' विबेक ओबेरॉयच्या ट्विटवरून गदारोळ: आपण विनोदबुद्धी हरवून बसतोय का?

विबेक ओबेरॉयच्या ट्विटवरून गदारोळ: आपण विनोदबुद्धी हरवून बसतोय का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

विवेक ओबेराय अभिनित सिनेमा ‘पी एम नरेंद्र मोदी’ प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर बेतलेल्या या चित्रपटाच्या नवीन पोस्टरचे अनावरण काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले.

बरेच चढउतार अनुभवल्यानंतर, संधींचा दुष्काळ भोगल्यानंतर करिअरल वळण देणारा एक सिनेमा प्रदर्शित होत असतानाच विवेक ओबेराय आता वेगळ्याच प्रकरणामुळे चर्चेत आलाय.

आता त्याचा सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर असणे नि त्याचे ‘ चर्चेत येणे’ या दोन्हींचा परस्परसंबंध आहे का हा प्रश्न अलाहिदा ! पण काही करत असले तरी, किंवा नसले तरी चित्रपट अभिनेते प्रसिद्धीच्या झोतात राहणे सोडत नाहीत हेच खरे.

विवेक ओबेराय हे नाव हिंदी चित्रपटाच्या fansना नवीन नाही. त्याची ‘चॉकलेट बॉय’ पर्सनॅलिटी, ‘कंपनी, साथिया, शूट आउट अॅट लोखंडवाला’ यासारख्या सिनेमातून दिसलेली त्याची अभिनयप्रतिभा या गोष्टींनी चित्रपट रसिकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या.

पण अचानक सौंदर्यवती ऐश्वर्या राय नि त्याच्या प्रेमप्रकरणाच्या खबरा येऊ लागल्या आणि त्याच्या चित्रपट क्षेत्रातील कारकिर्दीला घसरण लागली.

 

vivek aishwarya inmarathi
india.com

त्याचे प्रेमप्रकरण, त्यावरून सलमान खान बरोबर झालेले भांडण, नंतर ऐश्वर्याचे अभिषेकबरोबर लग्न ठरल्याच्या वावड्या, ऐश्वर्या-विवेकचे ब्रेक अप आणि अभिषेक ऐशचे लग्न अशा एकेक घटना घडत विवेक ओबेरायची प्रेमकहाणी संपली खरी, पण या कहाणीने त्याच्यातील नट देखील काही काळ संपवला.

एकेक चित्रपट हातातून निसटत गेले, अभिनेता म्हणून ओळख निर्माण केलेला विवेक एखाद्या होतकरू स्ट्रगलर प्रमाणे संधीच्या शोधात धडपडत गेला.

नंतर काही काळ काहीच घडले नाही. विवेक ओबेराय हे नाव विस्मृतीत जाईल अशी शक्यता निर्माण होत असतानाच विवेक श्री नरेंद्र मोदी यांच्या बायोपिक मध्ये काम करतोय ही बातमी येऊन धडकली नि त्याच्या fansनी याचे स्वागत केले.

पण चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच विवेक पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला.

निवडणुकांच्या निकालाची साऱ्या जगाला प्रतीक्षा असताना त्याने नुकतेच निकाल आणि त्याचा नि ऐश्वर्याचा भूतकाळ याची सांगड घालणारे एक meme ट्विटरवर पोस्ट केले नि जी त्याच्या दृष्टीकोनातून एक हलकीफुलकी गंमत होती तीवर अनेकांनी उलटसुलट प्रतिक्रिया देत त्याला त्रोल केले.

या meme मध्ये सुरुवातीला ऐश्वर्या सलमानच्या फोटोवर ‘ opinion poll’ असे लिहिलेले दिसत आहे. खाली ऐश्वर्या व विवेकचा फोटो ‘ exit poll’ या शीर्षकाखाली आहे, तर त्याच्या खाली ऐश्वर्या, अभिषेक आणि आराध्याचा फोटो आहे ज्यावर ‘final result’ असे लिहिले आहे.

