' प्रियांकाच्या “त्या” केसांवर अनेक विनोद झाले, जाणून घ्या त्या लूक मागचं खरं कारण! – InMarathi

प्रियांकाच्या “त्या” केसांवर अनेक विनोद झाले, जाणून घ्या त्या लूक मागचं खरं कारण!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आजकाल सोशल मिडीयावर कोण कधी आणि का ट्रोल होईल याचा काही नेम नाही आणि एकाने ट्रोल केलं कि हळूहळू तो ट्रेंडच होत जातो. या विषयावर बोलताना बरेच जण ‘नदीचं आणि ट्रेंडचं मूळ शोधू नये’ अशी गंमतीशीर कमेंट करतात.

मागे  प्रियांका चोप्रा अर्थात ‘पिगी चॉप्स’ चा व्हायरल झालेला एक फोटो आठवतोय का? झगमगीत ड्रेस, भडक मेकअप, आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे चित्रविचित्र पद्धतीने बांधलेले केस…

मेंदुला थोडा ताण दिला तर हा फोटो नक्की नजरेसमोर येईल. आठवलं?

तर प्रियांकाने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आणि ट्रोलिंगचा महापुर सुरु झाला. तिच्या या भन्नाट ‘लुक’ वर येणा-या प्रतिक्रिया त्याहूनही भन्नाट, विचित्र होत्या.

 

आता तुम्ही म्हणाल की  हा ट्रोलिंग विषय आत्ता कशाला? त्याचं कारण म्हणजे त्या फोटोमागील सत्य, जे वर्षभरानंतरही अनेकांना ठाऊक नाही,

या फोटो नेमका का काढला गेला? प्रियंकाने असा अवतार नेमका का केला होता? त्यामागचं रहस्य प्रत्येकाला माहिती असायलाच हवं.

एरवी स्टाईल आयकॉन म्हणून ओळखल्या जाणार्या प्रियांकाला तिच्या या अवताराची जाणीव नसेल का? की तिने ‘असा’ अवतार करून घेण्यामागे खरंच काही कारण असेल? असलं तर ते कुठलं कारण आहे ज्यामुळे प्रियांका एवढी ट्रोल झाली होती?

जाणून घेऊयात या अवतारामागची, फारशी प्रचलित नसलेली कहाणी…

सगळ्यात आधी ‘मेट गाला’ म्हणजे काय?

न्यूयॉर्क मधील ‘मेट्रोपोलीटियन म्युझियम ऑफ आर्ट’ हे युनायटेड स्टेट्समधील सर्वात मोठे वस्तुसंग्रहालय(म्युझियम) आहे, ज्याला ‘Met’ असेही म्हटले जाते.

या म्युझियमच्या कॉश्च्युम इंस्टिट्यूटतर्फे निधी गोळा करण्यासाठी दर वर्षी ‘Met Gala’ नावाचा उपक्रम आयोजित केला जातो आणि या कार्यक्रमाने कॉश्युम इंस्टिट्यूटच्या अ‍ॅन्युअल फॅशन एक्झिबिशनचे उद्घाटन होते.

 

 

प्रत्येक वर्षी ‘Met Gala’ साठी त्या वर्षाच्या कॉस्ट्यूम इंस्टिट्यूट एक्झिबिशनची थीम ही ऑफिशियल कॉश्च्युम थीम असते आणि येणाऱ्या पाहुण्यांच्या कपड्यांशी कार्यक्रमाची थीम जुळावी यासाठी आयोजक त्यांना आपल्या इथून ‘शॉपिंग’ करायला सांगतात.

दरवर्षी बरेच सेलिब्रिटी हे असे प्रदर्शनाच्या थीमला पूरक असणारे कपडे ‘समथिंग हटके’ म्हणून घालतात आणि रेड कार्पेटवर मिरवतात सुद्धा.

२०११ साली डिझाईनर अलेक्झांडर मॅकक्वीन यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ठेवलेली ‘सॅव्हेज ब्युटी’ ही थीम असो; किंवा २०१८च्या ‘फॅशन अँड दि कॅथलिक इमॅजीनेशन’ सारखी विस्तृत थीम असो; दरवर्षीची थीम ही अशीच हटके काहीतरी असते.

