' तब्बल १४०० फुट उंचीवर झालेल्या, २००० सैनिकांचा बळी घेणाऱ्या थरारक युद्धाची कथा

तब्बल १४०० फुट उंचीवर झालेल्या, २००० सैनिकांचा बळी घेणाऱ्या थरारक युद्धाची कथा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

“चीन” लोकसंख्येत, प्रदूषणात, तंत्रज्ञानात अशा सर्व क्षेत्रात पुढे असणारा देश, सध्या ह्यांच्या स्वस्त मालाने कित्येक जणांच्या नाकी नऊ आले आहे परंतु तुम्हाला ठाऊक आहे का ह्याच चीनला आपण ह्यापूर्वी युद्धात सळो की पळो करून सोडले आहे.

हे सुद्धा एक कारण आहे की चीन भारतावर हल्ला करायला धजावत नाही हि घटना आहे, सप्टेंबर १९६७ सालची. तेव्हा आपण फारसे तुल्यबळ नसलो तरी  आता मात्र युद्धाच्या दृष्टीने इतरांच्या तोलामोलाचे आहोत.

तर  १९६७ साली भारताच्या उत्तरपूर्व भागातल्या “नाथू ला” येथे जो प्रकार घडला तो एकूणच अविश्वसनीय होता.

ह्या घटनेचा चीनमध्ये सहसा उल्लेख होत नाही परंतु भारतीय जनतेसाठी आणि भारतीय सैन्यासाठी ही कहाणी निश्चितच मोठी प्रेरणादायी आहे. बघूया काय आहे प्रसंग.

 

nathu la inmarathi
cntraveller.in

ह्या सगळ्या प्रकरणाची खरी सुरुवात झाली होती १९६२ साली जेव्हा तिबेटच्या वादामुळे चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी म्हणजे पी एल ए ने भारताच्या सीमेलगतच्या चीनव्याप्त भागातून भारताच्या उत्तर पूर्व भागावर (म्हणजे आताचा हिमाचल प्रदेश) हल्ला केला.

काराकोरमच्या डोंगराळ भागात जवळपास १४०० फूट उंचीवर लढलं गेलेलं हे युद्ध महिनाभराच्या आतच संपलं. त्यात सुमारे दोन हजारच्या आसपास सैनिकांच्या प्राणाची बाजी लागली होती. अखेर ह्या युद्धात चीन चा विजय झाला.

 पण १९६२ साली जरी आपण चीन कडून हरलो तरी इतिहास साक्षी आहे की त्यानंतर लगेच पाच वर्षांनी आपल्या शूरवीरांनी चीनला चांगलाच धडा शिकवला जो चीन कधीही विसरू शकणार नाही. भारत विजयी झाला होता.

ज्यावेळी भारत विजयी झाला ते वर्ष होते,१९६७. ह्यावेळी हे युध्द जिथे लढले गेले ते स्थान होते होते “नथू ला” पास.

जे तिबेट आणि सिक्कीमच्या सीमेवर असून सैन्याला आपली रणनीती आखण्याच्या हिशोबाने आतिशय महत्त्वाचे आणि उंच ठिकाण होते.

त्यावेळी सिक्किम भारतीय संरक्षणाखाली होते, त्यामुळे भारताने आपल्या सैन्याला इथे बाहेरील हल्ल्यापासून बचाव होण्याकरिता तैनात केले होते.

 

army-inmarathi
legendnews.in

ह्यामुळे चिडलेच्या चीनने भारताला १९६५ च्या युद्धादरम्यान सिक्कीम-तिबेट चे डोंगराळ रस्ते रिकामे करा असे बजावले.  परंतु असे करण्यास भारतीय लष्कराने नकार दिल्याने चीनने भारताला धमकावण्यास सुरुवात केली आणि भारतीय सीमेत चीनचे सैनिक घुसखोरी करू लागले.

१३  जून, १९६७ पेकिंग म्हणजे आताचे बीजिंगच्या भारतीय दूतावासातील दोन अधिकाऱ्यांवर चीनने हेरगिरीचे आरोप लावले आणि  तिथल्या इतर कर्मचाऱ्यांना सुद्धा तुरुंगात डांबले.

परंतु दिल्लीच्या चीनी दूतावासातील कर्मचार्यांना भारताकडून कसलाही त्रास देण्यात आला नाही. यानंतर काही दिवसांनी भारतीय दूतावासातील कर्मचार्यांना सोडून देण्यात आलं पण तोवर दोन्ही देशातील संबंध खराब झाले होते.

त्यानंतर पीएलए ने  सिक्कीम-तिबेट सीमेवर २९ लाउडस्पीकर लावून भारतीय सैन्याला १९६२ साली झालेल्या पराभवाची आठवण करून देत, धमक्या द्यायला सुरुवात केली.

तेव्हा भारताकडून ह्या सीमेवर तारेचे कुंपण घालण्याचे ठरवण्यात आले, जेणेकरून चीनी सैनिकांच्या घुसखोरीला आळा बसेल.

