' अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन यांची हत्या; पिक्चरमध्ये शोभेल असा खरा घटनाक्रम...

अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन यांची हत्या; पिक्चरमध्ये शोभेल असा खरा घटनाक्रम…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

‘ताश्कंद फाईल्स’ बघितलाय का? दिवंगत लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूचे गूढ हा ह्या चित्रपटाचा विषय आहे. फक्त भारतातच नव्हे, तर जगभरातल्या अनेक राजकारण्यांचे मृत्यू हे असेच गूढ आहेत.

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशाच एका रहस्याबद्दल!

अमेरिकन गृहयुद्धाच्या काळात अमेरिकेचे नेतृत्त्व करणारे, अमेरिकेचे १६वे राष्ट्राध्यक्ष, जगविख्यात सर अब्राहम लिंकन यांच्या हत्येबद्दल तुम्हाला हे माहिती आहे का?

मॅरीलँडमधल्या एका अभिनेत्याच्या घरी जन्मलेला जॉन विल्क्स बूथ हा देखील एक अभिनेता होता.

कॉन्फिडरेट स्टेट्स ऑफ अमेरिका बद्दल त्याच्या मनात एक हळवा कोपरा असूनही गृहयुद्धादरम्यान तो उत्तर भागात राहून अभिनेता म्हणून आपली कारकीर्द घडवत राहिला.

 

Abraham Lincoln Inmarathi

 

पण जसजसे युध्द अंतिम टप्प्यात येऊ लागले, तसतसे जॉन बूथ आणि त्याचे इतर अनेक सहकारी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे अपहरण करून त्यांना कॉन्फिडरेट्सची राजधानी असणाऱ्या रिचमंडमध्ये घेऊन जाण्याची योजना आखू लागले.

२० मार्च, १८६५ रोजी जॉन बूथ आपल्या सहा साथीदारांसोबत अब्राहम लिंकनच्या नेहमीच्या रस्त्यावर त्यांची वाट बघत थांबला होता, पण सुदैवाने लिंकन ठरलेल्या वेळी तिथे हजर झाले नाहीत आणि त्यांच्या अपहरणाचा हा प्रयत्न फसला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

या घटनेनंतर दोन आठवड्यांनी रिचमंड पडले आणि एप्रिलपासून कॉन्फिडरेट्स सैन्याच्या पराभवाला सुरुवात झाली. त्यानंतर बूथ कॉन्फिडरेट्स स्टेट्स ऑफ अमेरिकाला वाचवण्यासाठी भयंकर योजना आखू लागला.

१४ एप्रिल १८६५ रोजी, लिंकन अभिनेत्री लॉरा किन हिचे ‘अवर अमेरिकन कझिन’ नावाचे नाटक बघण्यासाठी वॉशिंग्टन डी. सी. मधल्या फोर्ड थियेटरमध्ये येत आहे हे समजल्यावर जॉन बूथ आणि त्याच्या सहकार्यांनी आपल्या योजनेसाठी हाच दिवस नक्की केला.

 

 

तत्कालीन राष्ट्राध्यक्ष लिंकन, तसेच त्यांच्यानंतर राष्ट्राध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार ठरू शकणारे उपराष्ट्रपती अँड्र्यू जॉन्सन आणि सेक्रेटरी ऑफ स्टेट विल्यम एच. सिवार्ड या तीन प्रमुख व्यक्तींच्या एकाचवेळी हत्या करून अमेरिकेत अराजक माजवण्याची ही योजना होती.

लिंकन नाटक पाहण्यासाठी आपल्या ठरलेल्या वेळेपेक्षा उशिरा आले असले तरीही चांगल्या मूडमध्ये होते.

लिंकन त्यांची पत्नी मॅरी टॉड लिंकन, तरुण सैन्याधिकारी हेन्री रॅथबोन आणि न्यूयॉर्कच्या सीनेटर इरा हॅरिस यांची कन्या आणि रॅथबोनची भावी पत्नी क्लारा हॅरिस यांच्यासह स्टेजसमोरील प्रायव्हेट बॉक्समध्ये बसले होते.

 

lincoln inmarathi

 

१०.१५ वाजता, बूथ त्या प्रायव्हेट बॉक्समध्ये उतरले आणि आपल्या 44-कॅलिबर सिंगल शॉट डियरिंगर पिस्तुलाने त्याने लिंकनच्या डोक्याच्या मागच्या बाजूने गोळी झाडली.

