' अभिनय, दमदार फाईट-सीन्स ने तरुणाईला वेड लावणाऱ्या अजय देवगण बद्दल १० गोष्टी – InMarathi

अभिनय, दमदार फाईट-सीन्स ने तरुणाईला वेड लावणाऱ्या अजय देवगण बद्दल १० गोष्टी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

अजय देवगण, आपल्या अभिनयाच नाणं खणखणीत वाजवणारा एक गुणी अभिनेता. सगळ्यांचा आवडता, क्वचित कोणी असेल ज्याला तो आवडत नाही. आपल्या पदार्पणातच त्याने धुरळा उडवून दिला होता. आजवर त्याने कैक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्याच्या इंटेन्स लुक्स वर आजही तरुणी फिदा आहेत.

विशाल वीरू देवगन हे अजय देवगणचे संपूर्ण आणि खरे नाव, चित्रपट सृष्टीत येण्यापूर्वी त्याने आपले नाव बदलून अजय केले.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

त्याचे वडील फिल्म इंडस्ट्रीत प्रसिद्ध एक्शन डिरेक्टर आहेत आणि आई वीणा देवगण ह्या चित्रपट निर्मात्या आहेत.

अजयचा जन्म दिल्लीत झाला. सिल्वर बीच हायस्कूल आणि मुंबईच्या प्रसिद्ध मिठीबाई महाविद्यालयात त्याने आपले शिक्षण पूर्ण केले. आपल्या आजवरच्या कारकिर्दीत अजयचे नाव रवीना आणि कारीश्माशी जोडले गेले परंतु दोन्ही नाती जास्त काळ टिकली नाहीत आणि अजयने काजोलशी लग्न केलं.

 

Ajay-Devgn-and-Kajol InMarathi

 

अजय आणि काजोलची भेट झाली ती “हलचल” सिनेमाच्या सेटवर. परंतु तेव्हा त्यांचे आपसांत जास्त बोलणे झाले नाही मात्र “गुंडा राज” नावच्या दुसऱ्या  नेमापासून त्यांनी डेटिंगला सुरुवात केली. कालांतराने दोघांनी लग्न केलं.

आज त्यांन दोन गोंडस मुलं आहेत. एक चाहता म्हणून आपल्या आवडत्या कलाकाराबद्दल आपल्याला सगळी माहिती असावी अशी सर्वांचीच इच्छा असते.

 

Ajay-Devgn-family InMarathi

 

जर तुम्हीही अजय देवगणचे चाहते असाल तर हा लेख तुमच्यासाठी खास असणार आहे. कारण आज आम्ही तुम्हला सांगणार आहोत अजय देवगणशी संबंधित अशी काही रंजक माहिती ज्याबद्दल फारसे लोक जाणत नाहीत.

१) अजय देवगण चा पहिला सिनेमा कोणता ? तुम्ही म्हणाल “फूल और कांटे”

 

foolaurkate.com

पण नाही हे ह्या प्रश्नाचं खरं उत्तर नाहीये. हा अजय देवगणचा पहिला सिनेमा नाही. त्याने ह्यापूर्वी बापूंच्या “प्यारी बहना” ह्या १९८५ मध्ये आलेल्या सिनेमात मास्तर छोटू म्हणून बालकलाकाराची भूमिका केलेली आहे ज्यात मिथुन चक्रवर्ती ह्यांची प्रमुख भूमिका होती.

निर्माते दिग्दर्शक राकेश रोषण ह्यांनी आपला चित्रपट करण अर्जुन ह्यासाठी अजयला विचारले होते जी भूमिका नंतर शाहरुख खानने केली.

२) अजय देवगणला आतापर्यंत आपल्या दोन चित्रपटांसाठी उत्कृष्ट अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. पहिला चित्रपट ”जखम” आणि दुसरा “द लेजेंड  ऑफ भागात सिंग”

 

ajaydevgn-zakhm inmarathi
ndianexpress.com

३) अजय देवगणचा आजवरचा उत्तम अभिनय जमून आलेला सिनेमा म्हणजे संजय लीला भन्सालीचा “हम दिल दे चुके सनम” ज्यात त्याने नंदिनी म्हणजेच ऐश्वर्या रायच्या पतीची भूमिका साकारली होती.

