' नवरदेवावर तलवार उगारणे तर कुठे कपडे फाडून टाकणे: लग्न लावण्याच्या अजब रिती

नवरदेवावर तलवार उगारणे तर कुठे कपडे फाडून टाकणे: लग्न लावण्याच्या अजब रिती

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपण भारतीय लग्न सोहळ्यांना खूप महत्व देतो. कैक महिने आधीपासून ह्या सोहळ्याची तयारी चाललेली असते. सगळे उत्साहाने होईल ती मदत करायला तयार असतात, सगळीकडे उत्साहाचे वातावरण असते.

खासकरून धूमधडाक्यात लग्न लावण्याकडे आपला जास्त कल असतो. मग त्यासाठी खर्चाची फिकीर केली जात नाही.

आनंदाची आणि पैशांची मुक्तहस्ते उधळण होत असते. हे सोहळे अविस्मरणीय व्हावेत असा एकूणच सगळ्यांचे मत असते.

परंतु तुम्हाला माहिती आहे का, की आपल्याकडे विवाहाशी संबंधित अशा काही रिती आहे, ज्यामुळे अशी काही धम्माल उडते की हा लग्नसोहळा कायम स्मरणात राहतो.

रिती त्याच असल्या तरी व्यक्तिपरत्वे त्यांच्या प्रत्येकवेळी नव्या आठवणी तयार होत जातात. भारत वेगवेगळ्या संस्कृतींचे माहेरघर असल्याने आपल्याकडे प्रत्येक जातीधर्मात लग्न संबंधित रीतीरीवाजांत वैविध्य बघायला मिळते.

 

Marraige-Effect-On-Health.Inmarathi.jpg

 

अगदी नवरदेवाचे जोडे लपवून ठेवण्यापासून नवऱ्यामुलाचा कान पिळेपर्यंत अनेक गमती-जमती आपल्याला लग्नात पाहायला मिळतात. आज बघूया अशाच काही गमतीदार चालीरीती, ज्या कदाचित तुम्हाला ठाऊकही नसतील.

 

१. मातीची भांडी डोक्यावर घेऊन नमस्काराची कसरत.

हा प्रकार म्हणजे संस्कारी सुनेची ओळख! ह्यामध्ये सासू नव्या नवरीच्या डोक्यावर एकावर एक मातीची भांडी रचते आणि मग अशा अवघडलेल्या अवस्थेत तिने सगळ्या वडील मंडळीना नमस्कार करावा लागतो.

 

pot ritual

 

केवळ पायांना हात लावून नव्हे तर चक्क कमरेत वाकून त्यांच्या पायाला स्पर्श करायचा असतो. नववधूला डोक्यावरची मातीची भांडी सांभाळून हे दिव्य पार पडताना बघणे रंजक असते.

तिने त्या मातीच्या भांड्यांचा समतोल साधला म्हणजे ती संसाराची जबाबदारी घेण्यास सक्षम आहे असा त्यातून अर्थ काढला जातो. खरतर ह्या दोन्हीचा आपसात काहीही संबंध नाहीये पण असं तिकडे मानलं जातं खरं.

 

२. टोमॅटो आणि बटाटे फेकून मारत वरातीचे स्वागत.

साधारणपणे वरातीचे स्वागत हार फुलांनी आणि आरती ओवाळून करताना तुम्ही पाहिले असेल परंतु, उत्तर प्रदेशातल्या कानपूर जिल्ह्यात नवरदेवाच्या स्वागताची आगळीच तऱ्हा बघायला मिळते.

 

Marraige-Effect-On-Health.Inmarathi.jpg

 

येथे नवऱ्यामुलाच्या कुटुंबाचे स्वागत मुलीकडची मंडळी टोमॅटो आणि बटाट्यांचा मारा करून केले जाते.

हा कार्यक्रम बराचवेळ चालतो. ही त्यांच्याकडची एक महत्वाची प्रथा आहे. असे मानले जाते की असे केल्याने पुढे एकत्र येणाऱ्या दोन कुटुंबातील संबंध आंबट न राहता प्रेमात परिवर्तीत होतात.

 

३. चक्क वर जातो लग्नातून पळून.

