' शून्यातून उद्योगसाम्राज्य उभं करणाऱ्या धीरूभाईंच्या या गोष्टी बरंच काही शिकवून जातात – InMarathi

शून्यातून उद्योगसाम्राज्य उभं करणाऱ्या धीरूभाईंच्या या गोष्टी बरंच काही शिकवून जातात

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारतात मोबाईल क्षेत्रात क्रांति घडवली ती एकमेव रिलायन्स या कंपनी ने! आणि आजही रिलायन्स जियो हे या क्षेत्रात यशाच्या शिखरावर विराजमान आहे!

 

 

आज मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी जरी वेगवेगळ्या क्षेत्रात असले तरी आज दोघांची नावं ही आजही आदराने घेतली जातात!

आणि या सगळ्या बिझनेसचा पाया रचला त्यांचे वडील धीरूभाई अंबानी यांनी!

आज भारतीय उद्योगक्षेत्रात टाटा, बिरला, रहेजा यांच्याबरोबरीनेच उद्योगपती धीरूभाई अंबानी यांच्या नाव प्रामुख्याने घेतले जाते.

 

ambani family inmarathi
thehindu.com

 

या माणसाने भारतीय उद्योगक्षेत्राला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आणि भारताला जगभरात ओळख मिळवून दिली. लोकांना एका वेगळ्या जीवनशैलीची ओळख करून देण्यात धीरूभाई यांच्या उद्योगांचा मोठा हात आहे!

त्या काळात आपल्यासारख्या सामान्यांना रिलायन्स ही फक्त मोबाईल विकणारी सेल्युलर कंपनी इतकंच माहीत होतं, पण त्याहीपलीकडे रिलायन्स इंडस्ट्रीज विविध क्षेत्रात अग्रेसर होती, अगदी शेती मध्ये सुद्धा!

आजही आपल्याला फक्त रिलायन्स जिओ ही मोबाईल कंपनी माहीत असली तरी त्याशिवाय त्यांचे बरेच उद्योग आहेत!

फक्त एका मोबाईल कंपनीच्या जीवावर अंबानी खानदान स्वस्थ बसलं असतं तर आज इतकी प्रगती त्यांना बघता आली नसती!

रिलायन्स उद्योगसमूहाचे संस्थापक एवढीच त्यांची आपल्याला ओळख आहे. त्या व्यतिरिक्त सर्व सामन्यत: लोकांना त्यांच्याबद्दल माहिती नाही.

चला तर मग जाणून घेऊया धीरूभाई अंबानी यांच्या जीवन प्रवासातील काही रंजक गोष्टी !

 

dhirubai ambani inmarathi
thewire.in

 

१. २८ डिसेंबर १९३२ रोजी गुजरातमध्ये भारताच्या या उद्योगरत्नाचा जन्म झाला. त्यांचे पूर्ण नाव होते धीरजलाल हिराचंद अंबानी ! त्यांचे वडील शिक्षक होते.

२. गिरीनार पर्वताच्या पायथ्याशी भाविकांना भजी विकत धीरूभाईंनी उद्योगपती होणाच्या स्वप्नमयी प्रवासाला सुरुवात केली.

३. वयाच्या १६ व्या वर्षी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर धीरूभाई आपले नशीब आजमावण्यासाठी येमेन देशामध्ये गेले.

तिथे त्यांनी गॅस स्टेशनवर दर महिन्याला ३०० रुपयाच्या पगारावर नोकरी केली.

 

dhirubhai-ambani-marathipizza02
businessworld.in

 

४. १९५८ साली धीरूभाई भारतात परतले. त्यांनी येमेन मध्ये केलेल्या नोकरीमधून ५०,००० रुपये जमवले होते. साठवलेल्या पैश्यांमधून त्यांनी आपल्या चुलत भावासोबत टेक्सटाईलचा व्यवसाय सुरु केला.

काही वर्षे एकत्र व्यवसाय केल्यानंतर वैयक्तिक मतभेदांमुळे दोघ जण विभक्त झाले आणि धीरूभाईंनी स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याच्या दिशेने पाऊले वळवली.

५. धीरूभाईंनी १९६६ मध्ये आपल्या नव्या व्यवसायला सुरुवात केली. त्यांनी आपले ऑफिस मस्जिद बंदरमधील नरसिंहनाथ रोडवर थाटले.

ऑफिस म्हणजे केवळ ३३ स्क्वेअर मीटरची एक खोली होती. त्यात फक्त तीन खुर्च्या, फोन लाईन आणि एक केबल होती.

६. १९७० मध्ये धीरूभाईंनी दक्षिण मुंबईमध्ये स्वत:चे घर खरेदी केले. तेव्हा त्यांनी त्या घरासाठी सुमारे १० लाख रुपये मोजले होते.

 

dhirubhai inmarathi
outlookindia.com

 

७. धीरूभाई मसाले, कापड आणि विविध वस्तू निर्यात करायचे पण त्यात त्यांना जास्त फायदा व्हायचा नाही. पण नायलॉन सारखी उत्पादने ते तब्बल ३००% नफ्यामध्ये आयात करायचे.

त्यांच्यातला अस्सल व्यावसायिक येथे दिसून येतो.

८. १९६२ साली त्यांनी रिलायन्स उद्योगसमूहाची स्थापना केली. या उद्योगसमुहा अंतर्गत धीरूभाईंनी १९७७ साली स्वत:ची पहिली कापड मिल सुरु केली आणि तिचे नाव विमल असे ठेवले.

त्यांनी हे नाव आपला पुतण्या विमल अंबानी याच्या नावावरून ठेवले होते.

९. १९८६ पर्यंत धीरूभाईंनी संपूर्ण शेअर मार्केटवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्यांचा रिलायन्स उद्योगसमूह भारतातील सर्वोच्च उद्योग समूहांमध्ये गणला जाऊ लागला.

याच वर्षी त्यांनी मुंबईमधील क्रॉस मेडेनमध्ये कंपनीच्या वार्षिक सभेचे आयोजन केले होते. या सभेला तब्बल ३,५०,००० लोकांनी हजेरी लावली होती. यावरून आपण अंदाज लावू शकतो की या माणसाने किती लोकांना आपल्या कंपनीशी जोडले होते.

 

reliance inmarathi
theceostory.in

 

४ जून २००२ रोजी या महान उद्योगपतीला हृदयविकाराच्या झटका आल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ते सुमारे एक आठवडा कोमामध्ये होते आणि अखेर ६ जुलै २०००२ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

धीरूभाई अंबानींनी उद्योगक्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल २०१६साली सरकारतर्फे त्यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार प्रदान केला गेला.

आज त्यांनी स्थापन केलेल्या रिलायन्स उद्योगसमुहाने देशामध्ये स्वत:चे साम्राज्य निर्माण केले आहे. १ लाखांपेक्षा जास्त लोकांना त्यांनी उभ्या केलेल्या या व्यवसायामुळे रोजगार मिळत आहे.

भारतातीलचं नाही तर जगातील एक यशस्वी कंपनी म्हणून जगभरात रिलायन्सचे नाव घेतले जाते.

 

dhirubhai-ambani-marathipizza05
indiatoday.in

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?