‘लॉकडाऊन’ची बंधने अंशत: शिथिल झाली तरी या ‘६ गोष्टी’ करण्याचा विचार सुद्धा करू नका!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

सॉरी, पण लॉकडाऊन संपला याचा अर्थ लगेच सगळ्या गोष्टी पूर्ववत झाल्या असे आता होणार नाही. कोरोना व्हायरसच्या या संसर्गकाळात जगभर लॉकडाऊनची स्थिती मोठया प्रमाणावर आहे.

लोकांचे आधीचे आयुष्य पूर्णपणे बदलले आहे. अगदी चालत्या घोड्याला खीळ बसावी तशी या चालत्या जगाला अचानक खीळ बसलेली आहे.

पूर्वी कधीही न अनुभवलेल्या स्थितीतून सध्या जग जात आहे. ही स्थिती अभूतपूर्व अशी आहे. लोकांचे आयुष्य जणू एका क्षणात गोठले गेले आहे.

अर्थातच लोक घरात बसून कंटाळलेले आहेत. ते हा लॉकडाऊन कधी उठेल याची वाट पाहात आहेत.

आपण कधी यातून बाहेर पडू आणि पूर्वीसारखं आयुष्य जगायला पुन्हा सुरूवात करू असे अगदी प्रत्येकाला वाटत आहे.

 

india lockdown inmarathi
gulf news

 

परंतु दुर्दैवाने हे सांगणे भाग पडत आहे, की आपल्याला सर्वानाच आता पूर्वीसारखं आयुष्य पुन्हा लगेच जगता येणार नाही. गोष्टी इतक्या सोप्या राहिलेल्या नाहीत आता.

कोरोना विषाणूच्या संसर्गाने जगाची, जगातील माणसाची, माणसांच्या वर्तनाची, त्याच्या व्यवस्थांची सारीच गणिते बदलून टाकलेली आहेत. ती पूर्ववत होणे आता एकंदरीतच कठीण आहे.

आणि एवढ्या लगेच तर नाहीच नाही.

जगभरात एकतर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अजूनही वाढतेच आहे. ती कमी होताना दिसत नाही. अशावेळी एकतर या लॉकडाऊनच्या वाढण्याची मानसिक तयारी आपल्याला करावी लागणार आहे.

 

corona outbreak inmarathi
india today

 

तरीही उम्मीदपे दुनिया कायम आहे म्हणतात त्याप्रमाणे प्रत्येक माणसाच्या मनात अजूनही आशेची ज्योत तेवते आहे, की ही परिस्थिती बदलेल आणि आपण पुन्हा पुर्ववत सगळ्या गोष्टी करायला लागू.

लोकं आपल्या प्रियजनांना भेटायला आसुसलेले आहेत. पर्यटनाला जायला आसुसलेले आहेत, पार्ट्या, गेटटुगेदर करण्यास आसुसलेले आहेत.

पण समजा लॉकडाऊन हटला तरी तुम्हाला या गोष्टी लगेच करता येणार नाहीत. करून चालणारही नाहीत. त्यामुळे लॉकडाऊन हटला तरी पुढील गोष्टी ताबडतोब करायच्या नाहीत हे लक्षात असू द्या.

 

१. लगेच कोणतेही गेटटुगेदर किंवा पार्टीचे आयोजन करू नका

 

people doing party inmarathi
hauterfly

 

जरी लॉकडाऊन उठला, तरी आपल्याला काही प्रमाणात सोशल डिस्टन्सिंग पाळतच राहावं लागणार आहे.

कोरोना व्हायरसचा प्रसार जरी कमी झाला तरी तो संपूर्णपणे नष्ट होण्याची स्थिती सध्या तरी दिसत नाहीए. अशावेळी या विषाणूचे वाहक कोणी ना कोणी अस्तित्वात असणारच.

तुमच्या पार्ट्या, गेट टुगेदर्स आणि एकत्र येण्याने या विषाणूचा प्रसार पुन्हा अधिक जोराने होण्याचा संभव आहे. त्यामुळे येत्या काळात या गोष्टी करताना शंभर वेळा विचार करूनच करा.

 

२. बारमध्ये जाऊन ड्रिंक्स इत्यादी घेणे

 

people at bar inmarathi
paul nevin photographer

 

जी गोष्ट गेटटुगेदर आणि पार्ट्यांची तीच गोष्ट बारमध्ये जाण्याची. तिथे अनेक प्रकारचे लोक येत असणार. बसत असणार.

अशावेळी कोरोना वाहक कुणी असेल, तर तुम्ही पुन्हा त्याचा प्रसार होण्यास मदत करणार. त्यामुळे सध्या तरी काही काळ तुम्हाला बारमध्ये बसून ड्रिंक्स एंजॉय करता येणार नाही.

ते तुम्हाला टाळावं लागणार आहे.

 

३. वारंवार हात धुणे थांबवू नका

 

hand wash inmarathi
YouTube

 

जरी लॉकडाऊन उठला, तरी जोपर्यंत कोरोना वायरसवर जगात नेमकी औषध, उपाय योजना किंवा लस शोधली जात नाही, तोपर्यंत सतत हात धुण्याची आताची सवय चालूच ठेवा.