 

vivek inmarathi8
bollywood.com

जनमत चाचणी, तज्ञ मंडळींचे अंदाज याहून खरा निकाल वेगळाच असतो हे या सेलिब्रिटी लोकांच्या खाजगी आयुष्यात घडलेल्या घटनांवरून creative पद्धतीने मांडले आहे. creative हा शब्द स्वतः विवेकने स्वतःच्या बचावासाठी वापरला आहे.

एका मोठ्या घराण्याची सून असलेल्या स्त्रीला तिचे खाजगी आयुष्य असे चव्हाट्यावर आणणे किती चूक किती बरोबर यावर चर्चा झडत आहे आणि विवेकला पुन्हा नकारात्मक प्रतिक्रियांना सामोरे जावे लागत आहे.

त्याने ऐश्वर्याची माफी मागावी आणि ट्विट डिलीट करावे अशा प्रकारची मागणी जोर धरत आहे. एवढेच नव्हे तर त्याला अटक करावी अशीही भूमिका राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली आहे. तशी त्याला नोटीस देखील मिळाली आहे.

NCW च्या चेअरपर्सन रेखा शर्मा म्हणतात,

“ त्याने सोशल मिडिया आणि व्यक्तिशः ज्या व्यक्तीची या ट्विट मुळे बदनामी झाली तिची देखील माफी मागावी. त्याने तसे केले नाही तर त्याच्यावर कोणत्या प्रकारे कायदेशीर कारवाई करता येईल याचा विचार आम्ही करू. हे ट्विट ताबडतोब ट्विटरवरून काढून टाकावे म्हणून आम्ही ट्विटरशी चर्चा करत आहोत”.

महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या प्रमुख विजया रहाटकर यांनीही सांगितले कि विवेक ओबेरायच्या ट्विटची अधिकृत दखल घेऊन त्याला नोटीस पाठवण्यात आली आहे.

 

mahila ayog inmarathi
news24.com

फिल्म इंडस्ट्रीमधील कलाकारांनी देखील या meme वर नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोनम कपूरने त्यावर ‘ disgusting and classless अशी कॉमेंट केली आहे. तर मधुर भांडारकर यांनी सुद्धा यावर आपले मत मांडताना ट्विट केले.

“प्रिय विवेक , तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. ट्रोल करताना नि meme बनवताना माणसे कोणत्याही थराला जातात, तू एक जबाबदार व्यक्ती आहेस, आणि आपल्या एखाद्या कृत्याने इतरांच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल का याची काळजी तू घ्यायला हवी होतीस. हे ट्विट डिलीट करून माफी माग अशी विनंती करतो”.

एका ट्विटर युजरने विवेकची तुलना सलमानशी केली. लग्नापूर्वी सलमानने ऐश्वर्याच्या सन्मानाचे किती नि कसे धिंडवडे काढले हे आपण सर्वांनी खाजगी चॅनलवर पाहिले आहे. तरी सलमानचा एक चाहता म्हणतो,

“एकीकडे सलमान आहे, जो आजही ऐश्वर्याचा उल्लेख करायची वेळ आली तर तिचे पूर्ण नाव घेतो, ‘ ऐश्वर्या राय बच्चन’ आणि दुसरीकडे विवेक ओबेराय, ज्याने तिच्या प्रतिमेला धक्का पोहचेल असे चित्र पोस्ट केलेच, पण या सगळ्यात एका मायनरला देखील ओढले “.

अशा प्रकारे याचा संबंध एका स्त्रीच्या इभ्रतीशी तर जोडला जात आहेच, पण त्यात आता जातीयवादाचे देखील रंग भरले जात आहेत.

कोणी विवेकला निर्लज्ज म्हणत आहे, कोणी घृणास्पद म्हणून नाक मुरडत आहे, कोणी ती एका सुसंस्कृत कुटुंबाची सून आहे याची आठवण त्याला करून देत आहे, तर कोणी ऐश्वर्याचा विवेकला सोडण्याचा निर्णय योग्य होता अशी टिप्पणी करत आहे.

