'थंडीमध्ये त्वचा तजेल राखायची असेल तर या पदार्थांच सेवन सुरु करा !

थंडीमध्ये त्वचा तजेल राखायची असेल तर या पदार्थांच सेवन सुरु करा !

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

थंडी सुरु झाली की त्वचा कोरडी आणि निस्तेज पडायला लागते. याला कारणीभूत असतो हवामानात होणारा बदल आणि त्वचेतील कमी आर्द्रता! निस्तेज त्वचा ही कोणालाही आवडत नाही. मग अश्यावेळी या ना त्या क्रीम लावून त्वचा तजेल राखण्याचा आपण निष्फळ प्रयत्न करतो. निष्फळ यासाठी की या क्रीम्स वगैरे लावून काहीच वेळ आपल्या त्वचेमध्ये तजेलपणा येतो आणि मग पुन्हा त्वचा निस्तेज दिसू लागते. तुम्ही देखील थंडीमधील त्वचेच्या या समस्येने ग्रस्त असाल तर आता आम्ही तुम्हाला अशी उपयुक्त माहिती सांगणार आहोत की तुमच्या या समस्येवर रामबाण उपाय ठरेल. थंडीच्या दिवसात रोजच्या आहारामध्ये काही विशिष्ट पदार्थांचे सेवन केले तर तुमची त्वचा निस्तेजपणाला बळी पडणार नाही. चला तर जाणून घेऊया अश्या काही पदार्थांबद्द्दल ज्यांचे सेवन केल्याने थंडीममध्ये तुमची त्वचा अगदी तजेल राहील.

dry-skin-in-winter-marathipizza

स्रोत

अॅवाकाडो

avocado-marathipizaa

स्रोत

अॅवोकाडो शरीरासाठी अत्यंत पोषक आणि उपयुक्त फळ आहे. या फळात व्हिटामिन ई चे प्रमाण जास्त आहे.

मासे

fish-marathipizza

स्रोत

बांगडा, ट्युना, रावस यांसारख्या माशांमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिडचे प्रमाण अधिक असते. या अॅसिडमुळे त्वचेचा दाह कमी होण्यास मदत होते. तसेच जळजळीमुळे त्वचेवर येणारा लालसरपणाही या ओमेगा 3 फॅटी अॅसिडमुळे कमी होतो.

संत्री

orange-marathipizza

स्रोत

संत्र्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटामिन सी असते. यामुळे त्वचेचा ओलावा कायम राहतो. दररोज संत्र्याचे सेवन केल्यास शरीरातील अनावश्यक घटक बाहेर फेकण्यास मदत होते.

गाजर 

carrots-marathipizza

स्रोत

गाजरात ए आणि सी व्हिटामिन्स असतात. सी व्हिटामिन्समुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते तर ए व्हिटामिनमुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास तसेच त्वचेचा रंग निखरण्यास मदत होते.

थंडीचे दिवस तर सुरु झालेत, मग आतापासूनच या पदार्थांचे सेवन सुरु करा !!

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?