परंतु संपूर्ण सिनेमाच्या शूटिंग दरम्यान ऐश्वर्या आणि अजय फार क्वचित संवाद घडला. त्यानंतर ह्या दोघांनी एकत्र दोन सिनेमे केले. एक डेविड धवनचा “हम किसीसे कम नही” आणि रितुपर्णो घोषचा “रेनकोट”.

त्यानंतर त्यांची चांगलीच गट्टी जमली. इतकी की, अजय हा बच्चन कुटुंबीयांव्यतिरिक्त पहिला बहेचा माणूस होता ज्याला अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नाची बातमी ठाऊक होती.

 

aishwarya-rai-ajay-devgan-inmarathihum-dil-de-chuke-sanam
pandolin.com

४) बाजीराव मस्तानी” ह्या सिनेमासाठी बाजीराव म्हणून संजय लीला भंसाली ह्यांची अजय देवगण ही पहिली निवड होती परंतु सिनेमाच्या एकूण मानधनाविषयी मतभेद झाले आणि अजयच्या ऐवजी बाजीराव म्हणून तिथे रणवीर सिंगची वर्णी लागली.

५) अजय देवगण दिसायला जरी गंभीर दिसत असला तरी प्रत्यक्ष आयुष्यात तो प्रचंड मिश्कील स्वभावाचा आहे. त्याला गंभीर सिनेमेसुद्धा फारसे आवडत नाही. त्याला हलके फुलके विनोदी चित्रपट आवडतात. खासकरून त्याचा खास मित्र रोहित शेट्टी बनवतो त्या प्रकारचे विनोदी चित्रपट.

 

Ajay-Devgn-1 InMarathi

 

६) रोहित शेट्टी आणि अजय देवगण बालपणापासूनच जिवलग मित्र आहेत. ते आपसांत जवळ जवळ सगळ्याच गोष्टी शेअर करतात. दोघांचेही वडील इंडस्त्रीतले नावाजलेले एक्शन डीरेक्टर्स होते. ह्या दोघांनी लहानपणी अनेक वाढदिवस एकत्र साजरे केले आहेत.

 

rohit-ajay-inmarathi
bollywoodmdb.com

७) अजय देवागानाने “यु मी और हम” चित्रपट दिग्दर्शित केला आहे. ज्यात त्याने आपली पत्नी काजोल बरोबर काम केले आहे. परंतु चित्रपट अत्यंत वाईट प्रकारे फ्लोप झाला आणि अजय देवगण चा फायनान्स धोक्यात आला.

८) अजय देवगणचा होम प्रोडक्शन आणखी एक सिनेमा ह्यापूर्वी येऊन गेलाय. तो म्हणजे “राजू चाचा” हा सिनेमा अजय आणि त्याचा भाऊ अनिल देवगण ह्यांनी एकत्र दिग्दर्शित केला होता. परंतु हा सिनेमासुद्धा बॉक्स ऑफिसवर फार काही कमाल करू शकला नाही.

अनिल देवगण हा अजयचा चुलत भाऊ आहे. अजयने अनिलच्या हाल-ए-दिल ह्या सिनेमात कमिओ रोल केला होता. ह्या दोघांच्या दिसण्यात इतक साम्य आहे कि बरेचजण त्याना सख्खे भाऊ समजतात.

 

youtube

९) अजय देवगण च्या आयुष्यात दोनच पूजनीय व्यक्ती आहेत ते म्हणजे त्याचे आई वडील. तो दररोज आपल्या आईवडिलांच्या पाया पडतो. त्याचे आपल्या आईबाबांवर नितांत प्रेम आहे.

१०)  द्रीष्यम सिनेमात अजय देवगणने जी भूमिका साकारली आहे ती भूमिका ह्यापूर्वी तमीळ भाषेतील चित्रपटात मोहनलाल आणि मल्याळम भाषेतील चित्रपटात कमल हसन ह्यांनी साकारली आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?