' राजीव-सोनिया गांधी, अमिताभ-जया बच्चन जेव्हा INS विराटवरून सहलीस जातात… – InMarathi

राजीव-सोनिया गांधी, अमिताभ-जया बच्चन जेव्हा INS विराटवरून सहलीस जातात…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

२०१९ च्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका भाषणात  माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधींवर आरोप केले होते.

त्यांनी आपल्या नातेवाईक आणि मित्रांसोबत सुट्टी घालवण्यासाठी आय एन एस विराट या युद्धनौकेचा वापर केल्याचा आरोप केला.

काँग्रेसने त्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत इंडिया टुडे या मासिकाने आपला एक जुना लेख वेबसाईट वर उपलब्ध करून दिला. हा लेख पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आरोपांना पुष्टी देणारा आहे.

नक्की हे सहलीचं प्रकरण काय होतं आणि ३२ वर्षापूर्वीच्या या खासगी सहलीमुळे काँग्रेसला रोषाला का सामोरे जावे लागले, त्या प्रश्नांची उत्तरे या लेखात मिळतील.

 

rajeev inmarathi
indiatoday.in

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर १९८४ मध्ये सहानुभूतीच्या लाटेत राजीव गांधी पंतप्रधानपदी विराजमान झाले. काँग्रेसचा हा तरुण चेहरा जनमानसात चांगलाच लोकप्रिय होता. त्यांची कारकीर्द मिश्र स्वरूपाची राहिली.

 

हे ही वाचा –

===

 

असेच त्यांच्या कारकिर्दीतील एक प्रकरण होते ते म्हणजे त्यांची लक्षद्वीप समूहावरील सहल! 

भारताच्या पंतप्रधानांचा व्यग्र दिनक्रम असणे, सततच्या बैठका, फाइल्स चा डोंगर, अपेक्षांचे ओझे आणि समोरील गर्दी यांपासून थोडे दूर जाऊन काही दिवस कुटुंबियांसोबत सोबत विश्रांती घेणे काही चुकीचे नाही.

पण जेव्हा ही सहल सरकारी पैशांची उधळपट्टी करणारी ठरते, तेव्हा सामान्य जनता, करदाते त्यावर उद्विग्न प्रतिक्रिया देतील यात नवीन ते काय!

राजीव गांधी यांनी सहलीसाठी निवडलेले ठिकाण होते लक्षदीप समूहावरील बनगरम बेट!  निसर्ग सौंदर्याने नटलेले, कमी लोकसंख्येचे  ठिकाण, समुद्राच्या  सानिध्यात आणि महत्त्वाचे म्हणजे इतर जगापासून जरा तुटलेच असे हे बेट!

 

lakshadweep inmarathi
indiatoday.in

याशिवाय हे बेट निवडण्यामागे अजून एक कारण म्हणजे या बेटावर परदेशी व्यक्तींना येण्यास परवानगी आहे, जी लक्षदीप समूहातील इतर बेटांवर नाही. तेव्हा राजीव गांधींच्या सहलीत परदेशी पाहुण्यांना व्यत्यय येऊ नये यासाठी देखील हे ठिकाण निवडले होते.

एकंदरीत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि भरभरून असलेले निसर्गसौंदर्य पाहता या बेटाची निवड करण्यात आली होती.

आपली ही कौटुंबिक सहल प्रसारमाध्यमांपासून दूर ठेवण्यासाठी देखील हि जागा उत्तम होती. मात्र त्यावेळीदेखील (१९८७) प्रसारमाध्यमांना याची कुणकुण लागली आणि त्यांनी या सहलीतील काही छायाचित्र देखील मिळाले आणि त्यासोबत सहलीची बरीच माहितीदेखील त्यांना मिळवता आली.

राजीव गांधींनी आयोजित केलेल्या या सहलीत त्यांचे जवळचे लोक सहभागी होते. २६ डिसेंबर १९८७ रोजी राहुल गांधी आणि त्यांचे काही मित्र लक्षद्वीप बेटावर आले. या दिवसापासून या सहलीला सुरुवात झाली.

पुढे एकेक करत त्यांचा मित्रपरिवार, काही नातेवाईक त्या ठिकाणी येत गेले. यामध्ये राहुल गांधी, प्रियंका गांधी, त्यांचे चार मित्र, सोनिया गांधी, त्यांची बहीण आणि त्यांचे कुटुंब, सोनिया गांधींची आई,  भाऊ, मामा हे देखील तिथे उपस्थित होते.

अमिताभ बच्चन, जया बच्चन त्यांची मुले, एक पुतणी, राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री अरुण सिंग यांचे बंधू बिजेंदर सिंग सोबत त्यांची पत्नी व मुलगी, याशिवाय आणखी दोन परदेशी पाहुणे यांचा या सहलीत समावेश होता.

 

rajivgandhi inmarathi
indiatoday.in

आधी नमूद केल्याप्रमाणे २६ डिसेंबर रोजी राहुल गांधी आपल्या मित्रांसोबत तेथे आले. पुढे ३० डिसेंबरला राजीव गांधी आणि सोनिया गांधी तसेच पुढच्या दिवशी अमिताभ बच्चन त्यांच्या सोबत सामील झाले. जया बच्चन आणि त्यांची मुले आधीपासूनच तिथे आली होती.

अमिताभ बच्चन आले त्यादिवशी  काही पत्रकारांनी त्यांचे छायाचित्र घेण्याचा प्रयत्न केला असता ते रागावले होते मात्र तरीही पत्रकारांनी छायाचित्र घेतले.

