' प्राणी निसर्गासाठी किती महत्वाचे आहेत हे स्वतःच्या कृतीतून दाखवणारा अवलिया ‘मुंबईकर’! – InMarathi

प्राणी निसर्गासाठी किती महत्वाचे आहेत हे स्वतःच्या कृतीतून दाखवणारा अवलिया ‘मुंबईकर’!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक : प्रतिक कोसके

===

आपण नेहमीच म्हणजे अगदी शाळेत असताना पासून शिकत आलोय भूतदयेबद्दल. आपले शिक्षक आपल्याला हेच शिकवत आलेयत की प्राण्यांवर प्रेम करा त्यांचं रक्षण करा.

आपल्या पसायदानातही संत ज्ञानेश्वरांनी संदेश दिलाय. “भूतां परस्परे जडो मैत्र जीवांचे” शिवाय प्राणी आपल्या जीवनचक्रात किती महत्वाची भूमिका बजावतात हे सुद्धा आपण शिकलो आहोतच.

परंतु आपल्यापैकी किती जण ही शिकवण प्रत्यक्ष आयुष्यात पाळतात? क्वचितच. अशी माणसं अभावानेच आढळतात. आज आम्ही सांगणार आहोत अशाच एका पर्यावरणप्रेमी प्राणीमित्राची कहाणी.

हा मुंबईकर फारतर २७ वर्षांचा असेल पण त्यांने आजावर किमान दहा हजारांच्या वर प्राण्यांचे जीव वाचवले आहेत.

मुक्या जीवांना वाचवून त्यांचे पुनर्वसन करून, हा मुलगा जगासमोर आदर्श उदाहरण ठेवतोय आणि इतर मुंबईकरांना प्रेरित करतोय.

ही घटना आहे २०११ सालची जेव्हा मुंबई विहारच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या परिसरात एक कोब्रा आढळला.

तेव्हा पवन शर्मा नावाचा हा तरुण त्या नागाला वाचवायला धावला. त्याला हायड्रोफोबियाचा त्रास असल्याने त्याला तिथे जाण्याची परवानगी नव्हती तरी तो आपल्या गुडघ्यांवर त्या पाण्यात उभा राहिला.

एक क्षण तर असा आला कि तो तिथल्या युटीलिटी होल मध्ये पडता पडता वाचला.

 

pawan sharma snake inmarathi

 

त्या दिवशी पवनचा जीव थोडक्यात वाचला. परंतु पवनला त्याचे काहीही वाटले नाही पवनला त्या मुक्या जीवाला वाचवण्यात यश आलं हेच त्याच्यासाठी जास्त महत्वाच आहे.

ही तर एक छोटीशी घटना आहे ज्यातून आपल्याला पवनची त्याच्या कामावरची श्रद्धा आणि जनावरांबद्दलचं प्रेम दिसून येतं.

आजवर त्याने हजारांच्या संख्येत प्राण्यांना वाचवून त्यांचे पुनर्वसन केले आहे!

आणि मुंबईकरांपुढे आदर्श घालून दिला आहे की, मुंबई सारख्या शहरातही जिथे विकासाच्या नावाखाली मोठमोठ्या इमारती बांधल्या जातायत, जिथे हिरवळ संपुष्टात येत चाललीये अशा ठिकाणीही मनुष्य आणि प्राणी गुण्यागोविंदाने एकत्र नांदू शकतात.

आता पवनला हा छंद कसा लागला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर पावनला लहान पणापासूनच जंगली प्राण्यांवर आधारित डोक्युमेंट्री पहायची आवड होती आणि त्यातला पावाचा सर्वात आवडता भाग म्हणजे, रेस्क्यू ऑपरेशन.

तो नेहमी त्यातला नायकाच्या जागी स्वतःला कल्पायचा, ह्या डोक्युमेंट्री बघत असतानाच आपणही हे करू शकतो असा विश्वास त्याला वाटायला लागला होता. मात्र तशी संधी काही मिळत नव्हती.

आणि एक दिवस असा योग आलाच ज्याची पावन मनोमन आतुरतेने वाट पाहत होता, तेव्हा पावन केवळ १३ वर्षांचा होता.

तेव्हा त्याने केवळ एका अल्युमिनियमच्या हेंगरच्या सहाय्याने राजीव गांधी नाशनल पार्कच्या जवळ असलेल्या त्याच्या मुलुंडच्या सोसायटीत एका रसेल वायपर नामक सापाला पकडले.

 

pawan sharma 3 inmarathi
yourstory.com

 

त्या अत्यंत विषारी अशा सापाने तिथल्या मांजरीच्या पिल्लाला मारले होते त्यामुळे सोसायटीतील सगळ्यांचे मत असे होते की सापाला मारून टाकण्यातच शहाणपण आहे मात्र पवनने त्याची त्यातून यशस्वीरीत्या सुटका केली.

जेव्हा हे प्रकरण त्याच्या आईवडिलांना समजले तेव्हा साहजिकच इतर आईवडीलांप्रमाणे त्यांनी पवनला ह्या कामापासून परावृत्त करण्याचे भरपूर प्रयत्न केले.

ह्यात जनावरांशी थेट संपर्कात आल्याने जीवावर बेतू शकतं त्यामुळे ते काळजीत पडले होते.

त्याला त्यांची काळजी काळात होती त्यांना आपल्या सुरक्षेची काळजी आहे हे तो जाणून होता परंतु त्यांच्या मनात काहीतरी वेगळेच होते.

