' अमेरिकी गुन्हेगारी विश्वावर अधिराज्य गाजवणारा खरा ‘गॉडफादर’ : अल कपोन – InMarathi

अमेरिकी गुन्हेगारी विश्वावर अधिराज्य गाजवणारा खरा ‘गॉडफादर’ : अल कपोन

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

इतिहासात अनेक गुन्हेगार होऊन गेले. अमेरिकेत प्रत्येक शहरामध्ये एका प्रसिद्ध गुन्हेगाराचा इतिहास असतोच असतो, शिकागो शहरावर राज्य करणारा अल केपोने हा त्यांच्यापैकीच एक.

शिकागो शहरावर या गुन्हेगाराने अनेक वर्ष अधिराज्य गाजवले.

तो या शहराच्या इतिहासातील सर्वात प्रसिद्ध गुन्हेगार म्हणून ओळखला जातो. त्याने या शहरावरती राज्य जरी गाजवलेले असेल तरी तो त्या शहराचा मात्र नव्हता. त्याचा जन्म इटलीतील एका नामांकित घरामध्ये झाला होता.

त्याला त्याच्या घरामध्ये कुठल्याही गोष्टीची कमतरता नव्हती पण काही कारणास्तव त्याचे आईवडील त्याच्या दोन भावांना घेऊन १८९४ न्युयाँर्क या शहरांमध्ये स्थायिक झाले.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

त्याकाळी या शहरामध्ये घुसखोरीचे प्रमाण खूपच वाढले होते. इटालियन, ज्यू ही लोक शहरांमध्ये अवैधरित्या येऊन वास्तव्य करत असत.

त्यांना शहरांमध्ये येऊन पाच वर्ष झाली होती. ते गरिबीत दिवस जरी कंठत असले तरी त्यांचा संसार स्थिरस्थावर चालू होता.

काही दिवसांनी तेरेसा हिला दिवस गेले आणि तिने १७ जानेवारी १८९९ रोजी अल याला जन्म दिला.

 

 

तेव्हा अनेक प्रकारच्या दिव्यांना सामोरे जात त्या इटालियन दाम्पत्याने आपल्या तीनही मुलांच पालन पोषण केले.

त्यांचे कुटुंब आता झोपडपट्टीमध्ये राहत नव्हते ते अशा ठिकाणी राहायला आले होते या ठिकाणी आजूबाजूला सर्व ठिकाणी मदिरालय होती.

त्यांना त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी नेहमीच पैशाची कमतरता जाणवत असे आणि अशा वातावरणात केपोने वाढत असल्यामुळे तो लहानपणापासूनच घरी काही मदत करता येईल का याचा विचार करत असे.

तो घरच्यांना आर्थिक दृष्ट्या मदत करण्याचा विचार करत असे,

सहाव्या इयत्तेत असताना त्याने शाळा सोडण्याचा निर्णय घेतला.

तो तसा हुशार विद्यार्थी होता पण घरच्या वातावरणामुळे त्याच्यावरती योग्य संस्कार झालेले नव्हते, असे त्याच्या शिक्षकांचे म्हणणे होते. तो अनेक वेळेस अनेक विषयांमध्ये नापास होत असे.

हे ही वाचा – भारतातील या ८ सर्वात भयंकर सिरीयल किलर्सच्या सत्यकथा तुमची झोप उडवतील

 

al capone inmarathi

 

ही त्यांच्या आयुष्यातील पहिली घटना होती त्यावेळी त्याने मारामारीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला होता. त्याचे आयुष्य पुढे जात राहिले. असेच काही प्रकार त्यांच्या आयुष्यामध्ये घडत होते.

जेव्हा तो तरुण झाला त्यावेळी त्याच्या परिवाराने ठरवले की आता आपण चांगले आयुष्य जगले पाहिजे म्हणून त्यांनी त्यांचं वास्तव्य ब्रुकलीन येथे हलवले. पण यामुळे त्याचा संबंध मात्र अनेक प्रकारच्या गुन्हेगारांशी आला.

केपोनेची त्याच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणजेच त्याच्या बायकोशी भेट झाली. त्याची आणि त्याच्या बायकोची इथेच मैत्री झाली!

ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले, या कालावधीमध्ये तो काही क्लबच्या बाहेर अंगरक्षक म्हणून काम करत असे.