विनाकारण आपल्या डोळ्यांना, चेहऱ्याला, तोंडाला अथवा नाकाला हात लावण्याची सवय कायमसाठीच सोडून द्यावी लागणार आहे.

आणि कोरोना जरी नष्ट झाला, तरी वारंवार नीट हात धुण्याची तुमची ही सवय तुम्हाला इतर संसर्गापासून देखील वाचवण्यास मदत करणार आहे.

आणि विनाकारण आजारी पडून डॉक्टर आणि दवाखाना यापासून तुम्हाला लांब ठेवणार आहे. लहान मुलांना आपण सतत स्वच्छतेचं महत्त्व पटवून देत असतो.

तेच आता आपल्यालाही नेहमी पाळावं लागणार आहे.

 

४. लॉकडाऊन उठल्या उठल्या धोका असलेल्या लोकांना भेटायला जाऊ नका

 

high risk corona inmarathi
stat

 

शक्यता आहे, की या काळात तुमचे काही नातेवाईक, मित्रमंडळी किंवा इतर परिचीत कोरोनाने किंवा इतर कारणाने आजारी असतील!

आणि तुम्ही त्यांना लॉकडाऊनमुळे भेटायला जाणे तुम्हाला शक्य झाले नसेल. अशांना त्यांची विचारपूस करण्यासाठी भेटायला जावसं वाटणं तुम्हाला साहजिक आहे.

परंतु कृपा करून ते करू नका. लॉकडाऊन उठल्यावर लगेच आपल्या आजारी परिचीतांना भेटायला जाऊ नका. त्यांची लांबूनच ख्याली खुशाली विचारा.

कारण आजाराचा संसर्ग वाढण्याची आणि तो तुम्हालाही होण्याची शक्यता राहणारच आहे.

जोपर्यंत कोरोनाविषाणू वरची लस शोधली जात नाही आणि ऍंटीबॉडी टेस्टींगची सोय सर्वत्र उपलब्ध होत नाही तोपर्यंत कोण कोरोना बाधित आहे नि कोण नाही हे सांगता येणार नाही.

 

५. परदेश प्रवासाचा विचारही सध्या करू नका

 

foreign tour inmarathi
destination ksa

 

अनेक पर्यटन प्रेमी लोक या लॉकडाऊनच्या काळात अस्वस्थ असतील. अनेकांचे आधी केलेले प्लॅन्स देखील बारगळले असतील. आणि ते लोक फिरण्यासाठी आतुर उतावीळ झालेले असतील.

परंतु लॉकडाऊन उठले तरी देशातल्या देशातही फार फिरण्याचे प्लॅन आखू नका. परदेशात तर अजिबात नको.

परदेश वाऱ्या आणि परदेशातून आलेल्या लोकांमुळेच हा विषाणू पसरलाय जगभर हे विसरू नका. विमान प्रवास तर अत्यंत धोकादायक आहे.

कारण विमान व्हेंन्टीलेशन व्यवस्था नसते. त्यामुळे कोरोना प्रसाराच्या सुरुवातीलाच जगभरात आधी विमानसेवा बंद करण्यात आल्या आहेत.

जोपर्यंत स्थिती पूर्णपणे निवळत नाही, आणि ती पुढचं वर्षभर तरी कमीत कमी निवळण्याची शक्यता दिसत नाही अजून. तोपर्यंत मोठ्या पर्यटनाचे बेत आखू नका.

 

६. आपले फेसमास्क्स फेकून देऊ नका

 

facemask inmarathi

 

लॉकडाऊन उठले, तरी कोरोना संपला अशी परिस्थिती नसेल. त्यामुळे आपले मास्क लगेच फेकून देऊ नका. शक्यतो त्याचा वापर काही महिने चालूच ठेवा.

शिवाय अचानक परिस्थिती काय वळण घेईल हे देखील अजून आपण ठामपणे काही सांगू शकत नाही. त्यामुळे मास्कचा वापर नियमित राहू द्या.

थोडक्यात, कोरोना संसर्ग हा पूर्णपणे केव्हा आणि कसा नष्ट होईल हे अजूनतरी निश्चित नाही. जगभर संशोधन चालू आहेत. औषधं आणि लशींचे प्रयोग चालू आहेत.

परंतु जोपर्यंत शंभर टक्के यशस्वी औषध सापडत नाही तोपर्यंत लॉकडाऊन उठले तरी बेफिकीर राहू नका, निष्काळजी राहू नका.

वरील सहा गोष्टींचे भान सतत राहू द्या. याचा अर्थ असा नाही, की सगळी परिस्थिती निराशाजनक आहे. आपण यातूनही बाहेर नक्की पडू याची सकारात्मक आशा जरूर मनात ठेवा.

मानवजातीने यापेक्षा भयंकर स्थितीतून मार्ग काढलेला आहे. संसर्गजन्य आजारांवर विजय मिळवलेला आहे.

त्यामुळे या संसर्गावरही लवकरच रामबाण औषध शास्त्रज्ञ शोधून काढतीलच यात काही शंका नाही. पण तोपर्यंत आपल्याला सावध राहून काही काळज्या घेणं गरजेचं आहे हे मनात बिंबवून ठेवा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?