' भारतातील या पहिल्या 'कनेक्टेड कार' मध्ये एवढे काय खास आहे? वाचा..

भारतातील या पहिल्या ‘कनेक्टेड कार’ मध्ये एवढे काय खास आहे? वाचा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लेखक : हर्षल नाईक 

===

काल ह्युंदाई कंपनीने त्यांची ४ मीटर पेक्षा लहान पहिली SUV ‘व्हेन्यू’ दाखवली. ठीक आहे, पण त्यात एवढे विशेष काय?

अनेक ठिकाणी (इंटरनेट वर) या कारबद्दल अर्धवट किंवा गोंधळात टाकणारी माहिती समोर येत असल्याने ही छोटीशी माहितीपूर्ण पोस्ट लिहितोय..

१) ह्युंदाई व्हेन्यू ही पहिली कार आहे जी एकाच दिवशी भारत आणि अमेरिका या दोन्ही देशात मीडिया समोर सर्वप्रथम दाखवली गेली.

काल १७ एप्रिल रोजी भारतात गोव्याजवळ समुद्रात एका बोटीवरील कार्यक्रमात ही कार मीडियाला दाखवली गेली; तर अमेरिकेत न्यूयॉर्क ऑटो शो मध्ये. म्हणजेच भारत हे किती महत्वाचे मार्केट आहे, हे समजले असेल.

२) व्हेन्यू ही “भारतातील पहिली कनेक्टड कार” आहे, ज्यामध्ये आजवर भारतात न बघितलेले अनेक अत्याधुनिक फीचर्स असतील.

 

hyundai suv inmarathi
www.google.co.in

 

म्हणूनच अमेरिकेत ही कार दाखवताना ह्युंदाई ने म्हटले आहे “Big things in small package”. तसेच या कार मध्ये एयर प्यूरीफायर सुद्धा असणार आहे.

३) भारतात व्हेन्यूचे मार्केटिंग एक “प्रीमियम स्मॉल SUV” असे केले जात आहे, तर याउलट अमेरिकेत तिचे मार्केटिंग “तरुणांसाठी पहिली कार” म्हणजेच “Millennial’s 1st car” असे केले जात आहे. कारण अमेरिकेत ४ मीटर पेक्षा लहान SUV विशेष लोकप्रिय नाहीत.

४) व्हेन्यू च्या अमेरिकन मॉडेल मध्ये विविध प्रकारचे ड्राईव्ह मोड असतील जे भारतातील व्हेन्यू मध्ये नाहीत.

५) भारतातील व्हेन्यू मध्ये मागे बसलेल्या प्रवाशांसाठी एअर कंडिशनिंग असेल जे अमेरिकन मॉडेल मध्ये नसेल.

६) अमेरिकन मॉडेल ड्युअल टोन रंगांमध्ये उपलब्ध असेल जे भारतीय मॉडेल मध्ये सुरुवातीला बहुतेक नसेल.

 

Hyundai suv inmarathi
hundai.in

७) अमेरिकन मॉडेल मध्ये भारतीय मॉडेल पेक्षा जास्त सुरक्षा प्रणाली असतील.

८) व्हेन्यू मध्ये प्रथमच मागील लाईट साठी Lenticular lens हि आधुनिक प्रणाली वापरली जाणार आहे, जी आजवर कोणत्याही कार मध्ये नाही. ही सुविधा भारतीय मॉडेल मध्ये असेल कि नाही ते आता सांगता येणार नाही.

९) अमेरिकेत या कारला व्हेन्यू २०२० म्हणून ओळखले जाईल तर भारतात व्हेन्यू २०१९.

१०) व्हेन्यू भारतीय बाजारात मे २०१९ मध्ये दाखल होईल तर अमेरिकन बाजारात डिसेम्बर २०१९ पर्यंत.

११) भारतीय मॉडेल ला ३ वर्षांची वॉरंटी असेल तर अमेरिकन मॉडेल ला ५ वर्षांची.

 

suv inmarathi
consumerreports.org

१२) शेवटी सगळ्यात महत्वाचे: Venue is India’s 1st connected car असे ह्युंदाई कंपनी जे म्हणतेय त्याचा अर्थ काय?

तर या कार मध्ये ह्युंदाई ची Bluelink technology नावाची इलेक्ट्रॉनिक सुविधा असणार आहे. म्हणजेच या कार मध्ये एक inbuilt SIM कार्ड असणार आहे जे मोबाइल नेटवर्क वर काम करेल.

म्हणून कार चे GPS location सुद्धा नेहमी आपल्याला दिसू शकेल. समजा कार चोरीला गेली तरीसुद्धा GPS च्या मदतीने कार सहज शोधात येईल. (भारतात हि सुविधा खूप गरजेची आहे). तसेच कार चोरीला गेल्यास तिचे इंजिन मोबाईल फोन द्वारे बंद करू शकता.

किंबहुना जर आपली कार इतर कोणी जागेवरून ढकलून किंवा क्रेन ला बांधून हलवण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला मोबाईल फोन वर लगेच समजेल. याला GeoFencing म्हणतात.

Voice Recognition च्या मदतीने तुम्ही कारला तोंडी आदेश देऊ शकतात, जसे आपण कोणत्याही आयफोन किंवा अँड्रॉइड फोन वर करतो.

समजा एखाद्या प्रचंड मोठ्या पार्किंग च्या जागेत तुम्ही ही कार उभी केली आहे आणि काही वेळानी जर ही कार आपल्याला सापडत नसेल तर मोबाईल वर ऍप द्वारे कार चे अचूक GPS location बघता येईल.

 

hudai inmarathi
hundai.in

कार मध्ये बसण्याच्या आधीच घरातूनही तुम्ही कार चे एंजिन, एअर कंडिशनिंग, हॉर्न, लाईट इ. अनेक फिचर चालू/बंद करू शकतात.

समजा तुम्ही कार इतर कोणाला वापरायला दिली असल्यास ती व्यक्ती आपली कार नक्की कशा प्रकारे / किती वेगात / नक्की कुठे चालवत आहे, ही सर्व माहिती मोबाईल वर लाईव्ह बघता येईल.

असे एकूण ३३ फीचर्स या Bluelink technology मध्ये असणार आहेत. कार घेतल्यापासून ३ वर्षे हि Bluelink सुविधा मोफत दिली जाणार आहे त्यानंतर मोबाईल सिमकार्ड प्रमाणे रिचार्ज द्वारे ही सुविधा वापरता येईल.

म्हणूनच ही कार भारतीय वाहन उद्योग क्षेत्रात एक मैलाचा दगड ठरणार आहे.

तुम्हाला कदाचित एक प्रश्न पडला असेल की अशाच सर्व सुविधा MG Hector या लवकरच भारतात येणाऱ्या चायनीज कार मध्ये पण आहेत जे सतत टीव्ही वर जाहिरातीत दाखवले जाते, तर मग हुंदाई व्हेन्यू ही भारतातील पहिली कनेक्टड कार कशीकाय?

याचे कारण आहे “भारतातील पहिली कनेक्टड कार” हा किताब मिळवण्यासाठी आणि मिरवण्यासाठी ह्युंदाई कंपनी एमजी च्या एक महिना आधीच आपली कार भारतीय बाजारात आणणार आहे, म्हणजेच २१ मे २०१९ रोजी.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?