चीनी सैन्याला हे कुंपण मंजूर नव्हते. त्यांनी सीमेलगतच्या जमिनीवर खोदकाम करायला सुरुवात केली.  त्यामुळे पी एल ए चे अधिकारी आणि भारतीय लष्कराचे अधिकारी ह्यांच्या मोठा वाद झाला.

 

nathula inmarathi
holidaytravel.co

त्यानंतर काही दिवसांनी भारतीय लष्कराने पुन्हा आपल्या कुंपण घालण्याच्या कामला सुरुवात केली आणि पुन्हा चीनी सैनिकांनी भारतीय सीमेवर खोदकाम करायला सुरुवात केली.

ह्यावेळी त्यांच्याशी बोलणी करायला गेलेल्या भारतीय अधिकाऱ्याला चीनी सैनिकांनी गोळी घालून ठार केले आणि झालं, आपल्या अधिकाऱ्याला अशा अवस्थेत पाहून भारतीय सैन्याने चीनवर प्रतिहल्ला केला.

भारताच्या पर्वतारोही, राजपूत रेजिमेंट आणि ग्रेनेडीयर्सनी चीनच्या एम एम जी पोस्ट वर हल्ला चढवला आणि तोफगोळ्यांचा मारा करायला सुरुवात केली. दरम्यान तिथल्या परिसरातली चीनची प्रत्येक पोस्ट भारताने उध्वस्त करून टाकली होती.

“नथू ला” हा सपाट भूप्रदेश असल्याने येथे लपण्यासाठी जागा नव्हती त्यामुळे युध्द उघड्यावर झाले होते. पुढच्या तीन दिवसात चीनची एकूण एक पोस्त भारतीय सैन्याने बेचिराख करून टाकली होती.

आपल्या घुसखोरी बद्दल चीनने जेव्हा भारताची हि प्रतिक्रिया पाहिली तेव्हा भारताच्या साहसाने आणि ताकदीने थक्क होऊन चीनने पुन्हा धमक्या दिल्या आणि चीनी सैनिकांना चीनच्या स्वाधीन करण्याची मागणी केली.

अखेर भारताच्या सिक्कीम-तिबेट सीमेवर एक तात्पुरता युद्धविराम लावण्यात आला आणि तेव्हाचे सेना कमांडर सॅम माणेकशा ह्यांच्या उपस्थितीत आपापल्या मृत सानिकांच्या देहांना ताब्यात घेतले गेले.

 

nathula inmarathi
indiatoday.in

परंतु वाकड्या शेपटीच्या पी एल ए ने अजून हार मानली नव्हती. एके सकाळी त्यांच्या जवानांनी  “नथू ला” पास पासून जवळच असलेल्या “चो ला” पास येथे गस्त घालत असताना आपल्या काही भारतीय जवानांशी वाद घातला वाद चिघळत गेला आणि पुन्हा एकदा युद्धाला सुरुवात झाली, ह्यावेळी चीनी सैनिकांचा सामना झाला प्रसिध्द “ गोरखा रायफल्स” ह्यांच्याशी.

तेव्हा त्यांना कल्पनाही नसेल त्यांच्यापुढे काय वाढून ठेवलाय ह्याची. ह्यावेळी आपल्या मायभूमीवर पाय रोवून उभ्या असलेल्या भारतीय सैन्याने जीव तोडून भयंकर हल्ला केला आणि चीनी सैन्याची पार ऐशीतैशी करून टाकली.

“चो ला” पास इथलं हे युध्द पुढे दहा दिवस चाललं आणि पी एल ए ला हरवल्यावर थांबलाही.

गोरखा रायफल्सने आपल्या अचाट कामगिरीने चीनी सैनिकांना जवळजवळ तीन किलोमीटर मागे हाकलून लावण्यात यश मिळवल होतं. जे अजूनही तसचं आहे.  इथे आजाही भारतीय सैन्य तसच तैनात आहे जसं तेव्हा होतं.

 

indo china border
bbc.com

संरक्षण मंत्रालयाच्या मते दोन्ही युद्धांत, ८८ भारतीय जवान ठार आणि १६३ जवान जखमी झाले तर चीनच्या सैन्यापैकी ३४० सैनिक ठार झाले आणि ४५० सैनिक जखमी झाले.

तर अशाप्रकारे भारतीय सैन्याने चीनला चांगलाच धडा शिकवला आणि आपल्या मातृभूमीचे रक्षण केले. भारत एक शांतीप्रिय देश आहे स्वतःहून युध्द करत नाही परंतु जर कोणी छेडलंच तर सोडतही नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “तब्बल १४०० फुट उंचीवर झालेल्या, २००० सैनिकांचा बळी घेणाऱ्या थरारक युद्धाची कथा

  • April 2, 2019 at 10:19 pm
    Permalink

    1400 फुट उंचीवर चुकीचे आहे.14000 फुट उंची असली पाहिजे .

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?