थोडक्यात स्थानिक प्रशासनाने प्रसारमाध्यमांना दूर ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला असला तरीही त्यात ते सफल काही झाले नाही. 

खरे तर ही कौटुंबिक सहल राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी गाजण्याची अनेक कारणे होती. यातील पहिले कारण म्हणजे अमिताभ बच्चन यांची उपस्थिती!

कारण अमिताभ बच्चन यांचे बंधू यांची फेरा कायद्यांतर्गत चौकशी सुरू होती. अशा वेळेस एका आरोपीचा भाऊ पंतप्रधानांसोबत असणे याचे अनेक अर्थ निघत होते. त्यामुळे ही चौकशी निष्पक्षपणे होणार का अशा शंकाही त्यामुळे घेतल्या जाऊ लागल्या परिणामी तत्कालीन  विरोधकांनी या कारणावरून रणकंदन माजवले.

याशिवाय अजून टीकेचे मोहोळ उठले त्याचे कारण म्हणजे तिथे उपस्थित असलेले परदेशी पाहुणे आणि त्यांची  सरकारी पैशाने झालेली सरबराई हे होते.

 

amitabhbachchan-inmarathi
dnaindia.com

३१ जानेवारी १९८८ रोजी अनिता प्रताप यांनी या संदर्भात इंडिया टुडे मढयी लिहिलेल्या लेखात या सहलीत सरबराई साठी काय काय आणले होते याची तपशीलवार यादी दिली आहे. त्यात वाईन दारू यापासून अगदी लहान जिन्नस यांचा देखील समावेश आहे.

तसेच २३ डिसेंबर रोजी हे सगळे सामान तिथे पोहोचवले गेले आणि १ जानेवारी रोजी परत असेच काही जिन्नस मागवले गेल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

स्थानिक प्रशासनाने आम्ही कुठलेही  विशेष आदरातिथ्य केल्याचे नाकारले असले तरी असल्या आरोपांपासून ते मुक्त होऊ शकले नाही. मात्र लक्षद्वीप  प्रशासनाच्या पर्यटन विभागामार्फत अन्न, पाच कर्मचारी, दोन स्वयंपाकी पुरवले गेल्याचे स्पष्ट झाले होते.

 

===

 

याशिवाय देखरेखीसाठी दिल्लीहून गांधी कुटुंबियांचा खासगी स्वयंपाकी इथे उपस्थित होता.

वाद वाढत गेल्यानंतर  राजीव गांधी यांनी आपण या सहलीसाठी अठरा हजार रुपये खर्च केल्याचे सांगितले. मात्र प्रशासनातील विविध घटक या सहलीसाठी कार्यरत असताना या सहलीसाठी नक्की किती खर्च झाला याचा अंदाज लावणे कठीण आहे.

सर्वात मोठे वादंग उठले आणि आताही सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आरोप ते म्हणजे या सहलीसाठी कोचीन ते लक्षद्वीप बेट इथपर्यंत आणण्यासाठी आय एन एस विराट या युद्धनौकेचे चा वापर केला गेला.

 

INS-Viraat05-marathipizza
ibnlive

याशिवाय दहा दिवस ही युद्धनौका याच परिसरात तैनात होती. भारतीय युद्धनौका पंतप्रधानांच्या सहलीसाठी कशी काय वापरले जाऊ शकते? यामुळे आपण आपल्या सुरक्षेविषयी नक्की काय संदेश देत आहोत?

तसेच आयएनएस विराट सारखे विशाल युद्धनौका समुद्रात प्रवास करते त्यावेळेस तिच्या अवतीभोवती असणाऱ्या लहान नौका, पाणबुडी असा मोठा ताफा त्यासोबत असतो.

तेव्हा आयएनएस विराट या युद्धनौकेचा टॅक्सी म्हणून झालेला वापर हा आरोप काही बिनबुडाचा नाही.

तसेच विदेशी व्यक्ती तिथे उपस्थित असतील तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून देखील ही पण एक गंभीर बाब म्हणता येईल.

ही सहल ६ जानेवारी १९८८ रोजी संपली. प्रियंका गांधी या तिथून गोव्याला गेल्या. पुढे विदेशी पाहुणे देखील रवाना झाले. राजीव गांधी आपल्या पुढील कार्यक्रमांसाठी रवाना झाली त्यांच्यासोबत राहुल गांधी देखील होती.

सोनिया गांधी आणि त्यांची नातेवाईक हे सर्वात शेवटी रवाना झाले.

 

rajiv inmarathi
dnaindia.com

तत्कालीन राजकीय वादंगात काँग्रेस नेत्यांनी मात्र या सहलीमुळे काही सकारात्मक परिणाम झाल्याचे नमूद केले. ते म्हणजे पंतप्रधानांच्या लक्षद्वीप बेटांवरील या सहलीमुळे पर्यटकांचे या बेटा कडे लक्ष वेधले गेले आहे.

परिणामी लक्षदीप या द्वीपसमूहावर पर्यटकांचा ओढा वाढला असल्याचे काँग्रेस नेत्यांनी आवर्जून सांगितले. त्यामुळे स्थानिक जनतेला रोजगार मिळाल्याची देखील त्यांनी माहिती दिली.

तेव्हा १९८७ -८८ मधील ही सहल २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एक मुद्दा झाली त्यात नवल ते काय!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?