अख्ख्या देशाला आपल्या मोहक सौंदर्याने वेड लावणाऱ्या माधुरीबद्दल १५ खास गोष्टी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक सुपरस्टार हिरो होऊन गेले आहेत आणि अजून सुद्धा होत आहते. अगदी दिलीप कुमार, राजेश खन्ना, देव आनंद, अमिताभ बच्चन इथपासून ते सलमान, शाहरुख, आमीर इथपर्यंत.

 

madhuri_dixit 2 InMarathi

ह्यातल्या एकेकाच्या फक्त नावावर अख्खा चित्रपट सुपरहिट करण्याची शक्ती असते. मात्र ह्या तुलनेत अशा सुपरस्टार हिरोइन्सची संख्या मात्र फार कमी आहे.

मात्र अशा हिरोइन्सच्या यादीत अगदी वरच्या स्थानावर असणारे एक मराठमोळे नाव म्हणजे माधुरी दीक्षित.

चला तर मग तिच्याबद्दल माहित नसलेल्या पंधरा वेगळ्या गोष्टी आज आपण जाणून घेऊया

१ ) मायक्रोबायोलॉजीस्ट  माधुरी 

अभिनयाच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या माधुरी दीक्षित हिच्याकडे मायक्रोबायोलॉजीची डिग्री आहे. तिला सुरवातीला चित्रपटात काम करायची काहीच इच्छा नव्हती. काहीश्या अपघातानेच ती चित्रपटसृष्टीत आली.

Madhuri_Dixit InMarathi

तिचा पहिला चित्रपट अबोध जो १९८४ मध्ये प्रदर्शित झाला होता तो फ्लॉप झाला. तिला खर नाव आणि प्रतिष्ठा मिळवून दिली ती १९८८ साली प्रदर्शित झालेल्या तेजाब चित्रपटाने.

२) चौदा फिल्मफेयरला नामांकित माधुरी 

माधुरी ही एकमेव महिला कलाकार आहे जिला एकूण चौदावेळा फिल्मफेयर अवोर्ड साठी नामांकन मिळाले आहे.

 

Madhuri_Dixit filmfare awards InMarathi

 

ह्या नामांकनापैकी तिने चार वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार मिळवला आहे. दोन वेळा तिला वेगळ्या विभागात फिल्म फेयर पुरस्कार मिळाला आहे.

३) नृत्यांगना माधुरी 

आपल्या तालावर लाखो लोकांना नाचवणारी माधुरी ही शास्त्रीय कथ्थक शिकलेली आहे. ती तिच्या काळातील अशी एकमेव अभिनेत्री होती जिच्या गाण्याला साक्षात पंडित बिरजू मराज ह्यांनी नृत्य दिग्दर्शन केले होते.

 

madhuri dixit dance teacher

एका मुलाखतीत बिरजू महाराज तर अस सुद्धा म्हणाले होते की माधुरी ही बॉलीवूडमधील सर्वोत्कृष्ट नृत्यांगना आहे.

४) तीस किलो वजनी ड्रेस घालुन नृत्य करणारी माधुरी 

कमीतकमी कपडे घालून नाचण्यात अनेक नायिका पारंगत आहेत. मात्र माधुरी मार डाला ह्या देवदास चित्रपटातील गाण्यात चक्क तीस किलो वजनाचा ड्रेस आणि दागिने घालून नाचली होती.

 

Madhuri_Dixit 1 InMarathi

 

हा ड्रेस डिजायनर नीता लुल्ला ह्यांनी डिझाइन केला होता आणि एवढ असून सुद्धा तिचा तो नाच आजही लोकाच्या तसाच्या तसा नजरेसमोर आहे.

५) एम एफ हुसेनांनी चितारलेली माधुरी 

प्रसिद्ध चित्रकार एम.एफ. हुसेन हे माधुरीचे निस्सीम चाहते मानले जातात. ते तिच्या सौंदर्यावर प्रचंड फिदा होते. ते तर अस सांगतात की त्यांनी माधुरीचा हम आपके है कौन हा चित्रपट चक्क ६७ वेळा बघितला होता.

 

M. F. Husen painter InMarathi

माधुरीच्या सौंदर्यावर फिदा होऊन त्यांनी अनेक चित्र काढली. एवढच नाही तर तिला घेऊन त्यांनी गजगामिनी नावाचा चित्रपट सुद्धा प्रोड्यूस केला. ह्या चित्रपटात शाहरुख खान नायक होता.

६) जीवाभावाचे चाहते असणारी माधुरी   

माधुरीचे पूर्ण भारतभर अनेक चाहते होते जे तिच्यासाठी काहीही करायला तयार असायचे. जमशेदपूर मधल्या एका चाहत्याने तर माधुरीचा वाढदिवस हा राष्ट्रीय सुट्टी घोषित करावा अशी सरकारला विनंतीच करून टाकली.

तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने माधुरीच्या वाढदिवसापासून वर्ष सुरु होणारे एक कॅलेंडर सुद्धा बनवले.

