विषयाभोवती गुंफलेले व्हिडीओ ज्याची प्रचिती आपल्याला सगळ्यांना कधीतरी आलेलीच असते किंवा येत असते असे ह्या चॅनेलवर बघायला मिळतात.

केवळ ५-८ मिनिटांचे हे व्हिडीओ असले तरी आपल्या सगळ्यांना येणाऱ्या रोजच्या अनुभवावर आधारित असल्यामुळे अत्यंत रंजक व लक्षात राहतील असे असतात.

४. भारतीय डिजिटल पार्टी

भाडीपा हा चॅनेल माहीत नसलेला माणूस विरळाच! धमाल मुलं आणि त्यांच्याहून धमाल आई अशा ह्या त्रिकुटाने सगळ्यांच्या मनातला विशेष कप्पा व्यापला आहेच, पण त्याचबरोबर अमेय वाघ, निपुण धर्माधिकारी ह्याचं अत्यंत गाजलेलं कास्टिंग काऊच हे प्रत्येक मराठी तरुणाने बघितलेलं असेलच.

 

bhadipa inmarathi

 

ह्या दोन प्रसिद्ध शो सोबतच स्टॅन्डअप कॉमेडी करणारे सुद्धा अनेकजण ह्या चॅनेलवर दिसतात. असा हा एक वेगवेगळ्या प्रकारचे व्हीडीओ असणारा एक प्रसिद्ध चॅनेल आहे.

५. VIRUS मराठी

VIRUS मराठी हे सुद्धा एक अत्यंत चांगल्या कथा , लिखाण ह्याचा वापर करणारे च्यानल आहे. shoch कथा किंवा awesome twosome ह्यासारख्या अत्यंत चांगल्या लिखाणाच्या पायावर बेतलेल्या वेब मालिका ह्या च्यानलवर प्रसिद्ध आहेत.

 

virus inmarathi

ह्या चॅनेलद्वारे मराठी लोकांना आपल्या लेखनकौशल्याचा व कल्पकतेचा वापर करायला बराच वाव मिळाला आहे.

चांगल्या लिखाणाची बऱ्याच ठिकाणी कमी असल्यामुळे हिंसा आणि भडक दृश्ये ह्याचा वापर बरीच च्यानल करत असताना हा च्यानल त्यातल्या मजबूत कथेमुळे आपले लक्ष वेधून घेतो.

६. मराठी कन्या

स्मिता नावाच्या मुलीने काढलेला हा चॅनेल खास महाराष्ट्रातील मराठी युट्यूबरचा मराठी चॅनेल आहे. ह्यात आपल्याला कॉमेडी तर बघायला मिळतेच पण त्याच बरोबर खूप प्रमाणात मनोरंजन तसेच स्मिताचे स्वत:चे अनुभव ही बघायला मिळतात.

अवघ्या १० ते १२ मिनिटांच्या व्हिडीओजमध्ये बरेच विषय सामावलेले आपल्याला दिसतात.

 

marathi kanya inmarathi

गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडचं बाहेर भर उन्हात फिरायला जाणं किंवा आरत्यांचे विविध प्रकार अशा अनेक विषयांवरची निखळ कॉमेडी बघायला मिळणारा चॅनेल म्हणजे मराठी कन्या.

७. टेक मराठी

टेक मराठी हा एक नवीन आणि अभिनव कल्पनेवर आधारित असलेला मराठी चॅनेल आहे. ह्या चॅनेलवर आपल्याला अत्यंत सोप्या भाषेत वेगवेगळ्या विषयांवरची ट्युटोरीअल्स बघायला मिळतात.

ह्या चॅनेलमध्ये बऱ्याच विषयांवरचं प्रशिक्षण, मार्गदर्शिका किंवा सोप्या शब्दात सांगायचं तर माहिती मिळते.