पण या कामांमध्ये त्याला अपेक्षित मिळकत मिळत नसे, म्हणून काही दिवसांनी हे काम करत असताना तो एका गुन्हेगारी टोळीच्या संपर्कात आला. मग तो बेधडकपणे गुन्हे करत गेला.

सुरवातीला तो सिगरेट चोरण्यासारखे लहान गुन्हे करत असे कधीकधी तो मोठ्या गुन्हेगारांसोबत फिरत असे. त्यामुळे त्या लोकांचा त्याच्यावरती प्रभाव पडत गेला.

या गुन्हेगारांचं पण एक वेगळा विश्व असतं. जो सर्वात कणखर आणि बुद्धिमान असेल त्यालाच ते मोठ्या कामगिरीमध्ये जोडून घेत असत.

त्यानंतर त्या सर्वांची त्यांच्या परीने परीक्षा घेतली जात असत आणि जर या परीक्षेमध्ये तो उत्तीर्ण झाला तर मग त्याला लहान मोठी गोष्टी करण्याची परवानगी मिळत असे!

आणि जो जेवढी जबाबदारी उचलू शकतो त्याच्यावरती तेवढीच जबाबदारी टाकली जात असत.

 

al capone 2 inmarathi

 

अल कॅपोन हाही या सर्व प्रक्रियेला सामोरे गेला. त्याची ओळख जॉनीशी झाली. जाँनी शिकागो मधला एक प्रसिद्ध गुन्हेगारच होता. जॉनी त्याच्याकडे अनेक जबाबदाऱ्या नेहमीच देत असत.

जेव्हा जॉनीने १९०९ मध्ये ब्रूकलिन आणि शिकागो सोडायचा निर्णय घेतला त्यावेळी तेथील सर्व जबाबदारी त्याच्यावरतीच सोडून दिली होती. आणि अशाच प्रकारे जॉनी त्याच्यासाठी गॉडफादर झाला.

जॉनीने त्याची ओळख कुख्यात गुन्हेगार फ्रांकी याले याच्याशी करून दिली होती.

या गुन्हेगाराने त्याला एक नोकरी देऊ केली जी त्याने आनंदाने स्वीकारली. तो त्याच्या बार टेंडरच्या कामांमध्ये निष्णात होता. यालेने खूष होऊन त्याला बढती दिली होती.

एकदा त्यांच्या बारमध्ये काही गुंड आले. ते गुंड शहरातील एका नामवंत टोळीसाठी काम करत असत त्यावेळी अल आणि त्या टोळीमध्ये भांडणं झाली. अल ने त्याच्या सामर्थ्याच्या जोरावर त्या टोळीला नेस्तनाबूत केले.

तेव्हापासून अल याला शहरामध्ये एक वेगळीच ओळख मिळाली. त्याला शहरातील सर्व टोळ्या घाबरु लागल्या.

पण या झटापटीमध्ये त्याला तीस टाके पडले. हे सर्वच्या सर्व ३० टाके नेमके त्याच्या चेहऱ्यावरती आल्यामुळे त्याचा चेहरा विद्रूप दिसू लागला. त्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर लोक घाबरू लागली.

 

al kapone inmarathi

हे ही वाचा – गॉडफादर : खिळवून ठेवणारे एक भयानक सूडनाट्य

पण, त्याला तुझ्या चेहऱ्यावर ती टाके का पडले असे विचारायची शहरात कुणालाही हिंमत नसे एवढी त्याची दहशत निर्माण झाली होती.

आधी सांगितल्याप्रमाणे तिथेच त्याला त्याचे खरे प्रेम मिळाले. ते दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले काही दिवसांनी त्यांना अपत्य देखील झाले त्याचे नाव अल्बर्ट फ्रान्सेस कापोने असे ठेवण्यात आले.

काही दिवसांनी त्याने त्याचे ब्रूकलिन शहर सोडले आणि तो बाल्टिमोर शहरामध्ये आला. त्याने त्याच्या अनुभवाच्या जोरावरती एक साधारण नोकरी मिळवली. या नोकरीवर तो रोज सर्वसामान्य माणसाप्रमाणे लक्ष देत असे.

इकडे याच वेळी टोरीयो, त्याचा जुना मार्गदर्शक त्याच्या काकांकडे शिकागो शहरासाठी हुज्जत घालत होता. टोरीयो याचे काका शिकागो शहराचे प्रसिद्ध गुन्हेगार होते. काही दिवसांनी त्याच्या काकांचे निधन झाले.

