'यंदा मतदान करण्याआधी आपल्या ५७१ खासदारांचं हे रिपोर्ट कार्ड पहा आणि मगच निर्णय घ्या

यंदा मतदान करण्याआधी आपल्या ५७१ खासदारांचं हे रिपोर्ट कार्ड पहा आणि मगच निर्णय घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

परिवर्तनने बनवलेले १६ व्या लोकसभेतील ५४३ मतदारसंघातील गेल्या ५ वर्षांतील एकूण ५७१ खासदारांचे रिपोर्ट कार्ड आज प्रसिद्ध होत आहे. परिवर्तनने खास बनवलेल्या khasdar.info या वेबसाईटवर हे बघण्यासाठी उपलब्ध आहे.

सजग मतदार (informed electorate) ही प्रगल्भ लोकशाहीसाठी पूर्वअट आहे. मतदान करताना केवळ जाहिरातबाजी आणि घोषणांच्या भपक्यात मतदाराने वाहवत जाऊ नये, तर उमेदवाराने आधी केलेल्या कामाचा पूर्ण आढावा घ्यावा हे लोकशाहीत अपेक्षित आहे.

आणि म्हणूनच प्रत्येक खासदाराने निवडून आल्यापासून काय काय केले याचा एक वस्तुनिष्ठ लेखाजोखा आम्ही तयार केला आहे. २०१४ ते २०१९ या पाच वर्षांचा हा अहवाल आहे.

आम्ही हा खासदारांच्या कामाचा हा अहवाल बनवताना ५ निकष ठेवले-

१) खासदारांची लोकसभेतील एकूण उपस्थिती
२) खासदारांनी लोकसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नांची संख्या
३) लोकसभेत विविध विषयांवर, प्रस्तावित कायद्यांवर, अहवालांवर होणाऱ्या चर्चांमध्ये खासदारांच्या सहभागाची एकूण संख्या
४) खासदारांनी लोकसभेत स्वतंत्रपणे मांडलेल्या विधेयकांची संख्या
५) MP Local Area Development Scheme (MPLADS) या योजनेनुसार खासदारांनी वापरलेला निधी.

सर्व माहिती ही लोकसभेची अधिकृत वेबसाईट (loksabha.nic.in) व MPLADS ची वेबसाईट (mplads.gov.in) येथून घेतली आहे. २३ मार्च २०१९ पर्यंत वेबसाईटवर अपलोड असणारी माहिती या रिपोर्ट कार्डमध्ये दिसेल.

 

indian-parliament-inmarathi.jpg
indianexpress.com

व्यक्तिगत मतांवर अवलंबून राहण्यापेक्षा आम्ही प्रत्यक्ष आकडेवारीवर भर दिला. परिवर्तनने चांगले-वाईट, योग्य-अयोग्य अशी भूमिका घेणे हेतुतः टाळले आहे. जी काही आकडेवारी आणि माहिती अधिकृत वेबसाईटवर मिळाली तीच आम्ही वापरली आहे.

यामुळे मनातले पूर्वग्रह, एखाद्या विचारधारेशी असणारी बांधिलकी, राजकीय संबंध अशा गोष्टींचा परिणाम या अहवालावर होऊ नये याची काळजी घेतली गेली आहे.

फक्त वास्तव मांडण्याचा हा प्रयत्न आहे. योग्य-अयोग्य, चांगले-वाईट याचा निर्णय अंतिमतः मतदारांनी घ्यायचा आहे.

 

राष्ट्रीय सरासरीमहाराष्ट्राची सरासरी
लोकसभेतील उपस्थिती६८.६ %६९ %
लोकसभेत विचारलेले प्रश्न२५०५३३
लोकसभेतल्या चर्चांमध्ये सहभाग६४६८
लोकसभेत मांडलेली विधेयके
खासदार निधीचा वापर (कोटींमध्ये)१८१६

 

 • लोकसभेत सर्वाधिक उपस्थिती असणारे पहिले ५ खासदार :
भैरो प्रसाद मिश्राभारतीय जनता पार्टीबांदा (उत्तर प्रदेश)१००%
डॉ. कुलमणी समलबिजू जनता दलजगतसिंगपूर (ओडिशा)१००%
रमेश कौशिकभारतीय जनता पार्टीसोनीपत (हरियाणा)९९.७%
रतनलाल कटारियाभारतीय जनता पार्टीअंबाला (हरियाणा)९८.८%
राजेंद्र अगरवालभारतीय जनता पार्टीमीरत (उत्तर प्रदेश)९८.५%

 

 • लोकसभेत सर्वाधिक उपस्थिती असणारे महाराष्ट्राचे पहिले ५ खासदार
अरविंद सावंतशिवसेनामुंबई दक्षिण९७.९%
गोपाळ शेट्टीभारतीय जनता पार्टीमुंबई उत्तर९७.३%
डॉ सुनील गायकवाडभारतीय जनता पार्टीलातूर९६.१%
सुप्रिया सुळेराष्ट्रवादी कॉंग्रेसबारामती९५.८
राहुल शेवाळेशिवसेनामुंबई दक्षिण मध्य९५.८

 

