गजा पाटील ‘सरंजामे ग्रुप’चा मालक होण्याबद्दल झी मराठी होतीये झकास ट्रोल! वाचा मजेशीर कमेंट्स
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
“तुला पाहते रे” ही मालिका म्हणजे अगदी सुरुवातीला श्रीमंत उद्योगपती विक्रांत सरंजामे व चाळीत राहणारी अल्लड बाला ईशा निमकर यांची वयातील अंतर पार करणारी प्रेमकथा होती.
प्रारंभीचे १००च्या वर एपिसोडस या “वय विसरायला लावणाऱ्या” प्रेमात घालवल्यानंतर मात्र मालिकेची पटकथा अगदी लक्षणियरित्या बदलली.

‘सरंजामे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज’ साठी रक्ताचं पाणी करून कष्ट करणाऱ्या विक्रांत सरंजामे या नावाचा मुखवटा बाजूला होऊन एक वेगळाच चेहरा समोर यायला लागला, ज्याचं नाव – गजा पाटील.
ईशा हीच पूर्वजन्मातील राजनंदिनी असल्याच्या अनेक खुणाच मालिकेतून दिसायला लागल्या. आणि गजा पाटलाची व राजनंदिनी सरंजामे यांची प्रेमकहाणी म्हणजे विक्रांत सरंजामे आणि ईशा निमकर यांच्या प्रेमकथेचाच जुना भाग मालिकेत सुरू झाला
हा गजा पाटील म्हणजे लोकांना लुबाडून रोजच्या गरजा भागवणारा पण मोठ्ठी स्वप्ने पाहणारा एक तरुण. एके दिवशी त्याला रिक्षात राजनंदिनी दिसते आणि पाहताच त्याला लक्षात येतं की ही बडे बाप की बेटी आहे. आणि तिला पटवण्याचा निर्धार करून तो पुढची पाऊले रचतो.
यानंतर मालिकेत घडत जाणाऱ्या गोष्टी म्हणजे लॉजिक ची ऐसी तैसी आहेत. केवळ गजा पाटलावर विश्वास ठेवून राजनंदिनी जालिंदर सोबतचं कॉन्ट्रॅक्ट मोडते, त्याच्यासोबत वडापाव खाताना तो तिला पाणी पाजतो आणि ही त्याच्या प्रेमात पडते.

हा एकंदरीत प्रकार बघितल्यावर प्रेक्षकांचा मात्र चांगलाच हिरमोड झाला आहे. यामुळे प्रेक्षक समाज माध्यमावर तीव्र प्रतिक्रिया नोंदवत आहे आणि चॅनलच्या पेजवर गजा पाटील ह्या पात्राला ला ट्रॉल करत आहेत . काही प्रतिक्रिया वाचताना हास्यविकाराने तुमच पोट दुखेल, इतक्या त्या निखळ आहेत.
आम्ही खास तुमच्यासाठी काही निवडक प्रतिक्रिया घेऊन आलो आहोत..
रसिका काळे ह्या या मालिकेच्या नियमित प्रेक्षक आहेत, सध्या मालिकेच्या कथानकात चालू असलेल्या गोंधळावर भाष्य करताना मालिकेचे पटकथाकार असलेल्या के.डी यांना चांगलीच फटकार लगावली आहे.
शिल्पावती ह्यांनी उपहासात्मक पद्धतीने मालिकेच्या रटाळपणावर भाष्य केले आहे.
आदि दिक्षित ह्या वाचकाने तर पहिल्या भेटीत प्रेम होतच कसं काय ? असा प्रश्न उपस्थित करत खिल्ली उडवली आहे.
स्मिता कदम यांनी मात्र सिरीयल मध्ये चालू असलेल्या घटनाक्रमाहून समाजात चालू असलेल्या स्त्रियांच्या फसवणुकीवर भाष्य केलं आहे.
संदीप मोरे यांनी मालिका बघून चाळीशी ओलांडलेल्या पुरुषांना हि पुन्हा प्रेम करायची संधी आहे का याची चाचपाणी केली आहे !!
स्नेहल कदम ह्यांनी तर मालिकेच्या असंबंध व काल्पनिकतेच्या सर्व पायऱ्या ओलांडणाऱ्या कथानकाच्या रटाळपणावर अत्यंत उपहासात्मक पद्धतीने टीकास्त्र सोडले आहे
रमेश पोफळे ह्या प्रेक्षकाने तर कथानकाच्या विचित्रपणावर आणि पात्रांच्या वयोमानाचा विचार करण्याच्या पटकथाकाराने न घेतलेल्या तसदीबद्दल चांगलीच फटकार लगावली आहे.
प्रभा अण्णावतुल्ल्ला ह्यांनी ईशा आणि राजनंदिनीच्या घटक्यात प्रेमात पडण्याचा प्रकार विचित्र असल्याचं मत नोंदवलं आहे !
स्नेहा दाभोळकर यांनी तुला पाहते रे मालिकेचे निर्माते हवेत असल्याची प्रतिक्रिया नोंदवली आहे.
या कमेंट्स व्यतिरिक्त अनेक कमेंटस असून ज्यातून प्रेक्षकांनी मालिकेचे वाभाडे काढले आहेत !!
अश्या प्रकारे झी मराठी वरील एकेकाळी लोकप्रिय मालिकेच्या कथानक आणि रटाळवाण्या घटनाक्रमावर उपहासात्मक टीका केली आहे आणि पटकथाकाराला धारेवर धरलं आहे , वाचकांनी मात्र ह्या मनोरंजनाचा मनसोक्त आनंद लुटावा !!
आणखी मजेदार कमेंट्स वाचायच्या असल्यास झी ची मूळ फेसबुक पोस्टवर नक्की वाचा…! ही घ्या लिंक!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
Useless
Tya Ghadge sadan che hi kara kahitari ..pagalchale lawlet tyanni
K D चें पटकथा लेखन खूप च बेताल आहें. हा माणूस एक दिवस झी मराठीला रसातळाला नक्कीच पोहचवणार ….
Flashback madhye ata RN VS peksha mothi vatatiye ..serial lavkar sampavaychi ashya hetune may me kami logic mandala Jat asava..nahitar itki husshar industrialist mulgi itkya patkan Vishwas tevne ashakyach.