टोरीओ  शहरातील सर्वात मोठ्या टोळीचा म्होरक्या झाला आणि त्याचा उजवा हात अल! आणि येथूनच त्याचा खरा प्रवास चालू झाला. त्याने अनेक टोळ्यांचा नायनाट केला.

टोरीओ  याची काम करण्याची पद्धत मात्र वेगळी होती. त्याला विध्वंसापेक्षाही चर्चा करून प्रश्न सोडवायला जास्त आवडत.

त्याने आपल्या काम करण्याची पद्धत मात्र तीच ठेवली. त्याने दमदार काम केले. भरपूर कमाई केली आणि वर्षभराच्या आतच तो टोरिओच्या व्यवसायात भागीदार झाला.

 

capone-inmarathi

 

पण, त्यांचे अनेक शत्रू झाल्यामुळे ते त्यांच्या जिवाला घाबरून वागत असत.

त्याने अनेक वेळेस टोरिओला समजून सांगायचा प्रयत्न केला पण त्याने सावधानता न बाळगल्यामुळे त्याच्यावरती हल्ला झाला आणि काही वर्षांमध्येच तो परत निघून गेला.

त्यांनी त्यांच्या भागाचा सर्व व्यवसाय अलला सुपूर्त केला परत इटलीला गेला. आणि अशा रीतीने अल देशातील सर्वात मोठ्या गुन्हेगारी टोळीचा सर्वेसर्वा झाला.

त्यांचा व्यवसाय फार मोठा होता, त्याने अनेक पद्धतीने सर्वसामान्यांपर्यंत त्याचा व्यवसाय पोचवण्याचा प्रयत्न यशस्वी केला.

त्यानंतर मात्र त्याने मागे वळून बघितले नाही त्याने शहरातील बऱ्याच महत्त्वाच्या उद्योगांवरती स्वतःचे अधिपत्य गाजवण्यास सुरुवात केली होती.

त्याने शहरातील प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वतःबद्दल एक भीती निर्माण केलेली होती.

त्याने काही दिवसांनी विचारपूर्वक अन्नछत्र चालू केली. ज्यामुळे गरिबांना मोफत अन्न पुरवले जाऊ शकेल. त्याच्या या कामामुळे त्याला लोक रोबिंनहुड म्हणून ओळखू लागले.

तो सर्वसामान्यांची काम चुटकीसरशी करून देत असे. त्यामुळे लोकांचा त्याच्यावरती विश्वास वाढत चालला होता त्याची वाढती लोकप्रियता पाहून इतर गुन्हेगारांनी ही त्याच पद्धतीने काम करण्यास सुरुवात केली.

यावरून, अनेक वेळेस त्याचे आणि इतर गुन्हेगारांचे खटके उडत असत.

 

al capone bounty inmarathi

 

१९२९ मध्ये त्याच्याकडे मशीन गन सापडली. त्यामुळे पोलिसांनी काही महिन्यांसाठी त्याला अटक केली. सुटका झाल्यानंतर तो मियामी येथे निघून आला. मियामी येथे असताना त्याने पोलीस युनिफॉर्मचा वापर करून तेथील काही गुन्हेगारांना फसवण्यामध्ये यश प्राप्त केले.

काही वर्षांनी त्याने त्याच्या टोळीला संपूर्ण देशभरात पसरवण्यामध्ये यश प्राप्त केले.

त्याने त्याच्या कार्यशैलीने प्रत्येक शहरातील प्रत्येक उद्योगांमध्ये आपली माणसे नेमली. यासोबतच तो गुन्हेगारी क्षेत्रातील बादशहा म्हणून ओळखला गेला होता.

 

तो अनेक वेळी राजकीय व्यक्तींना मदत करत असे. त्यामुळे त्याला प्रत्येक क्षेत्रातील दिग्गज माणसं घाबरून असत.

त्याच्या वयाच्या ४८ व्या वर्षी त्याला एक आकस्मात विकार जडला आणि २५ जानेवारी १९४७ रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

हे ही वाचा – “माफिया” थरार दाखवणाऱ्या “गॉडफादर” मधील जीवनाचे “हे” धडे प्रत्येकाने शिकणं अत्यावश्यक आहे!

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?