चित्रविचित्र कपडे घालण्याची सुसंधी म्हणून जागतिक स्तरावरचे बरेच सेलिब्रिटी या इव्हेंटची आतुरतेने वाट पाहतात.

 

 

 नेहमीप्रमाणेच गेल्यावर्षी मे महिन्याच्या पहिल्या सोमवारी दिनांक ६ मे २०१९ रोजी ‘मेट गाला’ संपन्न झाला आणि अशा या कार्यक्रमाची या वेळची थीम होती ‘कॅम्प : नोट दी फॅशन’!

‘कॅम्प’ थीम विषयी !

आता ‘कॅम्प’ म्हटलं की आपल्याला एखाद्या नदीकाठी/जंगलात वगैरे निसर्गाच्या सानिध्यात केलेलं कॅम्पिंग आठवून जातं, पण या थीमचा अशा कॅम्पशी काहीच संबंध नव्हता. मग हा ‘कॅम्प’ कुठला ? तर तो आहे सुसान सोन्टॅग यांच्या १९६४सालच्या ‘नोट्स on कॅम्प्स’ या प्रबंधाशी!

 

थोडेसे प्रबंधाविषयी !

या प्रबंधाच्या सुरुवातीलाच ‘कॅम्प’ची व्याख्या स्पष्ट करताना सुसान म्हणते, ‘हे आहे कृत्रिम, कलात्मक/कुशल आणि अतिशयोक्तीने भरलेल्या गोष्टींवरचे प्रेम!”.

अशा या कॅम्पबद्दल लक्षात घ्यायची एक गोष्ट म्हणजे ‘कॅम्प’ ही ‘सौंदर्याची व्याख्या’ नाही तर ‘शैली आणि कलात्मकता यांची पातळी’ आहे. या गोष्टीमुळे विचित्र फॅशन सेन्सला ‘कॅम्प’ असं म्हटलं जातं.

थीमविषयी मतमतांतरे

इंस्टिट्यूटचे प्रमुख (क्युरेटर) अँन्ड्र्यू बोल्टन यांनी न्यूयॉर्क टाइम्सला सांगितले होते, “पॉप कॅम्प, क्वियर कॅम्प, हाय कॅम्प किंवा पॉलिटिकल कॅम्प; कुठलाही कॅम्प असो, ट्रम्प हे कॅम्प फिगर आहेत.

त्यामुळे मला वाटते की ही अतिशय समयोचित थीम आहे. विशेषतः हाय कॅम्प ही कुठल्याही घटनेवरची रिअॅक्शन असते. ”

 

दुसरे कारण असे कि हल्ली डिझाईनर वेगवेगळ्या चित्रविचित्र फॅशनवर म्हणजेच ‘कॅम्प’ वर विचार करण्याची जशी हिंमत दाखवत आहेत तशी या आधी कधीच दाखवली नव्हती.

GUCCI चे क्रिएटीव डिरेक्टर आणि यावर्षीच्या MET GALAचे सहअध्यक्ष अॅलेसॅन्ड्रो मिशेल, विशेषतः त्यांच्या जेन्डर-बेंडिंग सुटांमधून, वेगवेगळ्या पद्धतीने ‘कॅम्प’ थीम सादर करत असतात.

अशा प्रकारे अनेक ब्रँड्स आणि डिझायनर्सची नावं सांगता येतील, जे वेगवेगळ्या प्रकारे या ‘कॅम्प’ थीमला हात घालत आहेत.
म्हणूनच त्या वर्षीच्या Met Gala साठी ‘camp’ ही थीम ठेवण्यात आली होती.

 

यासाठी भारतातल्या प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोन आणि इशा अंबानी यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होतीच.

काय मग मंडळी, आता तुमच्याही मनात पुढच्या वर्षीच्या ‘मेट गाला’च्या थीमविषयी उत्सुकता वाटतीय की कोणता भारतीय कलाकार कोणत्या वेषात दिसणार याची काळजी?

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?