' ‘मृत’ शरीर जतन करून ठेवण्याची ह्या गावातली ही “विचित्र प्रथा” ठाऊक आहे का? – InMarathi

‘मृत’ शरीर जतन करून ठेवण्याची ह्या गावातली ही “विचित्र प्रथा” ठाऊक आहे का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मृत्यूनंतर विविध धर्मांमध्ये विविध सोपस्कार सांगितली गेलेली आहेत. या सोपस्कारांमध्ये जागेनुसार बदल होत राहतात. मृत्यूनंतरही त्या व्यक्तीच्या शरीराला काही ठिकाणी जपून ठेवण्यात येते.

इजिप्तमध्ये तुम्हाला अशा प्रकारच्या अनेक पिरँमीड आढळतील, पण काही ठिकाणी अशी प्रथा आहे या मृत शरीरांना मृत्यूनंतर लगेच घरातून किंवा परिवारापासून लांब ठेवणे अशुभ मानले जाते.

आपण जाणून घेऊयात अशा काही ठिकाणांबाबत…

इंडोनेशियातील पहाडी भागात तरोजा नावाची जमात वास्तव्य करते. लोक मृत्यूनंतर मृत शरीर जपून ठेवतात जसे काही ते अजून जिवंत आहेत.

या भागातील जवळपास एक करोड तरोजा जमातीतील लोक राहतात.

त्यांच्यातील बरेच लोक दक्षिणेतील सुलावेसी या भागामध्ये वास्तव्य करतात. यांचा असा समज आहे की माणसाच्या मृत्यूनंतर त्याची आत्मा त्याच्या घरातच राहते. त्यामुळे ते मृत शरीरांना जपून ठेवतात.

 

Taroja Jamat InMarathi

 

जणू काही ती जिवंत माणसच आहेत. त्यांना ते खाऊ घालतात, त्यांना नवीन कपडे घालतात, त्यांना पाणी पाजतात, त्यांना सिग्रेट देतात. त्यांची त्वचा आणि मास खराब होण्यापासून वाचवले जाते.

या सर्व प्रक्रियेची सुरुवात ते ज्या दिवशी मृत्यू पावतात त्याच दिवशी होत असते.

त्यांच्या शरीरावर एक विशिष्ट प्रकारचं केमिकल लावले जाते. ज्यामध्ये फारमलडिहाइड आणि पाण्याचे मिश्रण मोठ्या प्रमाणात वापरले जाते.

या मृत शरीरातून येणारा दुर्गंध खूपच मोठ्या प्रमाणात असल्यामुळे घरातली मंडळी खूप मोठ्या प्रमाणावर वाळलेली झाडे साठवून ठेवतात आणि हि झाडे त्यांच्या शरीराच्या आजू बाजूला ठेवली जातात जेणेकरून त्यांच्या शरीरातील दुर्गंध बाहेर येऊ नये.

ही सर्व लोकं आपल्याला विकृत मानसिकतेचे वाटू शकतात पण त्यांच्याकडे गेल्या कित्येक पिढ्यांपासून हीच प्रथा पार पाडली जाते.

त्यांचा समज आहे की मृत्यू पावलेल्या माणसाचा आत्मा घरात तोपर्यंत राहतो जोपर्यंत त्याच्या शरीराची अंतिम क्रिया केली जात नाही.

त्यामुळेच ही लोक त्यांचे शरीर जपून ठेवतात. एका महिलेशी त्याबाबत संवाद साधला असता त्या म्हणाल्या की,

“माझ्या आईचा अपघाती मृत्यू झाला होता आणि मी मानसिक दृष्ट्या ते स्वीकारायला कधीही तयार नव्हते, आणि तिला लगेच आमच्या पासून वेगळं करन मला खरंच शक्य नव्हतं. त्यामुळेच कदाचित अशा प्रकारची प्रथा बनवण्यात आली असेल.”

 

dead body inmarathi
adelaidenow.com.au

 

या भागामध्ये आर्थिक चणचण नेहमीच भासत असते. त्यामुळे काही परिवारांना एवढा वेळ नक्कीच लागतो जेणेकरून ते त्यांच्या आप्तस्वकीयांचा अंतिम कार्य योग्य पद्धतीने करू शकतील एवढा पैसा जमा करता येईल.