 • लोकसभेत सर्वाधिक प्रश्न मांडणारे पहिले ५ खासदार :
सुप्रिया सुळेराष्ट्रवादी कॉंग्रेसबारामती (महाराष्ट्र)११९२
धनंजय महाडिकराष्ट्रवादी कॉंग्रेसकोल्हापूर (महाराष्ट्र)११८२
विजयसिंह मोहिते पाटीलराष्ट्रवादी कॉंग्रेसमाढा (महाराष्ट्र)११४१
राजीव सातवकॉंग्रेसहिंगोली (महाराष्ट्र)११२६
शिवाजी आढळराव पाटीलशिवसेनाशिरूर (महाराष्ट्र)११०७
 • लोकसभेत सर्वाधिक चर्चांमध्ये सहभाग घेणारे पहिले ५ खासदार :
भैरो प्रसाद मिश्राभारतीय जनता पार्टीबांदा (उत्तर प्रदेश)१९८७
पुष्पेंद्र सिंग चंदेलभारतीय जनता पार्टीहमीरपुर (उत्तर प्रदेश)१७७५
शरद त्रिपाठीभारतीय जनता पार्टीसंत कबीर नगर (उत्तर प्रदेश)६१०
पी.पी. चौधरीभारतीय जनता पार्टीपाली (राजस्थान)४४१
चंद्रप्रकाश जोशीभारतीय जनता पार्टीचित्तोडगड (राजस्थान)३८१

 

 • लोकसभेत सर्वाधिक चर्चांमध्ये सहभाग महाराष्ट्राचे घेणारे पहिले ५ खासदार :
श्रीरंग बारणेशिवसेनामावळ२९७
अरविंद सावंतशिवसेनामुंबई दक्षिण२७१
राजीव सातवकॉंग्रेसहिंगोली२३३
राहुल शेवाळेशिवसेनामुंबई दक्षिण मध्य२०३
डॉ किरीट सोमय्याभारतीय जनता पार्टीमुंबई उत्तर पूर्व१६२

 

 • लोकसभेत सर्वाधिक स्वतंत्रपणे विधेयके मांडणारे पहिले ५ खासदार :
डॉ निशिकांत दुबेभारतीय जनता पार्टीगोड्डा (झारखंड)४८
डॉ किरीट सोळंकीभारतीय जनता पार्टीअहमदाबाद पश्चिम (गुजरात)३७
गोपाळ शेट्टीभारतीय जनता पार्टीमुंबई उत्तर (महाराष्ट्र)३२
ओम प्रकाश यादवभारतीय जनता पार्टीपाली (राजस्थान)२८
पुष्पेंद्र सिंग चंदेलभारतीय जनता पार्टीहमीरपुर (उत्तर प्रदेश)२६

 

 • लोकसभेत सर्वाधिक स्वतंत्रपणे विधेयके मांडणारे महाराष्ट्राचे पहिले ५ खासदार :
शिवाजी आढळराव पाटीलशिवसेनाशिरूर२०
श्रीरंग बारणेशिवसेनामावळ२०
ए.टी नाना पाटीलभारतीय जनता पार्टीजळगांव१७
चंद्रकांत खैरेशिवसेनाऔरंगाबाद१६
पूनम महाजनभारतीय जनता पार्टीमुंबई उत्तर मध्य

 

 • खासदार निधीचा सर्वाधिक वापर करणारे पहिले ५ खासदार :
  (आकडे कोटींमध्ये)
जनार्दन सिंग सिग्रीवालभारतीय जनता पार्टीमहाराजगंज (बिहार)३१.४५
लक्ष्मण गिलुवाभारतीय जनता पार्टीसिंगभूम (झारखंड)२७.४८
टी.जी. वेंकटेश बाबूअण्णा द्रमुकचेन्नई उत्तर (तामिळनाडू)२६.८
छेदी पासवानभारतीय जनता पार्टीसासाराम (बिहार)२६.६
संध्या रॉयतृणमूल कॉंग्रेसमेदिनिपूर (प. बंगाल)२६.६

 

 • खासदार निधीचा सर्वाधिक वापर करणारे महाराष्ट्राचे पहिले ५ खासदार :
  (आकडे कोटींमध्ये)
डॉ किरीट सोमय्याभारतीय जनता पार्टीमुंबई उत्तर पूर्व२५.६१
रामदास तडसभारतीय जनता पार्टीवर्धा२३.५७
राहुल शेवाळेशिवसेनामुंबई दक्षिण मध्य२०.८८
पूनम महाजनभारतीय जनता पार्टीमुंबई उत्तर मध्य२०.६२
डॉ. श्रीकांत शिंदेशिवसेनाकल्याण२०.३९

 

 • खासदार निधीचा सर्वाधिक वापर झालेली ५ कामे-
  (आकडे कोटींमध्ये)
रेल्वे/रस्ते/पूल१०९२.६४
इतर कामे६५०.७१/-
शिक्षण२२२.७७
पाणीपुरवठा२१४.३९
विद्युतीकरण१८६.८६

 

 • एकूण ६५ खासदारांनी गेल्या ५ वर्षात एकही प्रश्न लोकसभेत विचारलेला नाही. त्यापैकी महाराष्ट्रातले खासदार.
 • एकूण ४१ खासदारांनी गेल्या ५ वर्षात एकाही चर्चेत सहभाग घेतलेला नाही. त्यापैकी महाराष्ट्रातले खासदार
 • एकूण ४२० खासदारांनी गेल्या ५ वर्षात स्वतंत्रपणे एकही विधेयक मांडलेले नाही. त्यापैकी महाराष्ट्रातले २७ खासदार

 

khasdar.info

या वेबसाईट सर्व खासदारांची माहिती उपलब्ध आहे. या वेबसाईटची लिंक अधिकाधिक लोकांपर्यंत पोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करावे, आणि लोकसभा निवडणुकीच्या या काळात अधिकाधिक मतदारांपर्यंत ही माहिती नेऊन जागरूकता निर्माण करण्याच्या कामात हातभार लावावा हे नम्र आवाहन.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?