७) पद्मश्री माधुरी

माधुरीला तिच्या चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी सन २००८ मध्ये भारताचा चौथा सर्वोत्कृष्ट नागरी सन्मान पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आले होते.

 

Madhuri_Dixit padmashri award InMarathi

 

८) मालदार अभिनेत्री माधुरी

माधुरी ही तिच्या काळातील सर्वात जास्त पेड हिरोईन होती. अभिनेत्यांनी गाजवलेल्या काळात सुद्धा तिला तिच्या समोर असणाऱ्या सुपरस्टार पेक्षा जास्त मोबदला दिला जायचा.

 

madhuri dixit with salman khan InMarathi

अशी अफवा आहे की हम आपके है कौन ह्या चित्रपटासाठी माधुरीला २.७ कोटी रुपये मोबदला दिला गेला होता जो तिचा ह्या चित्रपटातील नायक सलमान खान पेक्षा सुद्धा जास्त होता.

९) लाखो चाहत्यांचे हृदय तोडणारी माधुरी 

भारतातील लाखो तरुणांचे ह्दय तोडून ही त्याच्या स्वप्नातील परी १७ ऑक्टोबर १९९९ ला लॉस एंजलीस मधल्या भारतीय वंशाच्या डॉ. श्रीराम नेने ह्यांच्या सोबत विवाहबंधनात अडकली.

 

madhuri dixit with husband InMarathi

तिने चित्रपट सृष्टी मधून एक स्वल्पविराम घेतला आणि ती अमेरिकेत राहू लागली. तिला रायन आणि अरीन नावाचे दोन गोड मुलगे आहेत.

१०) सदिच्छा दूत माधुरी 

चित्रपटसृष्टी पासून दूर असण्याच्या काळात सुद्धा माधुरी शांत बसलेली नव्हती. तिने वेगवेगळ्या प्रकारे समजसेवा केली.

 

Madhuri-Dixit-10 inmarathi
PINKVILLA

तिला सरकारने २०१४ साली महिला आणि मुलांच्या हक्कांसाठी लढण्यासाठी सदिच्छा दूत बनवले होते.

११) अवकाशात अढळस्थानी असलेली माधुरी

माधुरीची जादू फक्त पृथ्वीवरच नाही तर पृथ्वीच्या बाहेर सुद्धा पसरली आहे. आकशगंगेतील एका ताऱ्याला तिचे नाव देण्यात आले आहे.

 

madhuri dixit star certificate InMarathi

हे तिच्यावर प्रेम करणाऱ्या तिच्या अनेक चाहत्यांमुळे शक्य झाले आहे.

१२) महापाप न करू शकलेली माधुरी 

अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या माधुरीने १९९० साली महापाप नावाच्या चित्रपटात काम केले होते. ज्यात तिच्यासोबत मिथुन, आदित्य पांचोली, सदाशिव अमरापूरकर,शक्ती कपूर, परेश रावल असे कलाकार होते.

मात्र हा चित्रपट कधी पूर्णच होऊ शकला नाही. काही कारणाने त्याचे शुटींग अर्धवटच राहून गेले.

१३) देवानंद सोबतचं काम नाकारणारी माधुरी 

माधुरीने विजय आनंद ह्यांचा जाना ना दिल से दूर हा चित्रपट स्वीकारला सुद्धा होता. ह्यात तिच्यासोबत देव आनंद आणि इंद्र कुमार हे कलाकार होते. मात्र तिने हा चित्रपट शुटींग सुरु व्हायच्या आधीच सोडला .

 

dev-anand InMarathi

ह्यामागचे कारण मात्र गुलदस्त्यातच राहिले.

१४) अपयशातून यशाकडे वाटचाल करणारी माधुरी 

यशाचा चढता आलेख असणाऱ्या आणि अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या माधुरीची सुरवात मात्र निराशाजनक होती.तिचा पहिला चित्रपट फ्लॉप गेला होताच तसेच १९८४ ते १९८८ पर्यंत आलेले तिचे सलग नऊ चित्रपट फ्लॉप गेले.

 

Madhuri-Dixit-12 inmarathi
YouTube

तरीही माधुरीने चिकाटी सोडली नाही आणि मग १९८८ साली तिचा तेजाब रिलीज झाला आणि ती लाखोंच्या स्वप्नातली महाराणी झाली.

इथून पुढे तिने कधीच मागे वळून बघितले नाही आणि ती यशाच्या शिड्या चढतच गेली.

१५) अमेरिकेत नृत्याचे धडे शिकवणारी माधुरी 

नृत्यावर अतोनात प्रेम करणाऱ्या माधुरीने अमेरिकेत गेल्यावर सुद्धा त्याची साथ सोडली नाही. तिने तिकडे एक वर्च्युअल डान्स अकादमी स्थापन केली आहे त्याच्या माध्यमातून ती नाचाची आवड असलेल्या मुलांना नाच शिकवते.

 

madhuri dixit dance with students InMarathi

 

ह्या साईटवर कुणीही आपल्या डान्सचे व्हिडीओ टाकू शकतं आणि माधुरीच मार्गदर्शन मिळवू शकतं.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?