 

vivek inmarathi8
indianexpress.com

या सर्व प्रतिक्रियांच्या वादळात उभा राहून विवेक शांतपणे त्याची बाजू मांडत आहे. त्याच्या मते हे meme त्याच्याकडे आले तेव्हा त्यातील त्याचा भूतकाळ आणि निवडणुकांचा निकाल याची चपखल सांगड घालणे त्याला आवडले.

तो मनापासून हसला आणि इतर लोक देखील ही गंमत म्हणून स्वीकारतील अशी त्याची धारणा होती. यात काही राजकीय किंवा धार्मिक तेढ निर्माण करणारे आहे असे त्याला वाटत नाही.

सोनमच्या टीकेला उत्तर देताना तो म्हणतो,

“तिने अभिनय आणि सोशल मिडिया, दोन्हीकडे ओवररिअॅक्ट करणे थांबवावे. तिने महिला सबलीकरणच्या मोहिमेत किती प्रत्यक्ष काम केले आहे हे तिने मला सांगावे. मी स्वतः 10 वर्षे woman empowermentमध्ये काम केले आहे”.

माफी मागण्याच्या मुद्द्यावरून विवेक म्हणतो, “ माफी मागायला मला काहीच प्रॉब्लेम नाही, कारण मी त्या बाबतीत अगदी एक्स्पर्ट आहे, पण मला आधी माझी चूक तर कळू द्या.”

 

oberoi inmarathi
Bollywood.com

त्या meme मध्ये ज्या व्यक्ती involve आहेत, त्यांच्यापैकी कोणीच काही हरकत घेताना दिसत नाही. राजकीय लोक राजकीय फायद्यासाठी याचा इश्यू करत आहेत, काही अल्पसंख्यांकाचा मुद्दा आणून धार्मिक रंग देत आहेत, पण त्या meme मध्ये वाईट काय आहे?

मी कोणाला शिवी दिली ? काही अश्लील बोललो ? नाही. कोणीतरी ट्विट केले, मला हसू आले, मी हसलो. यात चूक काय?”

अशी प्रतिक्रिया हा वाद सुरु झाल्यानंतर त्याने पहिल्यांदा दिली. परंतु माध्यमातील प्रक्षोभ पाहता त्याने आज हे ट्विट मागे घेत बिनशर्त माफी मागितली आहे. 

एकूणच जे घडले त्याचा विचार केला तर मामला एवढा गंभीर वाटत नाही. खाजगी आयुष्य चव्हाट्यावर मांडले जाणे, त्याची गरमागरम चर्चा होणे ही गोष्ट आता सेलीब्रिटी स्टेटसचा भाग वाटावी इतकी कॉमन झाली आहे.

काही जण तर ‘ बद हुये तो क्या हुआ, नाम तो हुआ’ ही भूमिका घेत प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी जाणीवपूर्वक हा मार्ग निवडतात. या साऱ्याला तंत्रज्ञानातील शोधांनी अधिक हातभार लावला आहे.

पूर्वी पार, कट्टे, नदी नि सार्वजनिक नळ अशा ठिकाणी कुजबुजत कुचूकुचू केले जाणारे गॉसिप आता खुलेआम फेसबुक, whatsapp आणि ट्विटर वर केले जात आहे.

 

social-media-inmarathi
onlinelpntorn.org

लोकांच्या खाजगी जीवनात डोकावणे ही एक अत्यंत स्वाभाविक मानसिकता बनत चालली आहे. या गॉसिपमध्ये तथ्य किती, ते किती गांभीर्याने घ्यावे हे गॉसिप करणाराला माहित असते, ज्याच्याबद्दल केले जाते त्याला माहित असते.

चर्चा करण्यासारखे कितीतरी गंभीर प्रश्न असताना कोणत्या प्रश्नाला priority द्यायची हे ज्याचे त्याने ठरवावे नाही का ?

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?