' फेसबुकच्या चावडीचे खुद्द मालक: मार्क झुकरबर्ग यांच्याबद्दल १० अफलातून गोष्टी!

फेसबुकच्या चावडीचे खुद्द मालक: मार्क झुकरबर्ग यांच्याबद्दल १० अफलातून गोष्टी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

फेसबुक हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक झाला आहे. काही वेळासाठी सुद्धा फेसबुक चालायचे बंद झाले तर आपला जीव खालीवर होतो. २००४ साली सुरु झालेल्या ह्या सोशल नेटवर्किंग साईटने अपल्पावधीतच आपल्या संपूर्ण जगण्यावरच ताबा मिळवला आहे.

जेमतेम पंधरा वर्ष वय असणाऱ्या एका कॉलेजकुमारने आपल्या मित्रांशी बोलण्यासाठी बनवलेल्या साईटचा आज जगभर पसरलेला एवढा प्रचंड वटवृक्ष बनला आहे.

 

mark-zuckerberg inmarathi
EVOKE.ie

 

वयाच्या तिशीच्या आत जिथे सर्वसामान्य तरुण नुकताच कुठे तरी नोकरीत स्थिरावत असतो, कुणी लग्न केलेलं असत तर कुणी लग्नाच्या प्रयत्नात असतात, कुणी घर घेण्याच स्वप्न बघत असतो अशा वयात मार्क झुकरबर्ग जगातल्या सगळ्यात श्रीमंत लोकांच्या यादीत जाऊन बसलेला आहे. अशा ह्या अवलियाच्या आयुष्यातील दुर्लक्षित अशा दहा गोष्टींवर आज आपण प्रकाश टाकू.

१ – निळ्याचे साम्राज्य :-

फेसबुक उघडल्यावर आपल्या त्यात सगळ्यात जास्त निळ्या रंगाचे वर्चस्व दिसते. साईट बघताना असे वाटते की निळा रंग मार्कला फार आवडत असेल मात्र ह्या निळ्या रंगाच्या मागे सुद्धा एक वेगळेच कारण आहे.

 

mark zuxkerberg and facebook inmarathi
japantimes.co.jp

 

मार्क झुकरबर्गला रंगांधळेपणाचा त्रास आहे. त्याला लाल आणि हिरवा रंग नीट दिसत नाही. निळा रंग हा त्याला सगळ्यात व्यवस्थित दिसणारा रंग होता त्यामुळे त्याने साईट बनवताना त्या रंगाचा वापर सगळ्यात जास्त केला.

आता हाच निळा रंग ही फेसबुकची ओळख बनला आहे आणि त्याच्या करोडो चाहत्यांच्या सुद्धा आवडीचा रंग बनला आहे.

२ – नोकरी की व्यवसाय :-

एओएल आणि मायक्रोसॉफ्ट ह्या कंपन्यानी मार्कला तो हायस्कूलमध्ये असतानाच नोकरीत घेण्याचा प्रयत्न केला होता.

त्याने हायस्कूलमध्ये असतानाच सिनॅप्स नावाच्या एका प्रोग्रामचा शोध लावला होता जो ऐकणाऱ्या माणसांच्या आवडीप्रमाणे आर्टीफिशीयल इंट्यालीजन्स वापरून त्याला गाणी ऐकवू शकत होता.

मात्र मार्क ह्या आमिषाला बळी पडला नाही आणि त्याने आपले काम सुरूच ठेवलं आणि आता तो जगातला सर्वांत तरुण यशस्वी उद्योजक बनला .

३ – करड्या टीशर्टचे गूढ :-

मार्कचा कुठलाही फोटो बघितला तरी त्यात तो करड्या रंगाच्या टी शर्ट मध्ये आपल्याला दिसतो. त्याच्याकडे एकच टी शर्ट आहे की काय अशी आपल्याला शंका येऊ शकते एवढा तो त्याच टी शर्टमध्ये दिसतो. मात्र हे खर नाही.

 

mark-zuckerberg and t shirt inmarathi
IBTimes UK

त्याच्याकडे एकाच प्रकारचे आणि एकाच रंगाचे अनेक टी शर्ट आहेत. ह्यामागचे त्याचे कारण सुद्धा आपल्याला खूप काही शिकवणारे आहे. वेगवेगळ्या कपड्यांमधून एक कपडा निवडण्यात लागणारा वेळ वाचवण्यासाठी तो समान कपडे वापरतो.

त्यामुळे उद्या ऑफिसला काय घालायचे ह्या रोजच्या प्रश्नाचा त्याला त्रास होत नाही.

४ – टाय घालणारा मालक :-

टी शर्टमुळे काही लोकांच्या मनात मार्कबद्दल थोडे गैरसमज होऊ लागले होते. कंपनीबाबत तो जास्त सिरीयस नसेल अशा गोष्टी पसरू लागल्या, मात्र ह्या सगळ्यांचे उत्तर म्हणून मार्कने २००९ ह्या पूर्ण वर्षी रोज टाय घालू लागला.