रॅथबोन क्षणार्धात बूथला पकडण्यासाठी धावला तेव्हा त्याने रॅथबोन ला हिसका देऊन जॉन बूथ स्टेजवर जाऊन ओरडला “सिक सेपर ट्रायन्निस!” (“अशा प्रकारचे जुलूम करणारे लोक!” – व्हर्जिनिया राज्याचे घोषवाक्य).

पहिल्यांदा, सामान्य प्रेक्षकांना ह्या घटना या नाटकाचाच भाग असल्याचं वाटलं, परंतु मॅरी टॉड लिंकन यांच्या किंचाळीमुळे स्टेजवर नाटकाबाहेरचं काहीतरी घडत असल्याची कल्पना आली.

 

या सगळ्या धावपळीत बुथचा पाय दुखावूनही तो थिएटरमधून बाहेर पडला आणि त्याने वॉशिंग्टनमधून घोड्यावरुन पळ काढला.

चार्ल्स लीले नावाचा एक 23 वर्षीय डॉक्टर प्रेक्षकांकडे होता आणि शॉट ऐकून आणि मेरी लिंकनची ओरड ऐकल्यानंतर लगेचच अध्यक्षांच्या बॉक्समध्ये गेला.

त्यांनी लिंकनना तपासले तेव्हा लिंकन पक्षाघाताने घेरले जात होते, त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत होता आणि ते खुर्चीवर कसेबसे बसलेले होते.

अनेक सैनिकांनी लिंकनला उचलून रस्त्यावरच्या एका बोर्डिंगहाऊसमध्ये नेले आणि त्यांना बेडवर झोपवले.

जनरल सर्जन आल्यावर त्यांनी लिंकनयांना तपासले पण तेव्हा काही उपयोग नव्हता. त्याच रात्रीत कधीतरी लिंकन यांचा गतप्राण देह जनरल सर्जनसमोर होता.

 

 

१५ एप्रिल १८६५ रोजी सकाळी ७.२२ वाजता ५६ वर्षांच्या लिंकन यांना मृत घोषित करण्यात आले.

व्हाईट हाऊस मध्ये त्यांचे पोस्टमॉर्टेम केले गेले, त्यावेळी उपस्थित असणारा लष्करी सर्जन एडवर्ड कर्टिस या शस्त्रक्रियेबद्दल सर्जनच्या टीमचे मत सांगताना लिहितो..

“बेसिनमध्ये काढलेल्या त्या बुलेट्स मोजताना आमच्या मनात एकच विचार होता,जगाच्या इतिहासाला वळण देणाऱ्या अशा घटनेचे कारण कदाचित आपल्याला कधीच समजू शकणार नाही.

लिंकन यांच्या मृत्यूची बातमी वाऱ्याच्या वेगाने संपूर्ण अमेरिकेत पसरली, संपूर्ण अमेरिका शोकसागरात बुडाली. लिंकनच्या अंत्ययात्रेसाठी त्यांचे कॉफिन व्हाईटहाऊस ते त्यांच्या स्प्रिंगफिल्ड, इलिनॉय येथील मूळ घरी नेत असताना वाटेत लाखो लोकांनी त्यांचे दर्शन घेतले.

जॉन विल्क्स बूथ हा त्या थियेटरवरून निघाल्यानंतर आपला साथीदार डेव्हिड हेरॉल्ड सोबत व्हर्जिनीयाच्या दिशेने गेला. मध्ये सॅम्युएल मड नावाच्या डॉक्टरने त्याच्या दुखऱ्या पायावर इलाज केला.(यासाठी मडला नंतर देहांताची शिक्षा ठोठावण्यात आली.)

 

 

 

पोटोमॅक ते व्हर्जिनिया असा प्रवास जॉनने कॉन्फिडरेट एजंट असणार्या थॉमस ए. जोन्स च्या सहाय्याने केला पण शेवटी लिंकनच्या हत्येनंतर बाराव्या दिवशी २६ एप्रिल रोजी जॉन बूथ आणि डेव्हिड हेरॉल्ड लपून बसलेल्या व्हर्जिनीयाच्या गोदामाला अमेरिकन सैनिकांनी वेढा घातला आणि आग लावली.

त्या आगीमुळे डेव्हिडने आत्मसमर्पण केलं पण जॉन मात्र अद्याप आतच लपून बसला होता तेव्हा जॉनने आतून गोळी मारल्याचे सांगून सर्जंटनी आत गोळी घातली. त्यानंतर तीन तास जॉन आपल्या हाताकडे पाहून पुटपुटत होता “युजलेस, युजलेस !”

७ जुलै १८६५ रोजी जॉन विल्क्स बूथच्या चार साथीदारांना फाशी ठोठावण्यात आली.

