' या गोष्टी तुमच्या वजन वाढीसाठी कारणीभूत असू शकतात ! – InMarathi

या गोष्टी तुमच्या वजन वाढीसाठी कारणीभूत असू शकतात !

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

वजन वाढणे ही समस्त मानवजातीला सतावणारी जटिल समस्या आहे. वजन वाढतंय असं दिसलं की आपली धावपळ सुरु होते वजन कमी करण्यासाठी! मग जिम लावण्याप्पासून ते आहारावर नियंत्रण आणण्यापर्यंत ज्या काही गोष्टी करता येतील त्या आपण करतो. आपलं बस्स एकंच लक्ष असतं ‘काहीही करून वजन कमी करायचं’. पण कधीकधी एकही उपाय कामी येत नाही आणि आपला संपूर्ण हिरमोड होता. मग पुन्हा नव्या उपायांचा शोध सुरु होतो आणि नव्याने वजन कमी करायला सुरुवात होते. पण कधी विचार केलाय का एवढं सगळं करण्यापेक्षा आपण ही समस्याच उद्भवूच दिली नाही तर?? म्हणजेच वजन वाढूच द्यायच नाही म्हणजे पुन्हा वजन कमी करण्यासाठी कंटाळवाणी मेहनत करावी लागणारच नाही.

यासाठी सर्वप्रथम आपल्याला त्या गोष्टी ओळखता आल्या पाहिजेत ज्या आपले वजन वाढण्यासाठी कारणीभूत आहेत. एकदा का त्यांच्यावर आळा बसवला की तुम्ही तुमचं सडपातळ शरीर मिळवण्यास मोकळे! आज आम्ही तुम्हाला अश्याच काही गोष्टी सांगणार आहोत ज्या सहसा वजन वाढीसाठी कारणीभूत असतात आणि तुम्हीच स्वत: ठरवा की यापैकी कोणती गोष्ट तुमच्या वजन वाढण्याला कारणीभूत आहे.

fat-reason-marathipizza00

स्रोत

हिरव्या भाज्या आणि फळांच अपूरं सेवन

fat-reasons-marathipizza01

स्रोत

बहुतेकदा डाएटनुसार जेवण घेण्याच्या नादात आपण फळं आणि हिरव्या भाज्या खाणं विसरून जातो. यामुळे, तुमच्या शरीराचं पोषण कमी होतं आणि वजनात देखील काहीही फरक पडत नाही.

.
कमी झोप

fat-reasons-marathipizza02

स्रोत

कामाच्या, कुटुंबाच्या व्यापामुळे तुम्ही तुमच्या झोपेकडे दुर्लक्ष करत असाल तर हेदेखील तुमचं वजन वाढण्यामागे एक कारण ठरू शकतं.

 

प्रोटीनची कमतरता

fat-reasons-marathipizza03

स्रोत

प्रोटीन ही शरीरासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. वजन कमी करण्याच्या नादात अनेकदा प्रोटीन्सही आहारातून कमी होतात. यासाठी, तुमचा सकाळचा नाश्ता प्रोटीन्सपूर्ण असेल याची काळजी घ्या.

.
रिकाम्या पोटी व्यायाम करणे

fat-reasons-marathipizza04

स्रोत

काहीही न खाता-पिता तुम्ही व्यायाम करत असाल तर तुम्ही तुमच्या शरीराची झीज करताय, हे लक्षात घ्या. रिकाम्या पोटी व्यायाम केल्याचे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. यामुळे, वजन तर कमी होत नाही पण तुमचं मांस मात्र कमी होतं.

 

काहीही भरपूर प्रमाणात खाणं

fat-reasons-marathipizza05

स्रोत

आपण व्यायाम करतोय त्यामुळे कितीही खाल्लं तरी काही फरक पडत नाही, असा अनेकांचा गैरसमज असतो…पणं, व्यायामासोबत तुमच्या जेवणाकडेही लक्ष देणं आवश्यक असतं.

.
अतिशय कमी पाणी पिणे

fat-reasons-marathipizza06

स्रोत

अनेक प्रयत्न करूनही तुमचं वजन कमी होत नसेल तर यामागचं कारणं कदाचित तुमची पाणी पिण्याची सवय असू शकेल. दिवसभरात तुम्ही भरपूर पाणी प्यायल्याची खात्री करून घ्या… वजन कमी करण्यासाठी पाणी महत्त्वाची भूमिका पार पाडतं. खाण्यापूर्वी थोडं पाणी प्यायल्यानं तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त खाण्यापासून स्वत:ला वाचवता.

वजन वाढण्यासाठी अजून काही गोष्टी कारणीभूत असतील तर त्या कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आमच्याशी नक्की शेअर करा !

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?