 

Zuckerberg_suit_and_tie inmarathi
Vox

आर्थिक मंदीच्या ह्या वर्षी सुद्धा फेसबुकचा चेहरा जगात चांगला असावा ह्यासाठी त्याने हा प्रयत्न केला होता.

५ – शाकाहारी मार्क :-

अब्जावधी रुपयाचा मालक असलेला मार्क हा शुध्द शाकाहारी आहे. मांसाहार करण्याबाबत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना मात्र त्याने मजेशीर उत्तर दिले होते.

“ मी तेव्हाच मांस खाईन जेव्हा मी स्वतः त्या प्राण्याला मारलेले असेल ” .

मॅकडोनाल्ड किंवा इन-आउट बर्गर ह्यासारखी पेजसुद्धा त्याने लाईक केलेली आपल्याला दिसतात. मात्र ‘लाईक’ च्या बाबतीत त्याची अशी काही अट नाही.

६ – ट्वीटरवरचा टीवटीवाट :-

खर तर ट्वीटर ही फेसबुकची तशी विरोधी कंपनी म्हणावी लागेल. मात्र मार्कचे ट्वीटरवर सुद्धा चक्क २२०००० फॉलोवर्स आहेत.

तसा मार्क ट्वीटरवर फारसा फिरकत नाही मागच्या चार वर्षात त्याने फक्त एकोणीस वेळा ट्वीट केले आहे आणि ह्यातले शेवटचे ट्वीट २ वर्षा  आधीचे आहे.

तरीही लोक त्याच्या ट्वीटची आतुरतेने वाट बघत असतात.

७ – स्वतःवरचा चित्रपट :-

ऑक्टोबर २०१० मध्ये मार्क आपल्या फेसबुकच्या काही सोबत्यांसोबत एका चित्रपटगृहात “ द सोशल नेटवर्क ” हा चित्रपट बघायला गेला होता. हा चित्रपट फेसबुकची स्थापना ह्या बद्दल होता मात्र मार्क ह्या चित्रपटाबद्दल फारसा खुश दिसला नाही.

 

facebook_movie. inmarathi
Wired

चित्रपट पाहिल्यानंतर त्याने एके ठिकाणी मुलाखत देतात सांगितले की ह्या चित्रपटात त्याने फेसबुकची स्थापना समाजात मान सम्मान मिळवण्यासाठी केली असे दाखवले आहे जे खरे नाही आणि हे त्याला आवडले नाही.

स्वतःवरचा चित्रपट न आवडणारा असा हा मार्क .

८ – कुत्र्याचे फेसबुक पेज :-

मार्कच्या मालकीचा एक बीस्ट नावाचा हंगेरियन कुत्रा आहे. हा त्याचा अत्यंत आवडता कुत्रा आहे .

मजेशीर गोष्ट म्हणजे ह्या कुत्र्याच्या नावाचे एक फेसबुक पेज आहे आणि ह्या पेजचे चक्क दीड मिलियन फॉलोवर्स आहेत.

 

zuckerbrg dog inmarathi
Wired

फेसबुकवरचा हा कदाचित सगळ्यात लोकप्रिय कुत्रा असेल.

९ – कंजुष मार्क :-

मागच्याच वर्षी मार्कला फार ट्रोल केले गेले आणि ह्याचे कारण फार मजेशीर आहे. जवळपास दोन बिलियन डॉलर संपत्ती असणाऱ्या मार्कने आपल्या बायकोसाठी फक्त पंचवीस हजार डॉलरची वेडिंग रिंग घेतली होती.

बायकोसाठी रिंग घेताना केलेला कंजूसपणा मार्कला ट्रोल करायला लोकांना कारण देऊन गेला.

 

zuckerberg and wife inmarathi
CNBC.com

मात्र त्याची बायको ह्या सगळ्यात कुठेच सहभागी नव्हती. ती आपल्या नवऱ्याने दिलेल्या रिंगबाबत समाधानी होती.

१० – स्वतः मालक मार्क झुकरबर्ग :-

फेसबुकवर कमेंटमध्ये कुणालाही मेन्शन करायचे असल्यास आपल्याला @ लिहून त्याच्या पुढे त्या माणसाचे नाव लिहावे लागते .

मात्र जर आपण फक्त @ लिहून इंटर मारला तर आपोआप मार्क झुकरबर्ग मेन्शन होतो.

फेसबुकच्या मालकाने आपल्यासाठी ठेवलेली ही एक खास सोय आहे.

 

mark-zuckerberg- inmarathi
Project Freedom Growth

तर असा आहे हा अत्यंत साधा, सरळ, मेहनती तरुण यशस्वी उद्योजक मार्क झुकरबर्ग. आपल्याला कुठल्याही कामात झोकून देऊन काम करण्याची प्रेरणा देणारा हा तरुण आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?