' “जिवंत राहायचे असेल तर इस्लाम स्वीकार” : औरंगजेबाची क्रूर धमकी आणि शीख योध्दयाचे असामान्य बलिदान – InMarathi

“जिवंत राहायचे असेल तर इस्लाम स्वीकार” : औरंगजेबाची क्रूर धमकी आणि शीख योध्दयाचे असामान्य बलिदान

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

आपण देशासाठी, धर्मासाठी काहीही करू शकतो, अगदी आपला जीवही देऊ शकतो हे बोलणं वेगळं आणि तशी वेळ आल्यावर आपल्या बोलाण्यानुसार वागणं वेगळ. सुदैवाने, आपल्याला, आपल्या देशाला, भारताला प्राचीन काळापासूनच अनेक शूर वीर योद्ध्यांचा वारसा लाभलेला आहे.

आपल्या इतिहासात असे अनेक शूरवीर होऊन गेले ज्यांनी वेळोवेळी आपल्या प्राणांची बाजी लावून आपल्या देशाचं, आपल्या माणसांचं रक्षण केलं. त्यासाठी आपण कायम त्यांचे ऋणी आहोत. त्यांच्यामुळे आज आपण मोकळा श्वास घेऊ शकतोय.

आज पाहूया अशाच एका मूर्तिमंत शौर्याची आणि अद्वितीय त्यागाची कहाणी.

ह्या वीराने क्रूर मुघल सम्राट औरंगजेब ह्याच्या समोरही हार मानली नाही. आपल्या धर्माच्या रक्षणासाठी आल्या प्राणांची आहुती दिली. आजही त्यांच्या बलिदानाची आठवण श्रद्धेने आणि प्रेमाने काढली जाते. हे वीर होते शीख संप्रदायाचे नववे गुरु, “गुरु तेग बहादूर”.

 

guru teg inmarathi
www.hellotravel.com

गुरु तेग बहादूर ह्यांचा जन्म अमृतसर मध्ये झाला. त्यांचे वडील होते गुरु हर गोविंद साहेब. ह्याचं खरं नाव होतं त्याग मल. परंतु त्यांचे शौर्य पाहून त्यांचे वडील हर गोविंद आणि शिखांचे आठवे गुरु ह्यांनी त्यांना हे नाव दिलं होतं.

गुरु तेग बहादूर ह्यांना समाजकार्याची प्रचंड आवड होती. त्याकाळी, भारतावर मुघलांचे शासन होते आणि मुघल देशातल्या सगळ्या नागरिकांनी इस्लाम धर्म स्वीकारावा ह्यासाठी बळजबरी करीत होते.

आपल्या इस्लाम धर्माच्या प्रसारासाठी मुघल ते वाट्टेल ते करायला तयार होते. तेव्हाचा मुघल शासक होता, ओरांगजेब. औरंगजेबाच्या क्रौर्याचे किस्से तर सर्वश्रुत आहेतच.

त्यावेळी काश्मिरी हिंदुनी इस्लाम धरम स्वीकारावा अशी बळजबरी करण्यात येत होती, असे न केल्यास मुघल सैन्य नागरिकांचे हाल हाल करीत, त्यामुळे खचून जाऊन अनेकांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता, काही त्या मार्गावर होते. परिस्थिती वाईट होती.

तेव्हा गुरु तेग बहादूर ह्यांनी ह्या बळजबरीच्या धर्मांतराला कडाडून विरोध केला. खरंतर औरंगजेबाला टक्कर देण्याइतके त्यांच्याकडे पुरेसे मनुष्यबळही नव्हते ना इतर काही सुविधा होत्या तरी ते खचले नाहीत त्यांनी ह्या परिस्थितीचा सामना करायचे ठेरवले आणि धर्मान्तराचा तीव्र निषेध केला.

 

teg bahadur inmarathi
www.inmarathi.com

त्यांच्या ह्या पुढाकाराने अनेक सामान्य माणसांना धीर आला आणि त्यांनीही इस्लाम धर्म स्वीकारायला नकार दिला. ही बातमी जेव्हा औरंगजेबाला समजली तेव्हा तो संतापला. इस्लाम धर्माचा प्रसार करायचा तर अशा विरोधकांचा विरोध संपवणे आवश्यक होते त्यामुळे त्याने गुर तेग बहादूर ह्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्याचे फर्मान सोडले.

परंतु तेग बहादूर पक्के होते त्यांनी धर्मांतर करणार नाही असे कळवले. ठाम नकार दिला.

त्यावर औरंगजेब आणखी संतापला त्याने तेग बहादूर ह्यांचा नाना प्रकारे छळ केला. औरंगजेब बोलला,

“जर तुला जिवंत राहायचे असेल तर, इस्लाम धर्म स्विकारावाच लागेल.” त्यावर गुरु तेग बहादूर ह्यांचे उत्तर होते, “मी माझे शीर कापून देईन परंतु माझे केस कापू देणार नाही” त्यावर चवताळलेल्या औरंगजेबाने त्यांना देहदंडाची शिक्षा सुनावली आणि त्यांचे शीर कापण्याचा आदेश दिला.

तो दिवस होता २४ नोवेंबर १६७५. (काही इतिहासकारांच्या मते ते ११ नोव्हेंबर १६७५ रोजी शहीद झाले होते)

 

inmarathi.com

गुरु तेग बहादूर ह्यांच्या स्मरणार्थ, त्यांच्या त्यागाचे बलिदानाचे प्रतीक म्हणून २४ नोव्हेंबर हा दिवस शहीद दिवस म्हणून ओळखला जातो.

जिथे त्यांचे शीर उडवण्यात आले त्या जागेवर नंतर त्यांच्या अनुयायांनी गुरुद्वारा बांधला आज ती जागा शीशगंज गुरुद्वारा म्हणून ओळखली जाते, जिथे गुरु तेग बहादूर ह्यांचे अंतिम संस्कार करण्यात आले.

ती जागा म्हणजेच होय. गुरु तेग बहादूर ह्यांना “ हिंद कि चादर” असेही संबोधले जाते. त्यांच्या छायेखाली सगळे सुरक्षित आहेत अशी ह्यामागची भावना आहे. गुरु तेग बहादूर ह्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजकार्यात खर्च केले आणि जेव्हा धर्माच्या अस्मितेचा प्रश्न आला तेव्हा त्याच धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी आपल्या प्राणांची परवा न करता बलिदान दिले आणि शहीद झाले.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?