होय! बौद्धिक संपदा कायद्याने आपल्या नावावर करून घेता येते..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

लेखक : प्रसन्न जकातदार

===

दर वर्षी २६ एप्रिल हा दिवस जागतिक बौद्धिक संपदा दिवस (world intellectual property day) म्हणून साजरा केला जातो.

दैनंदिन जीवनावर असलेला बौद्धिक संपदेच्या प्रभावा बद्दल जागरूकता निर्माण करणे तसेच सर्जनशीलता आणि कल्पकतेला प्रोत्साहन देणे हा यामागील उद्देश.

समाजाच्या प्रगतीमध्ये अशा लोकांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस. २६ एप्रिल या दिवसाची यासाठी निवड करण्याचं कारण हे कि विश्व बौद्धिक सम्पदा संस्था ची स्थापना १९७० साली आजच्या दिवशी झाली.

जीवनात अनेकदा पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराईट असे शब्द आपल्या कानावर पडत असता. पण आपल्यापैकी अनेकांना याची कल्पनाही नसते की या सर्व एक प्रकारच्या संपदा (प्रॉपर्टी) आहेत ज्याला बौद्धिक संपदा म्हटले जाते. (Intellectual Property).

 

Intellectual Property inmarathi
small.com

साधारणतः जेव्हा जेव्हा प्रॉपर्टी ही संज्ञा येते तेव्हा त्या सोबतच मालकी हक्क ही एक संज्ञा जोडलेली असते. जर एखादी गोष्ट तुमची संपत्ती असेल तर त्यावर तुमचा मालकी हक्क असतो.

साधारणतः प्रॉपर्टी ही मूर्त (टँजिबल) स्वरूपात असते असे आपण समजतो, जसे की तुमचा बंगला, वाहन किंवा टीव्ही. हीच गोष्ट मानाने केलेल्या निर्मिती साठी सुद्धा लागू पडते.

आपल्यापैकी बऱ्याच जणांना याची कल्पना नसते की प्रॉपर्टी अमूर्त (इंटॅनजीबल) स्वरूपात पण असू शकते.

ही मनाची निर्मिती संशोधन, साहित्य, कला किंवा उद्योग क्षेत्रात वापरले जाणारे लोगो, नावे किंवा चित्र या स्वरूपात असू शकते. आपण आपल्या मनाच्या निर्मितीचा मालकी हक्क पण घेऊ शकतो.

जेणेकरून आपण त्याचा वापर आपल्या मनानुसार करू शकतो (अर्थातच जर ते कायदा मोडणारे किंवा दुसऱ्याला ती कल्पना वापरण्यापासून अटकाव करणारे नसेल तर !)

 

intellectual property
chinalaw.com

अशा प्रकारचे हक्क प्रदान करण्याची दोन प्रमुख कारणे आहेत. एक हे की ज्या व्यक्तीने त्या गोष्टीसाठी मेहनत घेतली आहे आणि वेळ दिलेला आहे त्याला त्याचा काही मोबदला मिळावा.

आणि दुसरे म्हणजे अश्या प्रकारे काही आर्थिक मोबदला मिळत असेल तर इतर व्यक्ती आणि संस्थांना संशोधन आणि कल्पकतेसाठी प्रोत्साहन मिळते.

अशा प्रकारच्या संपदेला नैतिक आणि आर्थिक अशा दोन प्रकारचे मूल्य असते. ही संपदा त्या व्यक्तीने कोणाला आर्थिक फायद्यासाठी विकली तरी याचे नैतिक अधिकार कायम त्या व्यक्तीकडेच राहतात.

बौद्धिक संपदा अधिकारांची व्याप्ती बरीच मोठी आहे. यात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो हे आपण आता पाहू.

साहित्य, कला तसेच संशोधन क्षेत्रातील काम (जसे की पुस्तके, लेख) कॉपीराईट च्या कायद्याअंतर्गत संरक्षित करता येतात. कला सादरीकरण (प्रस्तुती), त्याचे प्रक्षेपण अशा गोष्टी कॉपीराइट्स च्या रिलेटेड राईट्स अंतर्गत संरक्षित करता येतात.

संशोधन (जसे कि नव्या प्रकारचे इंजिन) पेटंट च्या कायद्याअंतर्गत संरक्षित करता येतात. औद्योगिक रचना (इंडस्ट्रिअल डिझाइन्स) हे इंडस्ट्रिअल डिझाइन्स च्या कायद्याअंतर्गत संरक्षित करता येतात.

 

petant inmarathi
locgroup.com

त्याच प्रकारे ट्रेडमार्क, सर्विस मार्क, लोगो आणि औद्योगिक नावे, भौगोलिक संकेत (जिऑग्राफिकल इंडिकेशन्स) हे देखील विविध कायद्यांअंतर्गत संरक्षित करता येतात.

औद्योगिक क्षेत्रातील अनफेअर कॉम्पेटिशन्स रोखण्यासाठीही बौद्धिक संपदा कायद्याअंतर्गत तरतुदी आहेत. जागतिक स्तरावर काम करणाऱ्या अनेक कंपन्यांना बौद्धिक संपदेचे महत्व समजलेले आहे. विकासासाठी बौद्धिक संपदा हे सूत्र त्यांनी अवगत केले आहे.

याउलट भारतीय लोकांमध्ये प्रचंड सर्जनशीलता असूनही भारत यात पिछाडीवर आहे. ह्या प्रकारच्या प्रॉपर्टी विषयी जागरूकता नसणे हेच त्याचे प्रमुख कारण.

जागतिक महासत्ता बनण्यासाठी वाटचाल करणाऱ्या भारताला या गोष्टीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. स्टार्टअप इंडिया सारख्या उपक्रमांमध्ये बौद्धिक संपदा हा विषय मोलाची भूमिका बजावू शकतो.

यामुळेच औद्योगिक क्षेत्र, विद्यापीठे यांमधील बुद्धिजीवी लोकांना तसेच इतर क्षेत्रांमधील कल्पकतेला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे याप्रकारे देशाच्या विकासात त्यांचे योगदान महत्वाचे ठरेल यात शंका नाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?