 

th postman inmarathi

विद्न्यानापासून ते तंत्रज्ञानाबद्दल, संगणक, स्मार्टफोन, सोफ्टवेअर, अनुप्रयोग सारख्या विषयांवरची माहिती, ट्रिक्स, टिप्स इथे बघायला मिळतात. ह्याचबरोबर वेगवेगळ्या विषयांवरचे परीक्षण ही ह्या चॅनेलवर मिळत.

८. मराठी वाघ

जगात अनेक वाईट गोष्टी घडत असतात, त्याकडे कोणी फारसं लक्ष देत नाही पण कुठेतरी काहीतरी चुकीचं होत असत आणि त्याबद्दल बोलणार कोणीतरी हव असत. अशा विषयांवर वाच्यता करणारा हा चॅनेल आहे.

दर वेळेस चॅनेल्स हा हेतू हा केवळ करमणूक नसून माहिती देण किंवा एखाद्या विषयावरच सामान्य ज्ञान देण हा ही असू शकतो हे ह्या चॅनेलमुळे आपल्याला समजतं.

 

marathi wagh inmarathi

रातराणी बस, वेगवेगळ्या सणांची माहिती, स्यानीटरी प्याडचा नशा करण्यासाठी होणारा गैरवापर अशा अनेक कधीही न ऐकलेल्या विषयांवरची माहिती इथे बघायला मिळते. फावल्या वेळात वेगवेगळी माहिती गोळा करण्याचे हा चॅनेल म्हणजे एक उत्तम साधन आहे.

९. चावट

चावट ह्या चॅनेलवर ‘स्ट्रगलर साला’ ही एक अत्यंत लोकप्रिय वेब मालिका आहे. विजू माने लिखित ह्या मालिकेत संतोष जुवेकर, कुशल बद्रिके आणि बाबा चव्हाण हे प्रसिद्ध कलाकार आहेत.

 

chavat inmarathi

ह्या मालिकेत अभिनेत्यांना आपल्या कार्यकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात काम मिळवण्यासाठी करावी लागलेली धडपड अत्यंत विनोदी पद्धतीने दाखवण्यात आलेली आहे.

ह्या मालिकेच्या संवादात शिव्यांचे प्रमाण थोडेसे जास्त असले तरीही ही एक न चुकवण्यासारखी वेब मालिका आहे.

१०. द पोस्टमन

सामाजिक, वैचारिक, राजकीय, साहित्यिक आणि मनोरंजन ह्या सर्व क्षेत्रातील ऐवज द पोस्टमन ह्या चॅनेलच्या माध्यमातून बघायला मिळतो.

 

the postman inmarathi

राजकारण ह्या विषयावरचे बरेच व्हिडीओ इथे सातत्याने येत असतात तसेच वेगवेगळ्या विषयांवर माहितीपर असे व्हिडीओ देखील इथे बघायला मिळतात.

उदाहरण द्यायचे झाले तर बेरोजगारी म्हणजे काय हा राजीव साने ह्यांचा एक गाजलेला व्हिडीओ ह्या चॅनेलने प्रसिध्द केला आहे. ह्याच बरोबर भाऊ तोरसेकर ह्यांचे राजकारणावरचे अनेक व्हिडीओ ह्या चॅनेलने लोकांसमोर ठेवले आहे.

११. उर्मिला निंबाळकर 

भटकंती हा सर्वांच्याच आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय. फिरण्यासाठी जगभरात चांगली, स्वस्त ठिकाणे कोणती, तिथे जाण्यासाठी किती खर्च येतो, तो खर्च कसा कमीत कमी करता येईल, या सर्व विषयांवर एक ट्रॅव्हल ब्लॉग उर्मिला निंबाळकर या तरुणीने सुरु केला आहे.

 

urmila inmarathi

व्हिडिओच्या माध्यमातून फिरण्याची माहिती देणारे हे युट्युब चॅनेल मराठीत चांगलेच लोकप्रिय होत आहेत.

आजकाल इन्टरनेटमुळे मनोरंजनाचे खूप पर्याय आपल्या समोर उपलब्ध आहेत पण शेवटी काय बघायचं आणि कशाच्या किती आहारी जायचं हे आपल्या हातात असत.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?