इस्त्राईलचं राष्ट्राध्यक्षपद आईन्स्टाईनकडे चालून आलं होतं…पण..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

अल्बर्ट आईन्स्टाईन…  भौतिकशास्त्रातील  जागतिक कीर्तीचे विद्वान शास्त्रज्ञ ज्यांचा शोधांमुळे ते जागतिक कीर्तीचे धनी बनले. त्यांनी सापेक्षतावादाचा सिध्दांत मांडला होता.

विज्ञानाच्या क्षेत्रात आईन्स्टाईन यांचं योगदान म्हणजे संशोधक लोकांचा आधारस्तंभ आहे.

 

Albert Einstein inmarathi
Viva!

जन्माने जर्मन असलेल्या या शास्त्रज्ञाने E=mc2 या सूत्राचा शोध लावून जगात फार मोठा बदल घडवला. जगातील हे प्रसिद्ध सूत्र आहे. त्यांनी फोटोइलेक्ट्रीक इफेक्ट आणि क्वांटम थिअरी मांडली.

संपूर्ण विज्ञान जगतात विद्वत्तेचा मानदंड असं ज्यांना मानलं जातं ते आईन्स्टाईन सापेक्षतावादाचे जनक आहेत. अतिशय हुशार असलेले आईन्स्टाईन हे प्रचंड नम्र होते.

विद्वत्तेचा जराही गर्व नसलेल्या आईन्स्टाईन यांच्या नावापुढे अजून एक बिरुद लागणार होतं- इस्राएलचे दुसरे अध्यक्ष…

पण ते लागलं नाही, नाहीतर आज अल्बर्ट आईन्स्टाईन शास्त्रज्ञ आणि इस्राएल चे अध्यक्ष अशी त्यांची ओळख ठरली असती.
तुम्हाला हे माहीत आहे का इस्त्रायलचे दुसरे अध्यक्ष होण्याची संधी आईन्स्टाईन यांना मिळाली होती???

आश्चर्य वाटलं ना? मग हा लेख वाचा…ती सारी कहाणी समजेल. तर झालं असं…

इस्राएलचे पहिले अध्यक्ष चाईम विझ्मन यांचा ९ नोव्हेंबर १९५२ रोजी मृत्यू झाला. खुद्द चाईम विझ्मन यांना अल्बर्ट आईन्स्टाईन हे इस्राएलचे दुसरे अध्यक्ष व्हावेत असं मनापासून वाटत होतं. हा महान ज्यू वंशीय शास्त्रज्ञ अध्यक्ष होण्यासाठी योग्य मनुष्य आहे असं त्यांचं मत होतं.

 

chaim albert inmarathi
New York Post

त्यांच्या मृत्यूनंतर या महान माणसाला ज्यू वंशीय बहुमान म्हणून इस्त्रायलचे अध्यक्ष म्हणून काम करण्याची इस्राएल सरकारने विनंती केली होती.

त्यासाठी आईन्स्टाईन यांना इस्राएलच्या दूतावासाने १७ नोव्हेंबर रोजी तशी विनंती करणारं अधिकृत पत्र पाठवलं होतं. अर्थात त्याकरिता आईन्स्टाईन यांना इस्राएलला स्थलांतरित व्हावे लागणार होते.

इस्त्रायलचे राजदूत अब्बा एब्बान यांनी आईन्स्टाईन यांना पंतप्रधान डेव्हिड बेन गरीआॅन यांच्या सांगण्यावरून पत्र पाठवलं होतं. त्या पत्रात त्यांना विनंती केली होती की, त्यांनी इस्राएलचे अध्यक्षपद स्वीकारावे.

त्यासाठी आईन्स्टाईन यांना इस्राएलचे नागरीकत्व स्वीकारावे लागेल.

 

david albert einstein inmarathi
Center for Israel Education

जरी त्यांना इस्राएलच्या अध्यक्षपदी निवडले तरी त्यांच्यावर त्याचा कसलाही बोजा पडणार नाही याची काळजी घेतली जाईल. या कामामध्ये आमचे प्रतिनिधी श्री. गुटेन तुम्हाला सर्वतोपरी सहकार्य करतील. तुम्हाला हे अध्यक्षपद देणे हा त्या पदाचाच सन्मान असेल.

इस्राएल हे आकाराने छोटे राष्ट्र आहे पण आपण या पदावर विराजमान झाल्यानंतर हे राष्ट्र उच्च स्तरावर पोहोचेल.

तसेच एक ज्यू वंशीय एवढ्या उच्चपदावर विराजमान झाल्यानंतर ज्यूंचे आत्मबल वाढून एकंदरीत त्यांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय ठरेल.

बाकी त्यांच्या वैज्ञानिक कार्यात त्यामुळे कसलेही अडथळे, बंधनं असणार नाहीत याची हमी त्यांना दिली होती. त्यांचं उच्चकोटीचं संशोधन कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी त्याचा सर्व खर्च इस्राएल सरकार करायला तयार होतं.

