'ब्लॅक टायगर: पाकिस्तानी सैन्यात राहून गुप्तहेरी करणारा धाडसी RAW एजंट!

ब्लॅक टायगर: पाकिस्तानी सैन्यात राहून गुप्तहेरी करणारा धाडसी RAW एजंट!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

रवींद्र कौशिक नाव त्याचं! राजस्थानच्या श्री गंगानगरमध्ये एका पंजाबी कुटुंबात १९५२ साली त्याचा जन्म झाला.

बालपणापर्यंत त्याला नाटकाचं भयंकर वेड  होतं. अभिनय त्याच्या नसानसात भिनला होता. परंतु एके दिवशी लखनऊ मध्ये प्रयोग सदर करताना RAW या भारताच्या गुप्तहेर संस्थेच्या नजरेत तो आला आणि त्याच्या अवघ्या जीवनालाचं कलाटणी मिळाली.

त्याच्या उत्तम अभिनयाचा वापर आपल्या कामासाठी केला जाऊ शकतो याची RAW ला खात्री होती.

राष्ट्रीय नाटक स्पर्धेवेळी रवींद्रची एका RAW अधिकाऱ्याशी झालेली ओळख ते रवींद्रने पदवी शिक्षण पूर्ण केल्यापर्यंतच्या काळात तो RAW च्या अधिकचं जवळ गेला.

१९७५ मध्ये पदवीधर झाल्यावर रवींद्रने RAW मध्ये प्रवेश केला आणि रवींद्र कौशिक हा राजस्थानमधील लहानश्या गावातील एक तरुण RAW एजंट बनला.

येथून त्याचा जो प्रवास सुरु झाला तो थक्क करण्यासारखा आहे.

 

ravindra-kaushik-story-inmarathi

स्रोत

 

रवींद्र कौशिक उर्फ नबी अहमद हा भारताचा सर्वात विश्वसनीय आणि सर्वोत्तम स्पाय एजंट होता.

सुमारे तीन वर्षे त्याला कामगिरीसाठी RAW ने प्रशिक्षण दिले होते.

त्याची परतफेड म्हणून रवींद्रने पाकिस्तान आर्मीमध्ये प्रवेश मिळवला. त्याचा कोणालाच संशय आला नाही, उलट त्याची क्षमता पाहून पाकिस्तान आर्मीने त्याला मेजर हे पद बहाल केले होते.

इतकी हुबेहूब नक्कल वठवीत तो कित्येक वर्षे शत्रूच्या गोटात राहून देशाची सेवा करत होता.

RAW मध्ये भरती झाल्यावर वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी तो भूमिगत झाला. त्याच्या प्रशिक्षणा दरम्यान त्याने उर्दू भाषेचा अभ्यास केला. पाकिस्तान मधील लोकांची बोलण्याची लकब, त्यांच्या धार्मिक विधी, पाकिस्तानी आर्मीमधील पद्धती त्याने शिकून घेतल्या.

जेव्हा १९७५ साली त्याला पाकिस्तानला पाठवण्यात आले, त्यापूर्वी भारतातील त्याची सर्व ओळख पुसून टाकण्यात आली. भारताचा नागरिक म्हणून त्याचाशी संबंधित जेवढी काही माहिती होती ती पूर्णत: नष्ट केली गेली.

त्याला RAW ने एक नवीन ओळख दिली.

आता तो झाला होता पाकिस्तानचा नागरिक नबी अहमद शाकीर!

 

ravindra-kaushik-story-inmarathi

स्रोत

 

पाकिस्तानात गेल्यावर रवींद्रने सर्वप्रथम कराची विद्यापीठामधून कायद्याचा अभ्यास करण्यास सुरुवात केली आणि त्याचं पदवीच्या जोरावर त्यांनी पाकिस्तान आर्मीमध्ये प्रवेश केला.

तेथे त्याची कामगिरी पाहून त्याला मेजर पदावर बढती मिळाली. याच काळात त्याने इस्लाम धर्माचा स्वीकार करून तेथील अमानत नावाच्या एका स्थानिक मुलीशी लग्न देखील केले.

कालांतराने त्यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला. १९७९ ते १९८३ या काळात तो अतिशय गुप्तपणे पाकिस्तानच्या हालचाली भारतीय सैन्याला यशस्वीपणे पोहोचवत होता.

शत्रूच्या गोटात राहून स्वत:च्या जीवावर खेळत शत्रूची माहिती न चुकता पोचवणारे रवींद्र कौशिक त्यांच्या कामगिरीमुळे भारतीय संरक्षण खात्यामध्ये प्रसिद्ध झाले होते.

त्यांना सर्वजण ब्लॅक टायगर म्हणून ओळखत असतं. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी हे नाव त्यांना दिले होते.

पण १९८३ मध्ये जणू त्यांच्या या धाडसीपणाला कोणाची तरी नजर लागली. १९८३ साली RAW तर्फे इनायत मसीहा नावाच्या अजून एका अंडरकव्हर एजंटला नबी अहमदला भेटण्यासाठी पाकिस्तानला धाडण्यात आले. पण दुर्दैवाने त्याची ओळख उघड झाली आणि तो पाकिस्तानी सैन्याच्या हाती लागला.

पाकिस्तानी सैन्याच्या निर्दयतेपुढे त्याने हात टेकले आणि त्याने नबी अहमद उर्फ रवींद्र कौशिकचे सत्य त्यांच्यासमोर उघड केले.

रवींद्रला ताब्यात घेऊन जवळपास २ वर्षे त्यांच्यावर पाकिस्तानी सैन्याने नाना अत्याचार केले. रवींद्रची दिवसरात्र चौकशी केली, परंतु त्याने देशाबद्दल एक अक्षरही न काढत त्या नरकयातना भोगल्या.

तो काहीही सांगत नाही हे पाहून चवताळलेल्या पाकिस्तानने  १९८५ साली त्याला मृत्यूदंडाची शिक्षा फर्मावली, परंतु नंतर ही शिक्षा बदलून त्यांना आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली.

त्यांना अटक झाल्यापासून भारत सरकारने मात्र आपण त्याला ओळखत नसल्याचे सांगत हात झटकले.

 

ravindra-kaushik-story-inmarathi

स्रोत

 

शिक्षा सुनावल्यानंतर मियांवली, सियालकोट आणि न्यू सेन्ट्रल मुलतान अश्या विविध जेलमध्ये १६ वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर २००१ साली टीबी आणि अस्थमाच्या आजरामुळे त्यांचा मृत्यू झाला.

त्याच्या मृत्यूनंतरही भारत सरकारने त्यांचं शव घेण्यासही नकार दिला. भारताच्या नकारानंतर इस्लामीक विधीप्रमाणे पाकिस्तानातचं त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आजही भारताचा हा सर्वोत्तम गुप्तहेर न्यू सेन्ट्रल मुलतान जेलच्या भिंतीआडील कबरीमध्ये शांत निद्रेत पहुडला आहे.

कोणत्याही स्वार्थाविना केवळ आपल्या जन्मभूमीच्या सेवेसाठी प्राणांचे बलिदान देणारा हा ब्लॅक टायगर आजही पाकिस्तानात तैनात असणाऱ्या इतर गुप्तहेरांना निडर होऊन आपले कार्य पार पाडण्याची प्रेरणा देतो आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on “ब्लॅक टायगर: पाकिस्तानी सैन्यात राहून गुप्तहेरी करणारा धाडसी RAW एजंट!

  • April 4, 2017 at 9:35 am
    Permalink

    Is it true? They may also have sent same agents! If it is true then what a dedicated life, hats off to REAL Hero!

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?