आता हे चार साथीदार कोण होते हे समजून घेण्यासाठी घटना घडण्याच्या आधीच्या काळात डोकवावं लागेल.

अमेरिकन गृहयुद्धाच्या शेवटचे ते दिवस होते, मॅरी सरीट यांच्या बोर्डिंग हाऊसमध्ये जॉन बूथ त्याच्या सहकाऱ्यांसोबत एक त्रिस्तरीय योजना आखत होता. अब्राहम लिंकन यांची हत्या हा या योजनेचा एक महत्त्वाचा भाग होता.

 

 

पुढे ही योजना आखण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्यामुळेच मॅरी सरीट हिला जॉन बूथची साथीदार म्हणून त्याच्यासोबतच फाशी दिले गेले, अमेरिकन फेडरल सरकारने एका महिलेला फाशी देण्याचा हा पहिला प्रसंग होता.

कॉन्फिडरेट स्टेट्स ऑफ अमेरिकेचे सेनाध्यक्ष रॉबर्ट ई. ली यांनी व्हर्जिनियातील Appomattox Court House इथे आपल्या उरल्यासुरल्या सर्व सैन्यासह शरणागती पत्करली त्याला केवळ पाचच दिवस झाले होते तेव्हा लिंकन यांचा खून झाला.

पण ज्यावेळी बुथने लिंकनवर बंदूक रोखली होती त्याचवेळी माजी सैनिक ल्युईस पॉवेल सेक्रेटरी ऑफ स्टेट्स विलियम हेन्री सेवार्ड यांच्या घरात पोहोचला होता, पण नोकरांच्या सजगतेमुळे सेवार्ड वाचले आणि पॉवेलला त्यांच्या घरातून पळ काढावा लागला.

 

 

नवीन उपाध्यक्ष अँड्र्यू जॉन्सन यांची खोली ज्या हॉटेलमध्ये होती त्याच कर्कवूड हाऊस हॉटेलच्या बारमध्ये जॉर्ज ऍट्झेरोड जॉन्सनची वाट पाहत होता.

पण वरच्या माळ्यावर असलेल्या जॉन्सनकडे जाऊन त्याला मारण्याची हिंमत गुन्हेगारी पार्श्वभूमी नसणाऱ्या ऍट्झेरोडकडे नव्हती; म्हणूनच त्याने काही वेळ थांबून तिथून काढता पाय घेतला.

जर पॉवेल आणि ऍट्झेरोड त्यांच्या प्लॅनमध्ये यशस्वी झाले असते तर लिंकननंतर अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार असणाऱ्या दोन व्यक्तींची हत्या झाली असती आणि नुकत्याच आटोक्यात आलेल्या अंतर्गत यादवीला पुन्हा खतपाणी मिळालं असतं.

या दोघांनाही पुढे पकडण्यात आलं आणि त्यांना अब्राहम लिंकन यांच्या खुनाच्या कटात सहभागी असल्याबद्दल फाशी ठोठावण्यात आली.

 

मॅरी सरीट, ल्युईस पॉवेल, जॉर्ज ऍट्झेरोड जॉन्सन आणि जॉनला राजधानीतून बाहेर पडण्यासाठी मदत करणारा डेव्हिड हेरॉल्ड हेच ते अब्राहम लिंकन खून खटल्यात सहभागी असणारे चार जण होते.

पण तरीही त्यांचा उद्देश संपूर्ण असफल ठरला असंही म्हणता येत नाही. कारण अब्राहम लिंकन यांच्या मृत्यूनंतर या घटनेचा प्रभाव बरीच वर्षं अमेरिकेच्या राजकारणावर पडत राहिला.

या हत्येमुळे अमेरिकेच्या उत्तर आणि दक्षिण या भागांमध्ये परस्परांसाठी तीव्र द्वेषभावना उत्पन्न झाली.

अमेरिकन नागरिक कितीतरी वर्षे युद्धाच्या भीतीखाली जगत होते आणि सतत अनिश्चित अशा भीतीदायक वातावरणाला अमेरिकेला सामोरे जावे लागले.

अब्राहम लिंकन यांच्या मृत्यूमुळे जॉन्सन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले आणि त्यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत पुनर्निर्माणाबद्दल चालवलेल्या धोरणांमुळे जागतिक इतिहासात अकारण वळण आले.

 

Andrew Johnson Inmarathi

 

एवढ्या वर्षानंतर आजही अब्राहम लिंकन हत्या ही घटना अमेरिकन इतिहासातील निर्विवाद निर्णायक घटनांपैकी एक आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?