 

albert einstein 1 inmarathi
Cal Newport

त्यासाठी लागणारा पैसा मनुष्यबळ सारं काही उपलब्ध करून देण्यात येईल पण तुम्ही इस्त्रायलचे अध्यक्ष होण्यास होकार द्यावा अशा आशयाचं पत्र त्यांना इस्राएल सरकार तर्फे पाठवलं होतं.

त्यावेळी अल्बर्ट आईन्स्टाईन यांचं वय होतं ७३ वर्षं. जन्माने जर्मन असलेले आईन्स्टाईन हिटलरच्या वंशवादाविरोधात अमेरिकेत विस्थापित झालेला ज्यूंच्या पुनर्वसनासाठी आणि त्यांच्या शांततामय जीवनासाठी एक वकील म्हणून काम करत होते.

त्याचवेळी झिओनिझम ही ज्यूंच्या पुनर्वसनासाठी असलेली चळवळ उभी राहिली होती. जी ज्यूंच्या अस्तित्वासाठी प्रयत्न करत होती.

मैंचेस्टर गार्डीयन या ब्रिटीश वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की, ज्यूंच्या आत्मिक बळासाठी व त्यांच्या धार्मिक परंपरांचे जतन करण्यासाठी ही चळवळ उभी राहीली होती.

आणि ही चळवळ खास ज्यू वंशीय लोकांच्या विकास आणि अस्तित्वासाठी झगडत होती.

 

zionism inmarathi
History

या चळवळीचे काम काही वरवरचे नव्हते. अतिशय नेटाने ती चळवळ सुरू होती. हिटलरच्या ज्यू वंश संपवण्याच्या प्रतिज्ञेने जो संहार केला त्यामुळे ज्यूंच्या आयुष्याला प्रचंड कलाटणी मिळाली होती.

त्याचे भयंकर पडसाद जगभर उमटले होते आणि ज्यूंचे पुनर्वसन फारच गरजेचे ठरले. आईन्स्टाईन त्यासाठीच काम करत होते. झिओनिझम ही चळवळ खुद्द इस्त्रायल चे अध्यक्ष चाईन विझ्मन चालवणारे दुसरे नेते होते.

त्यांना आईन्स्टाईन यांच्या बुध्दीमत्तेचीच नव्हे तर त्यांच्या ज्यू लोकांसाठी चालू असलेल्या मदतकार्याचीही जाणीव होती.आणि म्हणूनच ते दुसऱ्या अध्यक्षपदी त्यांची निवड व्हावी म्हणून आग्रही होते.

याशिवाय आईन्स्टाईन हिब्रू युनिव्हर्सिटी ऑफ जेरुसलेम च्या विकासासाठी स्वेच्छेने प्रयत्न करत होते. त्यांचं वकील असणं आणि गणितज्ज्ञ असणं हे त्या राज्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरत होतं.

 

Hebrew_University_inmarathi
The Times of Israel

“आईन्स्टाईन उत्तम गणितज्ज्ञ आहेत त्यामुळं आमच्या देशाची अर्थव्यवस्था सुरळीत करु शकतील” टाईम मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत एका संख्याशास्त्रज्ञाने आपले मत नोंदवले होते.

आईन्स्टाईन यांनी या पत्राला विनम्रपणे उत्तर दिलं.. विद्वत्तेचा कळस असलेल्या या माणसाने अत्यंत नम्रपणे ही संधी नाकारली. त्यासाठी त्यांनी कारण सांगितलं होतं,

“मी या कामासाठी योग्य नाही. कारण अशा कामामाठी प्रशासकीय सेवेचा आवश्यक तो अनुभव माझ्याकडे नाही. याशिवाय माझं वय जास्त आहे आणि लोकांना योग्य तऱ्हेनं सांभाळण्याचं, हाताळण्याचं कौशल्य माझ्याकडं नाही.

माझं आजवरचं आयुष्य भौतिकशास्त्र हाताळण्यात गेलं आहे. त्यामुळं नैसर्गिक गोष्टी आणि मानवी व्यवस्थापन करणे मला जमेल असे वाटत नाही. त्यामुळं त्यासाठी योग्य माणूस शोधा.”

 

albert einstein 2 inmarathi
mutualart.com

आपल्या भूमिकेवर आईन्स्टाईन ठाम होते. पण ज्यू वंशीय लोकांशी असलेलं घट्ट विणीचं नातं यामुळे बिघडणार नाही याची खात्री त्यांना होती.

आजकालच्या जगात किरकोळ पद मिळालं नाही म्हणून रुसवे फुगवे करणारे लोक कुठं आणि एका देशाचं मिळणारं सर्वोच्च पद नाकारणारे आईन्स्टाईन कुठं…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?