' अमेरीकेच्या White House ची किंमत आपल्या राष्ट्रपती भवनापेक्षा कमी आहे !

अमेरीकेच्या White House ची किंमत आपल्या राष्ट्रपती भवनापेक्षा कमी आहे !

 

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

अमेरिका आणि भारताची तुलना करायची म्हटली तर साहजिकचं पारडं अमेरिकेच्याचं बाजूने झुकणार. अश्या अनेक गोष्टी आहेत ज्या या देशाला आपल्यापेक्षा सरस ठरवतात. अमेरिका जगातील महासत्ता म्हणून ओळखली जाते तर आपण महासत्तेच्या दिशेने वाटचाल करणारे एक राष्ट्र म्हणून ओळखले जातो. पण अशी ही सर्वांगसुंदर संपन्न अमेरिका एक गोष्टीमध्ये मात्र भारताच्या मागे आहे. काय? आश्चर्य वाटलं ना? चला म्हणजे कोणत्या तरी एक गोष्टीमध्ये आपण अमेरिकेला पिछाडीवर टाकलंच म्हणायचं !

ind-vs-america-marathipizza

स्रोत

दोन्ही देशांमधील सर्वात प्रतिष्ठीत इमारती म्हणजे भारताचे राष्ट्रपती भवन आणि अमेरिकेचे व्हाईट हाउस ! पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की भारताच्या राष्ट्रपती भवनाची किंमत अमेरिकेच्या व्हाईट हाउस पेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहे.

rashtrapati-bhavan-vs-white-house-marathipizza
Hatched या प्रॉपर्टी वेबसाईटने G-20 मधील सर्व देशांच्या प्रमुखांची निवासे किती किंमतीची आहेत याची एक यादी प्रसिद्ध केली. या यादीमध्ये सर्वात वरच्या स्थानावर आहे चीन देशाचे राष्ट्रपती क्झी झिनपिंग यांचे निवासस्थान! चीनच्या या राष्ट्रपती निवासाची किंमत आहे तब्बल २.६३ लाख कोटी रुपये!

china-presodent-house-marathipizza

स्रोत

आपल्या भारताचे राष्ट्रपती भवन या यादीमध्ये सातव्या क्रमांकावर आहे. भारताचे विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी राहत असलेल्या या निवासाची किंमत आहे ३२०० कोटी रुपये ! या खालोखाल अमेरिकेचे व्हाईट हाउस या यादीमध्ये १० व्या क्रमांकावर स्थित आहे. अमेरिकेच्या व्हाईट हाउसची किंमत आहे केवळ २५८ कोटी रुपये म्हणजे भारताच्या राष्ट्रपती भवनाच्या किंमतीपेक्षा कितीतरी पट कमी!

white-house-marathipizza

स्रोत

पाच एकर मध्ये पसरलेल्या आपल्या राष्ट्रपती भवनाच्या बांधकामामध्ये युरोपियन, मोघल आणि रोमन स्थापत्यशास्त्राचा प्रभाव पाहायला मिळतो. राष्ट्र्पती भवन ब्रिटीशांच्या काळात बांधले ले तेव्हा या निवासस्थानाला Viceroy House म्हटले जायचे.

राष्ट्रपती भवनाचे निर्माण H आकारामध्ये केले असून दरबार हॉलमध्ये लावण्यात आलेला २ टन वजनाचा झुंबर जगप्रसिद्ध आहे. तसेच राष्ट्रपती भवनामध्ये ९ प्रकारचे टेनिस कोर्टस, एक पोलो ग्राउंड आणि १४-होल्सचा गोल्फ कोर्स देखील आहे.

rashtrapati-bhavan-marathipizza

स्रोत

तुम्हाला या यादीमध्ये इतर देश कोणकोणत्या क्रमांकावर आहेत हे पाहायचे असेल Hatched World Leader House Property List या लिंकला भेट द्या.

हे देखील नक्की वाचा: राष्ट्रपती भवन: काही विलक्षण गोष्टी, भारतातील सर्वात मोठ्या निवासी इमारतीबद्दल!

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?