त्याने आपल्या मनाचे ऐकले आणि वायच्या १८ व्या वर्षात पाउल ठेवताच त्याने आपला एन जी ओ सुरु केला आणि त्याला नाव दिले “रेस्किंक असोसिएशन फॉर वाइल्डलाईफ वेल्फेअर (RAWW).

पवनने जेव्हा हे काम सुरु केले तेव्हा एक वेगळीच गंमत झाली.

पवनच्या घरापासून संजय गांधी नेशनल पार्क जवळच असल्याने त्याच्या कॉलनीत त्याला अनेकदा निरनिराळे साप सापडायचे, आणि प्रेत्येकवेळी जेव्हा पावन त्यांना पकडायचा तेव्हा तेव्हा लोकांना त्याच्या हेतूबद्दल शंका यायची.

त्यांना वाटायचं तो ह्या सापांची तस्करी वगैरे करतो की काय, तेव्हा ह्या अफवांना थांबवण्यासाठी त्याने महारष्ट्र फोरेस्ट डिपार्टमेंट च्या मदतीने हा एन जी ओ स्थापन केला आणि तिथून त्याला त्याच्या पुढच्या प्रवासात समविचारी प्राणीप्रेमी भेटत गेले ज्यांनी त्याला त्याच्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये मदत केली.

प्राण्यांना वाचवण्यासाठी प्रेम आणि प्रशिक्षण ह्या दोन्हीची गरज आह त्याची पवनला कल्पना होती त्यामुळे त्याने मुंबई फोरेस्ट डिपार्टमेंटची रेस्क्यू ऑपरेशन टीम जॉईन केली. प्रशिक्षण घेतानाच तो त्यांना मदतही करू लागला.

 

pawan sahrma 4 inmarathi

 

प्राणी, खासकरून वन्य प्राणी हे आपआपल्या जाणीवेनुसार वागतात त्यामुले त्यांना वाचवण्याच्या आणि सुरक्षित सोडून देण्याच्या ह्या एकूण प्रक्रियेत त्यांची नैसर्गिक वृत्ती समजून घेण्यासाठी खूप शांत आणि स्थिरचित्त असणे फार गरजेचे असते. पवनने आपल्या प्रशिक्षणा दरम्यान हरप्रकारे फोरेस्ट डिपार्टमेंटच्या लोकांची मदत केली.

अगदी पहिल्या दिवसापासूनच त्याने प्राण्यांना उत्तम आयुष्य देण्याच्या आपल्या प्रयत्नात स्वतःला झोकून देऊन काम करायला सुरुवात केली.

पवनच्या प्रशिक्षणाला आता जवळजवळ सहा वर्षे पूर्ण होतील. दरम्यान ह्या काळात त्याला दहा हजाराच्या वर प्राण्यांना वाचवण्यात यश आले आहे.

ज्यात बिबट्या, पक्षी, साप, मगर, आणि इतर सरपटणाऱ्या प्राण्यांचा समावेश आहे. दरवर्षी त्यांची टीम एक हजाराच्यावर प्राणी आणि पक्ष्याचे प्राण वाचवते. ज्यात महाराष्ट्र पोलीस आणि फोरेस्ट डिपार्टमेंट त्यांची मदत करतात. , पवनने याव्यतिरिक्त चार पांगोलिन्स, एक लुप्तप्राय आणि सर्वाधिक तस्करी केल्या जाणाऱ्या प्रजाती देखील वाचविल्या आहेत.

तसं पाहिल्यास प्राण्यांना पकडण्यापेक्षा जास्त चालेन्जिंग असते त्यांचे पुनर्वसन करणे, कारण त्यांना जेव्हा पकडल जातं तेव्हा त्यांची मेडिकल टेस्ट होते आणि त्यात सगळ ठीक आईल तरच त्यांना त्याच्या नैसर्गिक अवसात सोडलं जातं.

प्राण्यांना सांभाळण्यात वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होतात. प्राण्यांच्या डॉक्टरांना दाखवण्यासाठी पैसे लागतात. कधीतरी प्राणी जेव्हा जखमी असत्तात तेव्हात्यांच्यासाठी बेसिक मेडिकल किट आणि रुग्णवाहिकेची ची गरज पडते, दवाखान्याची गरज पडते ह्यासाठी पवन पैसे उभारतोय.

 

pawan sharma featured inmarathi

 

ह्याशिवाय एकीकडे प्राण्यांना वाचवत असताना पवनची ही संस्था नागरिकांना प्राण्यांबद्दल जग्रिक करण्यासाठीही कार्यरत असते.

त्यासाठी पवन माहितीपर वर्गही घेतो ज्याला मुंबईकरांकडून उत्तम प्रतिसाद लाभतो आहे. मध्यंतरी केरळ मध्ये जो पूर आला त्यातही पवन आणि त्याच्या टीमने तीनशेच्या आसपास प्राण्यांची सुखरूप सुटका केली आहे.

मुंबई आणि उपनगरातील त्याचे एकूण प्राणी पुनर्वसनाचे प्रयत्न पाहता ठाण्याच्या फोरेस्ट डिपार्टमेंटने त्याला वाईल्ड लाईफ वार्डन बनवले आहे.

पवन चा एन जी ओ  RAWW हा सुद्धा बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन च्या रेस्क्यू ऑपरेशन टीम चा एक महत्वाचा भाग आहे.

तर मंडळी आपणही आपल्या परीने ह्या उदात्त कार्यात आपला हातभार लावायला हवाय. प्राणांची जमेल तेवढी काळजी घ्यायला हवी. प्रत्येक मुंबईकराने ह्यापासून प्रेरणा घेऊन प्राण्यांचे अस्तित्व टिकवायला मदत केली पाहिजे.

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?