'एक्झिट पोल म्हणजे काय? एक्झिट पोलची विश्वासार्हता किती? समजून घ्या..

एक्झिट पोल म्हणजे काय? एक्झिट पोलची विश्वासार्हता किती? समजून घ्या..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

जगातील सगळ्यात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून असलेल्या भारतामध्ये निवडणूक लागली आणि अवघे वातावरण प्रचार, प्रचार सभा, डिजिटल प्रचाराची रणधुमाळी यांनी ढवळून निघाले, या महिन्याभरात संपूर्ण देशात सात टप्प्यात निवडणूक झाली.

मतदान झाल्यानंतर सर्व उमेदवारांचे भवितव्य EVM मशिनमध्ये बंद झालं.

आता २३ तारखेला निकाल जाहीर होईल. पण त्याआधी बऱ्याच न्यूज चॅनलवर एक्झिट पोल घेऊन अंदाज व्यक्त केले. सर्वत्र खळबळ उडवणारे अंदाज यंदा एक्झिट पोल मधून व्यक्त करण्यात आले आहेत.

 

exit poll inmarathi
Times Now

आता सर्वसामान्य माणसाला प्रश्न पडतो की, मतं तर गुप्त आहेत. मशिन बंद करून ठेवली आहेत तरीही हे एक्झिट पोल वाले अंदाज कसा बांधतात? आणि तो बराचसा बरोबर कसा येतो?

चला..आज आपण पाहूया कसं चालतं एक्झिट पोलचं काम…

निवडणुकीच्या वेळी मतदानानंतर तत्काळ हे एक्झिट पोलचं काम सुरु होतं. सर्वसाधारणपणे मतदारांचा कल, जनमत यांची चाचपणी थेट लोकांशी संवाद साधून, त्यांना कोणत्या पक्षाचा उमेदवार चांगला वाटतो.

कोणता पक्ष येती पाच वर्षे राज्य करायला हवा आहे हे जाणून घेतले जाते.

 

indiadian political parties inmarathi
Tutorialspoint

भारतात बऱ्याच संस्था आहेत ज्या एक्झिट पोलसाठी विविध प्रकारच्या पध्दतीने जनमत चाचणी घेतात. पण या सर्वांची पध्दत ही एकच असते ती म्हणजे ढोबळमानाने नमुने गोळा करणे.

पण त्यातही थोडा फरक पडतो तो विशिष्ट पद्धतीने डाटा तयार केला जातो.तो डाटा वय, लिंग, जात यावरून घेतला जातो.

लोकसभा २०१९ च्या सातव्या टप्प्यात जे मतदान बिहार मध्ये झाले ते दुपारी १ पर्यंत ४०.७३% होते. जे जातीनिहाय झाले होते.

एक्झिट पोलचं मूळ-

एक्झिट पोल ची सुरुवात १९८० मध्ये प्रणय रॉय यांनी केली. त्यावेळी मासिकात प्रसिद्ध झालेला डाटा वापरला जात होता. त्यानंतर १९९० मध्ये सर्व्हे केलेला डाटा वापरुन एक्झिट पोलचे अंदाज प्रसिद्ध होऊ लागले.

 

pranay roy inmarathi
The Hindu

१९९६ साली दूरदर्शन ने एक्झिट पोल हा खास कार्यक्रम ठेवला होता. CSDS म्हणजे सेंटर आॅफ डेव्हलपिंग स्टडी यांच्या मदतीने जे आकडे जाहीर केले ते बरोबर आले होते. त्यानंतर प्रत्येक टीव्ही न्यूज चॅनलवर एक्झिट पोल चालू केला गेला.

कलम 126 अन्वये मतदानानंतर अर्ध्या तासाने एक्झिट पोल आपले अंदाज सादर करु शकतो. त्यासाठी प्रिंट मिडिया व इलेक्ट्रॉनिक मिडिया यांचा वापर करु शकतो.

२००९  मध्ये कौंग्रेस पक्षाने एक्झिट पोलचे अंदाज ऐकून इतर मतदारांवर प्रभाव पडतो अशी तक्रार केली.

खूपवेळा एक्झिट पोल हा विरोधी पक्षांनी लोकांची दिशाभूल करण्यासाठी केलेला डाव आहे त्यामुळे पुढील टप्प्यातील मतदानावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्याचा सारासार विचार करून एक्झिट पोल वर निवडणूक आयोगाने बंदी घातली होती.

 

election commission inmarathi
Inc42

एकंदर सर्व सहा राष्ट्रीय पक्ष आणि अठरा प्रादेशिक घटक पक्षांना याबाबत थोडी हरकत होतीच. मग हे एक्झिट पोलचे अंदाज सर्व टप्प्यांतील मतदान झाल्यानंतर प्रसिध्द करावे असे ठरले.