ऐकून आश्चर्य वाटले ना, पण हे खरे आहे. तमिळ ब्राम्हणांच्या विवाहांमध्ये ही महत्वाची प्रथा आहे. ज्यात नवरामुलगा लग्नाचे विधी सुरु होण्यापूर्वीच संन्याशी बनण्यासाठी मांडावातून पळ काढतो आणि वधूपिता त्याला अडवून त्याची मनधरणी करतो.

 

groom inmarathi

 

ह्या प्रथेमुळे काही काळ लग्नसोहळ्यात मोठे नाट्यमय वातावरण तयार झालेले असते.

 

४. पाय धुतलेले पाणी तीर्थ म्हणून प्यायले जाते.

ही विचित्र पद्धत आहे गुजराथी विवाहातील! ह्यात मुलीची आई मुलाचे नाक खेचते आणि नवऱ्यामुलाचे पाय दूध, मध, पाण्याने धुते.

 

kanyadan inmarathi

 

ह्या विधीला “मधुपर्क” म्हंटले जाते. नंतर ते पाणी तीर्थ म्हणून प्यायले जाते.

 

५. पंजाबी लग्नात होतो “जागो” चा गजर.

पंजाबी लोक प्रत्येक क्षणाचा आनंद घेतात. लग्नाच्या आधीच्या रात्री पाळली जाणारी ही प्रथा ह्याचे एक उत्तम उदाहरण आहे.

 

indian-wedding-article-inmarathi01

 

ह्या रीतीनुसार लग्नघरातले सगळे रात्रभर जागे राहून रात्रभर एकमेकांना “जागो ” म्हणत जागवत राहतात. खरेतर हा बहाणाच असतो पार्टी करण्याचा… परंतु जेव्हा स्त्रिया आपल्या डोक्यावर सजवलेली मातीची कळशी घेऊन त्यात सहभागी होतात तेव्हा खरी रंगत येते.

 

६. इथे होतात फक्त तीन फेरे.

मल्याळी लोक लग्नाच्या विधीसाठी सात फेरे न घेता ते फक्त तीनच फेरे घेतात.

 

shadi inmarathi

 

त्यांच्याकडे मंगळसूत्र म्हणजे पिवळा धागा. एकदा का हा धागा मुलाने मुलीच्या गळ्यात बांधला की त्यांचा विवाह झाला असे समजले जाते.

 

७. नवरी उगारते नवऱ्यावर तलवार

राजस्थानी “तोरण बंधन” ह्या रिवाजानुसार वधू आपल्या नवऱ्यावर तलवार उगारते, हो बरोबर वाचलेत. तलवारच! एक धारदार तलवार!

 

marriage05-marathipizza

 

असे करण्याचा हेतू असा, की नवरामुलगा पुरेसा निडर आणि चपळ आहे की नाही हे कळावे. नशीब हा केवळ रिवाज आहे, नाहीतर काही खरे नाही बिचाऱ्या नवरदेवाचे!

 

८. नवऱ्यामुलाचे कपडे फाडून टाकले जातात.

फारच विचित्र वाटले ना? परंतु या रीतीमागे मोठा अर्थ दडलेला आहे. येथे कपडे फाडून टाकण्याचा असा अर्थ घेतला जातो की जुने कपडे म्हणजे त्याचा भूतकाळ तो त्याने मागे टाकून द्यावा आणि नव्या आयुष्याच्या स्वागतासाठी सज्ज व्हावे.

 

wedding ritual

 

ही प्रथा म्हणजे निव्वळ धम्माल असते. ह्यात मूळचे कुटुंब आणि त्याची मित्रमंडळी त्याचे कपडे फाडून टाकतात.

 

९. विवाहात राजेशाही थाटासाठी वापरतात ध्वज

 

 

कुमाओनी विवाहांत, विवाह सोहळ्याला राजेशाही टच यावा म्हणून दोन्हीकडच्या बाजू दर्शवण्यासाठी मुलाकडचे आपल्या हाती “पांढरा” ध्वज घेतात आणि मुलीकडचे “लाल” ह्यातली  गम्मत म्हणजे परत येताना सगळे “लाल” ध्वजा पाठी एकत्र आलेले असतात

तर ह्या होत्या आपल्या भारतीय लग्नांतल्या काही रंजक रिती, तुमच्याकडे अशी कुठली धम्माल प्रथा आहे ?

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?