इंडोनेशिया मध्ये एका अंतिम संस्काराला कमीत कमी ७००  मिलियन इंडोनेशियन रूपया एवढे पैसे लागतात आणि सवर्णांसाठी तीन ट्रीलियन रुपया एवढ्या प्रमाणात पैसा आवश्‍यक असतो.

साधारणपणे तरोजा जमातीतील शेवटच्या वर्गातील माणसाला महिन्याला एक मिलियन रुपया कमावणे ही फार अवघड बाब आहे.

इथे अंत्यसंस्कारासाठी ही बँकेकडून कर्ज घेण्याची आवश्यकता पडते. यामुळेच कदाचित मागच्या काही दिवसांपासून तरुण वर्ग शहरांकडे वळताना दिसत आहे.

जेणेकरून ते त्यांच्या आप्तस्वकीयांचा अंत्यसंस्कार तरी योग्य पद्धतीने करू शकतील.

या सर्व प्रक्रियेमध्ये सर्वात जास्त पैसा पान म्हशी खरेदीसाठी जास्त प्रमाणात जातो एका म्हशीची किंमत सात हजार डॉलर पासून तीस हजार डॉलरपर्यंत असते.

ही किंमत त्यांच्या आकारावर, रंगावर आणि त्यांच्या शिंगावर अवलंबून असते त्यांच्या डोळ्यांच्या रंगालाही या प्रक्रियेमध्ये अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे.

जरी लोकांचे अंत्यसंस्कार केले गेले तरी वर्षातून एकदा या लोकांना थडग्यामधुन बाहेर काढून त्यांची सेवा केली जाते. या प्रथेला या भागामध्ये “मानेने” असे नाव आहे. याचा अर्थ त्यांची सेवा करणे असा होतो.

पारंपारिक दृष्टिकोनातून ही प्रथा ऑगस्ट महिन्यामध्ये पार पाडली जाते.

 

taroja InMarathi

 

या प्रथेमध्ये मृत शरीरांना बाहेर काढण्यात येते. त्यांना नीट प्रकारे धुतले जाते. त्यांच्या शरीरावरील अळ्या, किडे, घान काढली जाते. त्यांना नवीन कपडे घातले जातात. त्यांना बाहेर फिरायला घेऊन जातात.

त्यांना त्यांची सिग्रेट दिली जाते.

तरोजा जमातीतील लोकांचा असा समज आहे की मेल्यानंतर आत्मा लगेच शरीर सोडत नाही. या प्रथेच्या अनुसार मृत शरीराचे सर्व नातेवाईक आणि मित्र या दिवशी त्यांना भेटण्यासाठी दुरुन येत असतात.

हा एक प्रकारचा उत्सव म्हणूनच पाहिला जातो. याचवेळी तरुण मुलांना त्यांच्या पूर्वजांची भेट घातली जाते. ही मुले त्यांच्या सोबत फोटो घेतात.

जेव्हा शरीरांना परत पहिल्या जागी ठेवल जात, तेव्हा त्यांचे मित्र आणि नातेवाईक त्यांना नवीन भेटवस्तू देतात उदाहरणार्थ नवीन घड्याळ चष्मा किंवा दागिने.

या सर्व प्रथेची सुरुवात इसवी सन पूर्व नवव्या शतकात झाल्याचे सांगण्यात येते.

हल्ली काही दिवसांपासून, ख्रिश्चन मिशनरी यांच्या इंडोनेशियातील वाढत्या प्रभावामुळे या भागांमध्ये या प्रथेमध्ये आता देवाची प्रार्थना आणि बायबलचे वाचनही होऊ लागले आहे.

खरं बघायला गेलं तर या जमातीचा शोध सोळाव्या शतकामध्ये डच मिशनर्‍यांकडून लावण्यात आला होता.

 

mummy inmarathi
idbackpacker.com

 

काही दिवसांपासून युरोपियन आणि ऑस्ट्रेलियन पर्यटक या प्रथेबद्दल जाणून घेण्यासाठी येथील स्थानिक लोकांसोबत वेळ घालवू लागले आहेत.

ही रहस्यकारी प्रथा गेल्या अनेक पिढ्यांपासून अविरतपणे चालू आहे आणि यात प्रत्येकजण उत्साहाने सहभागी होत असतो. याचमुळे कदाचित त्यांना आनंद मिळत असावा आणि हा आनंद त्यांना मिळत राहो एवढीच अपेक्षा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?