१२६(अ) अन्वये विधी मंडळाने यात थोडी सवलत दिली आणि एक्झिट पोल प्रसिद्ध करायला परवानगी देण्यात आली.

हा अंदाज भविष्यवेत्ते, टॅरो कार्ड रीडर आणि एक्झिट पोल यापैकी कसलाही अंदाज प्रसिद्ध करायला निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. अंतिम चरणात झालेल्या मतदानानंतरच एक्झिट पोलने आपले अंदाज जाहीर करावेत असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.‌

हे अंदाज बांधताना मतदार मतदान करुन आल्यानंतर त्यांच्याशी थेट बोलून, त्यांनी कोणत्या पक्षाला, उमेदवाराला मतदान केले, त्यांना कोणाचं सरकार यावं वाटतं या सर्व गोष्टींचा उहापोह करुन जे ठोकताळे बांधले जातात ते एक्झिट पोल प्रसिद्ध करते.

किती असते एक्झिट पोलची विश्वासार्हता?

एक्झिट पोल हा अंदाज असतो. तो म्हणजे खराखुरा निकाल नव्हे. आजपर्यंत लागलेल्या निवडणूका, त्यांचे आलेले निकाल आणि एक्झिट पोलचे अंदाज यांमधील कधीकधी तफावत आढळली आहे. तर कधी कधी ते बरोबरही आले आहेत.

 

arnab goswami exit poll inmarathi
Janta Ka Reporter

२००९  मध्ये जी लोकसभा निवडणूक झाली होती तेंव्हा शेवटच्या काही तासांत जे मतदान झाले ते अगदी निर्णायक ठरले आणि त्यावरुन जो ढोबळमानाने अंदाज वर्तवला होता त्यात सर्वात मोठा राष्ट्रीय पक्ष काॅंग्रेस ठरला होता.

या पक्षाला बहुमत मिळेल व त्याच्या १५०  सीट्स निवडून येतील हा एक्झिट पोलचा अंदाज फसला तिथं कांग्रेसच्या ११३  सीट्स निवडून आल्या होत्या.

२००४  च्या निवडणुकीत NDA व घटक पक्षांना मतदानाबाबत दिलेले अंदाज साफ चुकले होते त्यांना १८९  जागा मिळाल्या होत्या तर कौंग्रेस पक्षाने २२२  जागा जिंकल्या होत्या. आणि सरकार स्थापनेसाठी त्यांनी दावा केला होता.

समाजवादी पक्ष आणि बसपाने त्यांना पाठिंबा दिला होता.

 

sp bsp inmarathi
India Today

२००९  साली झालेल्या एक्झिट पोलचे बहुतेक अंदाज चुकले होते. यूपीए ला स्पष्ट बहुमत मिळेल या अंदाजाला निवडणूक निकालादिवशी सुरुंग लागला होता. भाजपला पूर्ण बहुमत मिळाले होते.

तसेच २०१५  साली बिहारमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत एक्झिट पोलने भाजपला बहुमत मिळेल असा दावा केला होता तर बरोबर उलट महाआघाडीच्या पदरात विजयाची माळ पडली होती.

हीच गोष्ट झाली होती सन २०१४  मध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष जास्तीत जास्त जागा जिंकून सत्तेवर येईल असा अंदाज एक्झिट पोल पंडीतांनी केला होता. आणि हा दावा निखालस खोटा ठरला.

भाजपा स्वबळावर सरकार स्थापन करु शकेल इतक्या मताधिक्याने निवडून आली होती.

कोणते एक्झिट पोल खात्रीलायक आहेत?

यावेळचा लोकसभा निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत भरपूर एक्झिट पोल आपल्यासमोर अंदाजांचे ढिगारे ठेवतील. पण यातील इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडिया पोस्ट पोल हे खात्रीलायक एक्झिट पोल आहे अशी मान्यता आहे.

 

india today exit poll inmarathi
Ommcom News

२०१३ ते २०१९ दरम्यान झालेल्या निवडणुकांमध्ये इंडिया टुडे-अॅक्सिस-माय इंडिया पोस्ट पोल यांनी वर्तवलेले अंदाज ९५% बरोबर आले आहेत.

२०१३ पासून माय इंडिया टुडे-अॅक्सिस-माय यांनी ३६ पोस्ट पोल सादर केले आहेत आणि त्यांपैकी ३४ पोल बरोबर आले आहेत. फक्त तामिळनाडू आणि कर्नाटक विधानसभा निवडणुकीत या पोलचे अंदाज चुकले होते.

आताही ८ लाख लोकांच्या मतांचा सर्व्हे करुन पोल आपल्यासमोर मांडला आहे. अजून खात्रीलायक पोल म्हणजे आजतक न्यूज एक्झिट पोल.

शेवटची गोष्ट…. मतदार हा राजा असतो..तो काहीही करु शकतो!!!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?