'खुशखबर: आता भारतात होणार आयफोनचे उत्पादन!

खुशखबर: आता भारतात होणार आयफोनचे उत्पादन!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

आयफोन म्हणजे स्टेटस! ज्याच्याकडे आयफोन त्याला लोक एका वेगळ्याच नजरेने पाहतात. पण प्रत्येकालाचं आयफोन घेणं परवडतं असं नाही, कारण आयफोनची किंमत इतकी भरमसाठ की त्यात एखादी झकास बाईक येईल असं बऱ्याच जणांचं म्हणणं!

आयफोनची किंमत जास्त असण्याचं महत्त्वाच कारण म्हणजे आयफोनवर १२.५ टक्के आयात कर द्यावा लागतो. याच अडथळ्यामुळे भारतीय मध्यम वर्गीय ग्राहक आयफोनकडे पाठ फिरवतो. पण हा आयात कर जर हटवला गेला तर आयफोनची किंमत बऱ्यापैकी उतरेल आणि मध्यमवर्गीय देखील आयफोन हातात घेऊन हवा करू शकतील. पण हा आयात कर तेव्हाच रद्द होऊ शकतो जेव्हा आयफोनचे उत्पादन भारतात होईल.

काय म्हणता? असंच झालं पाहिजे? अहो मग तुमची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे, कारण आता आयफोन हा भारतात बनवला जाणार आहे.

iphone-marathipizza

स्रोत

आयफोनची निर्मिती भारतात व्हावी अशी खुद्द अॅपलची देखील इच्छा होती आणि त्यासाठी सरकारी पातळीवर त्यांची बोलणी देखील सुरु होती. आयफोनची निर्मिती फॉक्सकॉन या चीनी कंपनीमार्फत केली जाते. परंतु भारतात आयफोनची निर्मिती करण्याचा मान या कंपनीला मिळाला नसून हा मान मिळाला आहे तैवानच्या विस्ट्रॉन या कंनीला! या कंपनीने अॅपलच्या आयफोन प्रॉडक्शन युनिटसाठी बंगळुरुजवळच्या पिनया परिसरात जागा देखील ठरवली आहे.

खरतरं ही संधी फॉक्सकॉन कंपनीच्या हातात होती, परंतु महाराष्ट्रात युनिट उभारावं की तेलंगणा मध्ये हा निणर्य घेण्यासाठी ही कंपनी बराच वेळ खात होती. याच संधीचा फायदा उचलत तैवानच्या विस्ट्रॉन कंपनीने आपले घोडे पुढे दामटवले आणि ही संधी त्त्यांच्या पदरात जाऊन पडली.

आनंदाची गोष्ट म्हणजे एप्रिलपासून विस्ट्रॉनने आयफोनच्या उत्पादनाला सुरुवात करणार असल्याचे संकेत देखील दिले आहेत.

iphone-marathipizza02

स्रोत

भारत सरकारच्या मेक इन इंडिया मोहीमेअतर्गंत अनेक विदेशी कंपन्याना भारतात प्रॉडक्शन युनिट सुरु करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. त्यासाठी त्यांना आवश्यक सोयीसुविधा प्रदान करण्याचे आश्वासन देखील देण्यात आले आहे. त्याचाच फायदा उचलत गेल्या वर्षभरात जगभरातील अनेक कंपन्यांनी भारतात उद्योग स्थापन करण्याचे आपले स्वप्न पूर्ण करून घेतले आहे.

अॅपलच्या आयफोनची निर्मिती भारतात झाल्यामुळे या महागड्या फोनची किंमत बरीच कमी होणार आहे. मुख्य म्हणजे आयफोनच्या वाढीव किंमती मधील सर्वात मोठा घटक म्हणजे आयात कर तो देखील आपसूकच दूर होणार आहे.

iphone-marathipizza01

स्रोत

तर मग तयार राहा आयफोन घेऊन मिरवायला !

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?